Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

Jalgaon News

 • जळगाव- दक्षिण भारतात राहणाऱ्या व संपूर्ण महाराष्ट्रात बॅग लांबविणाऱ्या एका मोठ्या बेढरगुंडा टोळीतील १० भामट्यांंना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री पाचोऱ्यातील बाहेरपुरा परिसरातून अटक केली. यात तीन महिलांचा समावेश आहे. पाेलिसांनी भामट्यांकडून बॅग चाेरीसाठी वापरणारे साहित्य, दीड लाखाची रोकड, ३ दुचाकी जप्त केल्या आहे. एलसीबीने अटक केलेल्या संशियितांची बाबू शंकरय्या सल्ला (वय ४०), मायकल जॉन नागराज (वय ४०), राजेश रवी सल्ला (वय २७), उदय किरण सल्ला (वय ४०), राजबाबू मायकल...
  July 23, 10:16 AM
 • जळगाव- कांचननगरात आजीकडे राहणाऱ्या तरुणाचा सात खोल्यांजवळील रेल्वे रुळावर धावत्या रेल्वे खाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री ११.३० वाजता घडली. या जखमी युवकाच्या उपचारासाठी अनेक जणांनी प्रयत्न केले. रात्रभरातून त्याला तीन रुग्णालयांत फिरवण्यात आले; पण त्याला वाचवण्यात यश आले नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खबरीवरून तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संदीप भागवत पाटील (वय २०, रा. तुकारामवाडी) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिस व नातेवाइकांनी...
  July 23, 09:41 AM
 • जळगाव - अनेक वर्षांपासून कुटुंबातील सदस्यांसह एकाच भागांमध्ये नगरसेवक असूनदेखील प्रभागांतील साधे रस्ते देखील तयार झालेले नाहीत. आता त्याच खड्डे, चिखलमय रस्त्यांवर इच्छुक उमेदवारांना प्रचारासाठी फरफट करावी लागत आहे. खड्डे, डबक्यांतून मार्ग काढत प्रचार करत असलेल्या उमेदवारांना यामुळे मतदारांकडून मात्र चांगलेच टोमणे खावे लागत आहेत. यंदा निवडून आल्यावर प्रभागाचा विकास करू हे पारंपरिक आश्वासन देत उमेदवार प्रभागात फिरत अाहेत. साडेपाच लाख लोकसंख्या असलेल्या जळगाव शहरात गेल्या पाच...
  July 22, 12:11 PM
 • जळगाव - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या शासकीय वाहनाला महामार्गावर नशिराबादजवळ एका डंपरने धडक दिली. भुसावळकडून जळगावकडे येत असताना सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. वाहनाला पाठीमागून धडक देऊन डंपरचालकाने पळ काढला. दरम्यान, चालकाने प्रसंगावधान ठेवत गाडी नियंत्रणात अाल्याने अध्यक्षांसह चाैघे थाेडक्यात बचावले. नशिराबाद पाेलिसात डंपरचालकाच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला. जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील या (अंजाळे, ता. यावल) येथे...
  July 22, 12:08 PM
 • जळगाव - ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेच्या नेतृत्वाखाली मालवाहतूकदारांनी पुकारलेले देशव्यापी चक्काजाम आंदोलन शनिवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊन पाच हजारांवर कामगार प्रत्यक्ष-प्रत्यक्षरित्या कामापासून वंचित राहिले. अांदाेलनातून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक वगळण्यात अाली अाहे. खासगी वाहनामधून मालवाहतुकीस उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने परवानगी दिली अाहे. वाहतूक व्यवसायाच्या अडचणी, समस्या व मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने २०...
  July 22, 12:08 PM
 • जळगाव - फुपनगरी ते कानळदा दरम्यान अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर ताब्यात घेऊन जळगाव तहसील कार्यालयात आणताना चालक व मालकाने महसूल कर्मचाऱ्यांशी झटापट केली. त्यानंतर ममुराबादजवळ वाळू खाली करून डंपर पळवून नेले. १७ जुलै रोजी घडलेल्या या घटनेत चालक व मालकाविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी शनिवारी यातील डंपरमालक व चालक या दोघांना अटक केली आहे. विनोद हुकुमचंद साळुंखे (वय २४, रा. फुपनगरी, ता. जळगाव) व दीपक ज्ञानेश्वर साळुंखे (वय २२, रा. काेळन्हावी, ता. यावल) अशी...
  July 22, 12:07 PM
 • जळगाव - जिल्हा परिषदेच्या हिवताप विभागात बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणून नोकरी मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी औरंगाबाद येथील तीन उमेदवारांसह दोन त्रयस्थांविरुद्ध येथे शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. चंद्रपूर व नागपूर येथून पडताळणी केल्यानंतर ही कागदपत्रे बनावट असल्याचे उघडकीस आले आहे. प्रमोद बाबुराव राठोड, अरविंद बाबुराव जायभाये व संदीप प्रदीप बोराडे या तीन उमेदवारांना राजेंद्र पांडुरंग सानप व अजित दामोदर...
  July 22, 07:37 AM
 • जळगाव- सुरत रेल्वेस्थानकावरून हरवलेल्या मारवड (ता. अमळनेर) येथील मूळ रहिवासी व सध्या सुरत येथे राहणाऱ्या ८२ वर्षीय लक्ष्मीबाई पानपाटील यांचा अडीच वर्षांनंतर शोध लागला. तिरुअनंतपुरम न्यायालयाने रविवारी त्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. शुक्रवारी जळगाव जिल्हा न्यायालयात उर्वरित सोपस्कार पार पाडण्यात आले. या वेळी त्यांच्या दोन मुली, सून व नातू न्यायालयात आले होते. आई सापडल्याच्या आनंदात त्यांना गहिवरून आले होते. मारवड येथील स्वर्गीय कृष्णराव पानपाटील यांचा मुलगा कंपनीतील...
  July 21, 10:09 AM
 • जळगाव- कार चालकाला पैसे पडल्याचे सांगून दोन भामट्यांनी कारमधील दोन लॅपटॉप, वायफाय, हार्ड डिस्क व इतर वस्तू लांबवल्या. ही घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम चौकात घडली आहे. या प्रकरणी संशयिताचे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. दरम्यान, नागरिकांना रस्त्यावर पैसे टाकल्याचे सांगून लूट करण्याची ही चौथी घटना आहे. अशोक बिल्डकॉन कंपनीचे विभागीय व्यवस्थापक पी. बी. नलावडे, सुरक्षा अधिकारी संजय धोंडगे (रा. सटाणा) व अभियंता विजय नंदनवार (रा.नाशिक) हे कारने (क्रमांक...
  July 21, 09:59 AM
 • भुसावळ- माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या विधानसभा मतदारसंघातील मुक्ताईनगर नगर पंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपची सरशी झाली. लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि १७ पैकी १३ जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले तर शिवसेनेला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. भाजपने नगराध्यक्षपदासह १४ जागांवर विजय मिळवला. मात्र, जामनेर नगरपालिकेतील १०० टक्के यशाची पुनरावृत्ती माजी मंत्री...
  July 21, 08:21 AM
 • जळगाव- माहेजी (ता. पाचोरा) रेल्वे स्थानकापासून एक कि.मी. अंतरावरील ग्रीन सिग्नलचे लॉक तोडून चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री तीन -साडेतीन वाजेदरम्यान नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसवर दरोडा टाकला. या घटनेत चोरट्यांनी एस-४ या बोगीत झोपलेल्या दोन प्रवासी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी, तर इतर प्रवाशांचे महागडे मोबाइल, लॅपटॉपसह एकाची तीन लाख रुपयांची रोकड व इतर वस्तू लुटून पोबारा केला. गुरुवारी दुरांतो एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने जात होती. मात्र, ही रेल्वे माहेजी स्थानकापासून अवघ्या एक...
  July 21, 08:13 AM
 • जळगाव- मुलगा व पुतण्याच्या अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी पुणे येथे गेलेल्या जळगावातील शिव कॉलनीमधील शिक्षकाचा औरंगाबाद जिल्ह्यातील बोरगाव अर्ज फाट्यावर गुरुवारी पहाटे ४ वाजता कार व ट्रकच्या अपघातात मृत्यू झाला. यात त्याचा मुलगा, पुतण्या व चुलत भाऊ हे तिघे गंभीर जखमी झाले तर सुदैवाने एका मुलाला कुठलीही इजा झालेली नाही. जखमीवर औरंगाबाद व जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान हा अपघात इतका भयानक होता की, कारच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. दीपक रमेशचंद्र...
  July 20, 10:09 AM
 • जळगाव- विशेष विवाह कायद्यांतर्गत विवाहासाठीची नोटीस ऑनलाइन देण्याची सुविधा दस्त नोंदणी व मुद्रांक विभागाने नागरिकांना उपलब्ध करून दिलेली आहे. येत्या १ ऑगस्टपासून विशेष विवाहासाठीची नोटीस ऑनलाइन देणे बंधनकारक करण्यात आल्याची माहिती सह जिल्हा निबंधक व्ही. एस. भालेराव यांनी दिली. विशेष विवाह नोंदणी करीता वर व वधू यांना विवाह नोंदणी अधिकाऱ्याकडे नोटीस देण्यासाठी व विवाहासाठी दोन वेळेस जावे लागत होते. नोटीस देण्याची संपूर्ण प्रक्रिया नियोजित वर किंवा वधू यांना विवाह अधिकारी...
  July 20, 09:58 AM
 • जळगाव- गेल्या वर्षी खरीप हंगामात बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडून दुसऱ्या हप्त्याची १७७ कोटी २९ लाख रुपयांचा हप्ता प्राप्त झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी दिली. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने जिल्ह्याला ४४३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यापैकी यापूर्वी ११८ कोटी रुपये जिल्ह्याला वितरित करण्यात आले अाहेत. महसूल विभागातर्फे शेतकऱ्यांना हे...
  July 20, 09:54 AM
 • जळगाव- शासकीय निवासस्थानी बुधवारी मनपा निवडणुकीशी संबंधित भाजपची बैठक घेतल्याप्रकरणी जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांना मनपा निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता कक्ष प्रमुखांनी गुरुवारी आचारसंहिता भंगाची नोटीस बजावली . या नोटिशीला आठ दिवसांच्या आत उत्तर देण्याचे निर्देशही आयोगाने दिले आ हेत. तसेच याप्रकरणी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले आहेत. महापालिका निवडणुकीच्या नियाेजनासंदर्भात भाजपतर्फे बुधवारी जबाबदारी वाटपासाठी बैठकीचे...
  July 20, 09:41 AM
 • धुळे- घराची भिंत कोसळून ढिगार्याखाली दबून दोन बहिणीचा जागीच मृत्यू झाला तर आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत.शिंदखेडा तालुक्यातील आरावे येथे सकाळी ही घटना घडली. रुपाली देशमुख (वय-17) आणि धनश्री देशमुख(वय-15) असे मृत मुलींची नावे आहेत. मिळालेली माहिती अशी की, आणावे येथील भटू देशमुख यांच्या घराची भिंत कोसळली. ढिगार्याखाली भटू देशमुख यांची मुलगी रुपाली आणि पुतणी धनश्रीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत भुटू आणि त्यांची पत्नी निर्मला गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
  July 19, 04:44 PM
 • जळगाव - महापालिका निवडणुकीत उमेदवारांना दैनंदिन खर्च सादर करणे बंधनकारक अाहे. अायाेगाने निश्चित केलेल्या पद्धतीचा अवलंब करावा लागेल. अन्यथा संबंधित उमेदवारांना नाेटीस व अपात्रतेच्या कारवाईला सामाेरे जावे लागेल. निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रलाेभन देण्याचे प्रकार घडतात. उमेदवारांकडून हाेणारे गैरप्रकार राेखण्यासाठी शहरात विविध ठिकाणी फिरते व बैठे पथक तैनात करण्यात अाल्याची माहिती निवडणूक अायाेगाचे अायुक्त जे. एस. सहारिया यांनी पत्रकारांना दिली. महापालिकेच्या चाैथ्या...
  July 19, 11:03 AM
 • जळगाव - महापालिका निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी विभागीय दंडाधिकारी जितेंद्र पाटील यांनी चार पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ३५ गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई केली आहे. नवीन प्रस्तावाबरोबर प्रलंबित असलेल्या प्रकरणांचाही निपटारा करण्यात आला आहे. चोरी, हाणामारी, लुटमार करणाऱ्या या गुन्हेगारांवर शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मनपा निवडणुकीत यांचा होणारा उपद्रव लक्षात घेता उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी या गुन्हेगारांच्या हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय...
  July 19, 10:59 AM
 • धुळे - दुधाच्या दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या अांदाेलनाचा फटका शेतकऱ्यांनाही बसला अाहे. जिल्ह्यातून गुजरातच्या वसुधरा डेअरीतर्फे एक लाख लिटर दुधाचे संकलन दरराेज केले जाते. संपामुळे डेअरीतून दुधाचे टँकरच रवाना झाले नाही. वसुधरा दूध डेअरीच्या व्यवस्थापनाने दोन दिवसांपासून दूध संकलन थांबवलेले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आंदोलनात सक्रिय सहभाग नाही. तरी दूध संकलनावर परिणाम झालेला आहे. गुजरातच्या वसुधरा दूध डेअरीतर्फे जिल्ह्यातून सर्वाधिक दूध संकलन होते. हे दूध...
  July 19, 10:59 AM
 • जळगाव - महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात अालेल्या अंतिम मतदार यादीला झालेला उशीर व त्यातील चुकांमुळे निवडणूक अायाेगाचे अायुक्त जे. एस. सहारिया चांगलेच संतापले. मतदार यादीच्या कामाला फार महत्त्व न देता हलक्याने घेतल्याचा ठपका ठेवला. पालिकेच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना मस्ती अाली अाहे. पालिकेच्या कारभारामुळे अंतिम मतदार यादी मॅन्युअली करण्याचे अादेश द्यावे लागल्याने नाराजी व्यक्त केली. कामात कुचराई करणाऱ्यांना जागेवर निलंबित करण्याचे अादेश अायुक्त सहारिया यांनी दिले....
  July 19, 10:54 AM
 
जाहिरात

RECOMMENDED