Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

Jalgaon News

 • जळगाव- मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास सुरेश मराठे यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. तर मराठा क्रांती मोर्चातर्फे गिरणा पुलाजवळ तीन तास ठिय्या मारून महामार्ग राेखण्यात अाल्याने वाहतूक ठप्प झाली. या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आरक्षण मिळेपर्यंत हा लढा तेवत ठेवण्याच्या शपथेनंतर राष्ट्रगीताने दुपारी ४...
  August 10, 11:33 AM
 • जळगाव- कानळदा गावाजवळील गिरणा नदीपात्रात अवैध वाळू उपशास विरोध करीत संतप्त तरुणांनी जेसीबी मशीन आणि डंपरची तोडफोड केल्याची घटना गुरुवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. या वेळी संतप्त तरुणांनी मक्तेदारास शिवीगाळही केली. अखेर चालक,क्लिनर यांनी जमावाला विनंती केल्यानंतर डंपर सोडून देण्यात आले. या वेळी तरुणांनी रुद्रावतार धारण केल्याने तणाव निर्माण झाला होता.परंतु तो लगेच निवळला. धरणगाव तालुक्यातील दोनगाव (ता.धरणगाव) येथील वाळू गटाचा लिलाव झाला आहे. त्यानुसार मक्तेदाराकडून वाळू...
  August 10, 11:27 AM
 • धुळे- जेवणाच्या वादावरून एका महिलेने अापल्या मैत्रिणीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिल्याची घटना शिंदखेडा येथे घडली. जळीत महिलेवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत असून पेटवणाऱ्या महिलेस अटक करण्यात आली आहे. जळीत महिला शिरपूरची रहिवासी असून रॉकेल अोतून पेटवणारी तिची मैत्रीण अकोला येथील रहिवासी असून तिला अटक करण्यात आली. शिरपूरमधील वनिता नारायण ठाकरे (३०) ही महिला शिंदखेडा येथे आली होती. शिंदखेडा बसस्थानक परिसरात राहणारी कमलबाई यांच्या घरी ती मुक्कामी होती. वनिता रात्री...
  August 10, 09:46 AM
 • यावल- आदिवासी अस्मिता दिनाचा जिल्ह्याचा कार्यक्रम यावलला असल्याने मराठा समाज बांधवांनी दुपारनंतर रास्तारोको व शहर बंद हाक दिली. व्यावसायिकांनी स्वयंपूर्तीने दुकाने बंद ठेवली तर मुस्लिम बांधवांनी देखील या आंदोलनात सहभागी होऊ समर्थन दिले तसेच रास्तारोको करीता महिला देखील रस्त्यावर आल्या होत्या. दुपारनंतर एसटी महामंडळासह शहरातील सर्वच व्यवहार ठप्प होत झाले. आंदोलकांना मार्गदर्शन करण्यास आलेल्या आमदार हरिभाऊ जावळेंना आंदोलकांनी आधी राजीनामा द्या, नंतर तुमची भूमिका स्पष्ट करा, अशा...
  August 9, 07:41 PM
 • यावल- कोसगावपाडळसे दरम्यानच्या रस्त्यावरील पाटचारीत पोहण्यास गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी एक पाण्यात बुडून मृत्यू झाला. तेजस सुनील पाटील (वय-16, रा.बामणोद) असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी (दि.9) सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली. घटनास्थळी मुलाचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. हतनुर धरणाचा उजवा कालावा हा चोपड्याकडे जातो व सध्या धरण भरल्याने कालव्याव्दारे पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कालव्या मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. त्यात यावल तालुक्यातील कोसगावपाडळसे दरम्यान रस्त्यावर हा...
  August 9, 01:28 PM
 • जळगाव- रेल्वेस्थानक परिसरात पादचाऱ्यांचा मोबाइल घेऊन पळून जाणाऱ्या तिघांना जमावाने पकडून चोप दिला. जमावाच्या तावडीतून तिघे पळून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी दोघांना अटक केली. मंगळवारी रात्री १२.१५ वाजता ही घटना घडली. नितीन गणेश पाठक (वय ४८, रा.श्रीराम कॉलनी, धुळे) हे मंगळवारी रात्री १२.१५ वाजता स्टेशन रोडने पायी जात होते. मोहसीन शेख हानिफ (वय २१, रा. मास्टर कॉलनी), जुबेर शेख हुसनोद्दीन (वय २२, रा.शिवाजीनगर) व एक अल्पवयीन असे तिघे भामटे दुचाकीने (एमएच- १९, बीव्ही- ७३६४) मागून आले. त्यांनी...
  August 9, 10:49 AM
 • जळगाव- महापालिकेतील सत्ता प्राप्तीनंतर भाजपकडून वर्षभरात जाहीरनाम्यातील बाबींची पूर्तता करण्याच्या हालचाली सुरू झाल्या अाहेत. साेमवारी मंत्री गिरीश महाजनांसाेबत बैठकीनंतर अायुक्त चंद्रकांत डांगे यांनी बुधवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली. शनिवारी जळगाव दाैऱ्यावर अाल्यानंतर गाळे व हाॅकर्सच्या प्रश्नी चर्चा केली जाणार अाहे. महापालिका निवडणुकीत ७५ पैकी ५७ जागांवर भाजपला दणदणीत विजय मिळाला अाहे. निवडणुकीची प्रक्रिया अाटाेपल्यानंतर अायुक्त चंद्रकांत...
  August 9, 10:29 AM
 • जळगाव- मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे गुरुवारी गिरणा नदी पुलावर रास्ता रोको करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय व प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी तगडा पोलिस बंदोबस्त राहणार आहे. दरम्यान, अांदाेलनात अात्मघात, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करू नका, असा सल्ला मराठा क्रांती माेर्चाने अांदाेलकांना दिला अाहे. सकल मराठा समाजाने आपल्या मागण्यांसाठी ५८ मूक मोर्चे काढले....
  August 9, 10:02 AM
 • जळगाव- महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू असताना २९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या बनावट आवाजाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. याप्रकरणी स्वत: खडसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ जुलै रोजी सायंकाळी ५.०४ वाजता महापालिका नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ९८२३० ४४१०४ या मोबाइल क्रमांकावरुन एक ऑडिओ क्लिप जारी करण्यात आली. यात खडसे यांचा बनावट आवाजात मतदारांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन...
  August 8, 10:51 AM
 • नंदुरबार- वसतिगृहातील खानावळ बंद करण्याच्या निर्णयासह डीबीटी योजना रद्द करावी, या मागणीसाठी आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला सोमवारी हिंसेचे गालबोट लागले. या वेळी काही विद्यार्थ्यांनी आदिवासी प्रकल्प अधिकारी वान्मती सी. यांच्या वाहनावर चढून धिंगाणा तसेच वाहनाची काच फोडली. या प्रकरणी रात्री उशीरा २० विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. डीबीटी याेजना रद्द करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी येथील आदिवासी विकास प्रकल्प...
  August 8, 10:44 AM
 • देशात लोकशाही आहे. त्यामुळे कुणालाही मागण्याचा, सरकारविरोधी रोष व्यक्त करण्याचा आणि सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा निश्चितच अधिकार आहे. सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलनाने पेट घेतला आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठवाड्यातील काका शिंदे यांनी आत्महत्या केली. या घटनेनंतर अनेक ठिकाणी आत्महत्येच्या घटना घडल्या. महाराष्ट्रात अजूनही आंदोलनाची धग शमलेली नाही. आरक्षण आंदोलनापूर्वी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मेगा नोकर...
  August 8, 09:58 AM
 • पिंपळनेर - अवैधरीत्या वाळूची तस्करी करणाऱ्या पाच डंपर गाड्या पिंपळनेरजवळ पकडुन त्यांच्यावर पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास महसूल प्रशासनाच्या वतीने तहसीलदार संदिप भोसले, तलाठी दिलीप चव्हाण, उमेश पाडवी, सचिन मोड, प्रमोद राजपूत,जयवंत पाटील आदी तलाठ्यांच्या नियमितपणे गस्ती घालणााऱ्या पथकाला पिंपळनेर-साक्री रस्त्यावरील अण्णपुर्णा पेट्रोलियम जवळ नंदुरबारहून नाशिककडे जाणारी 5 डंपर वाहने अवैधपणे रेती वाहतुक करतांना आढळून आली. यावेळी चालकांना...
  August 7, 10:58 PM
 • यावल- तालुक्यातील पश्चिम भागात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वाघझिरा जवळील वनविभागाच्या तपासणी नाक्यावर तपासणीकरिता नियुक्त असलेल्या 2 वन मजुरांवर एकाने दगडाने हल्ला केला. त्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. जखमीस तब्बल पाच तासानंतर यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. सागवान लाकडाच्या तस्करीच्या पार्श्वभूमीवर वनकर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला आहे. यावल तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये सातपुड्याच्या पायथ्याशी...
  August 7, 06:55 PM
 • जळगाव - विधवा बहिणीच्या साेबत संबंध ठेवणाऱ्या तरुणाला तिच्या संतापलेल्या भावांनी दगड, विटांनी ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. त्यात संबंधित तरुण गंभीर जखमी झाला. अत्यवस्थेत त्याला उपचारासाठी अाैरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात अाले. ही घटना काल (सोमवारी) लक्ष्मीनगर भागात घडली. अंकुश नाना हटकर (वय 35, रा. तांबापुरा) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो खासगी वाहनावर चालक आहे. बबलू कोळी नावाच्या व्यक्तीच्या छोट्याशा खोलीत तो भाडेतत्वावर एका विधवा महिलेसोबत राहत होता. चार ते पाच...
  August 7, 03:31 PM
 • अमळनेर- आपली भूमिका इतक्या ताकदीने साकारा की ती पाहून नवे काम मिळायला हवे, असा सल्ला मराठी चित्रपट अभिनेत्री पूनम चौधरी-पाटील यांनी नवोदित कलाकारांना दिला आहे. पूनम या अमळनेर शहरात एका खासगी कामासाठी आल्या असता त्यांनी अभिनय क्षेत्राबाबत माहिती दिली. नाटक ते मराठी चित्रपट असा प्रवास करत जळगावच्या पूनम चौधरी-पाटील यांनी मराठी चित्रपटात आपला ठसा उमटवला आहे. मुरळी पर्वणी क्षितीज, प्रिय व्हाईट अम्ब्रेल्ला, घुमा, रेती, यंग्राड, तदैव लग्नंम, अष्टवक्र एका पाठोपाठ एक असे 10 चित्रपट त्यांनी...
  August 7, 03:30 PM
 • दिल्ली /नंदुरबार- माझ्यावर हल्ला करणाऱ्या १५ ते २० जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच याप्रकरणी धुळ्याच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे,अशी मागणी खासदार डॉ. हीना गावित यांनी सोमवारी संसदेत केली. दरम्यान, गुन्हा दाखल असलेल्या तिघांवर अॅट्रॉसिटीचे वाढीव कलम लावण्यात आले आहे. धुळे येथे रविवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक अर्धवट सोडून खासदार डॉ. हीना गावित या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर येत असताना मराठा आरक्षणासाठी आंदोलन...
  August 7, 11:05 AM
 • जळगाव- नवीन जोशी कॉलनीत सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मद्याच्या नशेत गळफास घेणाऱ्या १८ वर्षीय भावाचे प्राण लहान बहिणीच्या सतर्कतेमुळे वाचले. भावाला फासावर लटकलेला बघून तिने आरडाओरड करीत शेजाऱ्यांना सांगितले. त्यानंतर शेजाऱ्यांनी सुुरीने गळफास सोडून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परेश नरेश रणदिवे (वय १८, रा. नवीन जोशी कॉलनी) असे गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचे नाव आहे. दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्याने घरातील छताच्या पंख्याला दोरीने गळफास लावलेला...
  August 7, 11:01 AM
 • जळगाव महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकल्यानंतर आनंदाच्या भरात पक्षाच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये एकमेकांना जोरदार चिमटे काढण्याची जुगलबंदी सुरू झाली आहे. पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये विजयोत्सव साजरा केला जातो त्यामागची भूमिका ही निरलस म्हणा वा स्वच्छ असते. कारण, ज्या पक्षासाठी अन्् त्याच्या विचाराच्या प्रचार व प्रसारासाठी संबंध हयात घालवलेली असते, विरोधक म्हणून अनेक टप्पे-टोमणे सहन केलेली असतात. सत्ताधाऱ्यांच्या...
  August 7, 08:52 AM
 • यावल- तालुक्यातील दगडी येथे एका 20 वर्षीय तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी सकाळी 10 वाजेचा दरम्यान उघडकीस आली. विकास रमेश नन्नवरे असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मामाच्या गावात राहात होता. फुफनगरी (ता.जळगाव) येथील रहिवासी विकासचे लहानपणापासून मामाने संगोपन केले. सोमवारी विकास सकाळी घरातून बाहेर पडला होता. दगडी येथील शेत शिवारात भावसिंग वामन कोळी यांच्या शेतातील आब्यांच्या झाडावर भगव्या रंगाचा रुमालाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला....
  August 6, 06:35 PM
 • नंदूरबार/धुळे- खासदार डॉ.हिना गावीत यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आदिवासी कार्यकर्त्यांनी आज (सोमवार) नंदूरबार आणि धुळे बंदची हाक दिली आहे. आदिवासी कार्यकत्यांनी रस्त्यावर टायर पेटवून रास्तारोको आंदोलन केली. संतप्त तरूणांनी संपूर्ण जिल्ह्यात मोटार सायकल रॅली काढून कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन केले आहे. पालकमंत्र्यांचे वाहन समजून हल्ला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी आलेल्या नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित यांच्या वाहनावर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी रविवारी...
  August 6, 02:12 PM
 
जाहिरात

RECOMMENDED