जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • औरंगाबाद -जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहाराची प्रकरणे एकामागून एक समोर येत असतांना मुख्यमंत्र्यांच्या निधीतून करण्यात आलेल्या कामातही अधिकाऱ्यांनी हात धुऊन घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गंगापूर तालुक्यातील शेकटा येथे बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्याच्या कामात मोठी अनियमितता झाली अाहे. ती लपवण्यासाठी योजनेचे रेकॉर्डच गायब करण्याचा कारनामाही करण्यात आला आहे. जलयुक्तच्या ४ कामांत ६८.४० लाख रुपयांचा अपहार समोर आला. याप्रकरणी ७ जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे....
  May 8, 08:50 AM
 • औरंगाबाद - खुलताबाद ग्रामीण पोलिसांनी शस्त्रास्त्रविरोधी कायद्याअंतर्गत तीन जणांना सोमवार आणि मंगळवारच्या मध्यरात्री अटक केली. सरस्वती ट्रॅव्हल्स कंपनीची बस क्रमांक MH 20 EG 1276 चाळीसगाव ते पुण्याच्या दिशेने जात होती. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे हीच बस मध्यरात्रीनंतर खुलताबाद चौकातील शँजरी हॉटेलजवळ थांबवली. यातून 3 जणांना शस्त्रास्त्रांसह अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे एक गावठी कट्टा आणि 5 जिवंत काडतूसा सापडल्या आहेत. खुलताबाद ग्रामीण पोलिस निरीक्षक भुजंग यांच्या नेतृत्वात...
  May 7, 11:13 AM
 • औरंगाबाद- मोबाईल बॅटरीचा स्फोट झाल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. मोबाईल बॅटरी बाहेर काढून तिच्यासोबत खेळत असताना, बॅटरीचा स्फोट झाला, यात दोन भावंडे जखमी झाली आहे. आज सकाळी 9 च्या सुमारास शिऊर येथील घोडके वस्तीत ही घटना घडली. स्फोटात दोन्हीही बालकांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कृष्णा रामेश्वर जाधव(8) आणि कार्तिक रामेश्वर जाधव(5), अशी या मुलांची नावे आहेत. दरम्यान, हा स्फोट कसा झाला, मोबाईल कोणत्या कंपनीचा...
  May 6, 11:23 AM
 • बदनापूर-औरंगाबादहून जाफराबाद येथे एका नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी ऑटोरिक्षाने जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने बदनापूरजवळ अपघात होऊन सहा जण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर रुग्णवाहिकेला फोन केला. परंतु, रुग्णवाहिका अर्धा तास उलटूनही न आल्यामुळे पोलिसांच्या जीपमध्ये रुग्णांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जाफराबाद येथे एका नातेवाइकाचा अंत्यविधी कार्यक्रम असल्याने औरंगाबाद येथील मधुकर लक्ष्मण बोर्डे (वय ५२, लक्ष्मी...
  May 6, 10:13 AM
 • जालना-साहेब, सहा वर्षांपासून झुंबऱ्या-सांबऱ्याला पोटच्या पाेरासारखा जीव लावला, पण आता त्यांना काय खाऊ घालायचे? माणसांना प्यायला पाणी मिळेना, मग जनावरांसाठी कोठून आणणार? काळजावर दगड ठेवून त्यांना बाजारात आणले. अर्ध्या किमतीतही विकायची तयारी आहे, पण सकाळपासून एकही गिऱ्हाईक फिरकलं नाही. तुम्हीच सांगा आता यांचे काय करायचे? शनिवारी दुपारी २ वाजता भोकरदन येथील गुरांच्या बाजारात भेटलेले युवा शेतकरी सुनील श्रीरंग नामदे (प्रल्हादपूर, ता. भोकरदन) यांनी ही व्यथा मांडली. सहा वर्षांपूर्वी त्यांनी...
  May 6, 10:01 AM
 • जालना-राज्यात दुष्काळामुळे ग्रामीण भागासह शहरालाही पाणीटंचाईच्या झळा बसत आहे. यावर जलसंधारण हा एकमेव पर्याय अाहे. वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावात सुरू असलेल्या जलसंधारणासाठी श्रमदानाची कामे करण्यासाठी अनेक तरुण पुढे आले आहेत. जालन्यातील तरुणांनी जलमित्र संघटन करून शेकडो तरुणांना एकत्र केले आहे. याअंतर्गत ते वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावांत श्रमदान करून श्रमाचे दोन हात देत आहेत. जालना शहरातून जवळपास दोनशे जल मित्रांनी पाणी फाउंडेशनबरोबर जलमित्र म्हणून नोंदणी केली आहे. या...
  May 6, 09:56 AM
 • औरंगाबाद-बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ग्रामीण भागातील नवीन शेतकऱ्यांना कृषी कर्ज देण्याचे शाखा व्यवस्थापकांचे अधिकार गोठवले आहेत. याबाबत दिव्य मराठीत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर कृषी विभागात खळबळ उडाली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रची तक्रार रिझर्व्ह बँकेकडे करणार असून निर्णय मागे न घेतल्यास बँकेचा परवाना रद्द करावा, यासाठी रिझर्व्ह बँकेवरच आंदोलन करु, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी दिला. बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्रामीण भागातील कृषी कर्जाचा एनपीए १५...
  May 6, 09:44 AM
 • औरंगाबाद- औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात जंगली तांडा गावात गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी चक्क देवाचे पैसे वापरण्याची वेळ आले आहे. पण तरिदेखील त्यांच्या नशिबात पाणी काही मिळाले नाही. दोन महिन्यांपासून पाणी टंचाई निर्माण झाल्याने गावकऱ्यांनी मंदिरातील दानपेटीतून जमा झालेला पैसा विहीर खोदण्यासाठी वापरला. गावकऱ्यांनी विहीरही खोदली, पण पाणी काही लागलेच नाही. भीषण अशी दुष्काळ परिस्थिती सध्या या गावात निर्माण झाली. गावात गेल्या सात वर्षांपासून सरकारचे एक ग्लासही पाणी...
  May 5, 03:45 PM
 • औरंगाबाद- निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात पोलिसांनी ५० लाख रुपये पकडले. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या जावयासाठी म्हणजेच अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी दिले होते. पोलिसांनी ही कारवाई केली अन् नंतर फक्त ५० हजार जप्त केल्याचे दाखवले. ज्यांच्याकडून ही रक्कम जप्त केली त्यांनाही पोलिसांनी सोडून दिले. हे प्रकरण नेमके काय होते, याचा तपास पोलिस का करत नाहीत, असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी दिव्य मराठीशी बोलताना केला. जावयाला दानवेंनी मदत केल्याचा आरोप मी नव्हे,...
  May 5, 09:50 AM
 • औरंगाबाद-औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा होत आहे, हे पाणी साठवून ठेवण्यासाठी सामाजिक संस्था आणि कंपन्यांकडून टाक्या देण्यात आल्या आहेत. मात्र, या टाक्या कोणकोणत्या गावांना दिल्या याची माहितीच जिल्हा परिषदेत उपलब्ध नाही. ग्रामस्थांच्या सोयीसाठी देण्यात आलेल्या या टाक्या गावातील काही स्थानिक नेते व काही ग्रामसेवकांनीच पळवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यात सर्वाधिक टंचाई भेडसावत आहे. मान्सूनचे आगमन लांबण्याच्या शक्यतेमुळे अद्यापही दीड ते...
  May 4, 05:41 PM
 • औरंगाबाद - कामाचा अति ताण, अवेळी जेवण आणि आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये स्थूलत्वाचे प्रमाण वाढत चालले आहे. औरंगाबाद पोलिस दलातील अशाच पोट सुटलेल्या कर्मचाऱ्यांचे वजन कमी करण्यासाठी तसेच त्यांना निरोगी ठेवण्यासाठी विभागाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. विविध पोलिस ठाण्यांतील २९ जणांची आता ३० दिवस फक्त वजन कमी करण्याची ड्यूटी लागणार आहे. ६ मे पासून २९ कर्मचाऱ्यांची पहिली बॅच सुरू होत आहे. कर्मचारी-अधिकाऱ्यांना निरोगी ठेवण्यासाठी पोलिस...
  May 4, 08:46 AM
 • औरंगाबाद- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादमध्ये युती धर्म पाळला नसल्याचा आरोप शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आहे. दानवेंनी युती धर्म मोडत जावयाला मदत केली असे म्हणत खैरेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याकडे तक्रार केली आहे. खैरेंनी उद्धव ठाकरे...
  May 3, 05:19 PM
 • औरंगाबाद - बंगालच्या उपसागरातील फनी चक्रीवादळ ३ मेच्या दुपारनंतर ओडिशा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, राज्यातील उष्णतेची लाट काहीशी सौम्य झाली आहे. गुरुवारी चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक ४५.५ अंश सेल्सियस तापमान नोंदण्यात आले. विदर्भात ६ मेपर्यंत तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्रातील तापमानात गुरुवारी सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ दिसून आली....
  May 3, 09:06 AM
 • औरंगाबाद- सध्या दुष्काळी गावांमध्ये पाण्यासाठी येत असलेल्या टँकरीची संख्या वाढविण्यात येवू नये. असे निर्देश महसूल अधिकाऱ्यांनी दिले आहेत, त्यामुळे एका टँकरच्या तीन-तीन फेऱ्या केल्या जात आहेत, मात्र प्रत्यक्षात टँकर एकच फेरी करून पाणीपुरवठा करते, आणि तीन फेऱ्या दाखवून डिझेलचे पैसे खिशात घातल्या जातात, असा आरोप जि.प.सदस्यांनी मंगळवारी स्थायि समितीच्या सभेत केला. स्थायी समितीची सभा उपाध्यक्ष केशवराव तायडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. यावेळी समाजकल्याण सभापती धनराज...
  May 1, 12:38 PM
 • औरंगाबाद -आठवडाभरापासून सतत चढणारा राज्यातील पारा मंगळवारी किंचित घसरला. जगातील सर्वात उष्ण शहरांच्या यादीत अव्वल स्थान मिळवलेल्या अकोल्यात मंगळवारी तापमान ४५.२ अंश नोंदले गेले. विदर्भ व मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम असून मंगळवारी ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक ४७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. विदर्भ आणि मराठवाड्यात चार मेपर्यंत उष्णतेची लाट राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. दरम्यान, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात उष्माघाताने एका...
  May 1, 10:54 AM
 • औरंगाबाद -शिक्षण, व्यवसाय अन् नोकरीनिमित्त अनेक महाराष्ट्रीय परदेशात वास्तव्यास आहेत. तिथे राहिल्यानंतरही महाराष्ट्रातील जेवण, मराठी भाषा, आपलेपणा यांना ही तरुणाई खूप मिस करतेय. आधुनिकपणा, थेट संवाद या परदेशातील काही जमेच्या बाजू असल्या तरी महाराष्ट्राची सर या कुणालाही येणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गणपतीतील जल्लोष, होळीतील रंगांची उधळण, दिवाळी आठवली तरी या साऱ्यांचे डोळे पाणावतात आणि एकच गीत ओठी येते गर्जा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राविषयीच्या भावना त्यांच्याच शब्दात.......
  May 1, 09:14 AM
 • औरंगाबाद -अकुशल कामगारांना कुशल बनवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा देशभरात फज्जा उडाला आहे. योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या एकूण उमेदवारांपैकी देशात अवघ्या २७% तरुणांना नोकरीची संधी मिळाली. सर्वाधिक प्रशिक्षण घेणाऱ्या टॉप १० राज्यात महाराष्ट्राचा देशात सातवा क्रमांक असला तरी येथे फक्त १३ % उमेदवार नोकरीस पात्र ठरले. योजना २०२० मध्ये पूर्ण होण्यास कमी कालावधी शिल्लक असताना उद्दिष्टापैकी देशात १० % तरणांनाच रोजगाराची संधी मिळाल्याची...
  May 1, 08:57 AM
 • गंगापूर -तालुक्यातील झोडेगाव शिवारातील अशोक रामभाऊ दातार यांच्या घराला भर दुपारी आग लागून घरातील जवळपास सहा क्विंटल धान्य व संसारोपयोगी साहित्य, रोख रक्कम असा एकूण दोन लाखांचा ऐवज जळून खाक झाला. उकाड्यामुळे दातार कुटुंबीय झाडाखाली सावलीत बसलेले होते. अचानक घराला आग लागली या आगीच्या झळा शेजारील रामभाऊ दातार यांच्या छपरापर्यंत पोहाेचल्याने त्यांचे देखील संसाराेपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. दातार कुटुंबीय झाडाखाली सावलीत बसले असताना आगीचा डोंब उसळला त्यांना आग लागल्याचे...
  April 30, 09:59 AM
 • औरंगाबाद, अकोला -राज्यातील उष्णतेची लाट कायम असून सोमवारी ४६.९ अंशांसह अकोला राज्यात सर्वात उष्ण शहर राहिले. विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पारा चढा राहिला. मगंळवारीही (३० एप्रिल) विदर्भासह उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. दरम्यान, भरउन्हात बैलांना कामाला जुंपल्यावरून नागपुरात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर वाशीम जिल्ह्यात रणरणत्या उन्हात शेतातील पालातच बाळाला जन्म देण्याची घटना घडली. उष्माघाताने...
  April 30, 09:25 AM
 • औरंगाबाद - येथील सिद्धार्थ उद्यानातील समृद्धी वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला आहे. एकीकडे वाघांची संख्या कमी होत असताना सिद्धार्थ उद्यानातील ही आनंदाची बातमी समोर आली आहे. या बछड्यांपैकी दोघांचा पिवळा तर इतर दोघांचा पांढरा रंग आहे. या बछड्यांच्या येण्यामुळे सिद्धार्थ उद्यानातील वाघांची संख्या 12 झाली आहे. सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात 2005 मध्ये गुड्डु आणि दीप्ती ही वाघांची जोडी आणली होती. ही जोडी चंदीगडच्या एका प्राणिसंग्रहालयातून आणली होती. या जोडीने 2010 मध्ये समृद्धी...
  April 28, 01:11 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात