Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • करमाड - घरात धान्य नाही, गाेठ्यात गुरांना चारा नाही, विहिरीत पाण्याचा थेंब नाही म्हणून सरकारने दुष्काळ जाहीर करण्याची वाट न पाहता शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी, अशी मागणी सटाणा, गाढे जळगाव, देमणी वाहेगाव, शेकटा (ता. औरंगाबाद) येथील शेतकऱ्यांनी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे केली. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे औरंगाबाद तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना पाणीटंचाई, चाराटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत शनिवारी (दि. २७) पालकमंत्री डॉ. सावंत, जि. प....
  October 28, 06:55 AM
 • औरंगाबाद- डिजिटल इंडियाअंतर्गत देशभर जाहिरातीचे एलईडी लावायचे असून यात गुंतवणूक केल्यास दहा महिन्यांत दामदुप्पट मिळेल असे आमिष दाखवून सुमारे १० लाखांना गंडवल्याचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी गुरुवारी औरंगाबादच्या माय डायल डिजिटल एलईडी अॅड प्रा.लि.च्या ७ संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. यात ५०० गुंतवणूकदारांनी ४४०० आयडीद्वारे सुमारे १६ कोटींची गुंतवणूक केली असून त्यामुळे मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे. जटवाड्याचे अमोल प्रकाश मावस यांनी पोलिस आयुक्तांकडे ही...
  October 27, 08:17 AM
 • औरंगाबाद-दोन दिवसांपासून केंद्र सरकार रात्रंदिवस काम करत आहे. त्यांनी सीबीआयबाबत निर्णय घेतले, पण पंतप्रधान काहीच बोलले नाहीत. सीबीआय अर्थमंत्र्यांच्या अखत्यारीत येत नाही. पंतप्रधानांच्या अखत्यारीत येते. त्यामुळे या विषयावर पंतप्रधान बोलले असते तर देशाला अाश्वस्त करण्याचे काम अधिक चांगले झाले असते. सीबीआयच्या ज्या अधिकाऱ्यांनी चुका केल्या त्यांची निवड मनमोहनसिंग सरकारने नव्हे, तर याच सरकारने केली, त्यामुळे माेदींनी या प्रकरणात भाष्य करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे...
  October 26, 10:29 AM
 • औरंगाबाद -समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल पडले असून गुरुवारी भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. निळवंडे धरणात हे पाणी येईल. निळवंडे भरल्यावर पाणी जायकवाडीकडे सोडले जाईल. ४ हजार क्युसेक विसर्ग सायंकाळनंतर 10 हजारपर्यंत वाढवण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी मुळा धरणातून (ता. राहुरी) पाणी सोडण्यास प्रारंभ होईल. दरम्यान, जायकवाडीत 8.99 टीएमसी पाणी सोडण्याच्या आदेशाविरुद्ध मुंबई हायकोर्टात दाखल याचिकांवर तातडीने...
  October 26, 07:33 AM
 • औरंगाबाद- निवडणुका आल्या की, शिवसेना आणि भाजपला श्रीराम दिसतात. हाती सत्ता असताना सहाशे कोटी रुपयांचे कार्यालय बांधले जातात. मात्र आम्हाला या सगळ्या गोष्टींपेक्षा दुष्काळाच्या झळा सहन करणारा शेतकरी, नागरिकांची, तरुणांची मदत करणे महत्त्वाचे वाटते. हा आमच्यातील आणि सत्ताधाऱ्यांमधील मूलभूत फरक आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी एका कार्यक्रमासाठी शहरात आल्या असता त्यांनी महिला पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विविध विषयांवर त्यांनी चर्चा...
  October 25, 03:26 PM
 • औरंगाबाद - महाविद्यालयात जाण्यासाठी निघालेल्या विद्यार्थिनीच्या दुचाकीला भरधाव झायलोने मागून धडक दिली. जोरात धडक बसताच विद्यार्थिनी रस्त्यावर पडली. त्याच वेळी समोरून वेगात आलेल्या विटांच्या टेम्पोने तिला चिरडले. बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उस्मानपुरा भाजीवाली बाई चौकात हा भीषण अपघात झाला. वैभवी सुनील खिरड (वय १६) असे मृत तरुणीचे नाव असून ती शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मेकॅनिकल शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. बुधवारी सकाळी ते साडेआठच्या सुमारास तिच्या...
  October 25, 12:13 PM
 • औरंगाबाद - एप्रिल २०१७ ते १५ ऑक्टोबर २०१८ या सात महिन्यांत मराठवाड्यातील पाच पासपोर्ट केंद्रांतून ३२ हजार नागरिकांना पासपोर्ट मिळाले आहेत. औरंगाबादेतील केंद्रातून या काळात १३ हजार पासपोर्ट देण्यात आले आहेत. उर्वरित चार केंद्रांतून १९ हजार पासपोर्ट देण्यात आले. मराठवाड्यात सर्वप्रथम छावणी डाक कार्यालयात स्वतंत्र पोस्ट पासपोर्ट केंद्र उघडले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जालना, बीड, नांदेड आणि जळगाव येथे केंद्र सुरू करण्यात आले होते. मार्च २०१७ पूर्वी पासपोर्ट मिळवणे म्हणजे...
  October 25, 12:12 PM
 • औरंगाबाद - अहमदनगर-नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी दिल्यानंतर औरंगाबाद कडा विभागाच्या वतीने जोरदार पूर्वतयारी सुरू आहे. त्यासाठी ९ पथके नेमण्यात आली आहेत. दरम्यान, दारणा, गंगापूर व पालखेड प्रकल्पातून २६ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान पाणी सोडण्याचे लेखी आदेश कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांनी काढले आहेत. दरम्यान, एकीकडे पाणी सोडण्याची जय्यत तयारी सुरू असताना मुंबई हायकोर्टात या निर्णयाच्या विरोधात...
  October 25, 08:03 AM
 • औरंगाबाद - महाराष्ट्रातील १७ शहरे हवा प्रदूषणाच्या बाबतीत अति धोकादायक श्रेणीत आहेत. वाढते औद्योगिकीकरण, वाहतूक, खराब रस्ते आणि बांधकामांमुळे हवेचे प्रदूषण वाढत आहे. अशा परिस्थितीत आपण श्वास घेत असलेल्या हवेची गुणवत्ता काय? हे जाणून घेण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. यासाठीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने भारतात प्रथमच उद्योगांसाठी स्टार रेटिंग प्रणाली सुरू केली आहे. याच्या वेबसाइटवर आपल्या भागातील हवेची स्थिती समजू शकते, अशी माहिती हवा प्रदूषण तज्ज्ञ आणि महापरिवेश...
  October 24, 10:23 AM
 • औरंगाबाद -निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गटप्रमुखांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फक्त नि फक्त मेळावा तेवढा उरकला. शहरातील कचरा समस्या, १५० कोटींच्या रस्तेकामाचे अडलेले घोडे, औरंगाबादकरांना भेडसावत असलेली पाणीटंचाई, खासदार चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केलेला शहराच्या नामकरणाचा तसेच राजाबाजार येथे झालेल्या दंगलीचा मुद्दा यातील एकालाही हात घातला नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचाच असल्याचे त्यांनी सांगितले खरे, पण आपला मुख्यमंत्री...
  October 24, 10:14 AM
 • औरंगाबाद - समन्यायी पाणीवाटपानुसार जायकवाडी धरणामध्ये वरच्या धरणातून पाणी सोडण्याच्या हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करून पाणी सोडणसंदर्भात हालचालींना वेग आला आहे. गोदावरी महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी याबाबत आदेश काढले आहेत. त्यानुसार लवकरात लवकर जायकवाडीत पाणी सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोमवारी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची बैठक झाली होती, त्यानंतर कार्यकारी संचालकांना आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी कार्यकारी संचालकांनी आदेश दिले...
  October 23, 11:32 AM
 • औरंगाबाद - दौलताबाद किल्ल्यासमोर मॉर्निंग वॉक करणारे भानुदास जनार्दन जाधव (४५) यांना सोमवारी (२२ ऑक्टोबर) पहाटे ५ वाजेच्या सुमारास कारने उडवले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. कारचालक उमेश दर्डा याला अटक करण्यात आली आहे. पहाटेची वेळ असल्याने काही क्षणांसाठी चालकाच्या डोळ्यावर झोपेची झापड आली आणि आणि त्याचे स्टिअरिंगवरील नियंत्रण सुटले असावे, असा दौलताबाद पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. कारण जाधव यांना उडवल्यावर कार रस्त्याच्या कडेला उलटी झाली. चालकासोबतचा एक जणही जखमी झाला. मॉर्निंग वॉक...
  October 23, 10:36 AM
 • औरंगाबाद - कचरा संकलन, वाहतुकीचा सात वर्षांचा ठेका बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीला देण्याचा प्रस्ताव सोमवारी (२२ ऑक्टोबर) स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर झाला. मार्च २०१९ मध्ये सुरू होणाऱ्या या कामासाठी कंपनीला सात वर्षांत २१४ कोटी १९ लाख ८४ हजार २५० रुपये दिले जाणार आहेत. त्याचा बोजा शहरावर पडणार आहे. मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांकडून मार्च महिन्यापासून दररोज एक तर व्यापारी प्रतिष्ठानांकडून दोन रुपये वसूल केले जाणार आहेत. व्यापाऱ्यांना घराचा एक अाणि दुकानाचे दाेन असे तीन...
  October 23, 10:35 AM
 • औरंगाबाद - मराठवाड्यातील पाणीप्रश्नावर चर्चेसाठी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील ५६ आमदारांना निमंत्रण पाठवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात अवघे १८ आमदार बैठकीसाठी आले. त्यातलेही केवळ पाचच शेवटपर्यंत थांबले. आठपैकी एकाही खासदाराने हजेरी लावली नाही. त्यामुळे मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींची सर्वपक्षीय उदासीनता पुन्हा एकदा समोर आली आहे. दरम्यान, या बैठकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची बुधवारी भेट घेऊन हक्काचे पाणी सोडण्याची...
  October 23, 08:28 AM
 • औरंगाबाद -संत सखाराम महाराज यांच्या द्विशताब्दी समाधी सोहळ्यानिमित्त २० ते २९ एप्रिल २०१९ या काळात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे संत संंमेलन, राष्ट्ररक्षा १०८ कुंडी विष्णू पंचायतन महायज्ञ यासह विविध कार्यक्रम हाेणार अाहेत. अमळनेर येथील सखाराम महाराज यांच्या समाधी साेेहळ्याच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. २० एप्रिल २०१९ राेजी सकाळी ८.३० ते सायंकाळी ७ या वेळेत चार सत्रांत तसेच २१ एप्रिलला सकाळी ८.३० ते १२.३० अशा दोन सत्रांत संत संमेलन हाेईल. २१...
  October 22, 10:59 AM
 • औरंगाबाद -जायकवाडीच्या लाभक्षेत्राचे रेखांकन न झाल्यामुळे समन्यायी पाणीवाटपानुसार कमी पाणी मिळाले आहे. रेखांकन झाले असते तर किमान सहा टीएमसी पाणी अधिक मिळाले असते, याकडे मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य जलतज्ज्ञ शंकरराव नागरे यांनी लक्ष वेधले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत बंब यांनी सोमवारी मराठवाड्यातील आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत तुटीचा लेखाजोखा मांडला जाणार असून आमदारांनी जायकवाडीच्या रेखांकनाबाबतही आग्रही व्हावे, अशी अपेक्षा नागरे यांनी व्यक्त केली....
  October 22, 10:51 AM
 • औरंगाबाद - करिअर आणि कुटुंबासाठी खस्ता खाता खाता वृद्धापकाळ कधी येतो, हे समजत नाही. त्यातही या दिवसांत आप्त सोबत नसतील तर वाढत्या वयासोबत येणारी आजारपणं वृद्धांना आणखी एकटं करून टाकतात. आपलं मानून त्यांची काळजी घेणारं कुणी असावं या जाणिवेतून शहरात चार वर्षांपूर्वी एका विशेष प्रशिक्षणास (जेरिअॅट्रिक केअर) सुरुवात झाली. गत ४ वर्षांत ७२ तरुणांनी हे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेत अनेक वृद्धांना नव्याने जगण्याचे बळ दिले आहे. वृद्धांना भावनिक आधार देतानाच हे प्रशिक्षण तरुणांसाठी चांगला...
  October 22, 10:34 AM
 • जालना| शहरातील घाणेवाडी जलाशय,मोती तलाव या ठिकाणी हिवाळ्यात फ्लेमिंगो पक्षी मोठ्या संख्येने येतात. यापूर्वी २०१५ मध्ये फ्लेमिंगो पक्षी जालन्यात आले होते. त्यानंतर दोन वर्षे एकही फ्लेमिंगो या भागात आला नाही. आता गेल्या आठवड्यापासून घाणेवाडी जलाशयात फ्लेमींगोचे आगमन झाले. मात्र तीन वर्षांपूर्वीच्या तुलनेत त्यांची संख्या घटली. कशामुळे संख्या घटली : फ्लेमिंगो प्रामुख्याने कच्छच्या रणातून येतात. येथे त्यांचा संपूर्ण हिवाळा मुक्काम असतो. परंतु गेल्या काही वर्षापासून घाणेवाडी जलाशय...
  October 22, 09:35 AM
 • औरंगाबाद - बडीशेप खाऊ घालतो, असे सांगत पीडितेला दुचाकीवरून नेत तिच्यावर अत्याचार करणारा आरोपी मिस्त्री रवी सुखदेव मगरे (३३, रा. जुना बायजीपुरा, संजयनगर, ह.मु. सुभाष चौक ब्रिजवाडी, चिकलठाणा) यास पोलिसांनी शुक्रवारी (१९ ऑक्टोबर) रात्री अटक केली. त्यास न्यायालयात हजर करण्यात आले असता २३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी. भीष्मा यांनी शनिवारी दिले. या प्रकरणी चौदा वर्षीय पीडितेने तक्रार दिली. पीडितेला दुचाकीवर बसवून इंदिरानगर, मुकुंदवाडीत आणले. तेव्हा...
  October 21, 10:37 AM
 • औरंगाबाद -पाणीटंचाईच्या संकटामुळे लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. त्याबद्दल प्रशासनाला जाब विचारून पाणी वितरण यंत्रणेतील दोष दूर करण्याची नामी संधी शनिवारच्या मनपा सभेत नगरसेवकांना होती. तशी तयारीही त्यांनी केली होती. बेंबीच्या देठापासून टाहोही फोडला. पण अधिकाऱ्यांनी वाद पेटवला. त्याला बळी पडत नगरसेवक आपापसात भांडत राहिले आणि पाणीटंचाईच्या संकटाचा प्रश्न वाहून गेला. १२५ कोटींच्या रस्त्यातील टक्केबाजी, समांतर जलवाहिनी योजनेचे भवितव्य आणि मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी गेल्या...
  October 21, 10:32 AM
 
जाहिरात

RECOMMENDED