जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • नितीन पाेटलाशेरू |औरंगाबाद जय जवान, जय किसानचा नारा १९६५मध्ये भारत-पाक युद्धादरम्यान तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिला. आजही हेच दाेन समाजघटक देशाचा कणा आहेत. ऊन, वारा, पाऊस झेलत देशाचं रक्षण करणारा सीमेवरील मुलगा आणि घरी शेती करणारे वडील असं चित्र देशातल्या अनेक गावांमधून दिसतं. औरंगाबाद जिल्ह्यातील सैनिकांचे गाव म्हणून अभिमान असणारे आडगाव पिशाेर हे त्यापैकीच एक. याच गावातील शेतकरी रमेश भाेसले आणि लष्करात असलेला त्यांचा मुलगा नितीन हे अशा अनेक बापलेकांचं...
  August 15, 08:42 AM
 • जंभाळा- गावाजवळ आज दुपारी 3.45 वाजेदरम्यान औरंगाबादकडून-नाशिककडे जात असतांना स्विप्ट कार (क्र.एम एच 20 सी एस 4923) व ट्रक (जी.जे. 10 एक्स 7157) यांच्यात स्विप्ट डिझायर चालत्या ट्रकवर मागच्या बाजूने जोरात आदळून अपघात झाला. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की, जवळपास शेतात काम करणारे शेतकरी आणि गावकरी धावत आले, परंतु तोपर्यंत कारमधील दोघेजणांचा जागीच मृत्यू झाला होता. या भीषण अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. धूळे-सोलापूर महामार्गाचे चौपदरी करणाचे काम येथे चालू आहे त्यामूळे काही ठिकाणी दूपदरी तर काही...
  August 14, 10:41 PM
 • नाशिक : समाजातील अपप्रवृत्ती अबला महिलांवर वाईट नजर ठेवून असतात. यातील काही जणी या वासनाखोरांच्या दहशतीला बळीही पडतात. अशाच प्रकारे एका विवाहित महिलेवर अाेढवलेला बाका प्रसंग निर्भया पथक ३ च्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात अाला. पथकाने या संशयितांना असा काही धडा शिकवला की ते महिलेची छेड काढणे तर दूरच, तिच्याकडे बघण्याचीही हिंमत अाता करत नाहीत. पथकाच्या या कारवाईने महिला अापल्या चिमुकलीसोबत सुरक्षितपणे वावरत अाहे. एकटी महिला अाजही सुरक्षित नसल्याचा प्रत्यय सिडकोमधील एका विवाहित...
  August 12, 11:26 AM
 • औरंगाबाद : औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार शहरातील बाळासाहेब ठाकरे स्मारक केवळ 10 कोटी रुपयांत तयार करावे आणि तसा नवा प्रकल्प अहवाल पाठवावा, या राज्य शासनाच्या सूचनांचे पालन करू नये, अशा सूचना महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयुक्त विनायक निपुण यांना पत्राद्वारे केल्या आहेत. शासनाने या स्मारकासाठी आधीच पाच कोटी रुपये दिले आहेत. त्यानंतर महापालिकेने 64 कोटी रुपयांचा खर्च होणारा आराखडा तयार करून सरकारच्या मंजुरीसाठी पाठवला. मात्र, मंत्रिमंडळाने 10 कोटी...
  August 12, 11:24 AM
 • नाशिक : शहरात २६ जुलैपासून संततधार सुरू असलेल्या पावसाने रविवारी (दि. ११) विश्रांती घेतली. पावसाने उघडीप दिल्याने तसेच गंगापूर धरणातून विसर्गदेखील कमी करण्यात अाल्याने गाेदावरीचा पूर अाेसरला. मात्र भांडीबाजार, दहिपूल परिसरातील दुकानदारांनी लावलेल्या सेलमध्ये खरेदीसाठी नागरिकांचा महापूर लाेटल्याची परिस्थिती निर्माण झाली हाेती.पावसाने रविवारी उघडीप दिल्याने व्यावसायिकांनी लावलेल्या सेलमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी अशी गर्दी केली. दुष्काळाचा चटका सहन करावा लागल्याने पावसाची...
  August 12, 11:03 AM
 • औरंगाबाद : जायकवाडी धरण आज सकाळपर्यंत ८६.९८ टक्क्यांवर पोहोचले. धरणाच्या डाव्या कालव्यातून ४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून परळी थर्मलसाठी हे पाणी सोडण्यात येत आहे. माजलगावसाठी उजव्या कालव्यातून ८०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. नांदूर-मधमेश्वरमधून येणारा विसर्ग कमी होत असला तरी निळवंडे धरणातून सुटलेले पाणी जायकवाडीत येत असल्यामुळे पाणीसाठा वाढत आहे. जायकवाडीत रविवारी सकाळी सात वाजता १७४० दलघमी पाणीसाठा होता. हे प्रमाण ८०.१७ टक्के होते. सकाळी आठ वाजता ६२,७३२ क्युसेक आवक...
  August 12, 10:49 AM
 • औरंगाबाद : ज्या गावात मी लहानाची मोठी झाले, ज्या गल्लीबोळांत खेळले-बागडले व ज्या कृष्णा नदीने माझ्यासह अनेकांना नेहमी साथ दिली तीच आज कोपलेली पाहून प्रचंड वेदना होत आहेत. माझं गाव सांगली आणि माझे गावकरी सांगलीकर पुराच्या पाण्यात अडकून पडले आहेत आणि अत्यंत हालअपेष्टा सहन करत आहेत, हे चित्रच प्रचंड दु:खदायी आहे. अशा वाईट काळात मी सदैव सांगलीकरांच्या सोबतीला आहे, अशी भावनिक साद अभिनेत्री सई ताम्हणकरने दिली आहे. सई मूळची सांगलीचीच आहे. महापुराच्या पार्श्वभूमीवर सईने दिव्य मराठीशी साधलेला...
  August 12, 08:51 AM
 • स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अब्दुल सत्तार कोणाला समर्थन देणार याची चर्चा सुरु होती. मात्र, शनिवारी त्यांच्या ८१ समर्थकांनी हॉटेल अतिथीमध्ये झालेल्या बैठकीत अंबादास दानवे यांना पाठिंबा दिल्याचा दावा सत्तार यांनी दिव्य मराठीशी बोलताना केला आहे. शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या कन्नडच्या हर्षवर्धन जाधव यांच्या पाच सदस्यांनीही दानवेंना पाठिंबा दिला असून ते बैठकीत हजर होते. बैठकीला शिवसेना नेते विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, हर्षवर्धन जाधव, कृष्णा...
  August 11, 10:31 AM
 • औरंगाबाद : कुत्र्याचे पिल्लू पाळण्याचा हट्ट करणाऱ्या मुलाने शाळेतून घरी जाताच गल्लीतून पिल्लू उचलले. पिल्लासोबत खेळताना पाहून आईने दटावल्यामुळे रागाच्या भरातच अकरावर्षीय सर्वेश रणजितकुमार साह या शाळकरी मुलाने गळफास घेतल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी प्रकाशनगरात घडली. रागावून आतल्या खोलीत स्वत:ला कोंडून घेतलेला आपला छकुला बराच वेळ होऊनही दरवाजा का उघडत नाही हे पाहून आईच्या काळजात धस्स झाले. तिने शेजाऱ्यांना आवाज दिला. त्यांनी छतावरील पत्रे सरकवून पाहताच मुलगा गळफास...
  August 11, 10:26 AM
 • विवेक एम. राठोड | औरंगाबाद पूरपरिस्थितीत अडकलेले हजारो लोक, मृत्यूच्या दाढेत प्राण कंठात घेऊन जगत असलेले आबालवृद्ध, डोळ्यांदेखत पुराने हिरावलेला संसार. कोल्हापूर, सांगलीमध्ये निर्माण झालेल्या या विदारक स्थितीने अवघा महाराष्ट्र हेलावून निघाला आहे. इतकेच नव्हे, तर पीडितांच्या मदतीसाठी हजारो मदतीचे हात पुढे आले आहेत. अनेक जण प्रत्यक्षात जाऊन मदतकार्य करत आहेत, तर संस्था, संघटना, व्यक्तींनी आपापल्या परीने अन्न, औषधी, कपडे आदींच्या मदतीसाठी पुढे आली आहेत... नागरिक : बारामतीत अर्ध्या तासात...
  August 10, 11:37 AM
 • प्रशांत त्रिभुवन | वैजापूर (जि. औरंगाबाद) युतीच्या नवीन जागावाटपात वैजापूर मतदारसंघ कुणाकडे जाणार याचे वेध दोन्ही पक्षातील इच्छुकांना लागले आहेत. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीत पराभूत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आता येथून लढण्यास इच्छूक असून त्यांनी दाैरेही सुरु केल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार असलेल्या या जागेवर काँग्रेस दावा करण्याच्या तयारीत आहे. वंचित आघाडीतही इच्छुकांची चढाओढ आहे. २०१४ मध्ये चौरंगी लढतीत राष्ट्रवादीचे भाऊसाहेब पाटील...
  August 10, 10:25 AM
 • लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांनी मतदान न केल्यामुळे वंचितचे सर्वच उमेदवार पराभूत झाले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुस्लिम मतांवरून वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. मुस्लिम मतदार एमआयएमच्या पाठीशी नसून केवळ मौलवींच्या सांगण्यावरूनच मतदान करतात, अशा शब्दांत डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी एमआयएमची खरडपट्टी काढली. प्रकाश आंबेडकरांच्या या खळबजनक वक्तव्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी वंचितच्या पराभवाचे खापर काँग्रेसवर...
  August 9, 10:39 AM
 • बँकेतून बोलत असल्याचे सांगत गंगापूर तालुक्यातील कनकुरीमधील अमोल प्रदीप पवार यांच्या बँक खात्यातून काही मिनिटांमध्ये ५९ हजार ९६९ रुपये वळते झाले. सोबतच्या मित्राला त्याने हा प्रकार सांगताच दोघांनी २० मिनिटांत गंगापूर पोलिस ठाणे गाठले. गंगापूर पोलिसांनी सायबर पोलिसांना ही तक्रार पाठवताच तासाभरात तपासाची चक्रे फिरवत तरुणाचे सर्व पैसे चोराच्या हातात जाण्यापासून वाचले. ८ ऑगस्ट रोजी दुपारी बारा ते दोन वाजेच्या सुमारास ही सर्व घटना घडली. पवार काही कामानिमित्त मित्रासोबत गंगापूरला...
  August 9, 10:25 AM
 • औरंगाबाद - औरंगाबाद-अहमदाबाद या मार्गावर येत्या २ सप्टेंबरपासून ट्रू जेटची विमानसेवा सुरू करण्यात येत असल्याची घोषणा या कंपनीने केली. ही सेवा इंदूरमार्गे असल्याने औरंगाबादहून इंदूरला जाणाऱ्या प्रवाशांची सोय झाली आहे. आठवड्यातून चार दिवस ही सेवा असेल. केंद्रीय नागरी विमान उड्डयन मंत्रालयाने देशातील छोट्या शहरांना विमानसेवेने जोडण्यासाठी महत्त्वाकांक्षी उडान योजना सुरू केली. औरंगाबादेतून मात्र एअर इंडियाचे एकमेव विमान सुरू अाहे. त्यामुळे पर्यटन, उद्योगावर परिणाम झाला अाहे....
  August 9, 09:34 AM
 • औरंगाबाद - विधान परिषदेची निवडणूक ही सर्वात महागडी निवडणूक म्हणून ओळखली जात असली तरी औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सध्या सुरू असलेली निवडणूक सर्वात स्वस्त निवडणूक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही उमेदवारांनी एकत्र येऊन एका संयुक्त निवेदनाद्वारे घोडेबाजार करणार नाही, अशी घोषणा करून नवाच पायंडा पाडला आहे. अर्थात, हा निर्धार प्रत्यक्षात किती टिकतो याविषयी मात्र साशंकता आहे. या निवडणुकीतील शिवसेना- भाजप युतीचे उमेदवार अंबादास दानवे आणि काँग्रेस,...
  August 9, 09:30 AM
 • औरंगाबाद - गेल्या दोन महिन्यांपासून केवळ चर्चा सुरू असलेल्या कृत्रिम पावसाचा प्रयोग एकदाचा मराठवाड्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी सर्व तयारी पूर्ण झाली असून शुक्रवारी कृत्रिम पाऊस पाडण्याचे ट्रायल केले जाणार आहे. त्यानंतर पुढे नियोजन करून पाऊस पाडला जाईल. सध्या मराठवाड्यात पाऊस सुरू आहे, तेव्हा या प्रयोगाची गरज काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. परंतु सध्या पडणारा पाऊस हा कमी आहे, विभागाची गरज लक्षात घेता आणखी पावसाची गरज आहे. त्यामुळे पुढील ५२ दिवस प्रयोग केले जातील...
  August 9, 08:53 AM
 • औरंगाबाद - बंगालच्या उपसागरातील मान्सूनची शाखा सक्रिय झाली आहे. उत्तर बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र नऊ ऑगस्ट रोजी ईशान्य छत्तीसगड परिसरात कार्यरत राहील. यामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, गुजरात आणि राजस्थानातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे. आयएमडीच्या ताज्या अहवालानुसार, नऊ ऑगस्ट रोजी विदर्भ, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि गुजरातेत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. याच काळात कोकण...
  August 9, 08:42 AM
 • वैजापूर -गोदावरी नदीपात्रालगतच्या १८ गावांत तीन दिवस पुराच्या तडाख्याने उडालेला हाहाकार आता पाण्याचा जोर ओसरल्यामुळे काही प्रमाणात विसावला असून पूर प्रभावित भागात परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, पुराच्या पाण्यातून प्रशासनाने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलेल्या एक हजार लोक त्यांच्या घरी परतल्याची माहिती सूत्रांनी दिली. तालुका प्रशासनाने पूरप्रभावित भागात तैनात केलेले एस.डी.आर. एफचे बचाव पथकासह राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांची तुकडी...
  August 8, 08:57 AM
 • औरंगाबाद -विधानसभेत अधिवेशनाच्या काळात चर्चेदरम्यान मंत्री आश्वासने देतात. लोकशाहीत अशा आश्वासनांना महत्त्व असून त्यांची ९० दिवसांत पूर्तता करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक प्रकरणांत आश्वासनपूर्ततेत १५ वर्षांहून अधिकचा कालावधी लागला. शासनाच्याच समितीने या विलंबावर कठोर शब्दांत नाराजी वर्तवली आहे. सभागृहातील चर्चेदरम्यान मंत्री आश्वासने- अभिवचने देतात, परंतु त्यांची पूर्तता ९० दिवसांत होत नसल्याचे विधानसभा आश्वासक समितीच्या लक्षात आले आहे. शासनस्तरावर निपटारा करणे शक्य असणाऱ्या...
  August 8, 07:58 AM
 • पैठण -जायकवाडी धरणात सलग आठ दिवसांपासून नाशिकचे पाणी येत असल्याने प्रती तासाला धरणात १ टक्क्याची पाणीवाढ होत असल्याने मराठवाड्यातील दोन वर्षे पिण्याचा, तर एक वर्षभर शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने दुष्काळग्रस्त मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे. २२ मार्च रोजी जायकवाडी धरण मृत साठ्यात आल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. यातच जून, जुलैमध्येही पावसाने दांडी मारल्याने मराठवाड्यावर पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले असतानाच या दिवसापासून...
  August 8, 07:39 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात