Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • औरंगाबाद - भारतातून निर्यात होणाऱ्या गुलाबावर कीड व राेग असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने या फुलांच्या अायातीवर निर्बंध घातले आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात गुलाब परदेशात निर्यात होतात. यापैकी तब्बल ९५ टक्के गुलाब एकट्या ऑस्ट्रेलियामध्ये पाठवले जातात. मात्र, अाता या देशाने घातलेल्या निर्बंधामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका गुलाब उत्पादक आणि निर्यातदार कंपन्यांना बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून रोज सरासरी चार ते पाच लाख गुलाबांची...
  October 30, 07:32 AM
 • औरंगाबाद- आमच्या वॉर्डाला पाणी का नाही सोडले? असे म्हणत १२ ते १५ जणांच्या टोळक्याने सिडको एन-५ येथील जलकुंभावरील ४ पाणीपुरवठा आणि व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना सोमवारी रात्री ११.३० ते १२.०० वाजेच्या दरम्यान मारहाण केली. यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळपासूनच शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन दिवसांपासून विद्युत दुरुस्ती आणि जलवाहिनी फुटण्याच्या प्रकारामुळे शहरात अाधीच पाण्याची बोंबाबोंब आहे. सोमवारी रात्री भीमसेन परदेशी, काशीनाथ राठोड तसेच...
  October 30, 07:03 AM
 • औरंगाबाद- नळावर पाणी भरण्याच्या वादातून लोखंडी फायटरने मारहाण करून खून करणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी जन्मठेप व प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पैठण तालुक्यातील नांदलगाव येथील रहिवासी अण्णासाहेब बनसोडे नळावर पाणी भरण्यासाठी गेले होते. या वेळी शेतीच्या जुन्या वादातून ३१ ऑगस्ट २०११ रोजी दुपारी सय्यद निसार सय्यद हबीब (३२), प्रकाश हरिश्चंद्र भुजंग (२९), अमोल रघुनाथ चाबुकस्वार (३५) आणि सय्यद हबीब सय्यद अहमद या चौघांसोबत बनसोडेचा वाद झाला....
  October 29, 10:08 AM
 • औरंगाबाद- चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा धारदार शस्त्राने खून करून दुचाकीवरून पळालेल्या पतीस मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. बाळासाहेब शिंदे (६५, रा. राजनगर) असे आरोपीचे नाव असून शनिवारी त्याला वलसाडजवळून (गुजरात) अटक करण्यात आली. नवीन सिमवरून मुलाला केलेल्या कॉलमुळे त्याला पकडणे शक्य झाले. महिनाभर तो भटकत होता. नवसारीजवळील डोंगरात त्याने फेकलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली. बाळासाहेब याने २५ सप्टेंंबर रोजी मध्यरात्री पत्नी ज्योतीची निर्घृण हत्या केली होती. शस्त्राने वार...
  October 29, 09:59 AM
 • सिल्लाेड - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने भाजप सरकारविराेधात सुरू जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे. या जनसंघर्ष यात्रेचे सिल्लाेड येथे आगमन हाेत असून दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आयोजित जाहीर सभेस काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. सिल्लोड येथे मंगळवारी (दि. ३०) होणाऱ्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त आयोजित सभेला उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन...
  October 29, 09:25 AM
 • औरंगाबाद- पुण्यात काही काळ अभियंता म्हणून नोकरी केलेल्या नीलेश अशोक वडमारे (२९, रा. कागदी वेस, बीड) याने नामांकित कंपनीत जागा असल्याचे सांगत ऑनलाइन जाहिरात देवून मराठवाड्यातील २०० तरुणांची ७ ते ८ लाख रुपयांची फसवणूक केली. त्यासाठी त्याने आस्था कन्सल्टन्सी नावाची बनावट कंपनीही सुरू केली होती. २५ ऑक्टोबर रोजी त्याला बीड येथून औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी दिली. २३ ऑक्टोबर रोजी स्कोडा कंपनीच्या एचआर विभागाला एक तरुणाने मेल पाठवून...
  October 28, 09:44 AM
 • औरंगाबाद- २०१५ मध्ये औरंगाबाद- हैदराबाद- तिरुपती ही सेवा सुरू केली. सेवा सुरू करतानाच ट्रूजेटने त्यांचे लक्ष्य तिरुपती- शिर्डी असे असल्याचे सांगितले हाेते. पूर्वी शिर्डीला विमानतळ नसल्याने प्रवासी औरंगाबादला उतरत होते. येथून त्यांना शिर्डीला जावे लागत. यात प्रवाशांचा बराच वेळ जातो. शिर्डी विमानतळ सुरू झाल्याने ट्रूजेटने थेट हैदराबाद-शिर्डी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादहून औरंगाबादला येणाऱ्या प्रवाशांमध्ये बहुतांश शिर्डीला जाणारे असतात. हैदराबाद-शिर्डी...
  October 28, 09:29 AM
 • शिवना - सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील शिवारात शनिवारी (दि. २७) सकाळी सातच्या सुमारास बिबट्याने तीन शेळ्या फस्त करत एका म्हशीच्या वगारीचा फडशा पाडला. अजिंठा-बुलडाणा राज्य रस्त्यावरील खोल पाणंद शिवारात इंदासींनीआई माता मंदिरावजवळ ही घटना घडली. वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. मागदरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक व्ही. बी. सपकाळ यांनी पंचनामा केला. शिवाय परिसरातील शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. शिवना शिवारातील ( गट क्र.२६८) दादाराव काळे व रवींद्र काळे यांच्या शेतात...
  October 28, 07:01 AM
 • करमाड - घरात धान्य नाही, गाेठ्यात गुरांना चारा नाही, विहिरीत पाण्याचा थेंब नाही म्हणून सरकारने दुष्काळ जाहीर करण्याची वाट न पाहता शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी, अशी मागणी सटाणा, गाढे जळगाव, देमणी वाहेगाव, शेकटा (ता. औरंगाबाद) येथील शेतकऱ्यांनी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे केली. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे औरंगाबाद तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना पाणीटंचाई, चाराटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत शनिवारी (दि. २७) पालकमंत्री डॉ. सावंत, जि. प....
  October 28, 06:55 AM
 • औरंगाबाद- डिजिटल इंडियाअंतर्गत देशभर जाहिरातीचे एलईडी लावायचे असून यात गुंतवणूक केल्यास दहा महिन्यांत दामदुप्पट मिळेल असे आमिष दाखवून सुमारे १० लाखांना गंडवल्याचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी गुरुवारी औरंगाबादच्या माय डायल डिजिटल एलईडी अॅड प्रा.लि.च्या ७ संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. यात ५०० गुंतवणूकदारांनी ४४०० आयडीद्वारे सुमारे १६ कोटींची गुंतवणूक केली असून त्यामुळे मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे. जटवाड्याचे अमोल प्रकाश मावस यांनी पोलिस आयुक्तांकडे ही...
  October 27, 08:17 AM
 • औरंगाबाद-दोन दिवसांपासून केंद्र सरकार रात्रंदिवस काम करत आहे. त्यांनी सीबीआयबाबत निर्णय घेतले, पण पंतप्रधान काहीच बोलले नाहीत. सीबीआय अर्थमंत्र्यांच्या अखत्यारीत येत नाही. पंतप्रधानांच्या अखत्यारीत येते. त्यामुळे या विषयावर पंतप्रधान बोलले असते तर देशाला अाश्वस्त करण्याचे काम अधिक चांगले झाले असते. सीबीआयच्या ज्या अधिकाऱ्यांनी चुका केल्या त्यांची निवड मनमोहनसिंग सरकारने नव्हे, तर याच सरकारने केली, त्यामुळे माेदींनी या प्रकरणात भाष्य करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे...
  October 26, 10:29 AM
 • औरंगाबाद -समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल पडले असून गुरुवारी भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. निळवंडे धरणात हे पाणी येईल. निळवंडे भरल्यावर पाणी जायकवाडीकडे सोडले जाईल. ४ हजार क्युसेक विसर्ग सायंकाळनंतर 10 हजारपर्यंत वाढवण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी मुळा धरणातून (ता. राहुरी) पाणी सोडण्यास प्रारंभ होईल. दरम्यान, जायकवाडीत 8.99 टीएमसी पाणी सोडण्याच्या आदेशाविरुद्ध मुंबई हायकोर्टात दाखल याचिकांवर तातडीने...
  October 26, 07:33 AM
 • औरंगाबाद- निवडणुका आल्या की, शिवसेना आणि भाजपला श्रीराम दिसतात. हाती सत्ता असताना सहाशे कोटी रुपयांचे कार्यालय बांधले जातात. मात्र आम्हाला या सगळ्या गोष्टींपेक्षा दुष्काळाच्या झळा सहन करणारा शेतकरी, नागरिकांची, तरुणांची मदत करणे महत्त्वाचे वाटते. हा आमच्यातील आणि सत्ताधाऱ्यांमधील मूलभूत फरक आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी एका कार्यक्रमासाठी शहरात आल्या असता त्यांनी महिला पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विविध विषयांवर त्यांनी चर्चा...
  October 25, 03:26 PM
 • औरंगाबाद - महाविद्यालयात जाण्यासाठी निघालेल्या विद्यार्थिनीच्या दुचाकीला भरधाव झायलोने मागून धडक दिली. जोरात धडक बसताच विद्यार्थिनी रस्त्यावर पडली. त्याच वेळी समोरून वेगात आलेल्या विटांच्या टेम्पोने तिला चिरडले. बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उस्मानपुरा भाजीवाली बाई चौकात हा भीषण अपघात झाला. वैभवी सुनील खिरड (वय १६) असे मृत तरुणीचे नाव असून ती शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मेकॅनिकल शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. बुधवारी सकाळी ते साडेआठच्या सुमारास तिच्या...
  October 25, 12:13 PM
 • औरंगाबाद - एप्रिल २०१७ ते १५ ऑक्टोबर २०१८ या सात महिन्यांत मराठवाड्यातील पाच पासपोर्ट केंद्रांतून ३२ हजार नागरिकांना पासपोर्ट मिळाले आहेत. औरंगाबादेतील केंद्रातून या काळात १३ हजार पासपोर्ट देण्यात आले आहेत. उर्वरित चार केंद्रांतून १९ हजार पासपोर्ट देण्यात आले. मराठवाड्यात सर्वप्रथम छावणी डाक कार्यालयात स्वतंत्र पोस्ट पासपोर्ट केंद्र उघडले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जालना, बीड, नांदेड आणि जळगाव येथे केंद्र सुरू करण्यात आले होते. मार्च २०१७ पूर्वी पासपोर्ट मिळवणे म्हणजे...
  October 25, 12:12 PM
 • औरंगाबाद - अहमदनगर-नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी दिल्यानंतर औरंगाबाद कडा विभागाच्या वतीने जोरदार पूर्वतयारी सुरू आहे. त्यासाठी ९ पथके नेमण्यात आली आहेत. दरम्यान, दारणा, गंगापूर व पालखेड प्रकल्पातून २६ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान पाणी सोडण्याचे लेखी आदेश कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांनी काढले आहेत. दरम्यान, एकीकडे पाणी सोडण्याची जय्यत तयारी सुरू असताना मुंबई हायकोर्टात या निर्णयाच्या विरोधात...
  October 25, 08:03 AM
 • औरंगाबाद - महाराष्ट्रातील १७ शहरे हवा प्रदूषणाच्या बाबतीत अति धोकादायक श्रेणीत आहेत. वाढते औद्योगिकीकरण, वाहतूक, खराब रस्ते आणि बांधकामांमुळे हवेचे प्रदूषण वाढत आहे. अशा परिस्थितीत आपण श्वास घेत असलेल्या हवेची गुणवत्ता काय? हे जाणून घेण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. यासाठीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने भारतात प्रथमच उद्योगांसाठी स्टार रेटिंग प्रणाली सुरू केली आहे. याच्या वेबसाइटवर आपल्या भागातील हवेची स्थिती समजू शकते, अशी माहिती हवा प्रदूषण तज्ज्ञ आणि महापरिवेश...
  October 24, 10:23 AM
 • औरंगाबाद -निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गटप्रमुखांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फक्त नि फक्त मेळावा तेवढा उरकला. शहरातील कचरा समस्या, १५० कोटींच्या रस्तेकामाचे अडलेले घोडे, औरंगाबादकरांना भेडसावत असलेली पाणीटंचाई, खासदार चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केलेला शहराच्या नामकरणाचा तसेच राजाबाजार येथे झालेल्या दंगलीचा मुद्दा यातील एकालाही हात घातला नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचाच असल्याचे त्यांनी सांगितले खरे, पण आपला मुख्यमंत्री...
  October 24, 10:14 AM
 • औरंगाबाद - समन्यायी पाणीवाटपानुसार जायकवाडी धरणामध्ये वरच्या धरणातून पाणी सोडण्याच्या हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करून पाणी सोडणसंदर्भात हालचालींना वेग आला आहे. गोदावरी महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी याबाबत आदेश काढले आहेत. त्यानुसार लवकरात लवकर जायकवाडीत पाणी सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोमवारी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची बैठक झाली होती, त्यानंतर कार्यकारी संचालकांना आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी कार्यकारी संचालकांनी आदेश दिले...
  October 23, 11:32 AM
 • औरंगाबाद - दौलताबाद किल्ल्यासमोर मॉर्निंग वॉक करणारे भानुदास जनार्दन जाधव (४५) यांना सोमवारी (२२ ऑक्टोबर) पहाटे ५ वाजेच्या सुमारास कारने उडवले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. कारचालक उमेश दर्डा याला अटक करण्यात आली आहे. पहाटेची वेळ असल्याने काही क्षणांसाठी चालकाच्या डोळ्यावर झोपेची झापड आली आणि आणि त्याचे स्टिअरिंगवरील नियंत्रण सुटले असावे, असा दौलताबाद पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. कारण जाधव यांना उडवल्यावर कार रस्त्याच्या कडेला उलटी झाली. चालकासोबतचा एक जणही जखमी झाला. मॉर्निंग वॉक...
  October 23, 10:36 AM
 
जाहिरात

RECOMMENDED