Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

Jalgaon News

 • जळगाव- धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी धनगर समाज संघर्ष समितीतर्फे इच्छादेवी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. यासह समाजबांधवांनी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिलेला शब्द पाळला नाही. चार वर्षांपासून ते अभ्यास सुरू असल्याचे सांगून आरक्षण देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे आता सरकारवर विश्वास राहिलेला नाही. तसेच रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय पर्याय नसल्याने हे...
  August 14, 10:36 AM
 • यावल (जळगाव) - आरक्षणाच्या मागणीसाठी येथील तहसिल कार्यालयावर येडकोट येडकोट जय मल्हार च्या घोषणा देत धनगर समाजाने सोमवारी मोर्चा काढला. यावेळी तहसिलदार व पोलिस निरिक्षकांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले तर शासनाने आरक्षणासंर्दभात लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धनगर समाज बांधवांनी दिला आहे. शहरातील तसेच तालुक्यातील किनगाव, मनवेेल, साकळी, गिरडगाव, सांगवी सह तालुकाभरात विखुलेला धनगर समाज सोमवारी एकत्र आला होता. हातात पिवळे ध्वज घेवुन धनगर समाजाला...
  August 13, 08:16 PM
 • चोपडा (जळगाव) - राज्यातील प्रत्येक विद्यार्थी व्यसनमुक्त आणि आरोग्यसंपन्न रहावा यासाठी येत्या 15 ऑगस्टरोजी शिक्षण विभाग (महाराष्ट्र), राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण प्रकल्प (NTCP) यांसह इतर संघटनांच्या मदतीने तंबाखूमुक्त शाळा हे महत्त्वकांक्षी अभियान राबविले जाणार आहे. त्यानुसार या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण संपल्यानंतर प्रत्येक शाळा तसेच कार्यालये, रुग्णालये या ठिकाणी तंबाखूमुक्त आयुष्य जगण्याची शपथ घेतली जाणार आहे. तसेच यानिमित्ताने तंबाखू से आजादी या विषयावर शाळेने प्रभातफेरी...
  August 13, 05:16 PM
 • जळगाव- खान्देशात पावसाने दडी मारल्याने जळगाव जिल्ह्यात दुष्कासदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. निम्मा पावसाळा संपत आला असताना जिल्ह्यातील धरणांमध्ये असलेल्या अत्यल्प साठ्यामुळे चिंता वाढली अाहे. मोठे, मध्यम आणि लघुप्रकल्पांमध्ये केवळ २२.३५ टक्केच साठा शिल्लक असून त्यातही १३ पैकी ९ मध्यम प्रकल्प काेरडेठाक पडल्याने टंचाईची स्थिती निर्माण हाेण्याची भीती अाहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर, वाघूर अाणि गिरणा या तीन माेठ्या प्रकल्पांमध्ये जेमतेम २७.३५ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक अाहे....
  August 13, 10:48 AM
 • कापडणे- तालुक्यातील उडाणे येथे खेळता-खेळता पाण्याने भरलेल्या मोठ्या पातेल्यात पडल्याने दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी चार वाजता घडली. निकिता (३ वर्षे) व ज्ञानेश्वरी पाटील (दीड वर्षे) असे मृत बहिणींचे नाव आहे. तालुक्यातील उडाणे येथील निकिता भाऊसाहेब पाटील (३ वर्षे) व ज्ञानेश्वरी भाऊसाहेब पाटील (दीड वर्षे) या दोन्ही बहिणी रविवारी घरात खेळत होत्या. तब्येत बरी नसल्याने त्यांची अाई राणीबाई या घरच्या पुढच्या खोलीत अाराम करत होत्या. तसेच अाजीही घरच्या पुढच्या...
  August 13, 10:42 AM
 • जळगाव- शहरात विविध ठिकाणी एकाकी आयुष्य जगत असलेल्या गरजू वृद्ध व बालकांना जागेवरच ताजे अन्न मिळावे या उद्देशाने नि:स्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानतर्फे फूड व्हॅन रविवारपासून कार्यान्वित झाली गरजूंना जागेवर अन्न पुरवणारी ही पहिलीच फूड व्हॅन ठरली आहे. ६० वर्षांवरील वृद्ध तसेच १४ वर्षांआतील बालक अशा गरजूंना अन्न पुरवले जाणार आहे. त्यासाठी संस्थेने व्हॅन तयार केली आहे. ती दररोज सकाळ व सायंकाळ अन्नदात्यांच्या घरी जाऊन ताजे अन्न गाेळा करेल. त्यानंतर ते गरजूंपर्यंत पाेहाेचवेल. रविवारी ही...
  August 13, 10:09 AM
 • काळ्या-निळ्या गाभुळलेल्या मेघांच्या सावलीत बुडालेली गर्द हिरवळ अन् काेवळ्या सूर्यकिरणांची साेनेरी पखरण, लक्ष वेधून घेणारी पिवळीशार फुले असं श्रावणाच्या चाहुलीचं चैतन्यदायी गाणी गाणाऱ्या निसर्गाचं चित्र जैन हिल्स परिसरातून टिपलय निसर्गप्रेमी तुषार बुंदे यांनी. श्रावण मास अाजपासून : निसर्गाच्या रंगरुपाचं भरजरी लेणं असलेला श्रावण महिना रविवारपासून सुरू हाेत अाहे. अागमनाची चाहूल लागली तरी यंदा पावसाचा मागमूसही दिसत नाही. मात्र, जूनमधील पावसामुळे जळगावातील जैन हिल्स परिसर...
  August 12, 11:55 AM
 • जळगाव- जळगावच्या २६ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याने शुक्रवारी रात्री गळफास घेऊन पुणे येथे अात्महत्या केली. अात्महत्येपूर्वी तरुणाने चिठ्ठी लिहून ठेवली अाहे; पण त्यात काय लिहिले अाहे? याबाबत माहिती अद्याप समाेर अालेली नाही. मात्र, अाईच्या अकाली निधनानंतर ताे खचला हाेता, असे सांगण्यात येत अाहे. दरम्यान, शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह घेऊन नातेवाईक शनिवारी रात्री पुणे येथून जळगावकडे रवाना झाले. रविवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार हाेणार अाहेत. प्रशांत विलास हाेले (रा. श्रद्धा काॅलनी,...
  August 12, 11:51 AM
 • नंदूरबार - नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, धडगाव व तळोदा तालुक्यातील काही गावांत शनिवारी सायंकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य झटके जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.५ एवढी नोंदवली गेली असून सरदार सरोवर प्रकल्प परिसरातील केवडिया कॉलनी येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. तळोदा तालुक्यातील सलसाडी, पाडळपूर, गोपाळपूर, पांडुर्खे, बंधारा, राणीपूर, प्रतापपूर, रांझणी, तळवे, कढेल आदी गावांत मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याचे...
  August 12, 09:40 AM
 • यावल - फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून महिलेचे छायाचित्र टाकून अश्लील कमेंट करणे एका उपद्रवीला चांगलेच महागात पडले. आपणास पकडणार कोण, असा संबंधिताचा समज होता. मात्र, यावल पोलिसांनी जिल्हा सायबर सेलची मदत घेऊन थेट फेसबुकच्या अमेरिका येथील कॅलिफोर्नियातील कार्यालयातून माहिती मिळवत यावल पोलिसांनी संशयितास शुक्रवारी रात्री बेड्या ठोकण्यात आल्या. रत्नदीप भीमराव ससाणे (रा.जांभुळधाबा, ता.मलकापूर, जि.बुलडाणा) असे आरोपीचे नाव आहे. फैजपूर येथील रहिवासी २८ वर्षीय विवाहितेने फैजपूर पोलिस...
  August 12, 08:37 AM
 • पिंपळनेर/नवापूर- पिंपळनेर-सटाणा रस्त्यावरील अपघाताची मालिका नित्याने सुरूच असून पावडदेव मंदिर शिवारातील वळणावर शनिवारी सकाळी साडे दहा वाजता एसटी बस आणि दोन ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात 18 प्रवाशी जखमी झाले. यातील 8 गंभीर प्रवाशांना धुळे येथे पाठविण्यात आले. नावपूरहून पुणेकडे येणारी नवापूर-पुणे बस (MH 20 BL 1600) जात असतांना पावडदेव फाट्यावरील वळणावर नाशिककडून येणाऱ्या ट्रकने (TN 88 A 4549) जोरदार धडक दिली. अपघात इतका भयानक होता की तिघेही वाहने एकमेकांना धडकली गेल्याने वाहनांचे मोठ्या...
  August 11, 04:20 PM
 • जळगाव- आकाशवाणी चौकात शुक्रवारी सकाळी १० वाजता साइड देण्याच्या कारणावरून कारमधील चौघांनी ट्रक चालकास खाली पाडून मारहाण केली. अंगावरील कपडे ही फाडले. ट्रकचालक उमेश सखाराम धुमाळ (वय २७, रा. शिवाजीनगर) हा एमएच-१९, ९४६८ या क्रमांकाचा ट्रक घेऊन आकाशवाणी चौकातून दत्त मंदिराकडून सिंधी कॉलनीकडे जात हाेता. त्याला मालधक्क्यावर ट्रक घेऊन जायचे होते. मागील बाजूने कार येत होती. ट्रकचालकाने इंडिकेटर दाखवला. त्यानंतर सिंधी कॉलनीकडे वळत असताना कारचालक समोर येऊन उभा राहिला. यातून चार युवक खाली उतरले....
  August 11, 10:43 AM
 • जळगाव- मनपा अायुक्तांकडील ३०० चाैरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रातील बांधकाम मंजुरीचा प्रघात माेडीत काढण्यात अाला अाहे. सर्वच लहान, माेठ्या बांधकामांसह आवश्यक मंजुरीचे अधिकार अायुक्त चंद्रकांत डांगे यांनी स्वत:कडे घेतले अाहेत. महिनाभरापूर्वी काढलेल्या या अादेशानंतर निवडणुकीच्या व्यवस्थेमुळे शेकडाे प्रकरण मंजुरीअभावी अडकली अाहेत. पूर्वीच्या अायुक्तांनी नगररचना सहायक संचालकांना दिलेले अधिकार काढून घेतल्याने बांधकाम क्षेत्रात हा चर्चेचा विषय ठरत अाहे. महापालिका क्षेत्रात लहान...
  August 11, 10:35 AM
 • जळगाव- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव असा नामविस्तार शनिवारपासून अंमलात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना शुक्रवारी विद्यापीठाला प्राप्त झाली अाहे. या नामविस्तारानिमित्त आनंद सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लवकरच घेतला जाणार आहे. नागपूर येथे गेल्या महिन्यात झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव असा नामविस्तार करण्याचे विधेयक एकमताने...
  August 11, 10:07 AM
 • धुळे- मुंबई-आग्रा महामार्गावरील आर्वी शिवारात झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. या घटनेनंतर ग्रामस्थांनी महामार्गावर आंदोलन केले. या वेळी नाशिक येथे बैठकीसाठी निघालेले जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. वाहनात जिल्हाधिकारी असल्याची जाणीव झाल्यानंतर जमाव शांत झाला. पोलिस येईपर्यंत जिल्हाधिकारी रेखावार यांनी संतप्त जमावाची समजूत काढून त्यांना थोपवून ठेवले. तसेच त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर याच वाहनाने जिल्हाधिकारी...
  August 11, 10:07 AM
 • अमळनेर (जळगाव) - प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून राजेंद्र वाडे यांना जातप्रमाणपत्रासाठी लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे आज (शुक्रवारी) ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत 23 मे रोजी संदीप हिलाल ठाकूर (31, रा. तासखेडा, ता. अमळनेर) यांनी तक्रार दिली होती. मुलाचे ठाकूर समाजाचे जात प्रमाणपत्रासाठी प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून राजेंद्र वाडे (वय-50, रा. आंबेडकर नगर, ता. चोपड़ा) याने पंचासमक्ष 8,000 हजार रुपयांची लाच...
  August 10, 06:16 PM
 • जळगाव- मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास सुरेश मराठे यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. तर मराठा क्रांती मोर्चातर्फे गिरणा पुलाजवळ तीन तास ठिय्या मारून महामार्ग राेखण्यात अाल्याने वाहतूक ठप्प झाली. या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आरक्षण मिळेपर्यंत हा लढा तेवत ठेवण्याच्या शपथेनंतर राष्ट्रगीताने दुपारी ४...
  August 10, 11:33 AM
 • जळगाव- कानळदा गावाजवळील गिरणा नदीपात्रात अवैध वाळू उपशास विरोध करीत संतप्त तरुणांनी जेसीबी मशीन आणि डंपरची तोडफोड केल्याची घटना गुरुवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. या वेळी संतप्त तरुणांनी मक्तेदारास शिवीगाळही केली. अखेर चालक,क्लिनर यांनी जमावाला विनंती केल्यानंतर डंपर सोडून देण्यात आले. या वेळी तरुणांनी रुद्रावतार धारण केल्याने तणाव निर्माण झाला होता.परंतु तो लगेच निवळला. धरणगाव तालुक्यातील दोनगाव (ता.धरणगाव) येथील वाळू गटाचा लिलाव झाला आहे. त्यानुसार मक्तेदाराकडून वाळू...
  August 10, 11:27 AM
 • धुळे- जेवणाच्या वादावरून एका महिलेने अापल्या मैत्रिणीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिल्याची घटना शिंदखेडा येथे घडली. जळीत महिलेवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत असून पेटवणाऱ्या महिलेस अटक करण्यात आली आहे. जळीत महिला शिरपूरची रहिवासी असून रॉकेल अोतून पेटवणारी तिची मैत्रीण अकोला येथील रहिवासी असून तिला अटक करण्यात आली. शिरपूरमधील वनिता नारायण ठाकरे (३०) ही महिला शिंदखेडा येथे आली होती. शिंदखेडा बसस्थानक परिसरात राहणारी कमलबाई यांच्या घरी ती मुक्कामी होती. वनिता रात्री...
  August 10, 09:46 AM
 • यावल- आदिवासी अस्मिता दिनाचा जिल्ह्याचा कार्यक्रम यावलला असल्याने मराठा समाज बांधवांनी दुपारनंतर रास्तारोको व शहर बंद हाक दिली. व्यावसायिकांनी स्वयंपूर्तीने दुकाने बंद ठेवली तर मुस्लिम बांधवांनी देखील या आंदोलनात सहभागी होऊ समर्थन दिले तसेच रास्तारोको करीता महिला देखील रस्त्यावर आल्या होत्या. दुपारनंतर एसटी महामंडळासह शहरातील सर्वच व्यवहार ठप्प होत झाले. आंदोलकांना मार्गदर्शन करण्यास आलेल्या आमदार हरिभाऊ जावळेंना आंदोलकांनी आधी राजीनामा द्या, नंतर तुमची भूमिका स्पष्ट करा, अशा...
  August 9, 07:41 PM
 
जाहिरात

RECOMMENDED