जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • औरंगाबाद- रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन कार पेटवून दिलेल्या आशिष पंडित लुटे (२०, रा. अरिहंतनगर) व एका अल्पवयीन मुलाला गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली. २६ फेब्रुवारी रोजी विष्णुनगरातील अरिहंतनगर येथे मध्यरात्री ही घटना घडली हाेती. कॉलनीतील लोक आपल्याविषयी कुटुंबाला काहीही माहिती सांगतात, बाहेर करत असलेल्या कारनाम्यांविषयी माहिती देतात, असा संशय घेत रागातून दोघांनी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. अरिहंतनगरातील व्यापारी रूपेश वडगावकर यांची नवीन मारुती वॅगन आर कार (एमएच २० ईजे ७३८२) व...
  March 17, 01:17 PM
 • औरंगाबाद - राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मर्जीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी केवळ अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाशी संबंधित जागांचाच विचार करून १३ जानेवारी २०१७ नवा सेवानियम केला. मात्र, यात इतर विभागांचाही समावेश करून नियुक्तीसाठी नव्याने प्रक्रिया राबवावी, असे निर्देश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अौरंगाबाद पीठाचे व्हाइस चेअरमन न्या. एम. टी. जोशी आणि सदस्य अतुल चढ्ढा यांनी दिले असून शासनाने तयार केलेले सेवानियम रद्द केले आहेत. मॅटच्या या निर्णयामुळे...
  March 17, 10:50 AM
 • औरंगाबाद- देवगिरी महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजीच्या एम.टेक.च्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सायंकाळी 6.30 वाजता हा प्रकार समोर आला. विश्वास प्रभाकर म्हस्के (23, रा. पाथरवाला बुद्रुक, ता. गेवराई) असे मृताचे नाव आहे. मागील 4 ते 5 वर्षांपासून विश्वास शिक्षणानिमित्त शहरात वास्तव्यास होता. पदमपुऱ्यातील सोनार गल्लीत तो स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या महादेव नावाच्या मित्रासोबत राहायचा. शुक्रवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास त्याचा...
  March 16, 11:22 AM
 • बीड- बीड लोकसभेसाठी शुक्रवारी राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना रिंगणात उतरवले. उमेदवारीचे प्रबळ दावेदार असलेल्या माजी आमदार अमरसिंह पंडित यांचा गट मात्र यामुळे नाराज झाला. एकीकडे पंडित समर्थक सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त करत असताना अमरसिंह यांचे छोटे बंधू तथा माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनीही फेसबुक पेजवरून आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात, ज्यांना आपण वाऱ्यामुळे विझताना वाचवलेलं असतं. अशी पोस्ट टाकून हे कटुसत्य असल्याचे लिहिलेे. यामुळे ऐनवेळी...
  March 16, 11:07 AM
 • औरंगाबाद - निवडणूक आयोगाने प्रथमच मतदारांच्या सोयीसाठी विविध मोबाइल अॅप्स तयार केली. मात्र अॅप्समध्ये प्रचंड त्रुटी असल्याचे समोर आले आहे. गुगल प्लेवरील फीडबॅकमध्ये या अॅप्सबाबत ७० टक्के नकारात्मक तर ३० टक्केच चांगल्या प्रतिक्रिया आहेत. आयोगाच्या वेबसाइटवर या सर्वच अॅप्सची माहिती आहे. त्यात सी-व्हिजिल, व्होटर हेल्पलाइन, ऑनलाइन व्होटर सर्व्हिस पोर्टल आदी अॅप्सचा समावेश आहे. ही सर्व अॅप रे-लॅब्स नावाच्या कंपनीने तयार केली असून कंपनीकडून फिडबॅकची उत्तरेही खूप उशिरा येत असल्याच्या...
  March 14, 12:16 PM
 • औरंगाबाद - स्वतंत्र भारताची पहिली लोकसभा अस्तित्वात आली तेव्हा मराठवाड्यातून ७ खासदार लोकसभेत निवडून गेले होते. सातपैकी पाच काँग्रेसचे तर बीडमधून पीडीएफचे रामचंद्र परांजपे आणि परभणीतून नारायण वाघमारे (पीडब्ल्यूपी) विजयी झाले होते. त्या वेळी जालना, हिंगोली आणि लातूर लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात नव्हते. उल्लेखनीय बाब म्हणजे नांदेडमधून त्या वेळी दोन खासदार लोकसभेत पोहोचले होते. २६ जानेवारी १९५० रोजी भारत सरकार अधिनियम १९३५ हटवून भारतीय संविधान लागू करण्यात आल्यानंतर लोकशाही...
  March 14, 10:12 AM
 • औरंगाबाद - जगातील दिग्गज मानली जाणारी स्पेनमधील बिलियन डॉलर ऑटोमोटिव्ह कंपनी सीआयई ने औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स कंपनी विकत घेतली आहे. त्यामुळे अॅल्युमिनियम डायकास्टिंग या प्रकारात औरंगाबाद हे कंपनीचेे ग्लोबल हेडक्वार्टर होऊ शकते, असे मत बागला समूहाचे व्यवस्थापकीय संचालक ऋषिकुमार बागला यांनी दिव्य मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले. प्रश्न : सीआयई चीच निवड का केली? - स्पेनची ही कंपनी आहे. या कंपनीने जगातील अनेक कंपन्या फक्त विकत घेतल्या नाहीत, तर त्यांचा मोठा विस्तार केला....
  March 14, 09:35 AM
 • औरंगाबाद - एकीकडे काँग्रेस मनसेला विरोध करते. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसाठी मनसेला निमंत्रण देते. मग धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळण्यासाठी एमआयएम का चालत नाही, असा सवाल आमदार इम्तियाज जलील यांनी केला. औरंगाबादसह सहा मतदारसंघात एमआयएमचे प्राबल्य असतानाही केवळ प्रकाश आंबेडकरांच्या शब्दाखातर आम्ही त्या जागा सोडल्या आहेत. मात्र, त्यांनीही औरंगाबादच्या कार्यकर्त्यांचा आग्रह लक्षात घेता येथून दलित किंवा मुस्लिमालाच उमेदवारी द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले....
  March 13, 09:26 AM
 • औरंगाबाद - मराठवड्यातील आठही खासदारांत सर्वाधिक पोलिस केसेस व न्यायप्रविष्ट खटले हे शिवसेनेच्या खासदारांवर असून यात उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड १८ खटल्यांसह सर्वात आघाडीवर आहेत. त्या पाठोपाठ परभणीचे खासदार बंडू जाधव १५ तर औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे ८ खटल्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदार संघातील उमेदवारांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात ही माहिती दिली आहे. उमेदवारावर कोणते खटले दाखल आहेत, कोेणते...
  March 13, 09:23 AM
 • मुंबई - विधानसभेचे विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डाॅ. सुजय विखे यांनी अखेर मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा बहुचर्चित प्रवेश सोहळा पार पडला. दरम्यान, भाजपने सुजय यांच्या पक्षप्रवेशानंतर लगेच नगर लाेकसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी जाहीर करत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला माेठा धक्का दिला. एकिकडे सुजय यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसची नगरमध्ये कोंडी झालेली असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर व स्वाभिमानी...
  March 13, 08:45 AM
 • पिंपळगाव रेणुकाई - पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी गरोदर मातेची तपासणी करून गर्भातील बाळ आजारी असल्याचे सांगून रेफर केले. यानंतर या महिलेला सिल्लोडच्या शासकीय रुग्णालयात नेले असता त्या ठिकाणी बाळ सुदृढ जन्मले. यामुळे संतप्त नातलगांनी दुसऱ्या दिवशी रुग्णालयात जाऊन डाॅक्टरांकडे या प्रकाराबाबत विचारणा केली असता, डॉक्टर आढळून आले नाही. या केंद्राचा नागरिकांनी पंचनामा करून तो अहवाल तहसीलदारांकडे सुपूर्द केला. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील...
  March 12, 12:45 PM
 • खुलताबाद - सततच्या दुष्काळामुळे शेतातील पीक आणि कुटुंब जगवताना आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्याने आयुष्यच संपवण्याचा निर्णय घेत विष प्राशन केले. बेशुद्धावस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच वेळी या शेतकऱ्याच्या लेकीला दहावीचा गणिताचा पेपर द्यायचा होता. वडिलांची प्रकृती नाजूक असताना या लेकीने मन कठोर करून पेपर दिला. पण घरी परतली तेव्हा वडील आयुष्याच्या लढाईत पराभूत झाल्याचा निरोप मिळाला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे कळाले. गिरजाराम अंबादास काळे (वय ४८) असे...
  March 12, 12:40 PM
 • औरंगाबाद - अधिकाऱ्यांमध्ये मला सध्या मरगळ दिसते. दुष्काळात यंत्रणा त्वरेने हलली पाहिजे, तसे होत नाही. दुष्काळ ही संधी आहे, त्याचे सोने झाले पाहिजे. तसे न झाल्यास माझ्या हाती दंडुका आहे, हे विसरू नका. तो वापरण्याची इच्छा नाही, पण ती वेळही येऊ देऊ नका, अशा शब्दांत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील ८ जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना लेखी संदेश पाठवून तंबी दिली. लागेल ती मदत मिळेल, कामे दिसली पाहिजेत. काय कामे होताहेत हे नागरिकांनी मला सांगितले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले...
  March 10, 09:47 AM
 • औरंगाबाद - खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांचे चरित्र आगामी लोकसभेच्या प्रचारासाठी प्रसिद्ध केले आहे. त्यांचे जावई डॉ.संजय सुर्वे यांनी हे पुस्तक तयार केले आहे. पण तब्बल ३० वर्षांत त्यांच्या सासऱ्यांनी मतदारसंघात कोणती लोकोपयोगी कामे केली, याचा लेखाजोखा कुठेही नाही. हे पुस्तक म्हणजे खासदार खैरे यांची मतदारसंघातील फोटोजनिक चमकोगिरी ठरली असून संतमहंत आणि देवदर्शनाच्या फोटोंचा भडिमार आहे. साहेबांचा शिवसैनिक एक प्रवास असे या पुस्तकाचे शीर्षक आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी हे...
  March 10, 09:15 AM
 • औरंगाबाद- बीड बायपास मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावर अपघातांची श्रृंखला थांबायचे नाव घेत नाही. शुक्रवारी स्कूटीवर शिवाजीनगरहून पैठण रोडकडे जाणाऱ्या दांपत्याला ट्रकने एमआयटी चौकात ठोकरले. यात गाडीवर मागे बसलेली महिला ट्रकच्या मागच्या चाकात आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पती जखमी झाला आहे. स्नेहल मनोज बावळे (२८, गोल्डन सिटी, इटखेडा) असे मृत महिलेचे नाव आहे. महिलादिनीच काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. बीड बायपासवर मागील वर्षभरात आतापर्यंत तब्बल १६ बळी गेले आहेत....
  March 9, 11:14 AM
 • येत्या लोकसभा निवडणुकीस सामोरे जाताना राज्यातील मतदारांचा कौल नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी दिव्य मराठीने जनतेचा कल जाणून घेतला आणि त्याद्वारे जनतेच्या मनातील जाहीरनामा पुढे आणला आहे. यानिमित्त राज्याच्या प्रमुख शहरांसह ग्रामीण भागातील जनतेच्या नव्या सरकारकडून असणाऱ्या आशा-आकांक्षा जाणून घेण्यात आल्या. तसेच विद्यमान सरकारची प्रमुख क्षेत्रांत कामगिरी कशी राहिली याबाबतही सामान्य मतदारांची मते जाणून घेतली. मोदी सरकारतर्फे आखण्यात आलेली स्मार्ट सिटी योजना, स्वच्छ भारत...
  March 9, 09:54 AM
 • औरंगाबाद - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलिस उपनिरीक्षक पदासाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत बीड जिल्ह्यातील विष्णुपंत भगवान तिडके हे मागास वर्गवारीतून राज्यात प्रथम आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सुमीत कल्लाप्पा खोत हे राज्यातून प्रथम तर महिला वर्गवारीतून धुळे जिल्ह्यातील अश्विनी सुभाष हिरे या गुणानुक्रमे प्रथम आल्या आहेत. एकूण ६५० पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांसाठी ५ नोव्हेंबर २०१७ रोजी महाराष्ट्र लोकसेवा...
  March 9, 09:39 AM
 • औरंगाबाद - मराठवाड्यात औरंगाबादसह आठ जिल्ह्यांमध्ये तलाठ्याच्या ३३७ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. एसईबीसीतील उमेदवारांना नियुक्तिपत्र न देण्याचे शासनाचे आदेश असल्याने या प्रवर्गाबाबत संभ्रम आहे. राज्यातील एकूण १५४३ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यासाठी २२ मार्चपर्यंत अर्ज करता येतील. केंद्राचे आर्थिकदृष्ट्या मागासांना व राज्य शासनाने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणानुसार जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. शासनाच्या महापरीक्षा संकेत स्थळावर...
  March 8, 12:52 PM
 • औरंगाबाद- शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यातील वाद वाढतच आहे. मंगळवारी मुंबईत तर थेट मातोश्रीवरच तू-तू, मै-मै झाल्याचे समजते. वाद झाल्याचा दानवे यांनी इन्कार केला असला तरी बैठकीस उपस्थित अन्य सूत्रांनी मात्र हा वाद चांगलाच रंगल्याचे सांगितले. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोघांसोबत अर्धा तास बंद दाराआड चर्चा केल्याचे सांगण्यात आले. दानवे यांनी लोकसभेची उमेदवारी मिळावी, असा दावा पूर्वीच केला होता. अजूनही ऐनवेळी उमेदवार बदलून मलाच...
  March 7, 03:04 PM
 • केज/औरंगाबाद- मातंग समाजाला अनुसूचित जातीमध्ये लोकसंख्येप्रमाणे आरक्षण द्यावे या मागणीसाठी मंगळवारी बिंदुसरा प्रकल्पात उडी मारून आत्महत्या केलेल्या संजय ताकतोडे या तरुणाचे इन कॅमेरा शवविच्छेदन औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात करण्यात आले. दरम्यान, विच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात दिल्यावर बीड जिल्ह्यासह शहरातील मातंग समाजातील नेते व कार्यकर्त्यांनी घाटी रस्त्यावरील ज्युबिली पार्क येथे मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्ता रोको केला. नातेवाइक व समाजातील नेत्यांच्या मागणीनंतर बुधवारी...
  March 7, 12:30 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात