Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

Jalgaon News

 • जळगाव- सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबादजवळ (जि.जळगाव) दोन कारची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेली माहिती अशी की, नशिराबादजवळ काझी पेट्रोलपंपाजवळ बुधवारी मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. मृतांमधील चार पैकी तीन जण जळगावातील असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
  August 2, 11:56 AM
 • धुळे- उद्योगपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पद्मश्री सुवालाल छगनमल बाफना (८७) यांचे बुधवारी निधन झाले. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात सतीश व प्रवीण असे दाेन भाऊ, बहीण, दाेन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार अाहे. धुळे- नंदुरबार संयुक्त जिल्हा असताना धुळे काँग्रेसचा बालेकिल्ला हाेता. त्या काळी बाफना यांनी काँग्रेसचे सलग १० वर्षे अध्यक्षपद भूषवले. त्यांच्या नेतृत्वात स्थानिक पातळीसह लाेकसभा, विधानसभा मतदारसंघातही वर्चस्व मिळवले हाेते....
  August 2, 07:08 AM
 • जळगाव- जळगाव महापालिका निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. प्रभाग क्रमांक १२ मध्ये भुसावळ नगरपालिकेच्या नगरसेवकांची, सभापतींची ३ ते ४ वाहने आली होती. या वाहनातून मतदारांना पैसे वाटत हाेत असल्याचा शिवसैनिकांना संशय हाेता. त्यावरुन समतानगरातील धामणगाववाडा येथे दुपारी १ वाजता शिवसैनिकांनी ही वाहने अडवून विचारणा केली. त्यानंतर झालेल्या गदारोळात या कारमधील पावणेदोन लाख रुपये कार्यकर्ते व नागरिकांनी लुटून नेले. रामानंदनगर पोलिसांनी एमएच-१९, बीडी ४१४१ या क्रमांकाची ही कार ताब्यात घेतली...
  August 2, 06:54 AM
 • अमळनेर - अभिनेता आमिर खान याच्या पाणी फाउंडेशन संचालित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी जलदुत म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव कार्यक्रम बुधवारी जी. एस. हायस्कूलमधील लायन्स हॉल मध्ये पार पडला. यावेळी जलदूत म्हणून काम करणा-या अमळनेरमधील संस्था व व्यक्तींचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी बोलताना तहसीलदार प्रदीप पाटील यांनी तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी गावांनी श्रमदानाचा संकल्प करावा व भविष्यातील दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी आशावादी राहावे,...
  August 1, 10:58 PM
 • जळगाव- महापालिकेच्या प्रभाग १६मधील मतदान केंद्रात जेवणासह दारूच्या खाेक्यांनी भरलेले खासगी वाहन घुसवल्यावरून ईश्वर काॅलनी परिसरात भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये जाेरदार वाद झाला. वाहन तपासण्याच्या प्रयत्नात राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रिया काेल्हे यांना धक्काबुक्की करण्यात अाली. जप्त केलेले वाहन पाेलिसांनी बळाचा वापर करून साेडून दिल्याने शिवसेनेच्या उमेदवार साधना श्रीश्रीमाळ यांनी पाेलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करून अात्मदहनाचा इशारा दिला अाहे. मतदान केंद्रात...
  August 1, 09:41 AM
 • जळगाव- भाजप उमेदवारांचा प्रचार करणारे भाजपचे ज्येष्ठनेते अामदार एकनाथ खडसे कांॅग्रेस व शिवसेना उमेदवारांचे प्रेरणास्थान असल्याची बाब पुढे अाली अाहे. भाजपकडून उमेदवारी मिळू न शकलेल्या खडसे समर्थकांनी इतर पक्षांतून उमेदवारी करताना त्यांना प्रेरणास्थान मानले अाहे. एवढेच नव्हे, तर छायाचित्रही वापरल्याने ते चर्चेच्या केंद्रस्थानी अाहेत. भाजपकडून उमेदवारी मिळू न शकलेले विद्यमान नगरसेवक पृथ्वीराज साेनवणे अाणि जयश्री नितीन पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली. अापण खडसे समर्थक...
  August 1, 09:15 AM
 • जळगाव- जळगाव शहर महानगरपालिकेच्या चाैथ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी ( दि १ ऑगस्ट) मतदान हाेणार अाहे. ७५ जागांसाठी ३०३ उमेदवार नशिब आजमावत आहेत. शहरातील ४६९ मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून १४६ उपद्रवी मतदान केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. राज्य शासनाच्या नव्या नियमावलीनूसार एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून देण्यात येणार आहे. मतदानाचा लेखाजोखा - १९ प्रभागातील ७५ जागांसाठी ३०३ उमेदवार...
  August 1, 08:54 AM
 • जामनेर- जामनेर तालुक्यात देशातील दुसरे व राज्यातील पहिले सुगंधी व दुर्मीळ औषधी वनस्पती संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सूचवलेल्या गारखेडा बुद्रूक परिसरातील ५० एकर जागा आयुष मंत्रालयाकडे हस्तांतरीत करण्याच्या सूचना पत्राव्दारे मंगळवारी मुंबई येथील राज्य संचालक कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. त्यासाठी आयुष मंत्रालयाने १५ कोटी रूपयांची तरतूद केल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. जामनेर तालुक्यात सुगंधी व दुर्मीळ औषधी वनस्पती संशोधन केंद्र...
  August 1, 08:47 AM
 • गेल्या महिनाभरापासून चर्चा सुरू असलेल्या जळगाव महापालिकेच्या १९ प्रभागांतील ७५ जागांसाठी बुधवारी मतदान होत आहे. एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून देणारी राज्यातील जळगाव ही पहिलीच महापालिका असणार आहे. जळगावनंतर धुळे महापालिकेची निवडणूक डिसेंबरमध्ये होऊ घातली आहे. बदललेल्या प्रभाग रचनेनुसार निवडणूक लढवणे विद्यमान नगरसेवकांसह सर्वच उमेदवारांसाठी जसा नवीन अनुभव आहे, अगदी तसेच शिवसेना आणि भाजपसाठीदेखील नवा अनुभव असणार आहे. शिवसेना जळगाव महापालिकेची निवडणूक प्रथमच स्वबळावर लढवत...
  August 1, 07:47 AM
 • यावल- तब्बल 21 दिवसांच्या तुरूंगवासानंतर कोरपावली (ता.यावल) येथील तत्कालीन सरपंच सविता संदीप जावळे यांना मंगळवारी (31 जुलै) सशर्त जामीन मिळाला आहे. भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना दिलासा मिळाला दिला असून या गुन्ह्यातील दुसरा संशयीत आरोपी ग्रामसेवक मात्र अद्यापही फरारच आहे. कोरपावली येथील तत्कालीन सरंपच सविता जावळे व ग्रामसेवक सुनील चितांमण पाटील यांनी एप्रिल 16 ते जून 16 या कालावधित शासनाच्या 14 व्या वित्त आयोगाचा एकूण 8 लाख 46 हजार 500 रूपयांचा निधीचा वापर स्वत:च्या...
  July 31, 08:42 PM
 • यावल- शहराच्या विस्तारित भागामध्ये घरफोडीचे सत्र सुरूच आहे. पोलिसांची गस्त असून देखील चोरट्यांनी मंगळवारी पहाटे एका बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारला. मुलाचे हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी कपाटात ठेवलेले 35 हजार रुपये चोरट्यांनी लांबवले. शहरातील विस्तारित भागात भुसावळ रस्त्याला लागून असलेल्या आयेशा नगराजवळील चांद नगरत ही घटना घडली. चिरागोद्दीन गंभीर पटेल यांच्या मुलाची प्रकृती खालवल्याने सोमवारी (29 जुलै) त्यांनी त्याला जळगाव येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रात्री ते...
  July 31, 12:26 PM
 • जळगाव- महानगरपालिकेच्या चाैथ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गेल्या १३ दिवसापासून सुरू असलेल्या प्रचाराच्या ताेफा साेमवारी सायंकाळी थंडावल्या. शेवटच्या क्षणापर्यंत प्रचार फेऱ्या, काॅर्नर सभांच्या माध्यमातून मतदारांमध्ये राहण्याची धडपड दिसून अाली. १ अाॅगस्ट राेजी मतदान हाेणार असल्याने सर्वच पक्षातील उमेदवारांनी अाता छुप्या प्रचारावर भर दिला अाहे. गृहभेटींसह हितचिंतकांमार्फतच्या निराेपांवर जाेर दिला जात अाहे. मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी अास्थापनांतील कामगारांना पगारी सुटी...
  July 31, 11:53 AM
 • जळगाव- सातबारा उताऱ्यावरील नावे कमी करुन देण्यासाठी तक्रारदाराकडून १५०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पिंप्राळा येथील तत्कालीन तलाठ्यास न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवले. यात त्याला चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तर याच गुन्ह्यात सबळ पुराव्याअभावी सेवानिवृत्त कोतवालाची निर्दोष मुक्तता केली आहे. तलाठी सत्यजित अशोक नेमाने असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर सेवानिवृत्त कोतवाल उखर्डू पांडू सोनवणे यांना पुराव्याअभावी निर्दाेष सोडण्यात...
  July 31, 11:49 AM
 • जळगाव- डॉक्टर असल्याचे सांगून एका युवतीसाेबत मैत्री करून व्हिडीअाे काॅलिंगद्वारे केलेल्या क्लिप व्हायरल करून युवतीला ब्लॅकमेल करणाऱ्या युवकास जिल्हा पेठ पोलिसांनी रात्री ११ वाजता अटक केली. राजेश खुशाल चाैधरी (वय २८) असे त्या अाराेपीचे नाव अाहे. शहरातील गुजराल पेट्राेल पंप परिसर, अादित्य हाॅस्पिटलच्या मागील बाजूस ताे राहताे. शहरातील एका ३० वर्षीय युवतीला अापण डाॅक्टर असल्याचे खाेटे सांगून या युवकाने तिच्याशी मैत्री केली हाेती. गेल्या २० जानेवारीपासून त्या युवतीशी मैत्री करून...
  July 31, 11:36 AM
 • धुळे- आसाम रायफलमध्ये नाेकरी देण्याचे आमिष दाखवून धुळे व चाळीसगावमधील १६ तरुणांना प्रत्येकी अडीच लाखांत गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गुन्ह्यातील संशयितांचे नेटवर्क भंडारा, कोल्हापूरपासून थेट आसामपर्यंत असून संबंधित एजंटने तरूणांना आसामपर्यंत नेऊन बनावट वैद्यकीय तपासणी प्रक्रियादेखील राबवल्याचे समोर आले. याशिवाय डायरेक्टर जनरलच्या नावे खोटी कागदपत्रे पाठवली आहे. आसाम रायफल पॅरामेडिकल फोर्समध्ये नर्सिंग असिस्टंट, लॅब असिस्टंट पदावर भरती करून देतो, असे आश्वासन देऊन...
  July 31, 11:22 AM
 • जळगाव- स्वत:च्या काकाने शेतीच्या व्यवहारातील १४ लाख रुपये न देता, धमकी दिल्यामुळे २२ वर्षीय पुतण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ९.३० वाजता जळगावातील गांधीनगर परिसरात घडली. मृत तरुणाने आत्महत्येपूर्वी दोन पानांची चिठ्ठी लिहीली हाेती. यातून घटनेचा उलगडा झाला. ही चिठ्ठी जिल्हापेठ पोलिसांनी जप्त केली आहे. राहुल पंडित पाटील (वय २२, मूळ रा. मनवेल, ता. यावल, हल्ली रा. गांधीनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे काका दगडू वना पाटील व काकांची मुले यांनी शेतीच्या व्यवहारातील...
  July 30, 11:25 AM
 • जळगाव- मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी रविवारी दुपारी १२.३० वाजता सकल मराठा समाजातर्फे आकाशवाणी चौकात एक मराठा, लाख मराठा, जय जिजाऊ, जय शिवराय अशा घाेषणा करून एक तास रास्ता रोको आंदाेलन करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांना गो बॅक मामू असे म्हणत त्यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मराठा समाज दुपारी १२.३० वाजता आकाशवाणी चौकात जमला. रास्ता रोको आंदोलन होणार असल्याने पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी...
  July 30, 11:22 AM
 • जळगाव- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक अॅड. नरेंद्र भास्कर पाटील (वय ५८) यांचे २९ जुलै राेजी सकाळी ७ वाजता पुणे येथील रुबी हाॅस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा ३० जुलै राेजी सकाळी १० वाजता दीक्षितवाडीतील राहत्या घरापासून निघणार अाहे. नरेंद्र पाटील हे २ जुलै राेजी घरातील जिन्यावरून पडल्याने त्यांच्या मानेच्या मणक्याला दुखापत झाली हाेती. सुरुवातीला जळगाव व त्यानंतर पुणे येथे शस्त्रक्रियेनंतर त्यांच्यावर २७ दिवसांपासून उपचार सुरू...
  July 30, 11:17 AM
 • जळगाव- पावसाळा सुरू होऊन पावणेदोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी खान्देशात मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जळगाव जिल्ह्यात ३८.२ टक्के म्हणजेच सरासरी ३०७.६ मि.मी पावसाची नोंद झालेली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत पाच टक्के पाऊस जास्त झाला आहे. पारोळा, एरंडोल आणि धरणगाव तालुक्यात सरासरी ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. उर्वरित तालुके अजूनही चाळिशीच्या आत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प अजूनही कोरडेच अाहेत....
  July 30, 11:12 AM
 • अंकलेश्वर -बऱ्हाणपूर राज्य महार्गावर अपघातग्रस्त डंफरचे टायर चोरी करणाऱ्यास यावल पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कृष्णा शंकर कोळी (भालशिव) असे संशयीताचे नाव आहे. 16 मे रोजी किनगाव जवळ वाळूने भरलेल्या डंपरचा भीषण अपघात झाला होता. त्यानंतर वाहन रस्त्याच्या कडेलाच उभे होते. त्याचवेळी आरोपीने डंपरचे दोन चाक चोरले आणि आपल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला लावले होते. याबाबत सविस्तर वृत्त असे की वाळूने भरलेला डंपर क्रमांक MH 19Z 5858 घेवून चालक सचिन कोळी अंकलेश्वर ते बुऱ्हाणुपूरला राज्य महामार्गावरून जात...
  July 29, 03:38 PM
 
जाहिरात

RECOMMENDED