जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • औरंगाबाद -ऊस गाळप हंगामात यंदा राज्यात एकूण ९५१.७९ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. यातून १०७१.९४ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली. गतवर्षी ९५०.६९ लाख मेट्रिक टन गाळप आणि १०६७.८१ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली होती. त्या तुलनेत यंदा ४ लाख क्विंटल साखरेचे जास्त उत्पादन झाले आहे. सलग दुसऱ्या वर्षी साखरेचे विक्रमी उत्पादन झाल्याने बाजारात भाव नियंत्रित राहून लाखो ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. सततच्या दुष्काळामुळे २०१५ मध्ये ऊस लागवडीच्या क्षेत्रात घट झाली होती. संपूर्ण हंगामांवर विपरीत...
  May 26, 10:20 AM
 • औरंगाबाद -राज्यात उष्णतेची लाट कायम अाहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांत तापमान सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशांनी जास्त आहे. शनिवारी चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक ४६.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांत पारा ४० अंशांवर होता. राज्यात २९ मेपर्यंत उष्णतेची लाट राहील असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. पुणे वेधशाळेनुसार २९ मे रोजी राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यांत १५...
  May 26, 09:01 AM
 • औरंगाबाद - अभियांत्रिकीच्या (कॉम्प्युटर सायन्स) चाैथ्या वर्षात शिकणारी गौरी सुशील खवसे (२३, रा. मधुराज हाउसिंग सोसायटी, गारखेडा) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास आई तिला उठवण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार समोर आला. एका नामांकित आयटी कंपनीत मुलाखतीद्वारे तिची निवड झाली हाेती. येत्या काही दिवसात तिला ऑफर लेटर मिळणार होते. महाविद्यालयातील मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपमधून वेगळे केल्याने तिने तणावातून हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त...
  May 25, 01:15 PM
 • औरंगाबाद -महाराष्ट्रात ७१ वर्षांत प्रथमच बिगर काँग्रेसी मुस्लिम खासदार लोकसभेत पोहोचला. औरंगाबादेत एमआयएम उमेदवार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना पराभूत करून हा इतिहास घडवला. आजवर महाराष्ट्रातून ११ मुस्लिम खासदार लाेकसभेत गेले आहेत. मात्र ते सर्व काँग्रेस पक्षाच्या तिकिटांवरच विजयी झाले होते. इम्तियाज जलील यांनी रचला इतिहास १९६२ मध्ये अकोल्यातून काँग्रेसच्या तिकिटावर मोहंमद मोहिब्बुल हक विजयी झाले होते. येथून १९६७ व १९७१ मध्ये मुस्लिम खासदार झाले....
  May 25, 09:59 AM
 • खुलताबाद -येथील पांगरा तलावात दोन कामगारांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली. मृत झालेले दोघे तालुक्यातील कसाबखेडा येथील रहिवासी असून कसाबखेडा गावावर व मृतांच्या नातेवाइकांवर या घटनेमुळे दु:खाचा डोंगर कोसळला. तालुक्यातील कसाबखेडा येथील शेख अजीम शेख अहेमद (४१), विकास भगवान किर्तीकर (२१) या दोघांसह अन्य कामगार शुक्रवारी ९ वाजेच्या सुमारास खुलताबाद येथे ट्रकमध्ये सिमेंटने भरलेल्या गोण्या खाली उतरवण्यासाठी आले होते....
  May 25, 09:40 AM
 • औरंगाबाद -राज्यातील उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात २८ मेपर्यंत उष्णतेची लाट राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. शुक्रवारी चंद्रपूर येथे देशातील सर्वाधिक ४६.६ अंश तापमान नोंदवण्यात आले.दरम्यान, उष्माघाताने बीड जिल्ह्यात एका शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. राज्यात विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात गेल्या आठवडाभरापासून तापमान सातत्याने ४० अंशांवर आहे. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, येत्या दोन दिवसांत राज्यातील उष्णतेची...
  May 25, 08:28 AM
 • औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीचे निकाल काँग्रेस, राष्ट्रवादीला जबर धक्का देणारे ठरले अाहेत. मराठवाड्यात या वेळी काँग्रेसला भाेपळाही फाेडता आला नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसही चारही मुंड्या चित झाली. मराठवाड्यातील आठपैकी ७ जागा महायुतीने जिंकल्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमधून अशाेक चव्हाण आणि हिंगाेलीतून राजीव सातव यांनी निवडून येत लाज राखली हाेती. मात्र या निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले चव्हाणही पराभूत झाले. मराठवाड्यात सर्वच ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीची...
  May 24, 10:18 AM
 • औरंगाबाद -अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएमचे इम्तियाज जलील साडेचार हजार मतांनी विजयी झाले. ते या पक्षाचे महाराष्ट्रातील पहिले खासदार ठरले आहेत. अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना २ लाख ८१ हजार मते मिळाली. त्यामुळे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. खैरे यांचा त्यांच्या आयुष्यातील हा पहिला पराभव ठरला आणि कारणीभूत ठरले ते हर्षवर्धन जाधव. इम्तियाज यांना ३ लाख ८९ हजार मते मिळाली तर खैरे हे ३ लाख ८४ हजारांवर...
  May 24, 09:51 AM
 • औरंगाबाद - २०१४ च्या माेदी लाटेत महाराष्ट्रातील ४८ पैकी ४१ जागा पटकावणाऱ्या भाजप- शिवसेना युतीने या यशाची २०१९ च्या निवडणुकीतही पुनरावृत्ती केली. त्यात भाजपला २३, तर शिवसेनेने १८ जागा कायम राखल्या. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेस केवळ एका जागेवर मर्यादित राहिली, तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही गेल्या वेळेप्रमाणे ४ जागा कायम राखल्या. वंचित आघाडीने यंदा काँग्रेस-राष्ट्रवादीची दमछाक करत औरंगाबादेतून एक जागा निवडून आणली. १७व्या लोकसभेत महाराष्ट्रातून १९ नवीन चेहरे जात...
  May 24, 09:20 AM
 • औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येत असून यामध्ये अनेकदिग्गजांना धक्के बसत आहेत. औरंगाबाद हा शिवसेनेचा गड समजला जातो. याठिकाणी गेल्या 20 वर्षांपासून शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे हे निवडूनआले आहेत. पण यावेळी मात्र शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा दारुण पराभव केला आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरेंना381975 मतं पडली तर इम्तियाज जलील यांना388042 मतं पडली. तसेच काँग्रेसचे सुभाष झांबड यांना 91253 आणि हर्षवर्धन जाधव...
  May 23, 09:00 PM
 • जालना,नंदुरबार- लोकसभेचे निकाल हुल-हळू समोर येत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवेंनी आपली विजयी परंपरा कायम राखली आहे.1999 पासून रावसाहेब दानवेच येथून विजयी होत आलेले आहेत. त्यांच्याविरूद्ध यावेळीकाँग्रेसचे विजय औताडे मैदानात होते.तर दुसरीकडे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे डॉ. हीना गावित विजयी झाल्या आहेत. त्यांच्याविरूद्ध काँग्रेसचे के.सी. पाडवी होते, तर वंचित आघाडीतर्फे दाजमल मोरे मैदानात होते. असा होता नंदुरबारचा 2014 चा निकाल 2014 मध्ये सलग 9 वेळा खासदार...
  May 23, 06:20 PM
 • जालना- जालना जिल्ह्यातील अबंड तालुक्यातील वलखेडामधील जिलेटीन स्फोटात दोन सख्खे भाऊ जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. शिवम धोत्रे(9) आणि शिवराज धोत्रे(7) अशी या दोघांची नावे आहेत. या घटनेमुळे जालन्यात हळहळ व्यक्त होत आहे. जालना जिल्ह्यातील अबंड तालुक्यात काकासाहेब आत्माराम कटारे यांच्या दगडाच्या खाणीवर रवींद्र धोत्रे आणि त्यांची पत्नी दगड फोडण्याचे काम करत होते. काल(21 मे) रवींद्र धोत्रे हे आपल्या दोन्ही मुलांसोबत दगडीच्या खाणीजवळ गेले होते. दुपारी रणरणतं ऊन असल्याने ते दोघेही दगडाच्या...
  May 22, 02:15 PM
 • औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीत नशीब आजमावणाऱ्या १५५ उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. सर्वच मतमाेजणी केंद्रांवर २३ मे रोजी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे. या वेळी सर्वाधिक म्हणजे ३६ उमेदवार बीड लोकसभा मतदारसंघात असून येथील निकाल हाती येण्यासाठी शुक्रवारची पहाटच उजाडण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. या निवडणुकीत आठ मतदारसंघांतून तब्बल १५५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. औरंगाबाद...
  May 22, 09:54 AM
 • वैजापूर -माता-पित्याची हत्या करण्याची भीती दाखवून नवविवाहितेवर अत्याचार केल्याचा प्रकार डागपिंपळगाव येथे शनिवारी पहाटे घडला. अत्याचार केल्यानंतर आरोपी पोलिस कारवाई होईल, या धास्तीने फरार झाला आहे. अप्पा मधूकर माकोडे (रा. डागपिंपळगाव) असे आरोपीचे नाव आहे. गावातील १९ वर्षीय युवतीचा विवाह १४ मे रोजी म्हस्की येथील युवकाशी झाला. विवाहानंतर दोन दिवस नवविवाहिता सासरी राहिली. तिसऱ्या दिवशी रितीरिवाजानुसार ती माहेरी आली. माहेरी ती रात्री घरात झोपलेली असताना आरोपी माकोडे याने तिच्याशी संपर्क...
  May 20, 10:04 AM
 • सिल्लोड -अवैधरित्या तलवारी बाळगल्याप्रकरणी सिल्लोड पोलिसांनी केलेल्या कारवाईत शनिवारी (दि. १८)रात्री संशयित दोन आरोपींसह चार धारदार तलवारी जप्त केल्या. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुनील पवार यांनी शनिवारी तक्रार दाखल केली. सुनील पवार यांनी फिर्यादीत म्हटले की, शहरात झालेला लुटीचा तपास करत असताना राहूल मिलिंद सूर्यवंशी जयभवानीनगर, सिल्लोड याच्याकडे दोन तलवारी ठेवल्याची माहिती मिळाली. पथकासोबत पवार यांनी राहूल सूर्यवंशी याच्या घराची झडती घेतल्यानंतर...
  May 19, 10:03 AM
 • औरंगाबाद -भगवान गौतम बुद्धांनी जगाला मानवता, अहिंसेची शिकवण दिली. त्यांच्याविषयी तसेच त्यांच्या शिकवणुकीबद्दल जगभरात संशोधन झाले. दुर्मिळ साहित्य निर्माण झाले. हे सारे साहित्य बुद्धपौर्णिमेनिमित्त म्हणजे १८ मे रोजी एका क्लिकवर सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालय विभागाने ही किमया घडवून आणली आहे. तथागत गौतम बुद्धांनी कायम ज्ञानप्राप्तीचा आग्रह धरला. प्रत्येक गोष्ट स्वत: तपासून, अभ्यासून बघा, असे सांगितले. त्यांच्या शिकवणुकीवर...
  May 18, 09:32 AM
 • गंगापूर -गंगापूर तालुक्यातील सावखेडा परिसरातील जायकवाडी बॅकवाटर परिसरात चर खोदून पाणी उपसा सुरू असण्याबाबतच्या तक्रारीवरून जायकवाडी प्रशासन व वन विभागाने पोलिसांकडे कारवाईसाठी शिफारस केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून हीकारवाई एकतर्फी यासंदर्भात माहिती अशी की, जायकवाडी बॅकवाटर भागातील गंगापूर व पैठण तालुक्याच्या सीमेवर असलेल्या ब्रम्हगव्हाण येथील शेतकरी सचिन लक्ष्मण तेजीनकर व त्यांच्या अन्य तीन सहकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून गंगापूर...
  May 17, 08:35 AM
 • औरंगाबाद -सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे महाराष्ट्राच्या जमिनीतील जलस्रोतही आटत चालले आहेत. राज्यातील ३५३ पैकी २९७ तालुक्यांतील भूजल पातळी एक मीटरपेक्षा अधिक खाली गेली आहे. २६४२ गावांमध्ये हे प्रमाण तर ३ मीटरपेक्षा अधिक खोल गेल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या मार्चच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालात भूजल पातळीचा मागील ५ वर्षांच्या सरासरीशी तुलनात्मक अभ्यास आहे. यातील आकडेवारी धक्कादायक आहे. अनेक ठिकाणी शेकडो फुटांवरही पाणी लागत नसल्याचे चित्र...
  May 16, 09:05 AM
 • पैठण -पैठण तालुक्यात दरवर्षी दुष्काळ असो किंवा नसाे, उन्हाळ्यात टँकर सुरु राहणारच ही परिस्थिती अाहे. यंदा तर टँकरच्या खेपांचा आकडा अडीचशे पार करून गेला असून अनेक गावांना टँकरचेही पाणी मिळत नाही ही परिस्थिती निम्म्या तालुक्यातील गावांची झाली अाहे. मात्र जायकवाडी धरणाच्या लगत अर्धा किमी अंतरावरील अनेक गावांनाही जायकवाडी धरणाचे शुद्ध पाणी मिळत नाही.एवढेच काय जायकवाडी धरणाच्या भिंतीलगत वसाहतीला देखील धरणाचे शुध्द पाणी मिळत नसल्याने पैठणच्या जलशुद्धीकरण केंद्रातून धरणाच्या लगतचे...
  May 16, 08:22 AM
 • पैठण - पैठण तालुक्यातील चाळीस ते पन्नास गावांची तहान भागवणाऱ्या आपेगाव, हिरडपुरी या दोन्ही बंधाऱ्यांत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी साेमवारी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी जायकवाडी धरणाच्या गेटच्या पायथ्याशी जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनी धरणावर जाण्यापासून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना रोखले असल्याने शेतकऱ्यांनी नदीपात्रातच ठिय्या आंदोलन सुरू केले असून आम्ही जलसमाधी आंदोलनावर ठाम आहोत. रात्री काय तो निर्णय घेणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे. सायंकाळी ६...
  May 14, 10:17 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात