जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • औरंगाबाद-नारेगावकरांनी केलेली कचरा कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने अघोरी मार्ग शोधत ७ मार्च रोजी मिटमिटा गावाजवळ कचरा टाकण्याचा प्रयत्न केला. भडकलेल्या ग्रामस्थांनी दगडफेक, जाळपोळ सुरू केली. मग पोलिसांनी तुफानी लाठीहल्ला केला. घरात घुसून महिलांनाही मारहाण केली. १०० पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल झाले. पुढील स्लाइडवर पाहा- काही महत्त्वाच्या घटना
  December 31, 11:06 AM
 • औरंगाबाद- झाल्टा फाटा ते महानुभाव आश्रम असा १४ किलोमीटरचा बीड बायपास सहापदरी करून देतो. फक्त हा रस्ता राज्य शासनाकडून केंद्राकडे हस्तांतरित करण्याची तांत्रिक बाब पूर्ण करा, अशा सूचना केंद्रीय भूपृष्ठ व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सावर्जनिक बांधकाम विभागाला केल्या. रविवारी विभागीय आयुक्तालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी या सूचना केल्या. गत वर्षभरात बीड बायपासवर अनेक अपघात झाले आहेत. ट्रक, चारचाकींच्या धडकेने ११ जणांनी जीव गमावला असून किमान ४० नागरिक जायबंदी झाले आहेत. या...
  December 31, 10:36 AM
 • औरंगाबाद- देशात प्रथमच स्कायबसने प्रवास शक्य होणार आहे. ही स्काय बस प्रायोगिक तत्त्वावर सर्वप्रथमच औरंगाबादमधून धावेल. केंद्रीय भूपृष्ठ व जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी येथे आढावा बैठकीत ही घोषणा केली. वाळूज ते जालना अशा ८५ किमी मार्गासाठी गडकरी यांनी ही स्कायबस सुचवली. मेट्रोच्या तुलनेत हा खर्च कमी असल्याचे ते म्हणाले. गडकरी रविवारी एका लग्नसमारंभासाठी औरंगाबादेत होते. तत्पूर्वी त्यांनी सायंकाळी विभागीय आयुक्तालयात मराठवाड्यातून जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांचा आढावा...
  December 31, 09:57 AM
 • फर्दापूर- पळसखेडा येथील २४ वर्षीय तरुणाने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि. २९) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे येत्या जानेवारी महिन्यातच त्याचे लग्न होणार होते. सदर घटनेची पहूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पळसखेडा येथील सागर संजय सावळे (२४) याच्या वडिलांची पळसखेडा शिवारात पाच एकर जमीन आहे. त्यावरच सावळे कुटुंबाची उपजीविका भागते. सागरने शनिवारी रात्री १२. ३० वाजेच्या दरम्यान विष घेऊन आत्महत्या केली. सागरच्या वडिलाच्या नावावर कर्ज होते, अशी माहिती...
  December 31, 08:20 AM
 • वाळूज- बजाजनगर, महाराणा प्रताप चौकातील पी-११८ महावीर कॉम्प्लेक्समधील राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखाना क्र.१ येथील रेकाॅर्ड रूमला शनिवारी आग लागली. या आगीत जुने व नवीन सर्वच रेकाॅर्ड जळून खाक झाले. ही घटना शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमनच्या जवानांनी अवघ्या अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. ही आग नेमकी कशाने लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तसेच या आगीत किती नुकसान झाले आहे. याचा तपशीलही अद्याप प्राप्त झाला नाही. घटनेची नोंद...
  December 30, 11:29 AM
 • औरंगाबाद- इयत्ता आठवीतील विद्यार्थ्याने मोबाइल चार्जरच्या वायरने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मयूर पार्कमधील भगतसिंगनगरात शनिवारी घडली. प्रद्युम्न राजू हिवाळे (१४) असे त्याचे नाव आहे. दुपारी तीन वाजता लहान भाऊ शिकवणीहून घरी परतल्यानंतर हा प्रकार समोर आला. प्रद्युम्न इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत होता. त्याचे वडील गंगापूर भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असून आई गृहिणी आहे. त्याचा लहान भाऊ दुपारी शिकवणीला गेला होता, तर वडील कार्यालयात गेले होते. त्याची आई काही...
  December 30, 11:26 AM
 • औरंगाबाद- गुन्ह्यांच्या तपासात चोरांच्या मुसक्या आवळण्याप्रमाणेच ऐवज हस्तगत करण्याचेही आव्हान पोलिसांसमोर असते. परंतु, संस्थान गणपती मंदिरातील दानपेटीच्या चोरी प्रकरणात पोलिस अर्ध्याच यशाचे मानकरी ठरले आहेत. चोरीच्या घटनेनंतर गुन्हे शाखा सिटी चाैक पोलिसांनी अवघ्या २४ तासांत चोरट्यांना गजाआड केले खरे; परंतु सहा दिवसांनंतरही दानपेटी मात्र त्यांच्या हाती लागलेली नाही. शहराचे ग्रामदैवत असलेल्या राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिरातून २३ डिसेंबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास...
  December 30, 11:24 AM
 • औरंगाबाद- बँक कर्मचारी व नर्स असलेले पती-पत्नी नोकरीवर जाताच चोरट्यांनी त्यांच्या नागेश्वरवाडीतील घराचे कुलूप तोडून मंगळसूत्र, अंगठ्यांसह समोरील खोलीत ठेवलेली पिग्मी बँक असा ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. २७ डिसेंबर रोजी सायंकाळी दांपत्य घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. नागेश्वरवाडीतील चिंतामणी अपार्टमेंटमध्ये राहणारे गजानन आत्माराम आष्टुरकर (३१) हे एका बँकेत नोकरी करतात, तर त्यांच्या पत्नी घाटीत नर्स आहेत. २७ डिसेंबर रोजी सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास दोघेही कामावर गेले....
  December 30, 11:21 AM
 • औरंगाबाद- तुमच्या घरातील लग्न सोहळ्यात भरजरी कपडे घालून येणारे तरुण, अल्पवयीन मुले वधू किंवा वराकडील पाहुणेच असतील, असे नाही. कारण चांगली वेशभूषा करून पाहुण्यांसारखे येत वधू-वरांचे दागिने, रोख रकमेवर नजर ठेवून ती लंपास करणारी टोळी शहरात कार्यरत आहे. मागील आठ दिवसांत नऊ समारंभांतून सुमारे ५० लाख रुपयांचा ऐवज या टोळीने लंपास केला आहे. विशेष म्हणजे एकाही प्रकरणात पोलिसांना कुठलाही पुरावा सापडला नाही. अजून सहा महिने लग्नाचे मुहूर्त आहेत. त्यामुळे वऱ्हाडी म्हणून मिरवणाऱ्या या चोरट्यांचा...
  December 30, 11:19 AM
 • औरंगाबाद- इंटरनेट आणि मोबाइलच्या युगात वाचन संस्कृती संपली, अशी भीती वाटणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील एक चतुर्थांश म्हणजेच २५ % नागरिक पुस्तकांचे नियमित वाचन करतात. तर देशात सर्वाधिक ३३ % वाचक मुंबईकर आहेत. एवढेच नव्हे तर देश आणि अन्य राज्यांतील पुुस्तक वाचणाऱ्यांची संख्या घटत असताना महाराष्ट्रातील वाचकांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. पुस्तकांवर सर्वाधिक खर्च करणारे, वाचनासाठी अधिक वेळ देणारेही मराठी वाचक आहेत. महाराष्ट्र, मुंबईकर वाचनात...
  December 30, 08:33 AM
 • औरंगाबाद- शहरातील प्रख्यात डॉक्टर दांपत्याच्या मुलीच्या लग्नाच्या स्वागत समारंभातून वधूचे तब्बल ४२ तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे सव्वा लाख रुपये रोख रक्कम पळवण्याची आणखी एक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. बीड बासपासवरील गुरू लॉन्सवर झालेल्या या सोहळ्यात वधूची आई जेवत असताना तिने शेजारी ठेवलेली पर्स एका अल्पवयीन चोरट्याने पळवली. रात्री अकरा वाजता तीन जण लॉन्सवर आले. त्यापैकी एक अल्पवयीन मुलगा स्वागत समारंभात घुसला. त्याने दोन मिनिटात चोरी केली. चोरीची पर्स बाहेर उभ्या दोन तरुणांकडे...
  December 29, 11:31 AM
 • औरंगाबाद- शिवाजीनगरमधील अकराव्या योजनेतील एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. भगवान धोंडिबा शिरोळे असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, गुरुवारी दुपारी बारा वाजता घरात कोणी नसताना त्यांनी गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबाच्या लक्षात येताच त्यांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, घाटीतील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. शिरोळे यांचा २०१७ मध्ये अपघात झाला होता. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते...
  December 29, 10:52 AM
 • औरंगाबाद- शहरे स्मार्ट करण्याच्या योजनांवर शासन आणि प्रशासनाची धावाधाव सुरू असताना डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे वास्तव सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या नऊ महिन्यांत औरंगाबाद विभागातील ९१५ बालकांनी विविध कारणांनी जीव गमावला आहे, असे हा अहवाल सांगतो. शून्य ते ५ वर्षे वयोगटातील बालके दगावण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न सुरू असले तरी तो किती अपुरे आहेत हे या आकडेवारीतून स्पष्ट होते. बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे...
  December 29, 10:47 AM
 • औरंगाबाद- बहीण व तिच्या दोन मुलांना सोडून दुसऱ्या महिलेसोबत घरोबा करणाऱ्यास पाच जणांनी बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक करून न्यायालयात हजर केले असता १ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर.के. देशपांडे यांनी दिले. अब्दुल ऊर्फ कल्लू खालीद जहीर खान (२४, रा. इलियास कॉलनी, हर्सूल) असे आरोपीचे नाव आहे. शोएब खान शेर खान (२७, रा. मिसारवाडी) याने तक्रार दिली होती. शोएबचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तो रिक्षा...
  December 29, 10:39 AM
 • औरंगाबाद- कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी फुलेनगरात घडली. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास हा प्रकार समोर आला. बाबासाहेब पुनाजी भिवसने (३५) असे त्यांचे नाव आहे. त्यांची पत्नी माहेरी राहायला गेली होती. दोन मुले आणि मुली असणारे बाबासाहेब सेंट्रिंगचे काम करत होते. काही दिवसांपासून ते आर्थिक विवंचनेत असावेत अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. गुरुवारी रात्री त्यांनी गळफास घेतला. सकाळी शेजारी राहणारा पुतण्या त्यांना झोपेतून उठवण्यासाठी गेला असता हा प्रकार समोर आला....
  December 29, 10:32 AM
 • औरंंगाबाद- काही दिवसांपासून चोरट्यांनी शहर परिसरात धुमाकूळ घातला आहे. अत्यंत वर्दळीच्या आणि मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गुलमंडी येथील जेथलिया टॉवर्स अपार्टमेंटमधील ४ घरे फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. ही घटना गुरुवारी २७ डिसेंबर सायंकाळी साडेपाच ते साडेसातच्या दरम्यान घडली. चारपैकी तीन घरांची कुलपे न तुटल्याने चोरट्यांचा डाव फसला. एक घर काही दिवसांपासून रिकामे असल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले. मध्यवर्ती आणि वर्दळीचा परिसर म्हणून गुलमंडीची ओळख आहे. याच भागात प्रमुख...
  December 29, 10:28 AM
 • औरंगाबाद- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील भरती २०१० पासून बंद आहे. त्यामुळे टीईटीच्या चार पूर्वपरीक्षा देऊनही भावी शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भरती करण्याचे आश्वासन अनेक वेळा दिले खरे, पण ते फोल ठरले आहे. त्यामुळे राज्यात प्राथमिक शिक्षकांची २५ हजारांवर पदे रिक्तच आहेत. या रिक्त पदांमुळे शिक्षणाचा बोजवारा उडाला असून भावी शिक्षकांवर बेकारीचे जीवन जगण्याची वेळ ओढवली आहे. आठ वर्षांपासून शिक्षक भरती बंद आहे. दुसरीकडे दरवर्षी...
  December 29, 10:20 AM
 • वैजापूर- बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहक सेवा केंद्रातून ९० हजार रुपये असलेली बॅग पळवल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पंचायत समितीजवळ घडली. तालुक्यातील घायगाव येथील राहुल साळुंके हे पंचायत समिती कार्यालयाजवळ बँक ऑफ महाराष्ट्रचे ग्राहक सेवा केंद्र चालवतात. त्यांनी शुक्रवारी सकाळी महाराष्ट्र बँकेतून एक लाख ५० हजार रुपयांची रक्कम काढली व ही रक्कम घेऊन ते ग्राहक सेवा केंद्रात गेले. त्याठिकाणी रोकड असलेली बँकेत ठेऊन ते ग्राहकांच्या सेवेत व्यस्त होते. त्यावेळी एक अपंग...
  December 29, 08:20 AM
 • औरंगाबाद- बहुचर्चित आकांक्षा देशमुख हत्याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलिसांची चांगलीच कान उघाडणी केली आहे. पोलिसानी अटक केलेल्या आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी, यासाठी योग्य ती कारवाई करून प्रकरण कोर्टात दाखल करा, अशा सूचना महिला आयोगाने दिल्या आहे. विजया रहाटकर यांनी याप्रकरणी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेतली. या प्रकरणात जलदगतीने न्याय मिळावा, यासाठी पोलिसांनी योग्य ती करवाई करावी, असे विजया रहाटकर यांनी पोलिस आयुक्तांना सांगितले....
  December 28, 02:43 PM
 • औरंगाबाद- सिडको परिसरातील दोन मंगल कार्यालयांतील विवाह सोहळ्यांत एका व्यक्तीचे पैशांचे पाकीट, तर दुसऱ्या ठिकाणी एका महिलेची पर्स चोरून हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला. सप्तपदी व सौभाग्य मंगल कार्यालयांमध्ये बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास या घटना घडल्या. दरम्यान, लग्न समारंभात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे मंगल कार्यालये व लॉनमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी सांगितले. अाठवडाभरात विवाह सोहळ्यातून दागिने, पैसे...
  December 28, 10:44 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात