जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

Jalgaon News

 • पारोळा ।येथील गावहोळी चौक परिसरातील शिरसमणीकर ज्वेलर्ससह तीन दुकानांना बुधवारी पहाटे ६ वाजता शाॅर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत एक कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. १९ मार्च रोजी रात्री ९ वाजता शिरसमणीकर ज्वेलर्स, सुनील ड्रेसेस, सरसवान किराणा यांनी दुकान बंद केले. बुधवारी सकाळी सहा वाजता किराणा दुकानाचे मालक रमेश अमृतकर यांना ज्वेलर्सच्या दुकानातून धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी ज्वेलर्सचे मालक सुनील भालेराव यांना माहिती दिली. दुकानाचे शटर उघडले असता...
  09:46 AM
 • धुळे- मोदी आपसे बैर नहीं, डॉ. भामरे तुम्हारी खैर नहीं, असे आव्हान देतच आमदार अनिल गोटे यांनी लोकसभेच्या रिंगणात उडी घ्यायची तयारी केली आहे. धुळे मतदारसंघाला टक्केवारी, गुंडगिरी व गटबाजीचा लागलेला कॅन्सर मुळापासून उखडून फेकण्यासाठी आपली उमेदवारी राहील, असे गोटे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले. सध्या या मतदारसंघातून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे भाजपचे प्रतिनिधित्व करतात. मात्र धुळे मनपा निवडणुकीपासून भामरे व गोटे यांच्यात वितुष्ट निर्माण झाले आहे. त्यामुळे गोटेंनी...
  March 20, 12:09 PM
 • यावल- टिक टॉकवर तलवारीसह व्हिडिओ तयार करुन तो सोशल मीडियावर अपलोड करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. तलवार हातात घेवून व्हायरल झालेल्या या व्हिडिओवरून तरुणाच्या पोलिसांनी मुसक्या आवळून त्याला कोठडीत टाकले आहे. सागर अशोक पाटील (वय-19, रा.साकळी, ता.यावल) असे आरोपी तरुणाचे नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सागर पाटील याच्याकडे तलवार असल्याची माहीती फैजपूर उपविभागीय पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे व पोलिस निरीक्षक डी. के. परदेशी...
  March 19, 12:29 PM
 • जळगाव । घरात एकट्या असलेल्या मेहुणीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या एका आरोपीस न्यायालयाने सोमवारी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या आरोपीस आजन्म कारागृहात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. नरेंद्र बीनाबाई रतवेकर (४१, रा.बळीरामपेठ) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने २२ नोव्हेंबर २०१६ रोजी सायगाव (ता.चाळीसगाव) येथे त्याच्या ३२ वर्षीय मेहुणीवर अत्यावर करुन नंतर डोक्यात दगड मारुन खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह वाळूच्या ढिगाऱ्याखाली पुरण्याचा प्रयत्न केला होता....
  March 19, 10:08 AM
 • यावल- यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात एक कोटीहून अधिक रकमेचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. तत्कालीन पाच प्रकल्प अधिकारी तसेच एक मक्तेदार आणि कार्यालयातील तत्कालीन कर्मचार्यांविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन 2005 ते 2010 दरम्यानहा अपहार झाल्याचे राज्य शासनाकडून नियुक्त निवृत्त न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड यांच्या समितीने केलेल्या चौकशीत उघड झाले आहे. त्यात दुधाळ जनावरे, कन्यादान योजना आदींचा समावेश आहे. तत्कालीन अधिकार्यांवर गुन्हा दाखल झाल्याने...
  March 18, 12:49 PM
 • यावल- तालुक्यातील मनवेल येथे एका शेतकऱ्याने शेतातील नापिकी, कर्ज आणि केळीला हमिभाव मिळत नसल्याने कंटाळून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव सुरेश भागवत पाटील (70) असे आहे. त्यांनी स्वतःच्या शेतात विष प्राशन करून आयुष्य संपवले. सुरेश भागवत पाटील यांचा मृतदेह पिळोदा शिवारामध्ये रविवारी सकाळी आढळून आला. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी सेंट्रल बँकेकडून 2.90 लाखांचे कर्ज घेतले होते. त्याची परतफेड केळी विकून करणार असा त्यांचा संकल्प होता....
  March 17, 02:50 PM
 • अमळनेर - तसे पाहता महाराष्ट्रातील अमळनेर शहराला फारसे कुणी अाेळखत नाही; परंतु जळगाव जिल्ह्यातील हे शहर काेट्यधीशांचे गाव अाहे. २.८८ लाख लाेकसंख्या असलेल्या या शहरात विप्राे कंपनीचे सुमारे ३ % शेअर्स अाहेत व सध्याच्या बाजारपेठेनुसार या शेअर्सचे मूल्य सुमारे ४,७५० काेटी रुपये अाहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश शेअर्स अतिशय कमी किमतीत देण्यात अाले. तसेच हजाराे शेअर्स तर भेटवस्तू म्हणून दिले गेले हाेते. विप्राे अायटी कंपनी नव्हती व केवळ तेल, वनस्पती तूप व इतर उत्पादने बनवत हाेती तेव्हाची ही...
  March 17, 02:18 PM
 • जळगाव - नितीन गडकरी यांनी मला लोकसभा लढण्याचा सल्ला दिला होता. मात्र लोकसभेला मी उमेदवार देतो, निवडून आणतो. मला खासदारकीत रस नाही. लोकसभा लढण्याचा प्रश्नच नाही, असे भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे म्हणाले. अंबानी यांच्याबाबत मी जे बोललो ते खरे आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनी बळकावणाऱ्यांमध्ये त्यांचेही नाव आहे. जी गोष्ट रेकॉर्डवर आहे, तेच मी बोललो. अंबानींची चौकशीदेखील झाली आहे. पुढील कारवाई टाळण्यासाठी त्यांनी स्थगिती मिळवली आहे. आता हे प्रकरण न्यायालयात आहे, असे ते म्हणाले....
  March 17, 10:09 AM
 • यावल- पाळीव कुत्र्याने अचानक हल्ला केल्यामुळे एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. प्रताप अमरसिंह पाटील (वय- 43, विरावली, ता. यावल) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजता यावल शहरातील साॅ मिलमध्ये घडली. कुत्र्याने प्रताप पाटील यांचा डावा हात आणि कमरेचे लचके तोडले आहेत. यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. शहरातील चोपडा रस्त्यावर साॅ मिल आहे. मिल मालकाकडे काही पाळीव कुत्रे आहेत. शनिवारी मिलमधील एका कुत्र्याने प्रताप...
  March 16, 06:33 PM
 • नंदुरबार- शहर पोलिस स्टेशन येथून नुकतेच नाशिक ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये बदली होऊन गेलेले पोलिस निरीक्षक गिरीश पाटील यांचे अल्पशा आजाराने नाशिक येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये निधन झाले. मूळचे मारवाड (ता.अमळनेर) येथील रहिवासी पोलिस निरीक्षक गिरीश पाटील नंदुरबार येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी केली होती. त्यानंतर त्यांची बदली शहर पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली. गुन्हेगारांमध्ये त्यांच्या मोठा वचक होता. नंदुरबार जिल्ह्यात ज्या ज्या...
  March 15, 02:15 PM
 • जळगाव - अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण विभागाने प्रत्येक मद्यपेय बाटलीवर मद्यपान हे आरोग्याला धोकादायक, सुरक्षित राहा, मद्यपान करून गाडी चालवू नका ही वाक्ये मातृभाषेतून लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होणार असल्याने राज्य उत्पादन शुल्क आणि अन्न व औषधी प्रशासनाकडून याविषयी तपासणी करण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाच्या राज्याच्या राज्य शुल्क उत्पादक आयुक्त आणि अन्न विभागाच्या आयुक्तांची बैठक बुधवारी झाली. बैठकीत अन्न सुरक्षा आणि...
  March 15, 09:50 AM
 • मुक्ताईनगर / रावेर - गेल्या वेळी युती तुटली. मात्र, त्यासाठी मी एकटा कारणीभूत नाही. पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची अंमलबजावणी केली. तेव्हा युती तुटली नसती तर भाजपचा मुख्यमंत्री झाला नसता. आता युती झाली आहे. सरकार आले तर मुख्यमंत्री भाजप-सेनेचा आहे, असे म्हणावे लागले. मित्रपक्षाने मनातील कटुता दूर करावी. बदला घेण्याची ही वेळ नाही, असे आवाहन माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. खडसे यांच्या खडसे फार्म हाऊसवर प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी झाली. त्या वेळी ते बोलत...
  March 14, 11:26 AM
 • यावल- अल्पवयीन मुलीशी प्रेम व प्रेम संबंध तोडले तर तुला गोळी घालेन, असे म्हणत डोक्यावर पिस्तूल रोखणारा प्रेमवीर..या प्रकाराने अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न.. बुधवारी झाला या प्रकरणाचा उलगडा.. मुलीने नातेवाईकांनी यावल पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवूनशहरातील बोरावल गेट गावठी कट्ट्यांसह चौघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहरात गावठी कट्टा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी...
  March 13, 09:17 PM
 • भुसावळ- रावेर लोकसभा मतदारसंघावर माजी मंत्री तथा भाजपचे नेते एकनाथ खडसेंचा प्रभाव आहे. त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. उमेदवारी यादी अद्याप जाहीर झालेली नाही. कोणताही राजकीय दगाफटका होऊ नये म्हणून एकनाथ खडसे हे सातत्याने पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात आहेत. खासदार रक्षा खडसे यांनी चोपडा विधानसभा मतदारसंघात मंगळवारी 13 गावांना भेटी देऊन कार्यकर्त्यांच्या कोपरा बैठका घेतल्या. पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद पाठीशी असावा म्हणून शनिवारी (दि.9) त्यांनी...
  March 13, 04:44 PM
 • यावल- यावल-भुसावळ दरम्यान असलेल्या तापी नदीच्या पुलावरून 28 वर्षीय तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. भूपेंद्र मुकुंदा बोंडे (रा.शिव कॉलनी, भुसावळ) असे आतम्हत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ती घटना बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. आयटीआयचे शिक्षण पूर्ण करून सदर तरुणाने रेल्वेमध्ये अॅप्रेंटीसशीप केली व नोकरीच्या शोधात होता. नैराश्यातून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, असे बोलले जात आहे. फैजपूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, हवालदार गोकूळ तायडे, रमण...
  March 13, 01:13 PM
 • यावल- दहीगाव येथून चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेहमंगळवारी आढळल्याने खळबळ उडाली आहे.सुरेश विठ्ठल महाले-कोळी (वय-45) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. केळीच्या बागेत सुरेश महाले यांचा मृतदेह आढळून आला. नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह जळगाव येथील जिल्हा हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे. सुरेश विठ्ठल महाले हे गेल्या शनिवारपासून दहीगाव येथून बेपत्ता झाले होते. पोलिसांना प्राथमिक माहिती घेऊन कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते....
  March 12, 05:44 PM
 • साक्री- शहरातील हॉटेल अमित समोर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी एसटी बस, ट्रेलर आणि पिकअपचा विचित्र अपघात झाला. या अपघातात पिकअप चालकाचा जागेवर मृत्यू झाला. सुनील शांताराम मुसळे (रा.पिंपळनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हॉटेल अमितसमोर सकाळी 8 वाजून 10 मिनिटांला मालेगाव- साक्री ही बस थांबली. प्रवाशी खाली उतरत असताना बसमागून आलेला भरधाव ट्रेलर समोरून येणार्या पिकअपला जोरदार धडक देत रस्त्याच्या विरुद्ध बाजुला असलेल्या जॉनस कंपनीचेच्या शोरुमसमोरील...
  March 12, 05:17 PM
 • यावल- महाराष्ट्रात गोहत्याबंदी कायदा लागू झाला असतानाही यावल तालुक्यात गोहत्या, गोवंश तस्करी सर्रास सुरु आहे. एवढेच नाही तर गाेवंश तस्कराशीपोेलिसांचे साटेलोटे असल्याचा आरोप समस्त हिंदूत्ववादी संघटनेने केला आहे. गोहत्या आणि गोवंश त्वरित बंद करावी, या मागणीचे निवेदन शहरातील समस्त हिंदुत्त्ववादी संघटनाच्या वतीने निवासी नायब तहसिलदार आर.के. पवार यांना देण्यात अाले. गुरांचे वाहन रोखणाऱ्यांवरच पोलिसांची कारवाई, नागरिकांमधून संताप गोवंश वाहून नेणारे वाहन रोखणार्यांवरच गेल्या...
  March 11, 07:31 PM
 • जळगाव- मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या गीतांजली एक्सप्रेस या सुपरफास्ट गाडीच्या सर्वात शेवटी असलेल्या पाॅवर काेचला साेमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शिरसाेली रेल्वेस्थानक पास करीत असतांना अचानक अाग लागली. अाग लागल्याचे लक्षात अाल्याने तत्काळ गाडी थांबविण्यात येवुन अाग अाटाेक्यात अाणण्यात रेल्वे प्रशासनाला यश अाले. त्यामुळे अागीचे प्रमाण वाढले नाही. अागग्रस्त काेच गाडीपासून वेगळा करून सुमारे तासभराच्या विलंबाने गीताजंली एक्सप्रेसला मार्गस्थ करण्यात अाले. दरम्यान, अागीची...
  March 11, 05:10 PM
 • जळगाव - दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या लिंगाच्या कॅन्सरग्रस्त रुग्णावर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तीन तज्ज्ञ डॉक्टरांनी तब्बल पावणेदोन तास यशस्वी शस्त्रक्रिया करून रुग्णाचे प्राण वाचवले. विशेष म्हणजे ग्रेड-२ मध्ये असलेल्या ६० वर्षीय रुग्णाचे लिंगच काढून टाकले. त्यामुळे मूत्र विसर्गाचा मार्ग बदलण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील ६० वर्षीय वृद्धाला लिंगावर गेल्या जखम झाली हाेती. मात्र, याविषयी इतरांना सांगण्याची त्यांना लाज वाटत होती. त्यामुळे ही बाब अनेक महिने लपवून...
  March 9, 10:42 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात