Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

Jalgaon News

 • जळगाव - महापालिका निवडणुकीत जळगावकरांनी भाजपला एक हाती सत्ता दिली अाहे. अाता महापाैर काेण हाेईल? याकडे सर्वाचे लक्ष लागले अाहे. त्यासाठी किमान दीड महिन्याची प्रतिक्षा करावी लागणार अाहे. महापाैर निवडीचा कार्यक्रम १८ सप्टेंबर राेजी लागण्याची शक्यता अाहे. त्यासाठी नवीन अारक्षणानुसार अाेबीसी महिलांसाठी महापाैर पद अारक्षित करण्यात अाले अाहे. महापालिका निवडणुकीचे निकाल ३ अाॅगस्ट राेजी जाहिर हाेऊन भाजपने ५७ जागावर विजय मिळवला अाहे. तर शिवसेनेला १५ जागांवर समाधान मानावे लागले. प्रथमच...
  August 5, 12:26 PM
 • जळगाव- मुलगा व दत्तक घेतलेल्या साडूच्या मुलीस मेहरूण तलाव परिसरात फिरायला घेऊन आलेल्या एका तरुणाचा पोहत असताना तलावात बुडून मृत्यू झाला. मुलगा व मुलगी काठावर बसून भेळ खात वडिलांना पोहताना पाहत होते. अचानक पाण्याखाली गेल्यामुळे मुलांच्या डोळ्यादेखत त्यांचा बुडून मृत्यू झाला. नरेंद्र सुरेश तायडे (३६) असे मृताचे नाव आहे. तायडे हे ११ वर्षांचा मुलगा शुभम व त्यांनी २० दिवसांपूर्वी साडूची दत्तक घेतलेली मुलगी खुशी (७) यांना घेऊन ते शनिवारी मेहरूण तलाव परिसरात फिरण्यासाठी गेले हाेते. शुभम व...
  August 5, 11:45 AM
 • जळगाव - शहरातील रेमंड चौफुलीजवळ चारचाकीत महिला व एका विवाहित पुरुषाचा संशयास्पद मृतदेह शनिवारी आढळला. मृत महिला विधवा असून तिचे माहेर जळगाव तालुक्यातील कानळदा येथील आहे. तर पुरुष खामगाव तालुक्यातील घाटपुरा येथील रहिवासी आहे. दोघांनी विषारी अौषध घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महिलेने भावास चिठ्ठी लिहून ठेवली आहे, तर पुरुषाने आपल्या २२ वर्षीय मुलास मोबाइलवरून एसएमएस केला आहे. घटनेवेळी या चारचाकीत महिलेचा ११ वर्षांचा मुलगादेखील होता. मयूरी प्रशांत इंगळे (३२, रा. घाटपुरा,...
  August 5, 11:01 AM
 • यावल - येथील सिध्दार्थ नगरमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या तणावातून मारहाणीची घटना घडली. दोन्ही गटांनी लोखंडी आणि लाठया-काठयांनी एकमेकांना मारहाण केली. दोन्ही गटांच्या परस्पर विरोधी तक्रारीवरून एका गटाकडील 10 तर दुस-या गटाकडील 17 जणांवर मारहाण, विनयभंग यासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सिध्दार्थ नगरात शुक्रवारी सांयकाळी पाच वाजेच्या दरम्यान दोन गटांत हा तणाव निर्माण झाला. एका अल्पवयीन मुलीला मोबाईल नंबर मागितल्याच्या कारणावरून हा संपूर्ण वाद झाल्याचे समोर येत आहे.
  August 4, 10:35 PM
 • मुंबई - सांगली-मीरज आणि जळगाव महापालिका ताब्यात घेऊन भाजपने राज्यातील एकूण 16 महानगरपालिकांवर कमळ फुलवले आहे. राज्यात ऐकूण 27 महापालिका आहेत. राज्यभरात सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाचा जळगाव व सांगली-मीरज महापालिका निवडणूकांवर कोणताच परिणाम झाला नसल्याचेही यानिमित्ताने समोर आले आहे. निवडणुकांसाठी स्थानिक पातळ्यांवर भाजपने उभे केलेले उमेदवार, प्रचारातील मुद्दे यांनीच या निवडणुकांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. भाजपच्या ताब्यातील...
  August 4, 10:06 AM
 • जळगाव- जळगाव महापालिका निवडणुकीत ५७ जागा जिंकून भाजपने मिशन फिप्टी प्लस फत्ते केले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अामदार सुरेश भाेळे यांच्या नेतृत्वात हे यश या पक्षाला मिळाले. शिवसेनेला अवघ्या १५ जागांवर समाधान मानावे लागले. माजी मंत्री सुरेश जैन यांचे वर्चस्व या निवडणुकीत संपुष्टात अाले. कांॅग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी या महाअाघाडीला भाेपळाही फाेडता अाला नाही. मात्र, एमअायएमने पहिल्यांदाच निवडणूक लढवून तीन जागा जिंकल्याने प्रस्थापितांच्या भुवया उंचावल्या अाहेत. जळगाव...
  August 4, 10:05 AM
 • जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. शिवसेनेचा दारुण पराभव करून भाजपने दणदणीत यश मिळवले. यात काँग्रेस, राष्ट्रवादीही भुईसपाट झाली. पण चर्चा सुरेश जैन, गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाचीच अधिक होत आहे. या तिन्ही नेत्यांचे राजकारण उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. जैन आणि खडसे यांच्यात गेली अनेक वर्षे वर्चस्वाची राजकीय लढाई सुरू होती. हे दोन्ही नेते जळगाव आणि राज्याच्या राजकीय क्षितिजावर चमकत असताना गिरीश महाजनांचा उदय आमदार म्हणून झालेला होता. खडसे आणि जैन हेच...
  August 4, 08:32 AM
 • जळगाव/सांगली- जळगाव आणि सांगली या अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला चारीमुंड्या चीत केले. राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर या पालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभांना प्रचंड विरोध झाला. या स्थितीत जळगावात मंत्री गिरीश महाजन यांनी तर, सांगलीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजयकाका पाटील यांनी किल्ला लढवला....
  August 4, 07:04 AM
 • जळगाव- जळगावमहापालिकेत ७५ पैकी ५७ जागांवर विजय मिळवत भाजपने माजी अामदार सुरेश जैन यांची शिवसेनेच्या झेंड्याखाली असलेली सत्ता उलथून टाकली. एमअायएमने ३ जागा मिळवत पालिकेत प्रवेश केला. गेल्या वेळी भाजपचे १५ उमेदवार निवडून अाले हाेते. या निवडणुकीत प्रमुख स्पर्धक असलेल्या शिवसेनेला अवघ्या १५ जागांवर रोखले. काँग्रेस, राष्ट्रवादी अाणि समाजवादी पार्टीच्या महाअाघाडीला तर खातेही उघडू दिले नाही. गेली ४० वर्षे जळगाव महापालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या सुरेश जैन यांचे वर्चस्व भाजपने या विजयातून...
  August 4, 06:12 AM
 • जळगाव- नशिराबाद गावाजवळील वळणावर बुधवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास भरधाव दोन कारचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात मित्राचा वाढदिवस साजरा करुन जेवणासाठी जात असलेले चार तरुण जागीच ठार झाले. तर दोन्ही कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही कारचा चुराडा झाला. त्यामुळे क्रेनच्या साहाय्याने कार वेगळ्या करून युवकांचे मृतदेह व जखमींना बाहेर काढावे लागले. सुबोध मिलिंद नरवाडे (वय २६), रोहित प्रकाश जमदाडे (वय २०), समुद्रगुप्त चंद्रगुप्त सुरवाडे (वय २०) व...
  August 3, 10:21 AM
 • जळगाव- जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या तासाची सुरुवात शरीर क्रिया शास्त्राच्या तासाने झाली. प्रा. डाॅ. चंद्रकांत डी. डांगे यांनी नवप्रवेशित विद्यार्थ्यांशी संवाद साधत अभ्यासक्रमाला सुरुवात केली. पहिल्या दिवशी दाेन सत्रात चार तास झाले. दरम्यान, केंद्र सरकारच्या काेट्यातील १५ जागाही बुधवारी महाविद्यालयासाठी जाहीर झाल्या अाहेत. अाता केवळ राज्य शासनाच्या काेट्यात ५ जागांचा विषय प्रलंबित अाहे. महाविद्यालयाच्या १०० पैकी...
  August 3, 10:14 AM
 • धुळे- शहरातील मालेगाव रोडवर असलेल्या न्यू प्रतीक डेअरी येथे गुरुवारी रात्री गोळीबार करून सुमारे १५ ते २० हजार रुपये लुटून नेण्यात आले. हा थरार रात्री ९ वाजून ११ मिनिटांनी घडला. तीस सेकंदात ही लूट करण्यात आली. यावेळी दुकानमालक आणि दोन मुलांनी पाठलाग केला परंतु गोळीबार करणारे दोनजण तिसऱ्या साथीदाराच्या मदतीने दुचाकीवरुन पसार झाले. शहरातील मालेगाव रोडवर काही महिन्यांपूर्वी न्यू प्रतीक दूध डेअरी सुरू झाली. या ठिकाणी गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू होते. तसेच ग्राहकांची...
  August 3, 09:52 AM
 • जळगाव- सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबादजवळ (जि.जळगाव) दोन कारची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेली माहिती अशी की, नशिराबादजवळ काझी पेट्रोलपंपाजवळ बुधवारी मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. मृतांमधील चार पैकी तीन जण जळगावातील असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
  August 2, 11:56 AM
 • धुळे- उद्योगपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पद्मश्री सुवालाल छगनमल बाफना (८७) यांचे बुधवारी निधन झाले. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात सतीश व प्रवीण असे दाेन भाऊ, बहीण, दाेन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार अाहे. धुळे- नंदुरबार संयुक्त जिल्हा असताना धुळे काँग्रेसचा बालेकिल्ला हाेता. त्या काळी बाफना यांनी काँग्रेसचे सलग १० वर्षे अध्यक्षपद भूषवले. त्यांच्या नेतृत्वात स्थानिक पातळीसह लाेकसभा, विधानसभा मतदारसंघातही वर्चस्व मिळवले हाेते....
  August 2, 07:08 AM
 • जळगाव- जळगाव महापालिका निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. प्रभाग क्रमांक १२ मध्ये भुसावळ नगरपालिकेच्या नगरसेवकांची, सभापतींची ३ ते ४ वाहने आली होती. या वाहनातून मतदारांना पैसे वाटत हाेत असल्याचा शिवसैनिकांना संशय हाेता. त्यावरुन समतानगरातील धामणगाववाडा येथे दुपारी १ वाजता शिवसैनिकांनी ही वाहने अडवून विचारणा केली. त्यानंतर झालेल्या गदारोळात या कारमधील पावणेदोन लाख रुपये कार्यकर्ते व नागरिकांनी लुटून नेले. रामानंदनगर पोलिसांनी एमएच-१९, बीडी ४१४१ या क्रमांकाची ही कार ताब्यात घेतली...
  August 2, 06:54 AM
 • अमळनेर - अभिनेता आमिर खान याच्या पाणी फाउंडेशन संचालित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी जलदुत म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव कार्यक्रम बुधवारी जी. एस. हायस्कूलमधील लायन्स हॉल मध्ये पार पडला. यावेळी जलदूत म्हणून काम करणा-या अमळनेरमधील संस्था व व्यक्तींचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी बोलताना तहसीलदार प्रदीप पाटील यांनी तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी गावांनी श्रमदानाचा संकल्प करावा व भविष्यातील दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी आशावादी राहावे,...
  August 1, 10:58 PM
 • जळगाव- महापालिकेच्या प्रभाग १६मधील मतदान केंद्रात जेवणासह दारूच्या खाेक्यांनी भरलेले खासगी वाहन घुसवल्यावरून ईश्वर काॅलनी परिसरात भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये जाेरदार वाद झाला. वाहन तपासण्याच्या प्रयत्नात राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रिया काेल्हे यांना धक्काबुक्की करण्यात अाली. जप्त केलेले वाहन पाेलिसांनी बळाचा वापर करून साेडून दिल्याने शिवसेनेच्या उमेदवार साधना श्रीश्रीमाळ यांनी पाेलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करून अात्मदहनाचा इशारा दिला अाहे. मतदान केंद्रात...
  August 1, 09:41 AM
 • जळगाव- भाजप उमेदवारांचा प्रचार करणारे भाजपचे ज्येष्ठनेते अामदार एकनाथ खडसे कांॅग्रेस व शिवसेना उमेदवारांचे प्रेरणास्थान असल्याची बाब पुढे अाली अाहे. भाजपकडून उमेदवारी मिळू न शकलेल्या खडसे समर्थकांनी इतर पक्षांतून उमेदवारी करताना त्यांना प्रेरणास्थान मानले अाहे. एवढेच नव्हे, तर छायाचित्रही वापरल्याने ते चर्चेच्या केंद्रस्थानी अाहेत. भाजपकडून उमेदवारी मिळू न शकलेले विद्यमान नगरसेवक पृथ्वीराज साेनवणे अाणि जयश्री नितीन पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली. अापण खडसे समर्थक...
  August 1, 09:15 AM
 • जळगाव- जळगाव शहर महानगरपालिकेच्या चाैथ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी ( दि १ ऑगस्ट) मतदान हाेणार अाहे. ७५ जागांसाठी ३०३ उमेदवार नशिब आजमावत आहेत. शहरातील ४६९ मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून १४६ उपद्रवी मतदान केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. राज्य शासनाच्या नव्या नियमावलीनूसार एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून देण्यात येणार आहे. मतदानाचा लेखाजोखा - १९ प्रभागातील ७५ जागांसाठी ३०३ उमेदवार...
  August 1, 08:54 AM
 • जामनेर- जामनेर तालुक्यात देशातील दुसरे व राज्यातील पहिले सुगंधी व दुर्मीळ औषधी वनस्पती संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सूचवलेल्या गारखेडा बुद्रूक परिसरातील ५० एकर जागा आयुष मंत्रालयाकडे हस्तांतरीत करण्याच्या सूचना पत्राव्दारे मंगळवारी मुंबई येथील राज्य संचालक कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. त्यासाठी आयुष मंत्रालयाने १५ कोटी रूपयांची तरतूद केल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. जामनेर तालुक्यात सुगंधी व दुर्मीळ औषधी वनस्पती संशोधन केंद्र...
  August 1, 08:47 AM
 
जाहिरात

RECOMMENDED