Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

Jalgaon News

 • शिंदखेडा- गणपती मूर्तीसाठी अाजीकडून पन्नास रूपये मिळाले नाही, म्हणून तेरा वर्षाच्या मुलाने अात्महत्या केली. तालुक्यातील भडणे येथे ही घटना घडली. भडणे येथील सातवीत शिक्षण घेणारा भूषण भगवान खरकार (पाटील) (वय १३) हा शिंदखेडा येथील जनता हायस्कूलमध्ये शिक्षण घेत हाेता. त्याने गणपती बसवण्यासाठी आजीकडून पैसे मागितले होते. आजीने १५० रुपये दिले. मात्र भूषणने अाणखी ५० रुपयांची मागणी केली. ते देण्यास नकार दिला. म्हणून भूषणला राग आला. त्याने राहत्या घरातील खांबाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
  September 13, 10:49 AM
 • धुळे- धुळे, नंदुरबारसह जळगावमध्ये विस्तार असलेली ग. स. बँक प्रत्यक्षात तोट्यात असताना नफ्यात दाखवली. त्यासाठी बनावट कागदपत्रे व आर्थिक पत्रकांचा आधार घेतला. संचालक, सभासदांच्या बैठकीतही खोटी माहिती सादर करण्यात आली. तसेच एटीएमबद्दल रिझर्व्ह बँकेने परवानगी नाकारली तरी नाशिकच्या कंपनीला नियमबाह्य ठेका देण्यात आला. या दोन्ही प्रक्रियांतून बँकेला साडेपाच कोटींचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी ४४ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची बँक...
  September 13, 08:40 AM
 • यावल- किरण मराठे या तरुणाला चार ते पाच तास चौकशी करून एटीएसच्या पथकाने साखळी गावात रात्री येऊन सोडले आहे. हा तरुण हा नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या गावातील वासुदेव सूर्यवंशी व विजय उर्फ भैय्या लोधी या दोघांचा मित्र आहे. त्याला जळगाव येथून सायंकाळी पथकाने ताब्यात घेतले. त्याची गाडीतच सुमारे चार ते पाच तास चौकशी केली तसेच त्याच्या दोन मित्रांच्या संदर्भात काही माहिती जाणून घेतली. एटीएसच्या पथकाला तपासात आवश्यक ते सहकार्य करण्याच्या अटीवर त्याला सोडण्यात आले....
  September 12, 11:03 PM
 • भडगाव- वाडे येथून भडगावकडे निघालेली बस झाडावर आदळली. या अपघातात 43 प्रवासी जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी सकाळी 7 वाजून 30 मिनिटांला वडधे फाट्यावर घडली. वाडे गावाहून सुटणारी बस (एम.एच. 20 बीएल 0112) वेगात होती. चालकाचा ताबा सुटल्याने बस समोरच असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी चालकासह काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. घटना घडल्यानंतर तत्काळ जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रवासी विशाल प्रभाकर पाटील (रा.कनाशी) यांच्या फिर्यादीवरुन बसचालक वाल्मीक...
  September 12, 06:56 PM
 • धुळे- शहरापासून जवळ असलेल्या वडेल शिवारात काल सोमवारी तरुणीचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळला होता. त्यानंतर धुळे एलसीबीचे पथक मंगळवारी रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी तळ ठोकून होते. वडेल शिवार व मृतदेह आढळून आलेला परिसर पोलिसांनी अक्षरश: पिंजून काढला. मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची तपासणी करावी, अशी मागणी शवविच्छेदनानंतर केली. या वेळी पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी सखोल तपासाची हमी दिल्यावर मृतदेह कुटुंबीयांनी ताब्यात घेतला. वडेल शिवारात मतिमंद मुलीचा मृतदेह काल...
  September 12, 11:18 AM
 • वरणगाव- पतीने पत्नीचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास हतनूर (ता.भुसावळ) येथे घडली. सोनी उर्फ मनीषा योगेश कोळी (वय २६) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी संशयित पती योगेश अशोक कोळी (रा.हतनूर) यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध वरणगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे . संशयित योगेश कोळी (तायडे) व मनीषाचा नऊ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तर लग्नापासूनच संशयित पत्नीचा छळ करत होता. त्याने अनेकदा पत्नीला मारहाणदेखील केली होती. दोन...
  September 12, 11:09 AM
 • जळगाव- शहरातील इच्छादेवी मंदिरामागील पंचशीलनगरात मंगळवारी (दि.११) सायंकाळी सात वाजता शाॅर्टसर्कीटने अाग लागली. त्यातच एका घरातील सिलिंडरचा स्फाेट झाला. त्यात ६ घरे पूर्णत: खाक झाली. अनेक घरांना अागीची झळ बसली. स्थानिक नागरिकांसह अग्निशमन दलाच्या सहा बंबांनी ही अाग विझवण्यात रात्री १० वाजता यश अाले. मात्र, ताेपर्यंत लाखाेंची वित्तहानी झाल्याने अापदग्रस्तांना रडू काेसळले. अाग विझवताना दाेन जण जखमी झाले. महामार्गालगत ईच्छादेवी मंदिरामागे असलेल्या पंचशीलनगर भागात सायंकाळी सात...
  September 12, 10:54 AM
 • जळगाव- पाकिस्तानची ढासळत चाललेली अर्थव्यवस्था, दारिद्रय आणि बेरोजगारी लपवण्यासाठी जम्मू काश्मीरच्या निमित्ताने पाकिस्तानकडून धर्माचे राजकारण जिवंत ठेवले जात आहे. अशा वेळी भारतीयांनी एकसंघ होऊन राष्ट्रवादाची भावना वाढीला लावावी, असे मत सेवानिवृत्त मेजर जनरल डॉ.जी.डी. बक्षी यांनी व्यक्त केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विचारधारा प्रशाळेतंर्गत असलेल्या स्वामी विवेकानंद अभ्यास व संशोधन केंद्राच्या वतीने मंगळवारी निवृत्त मे.जनरल डॉ.जी.डी.बक्षी यांचे...
  September 12, 10:47 AM
 • भुसावळ- कौटुंबिक वादातून पतीने दोरीनेपत्नीचा गळा आवळून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनिषा योगेश कोळी (26) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. योगेश अशोक कोळी (30) आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. भुसावळ तालुक्यातील हतनूर येथे ही घटना घडली आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..
  September 11, 03:36 PM
 • मोदी म्हणाले...प्रसिद्ध चौधरी चहा घेण्यासाठी नंदुरबारला यायचो नंदुरबार- हर घर पोषणआहार त्योहार अंतर्गत मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील अंगणवाडी सेविका,आशा कर्मचारी आणि आरोग्य सेविका यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. राज्यातील सर्वाधिक कुपोषणग्रस्त भागापैकी एक असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातीलअंगणवाडी सेविका,आशा कर्मचारी आणि आरोग्य सेविका यांना पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा, वाहणार्या...
  September 11, 03:22 PM
 • यावल-किनगाव (ता.यावल) येथे रविवारी अतिसार सदृश्य लागण झाल्याने २ जण दगावले, तर ४० जणांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू होते. सोमवारी देखील १७ रुग्णांची तपासणी करत त्यांना जळगावला हलवण्यात आले. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर ह्या पथकासह गावात तळ ठोकून होत्या. आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, माजी जि. प. सदस्य आर.जी.पाटील यांनी रुग्णालय गाठून मदत कार्याचा आढावा घेतला. किनगाव येथे रविवारी सकाळी अतिसार सदृश्य लागण झाली. त्यात प्रकृती खालावल्याने नाना माधव साळुंखे (वय...
  September 11, 11:09 AM
 • जळगाव- पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले भाव, महागाई याकडे केंद्र आणि राज्यातील सरकारचे लक्ष वेधण्यासाठी साेमवारी घाेषित करण्यात अालेला भारत बंद यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या कांॅग्रेस, राष्ट्रवादी, मनसे अाणि समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांना भाजप कार्यकर्ते अाणि व्यापाऱ्यांनी हरहर माेदीच्या घाेषणांनी प्रत्युत्तर दिले. त्यामुळे जळगावात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरून दाणा बाजार, फुले व्यापारी संकुल, गोलाणी...
  September 11, 11:03 AM
 • वराड- धरणगाव तालुक्यातील मुसळी येथे २६ वर्षीय युवकाने नाेकरी न मिळाल्याने विहिरीत उडी घेऊन अात्महत्या केली. संदीप गोविंद घोलप असे त्याचे नाव अाहे. संदीप घाेलप ७ सप्टेंबरपासून बेपत्ता होता. रविवारी विहिरीमध्ये त्याचा मृतदेह आढळला. संदीप हा पदवीधर होता. नोकरीच्या शोधात ताे फिरत होता. तो मानसिक तणावात असल्याने त्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या करू जीवन संपवले.
  September 11, 10:52 AM
 • जळगाव- अल्पावधीतच लाखाे जळगावकरांच्या हृदयात स्थान मिळवणाऱ्या दिव्य मराठीचा सातवा वर्धापन दिन मंगळवारी साजरा हाेत अाहे. यानिमित्ताने स्नेहमिलनाचे अायाेजन करण्यात अाले अाहे. वाचकांच्या विश्वासाची सात वर्षे दिव्य मराठीने पूर्ण केली आहेत. या यशस्वितेत जळगावकरांचा मोठा वाटा आहे. त्यांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे ही यशपूर्ती होऊ शकली. म्हणून मंगळवार, दि. ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेपासून लाडवंजारी मंगल कार्यालय, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६, इच्छादेवी चौफुली, जळगाव येथे...
  September 11, 10:33 AM
 • यावल- तालुक्यातील किनगाव येथे रविवारी अतिसार सदृश्य लागण झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. रात्रीपासून सकाळपर्यंत प्राथमिक बारोग्य केंद्रात सुमारे 50 हून जास्त रूग्ण उपचारार्थ दाखल झाले आहे तर काहींना जळगाव येथील जिल्हा रुग्णालवात हलविण्यात आले आहे. गावात आरोग्य पथक, लोकप्रतिनिधी तळ ठोकून आहेत. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ज्या भागातील रूग्ण आहेत त्या भागात सार्वजनिक पाणी पुरवठा सह स्वच्छतेविषयी विशेष काळजी घेतली जात आहे. तसेच डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची सोमवारी आरोग्य...
  September 10, 11:54 AM
 • जळगाव- घरमालकाच्या संपत्तीवर नजर ठेवून असलेल्या मोलकरणीनेच नियोजन करून भावासह तिघांच्या मदतीने वृद्धेस बांधून जबरी चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. मोलकरणीने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे बटन बंद केल्यामुळे तिच्यावर सर्वप्रथम पाेलिसांचा संशय बळावला होता. त्यामुळे पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर शेतात दडवून ठेवलेला एेवज काढून दिला. डॉ. नरेंद्र दोशी यांच्या घरात शनिवारी दुपारी १.३० वाजता घडलेल्या या जबरी चोरीच्या नाट्यावरून रात्री ११ वाजता पडदा उठला....
  September 10, 10:56 AM
 • जळगाव- तांबापुरातील मच्छी बाजार, गवळीवाड्यात रविवारी दुपारी झालेल्या किरकोळ भांडणावरून रात्री ९.४५ वाजता दोन गटात तुफान हाणामारी झाली. या वेळी गोठ्याजवळील बैल बिथरल्याने हाणामारीचे रूपांतर जोरदार दगडफेकीत झाले. यात दोन्ही गटांकडून दगड, विटा, काचेच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या घटनेत १० दुचाकींचे नुकसान तर १० घरांची नासधूस झाली. तसेच एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या ६ कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत तर २ तरुण व एक बालक...
  September 10, 10:45 AM
 • चाळीसगाव- जेसीबी मशीन व ट्रॅक्टर सोडण्यासाठी एक लाख २० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या उपखेड (ता.चाळीसगाव) येथील वनरक्षकास जळगावच्या लाचलुुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास चाळीसगाव वन विभागाच्या कार्यालयात झाली. प्रकाश विष्णू पाटील (५०) असे या वनरक्षकाचे नाव असून तो चाळीसगावमध्ये राहतो. तक्रारदाराचे स्वतःच्या मालकीचे जेसीबी मशीन असून ते वन विभागाच्या हद्दीत मुरूम उत्खनन करताना वनरक्षक प्रकाश पाटील यांना आढळले होते. त्यांनी...
  September 10, 07:47 AM
 • यावल- नालासाेपारा येथील स्फाेटक प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील साकळी (ता. यावल) येथून अटक करण्यात अालेल्या संशयितांना रविवारी मुंबईच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात अाले. न्यायालयाने या दाेघांना १७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सूर्यवंशी व लोधी यांच्याकडून ज्वालाग्राही पदार्थ, पेनड्राइव्ह, मोबाइल असे साहित्य जप्त केल्याचे एटीएसने न्यायालयात सांगितले. एटीएसने १० ऑगस्ट रोजी नालासोपारा येथून काही शस्त्रे व बाॅम्ब जप्त करून वैभव राऊतला अटक केली हाेती. नंतर याच प्रकरणात शरद कळसकर,...
  September 10, 07:28 AM
 • पिंपळनेर (धुळे)- जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत पिंपळनेरचा थेट सरपंचपदासह निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 17 सदस्यसंख्या असलेल्या पिंपळनेर ग्रामपंचायतीत ६ वॉर्डांचा समावेश आहे. जिल्ह्यात आर्थिकदृष्ट्या मजबुत ग्रामपंचायत म्हणून या ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. निवडणूकीची घोषणा होताच प्रमुख राजकीय पक्षांच्या आजी-माजी सदस्यांसोबत अनेक तरुण उमेदवारांची रेलचेल सुरू आहे. जिल्ह्य़ातील सवाँत मोठी लोकसंख्या व आर्थिक विकासाबरोबर उत्पन्न गटात प्रथम क्रमांक असलेली...
  September 9, 01:04 PM
 
जाहिरात

RECOMMENDED