Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

Jalgaon News

 • यावल - आदिवासी वसतीगृहात राहणाऱ्या अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आहारा करीता मासिक अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला. या निर्णयाचे राज्यात कुठे स्वागत तर कुठे थेट विरोध करीत आंदोलन होत आहे. मात्र, यावल आदिवासी प्रकल्पांतर्गत येणा-या जळगाव शहरातील मुला-मुलींच्या 1 हजार संख्या असलेल्या वसतीगृहात रोखीच्या अनुदान योजनेचे स्वागत करण्यात येत आहे. ही योजना थांबवल्यास प्रसंगी जळगावातुन आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासुन आदिवासी...
  06:52 PM
 • मुक्ताईनगर (जळगाव) - मुक्ताईनगर शहरपासून 25 किलोमीटर अंतरावरील अंतुर्ली येथे 12.45 वाजता लुकमान फ्रूट कंपनी केळी पिकवण केंद्रात सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. यामध्ये दोन कामगार ठार, तर एक जण जखमी झाला. या घटनेतील मृत आणि जखमींचा आकडा वाढण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मुक्ताईनगर-बऱ्हाणपूर रस्त्यावरील अंतुर्ली फाट्याजवळ लुकमान फ्रूट कंपनीचे केळी पिकवण केंद्र (बनाना रायपनिंग सेंटर) आहे. येथे कार्बनडाय अॉक्साईडचा वापर करून केळी पिकवली जाते. यासाठी केंद्रात 11 वातानुकुलित चेंबर तयार करण्यात...
  04:02 PM
 • जळगाव- भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील एका तरुणाच्या खून प्रकरणात न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा भोगत असताना पॅरोलवर बाहेर आल्यानंतर फरार झालेला एक अारोपी तब्बल १२ वर्षांनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागला. दरम्यान, पॅरोलवर बाहेर अाल्यानंतर फरार झाल्यावर काही दिवसांनी या आरोपीच्या नातेवाइकांनी त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव केला होता. भुसावळ येथील वाल्मीकनगरमधील मूळ रहिवासी व सध्या वर्धा येथे स्टेशन फाइलमध्ये राहणारा जितेंद्र श्रावण जावळे (वय ५१) असे फरार आरोपीचे नाव आहे....
  10:12 AM
 • जळगाव- जळगाव महानगरपालिकेच्या चाैथ्या सार्वत्रिक निवडणुकीचे चित्र मंगळवारी स्पष्ट झाले. अर्ज वैध ठरलेल्या ४२७ उमेदवारांपैकी मंगळवारी अखेरच्या दिवसापर्यंत एकूण १२४ जणांनी माघार घेतली. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीसाठी ३०३ उमेदवार रिंगणात अाहेत. यात भाजपचे ७५ तर शिवसेना ७० तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे ५८ उमेदवार पक्षाच्या चिन्हावर लढणार अाहेत. ८२ अपक्षांमुळे जवळजवळ सर्वच प्रभागात बहुरंगी लढतींचे चित्र आहे. परंतु खरी लढाई भाजप- शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी...
  09:23 AM
 • जळगाव- जिल्हा बॅंकेकडून घेतलेल्या पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या ८० हजारांवर शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत २५ हजार रुपयांपर्यंतच्या प्रोत्साहनपर अनुदानास पात्र ठरलेले आहेत. शासनाकडून त्यांना हे अनुदान वितरित करण्यात येत आहे. शासनाने जून २०१६पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी योजनेंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत थकीत असलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र, हा निर्णय घेताना नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय...
  09:17 AM
 • यावर्षी पाऊस सरासरी गाठणार. त्यामुळे बळीराजा आणि सरकारला फार चिंता करण्याची गरज नाही, असा हवामानाचा अंदाज होता. अंदाजाप्रमाणे पावसाने जून महिन्यात सर्वदूर हजेरी लावली. पाऊस वेळेवर आल्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणीही केली. जेथे पाऊसच आला नाही, तेथील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून होती. मात्र, ज्यांनी पेरणी केली, त्यांना पुन्हा पाऊस वेळेवर येईल की नाही, याची चिंता लागून होती. पाऊस लांबल्याने त्यांच्या चिंतेत वाढ झाली. वेळेवर हजेरी लावून गेलेला पाऊस महाराष्ट्रात फिरकलाच नाही....
  07:57 AM
 • यावल (जळगाव) - तालुक्यातील मनवेल येथे एका शेतकऱ्याला शेत विहिरीतील मोटर चालू करण्यासाठी जात असताना शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. राजेंद्र शांताराम पाटील (42) असे मृत्यूमुखी पडलेल्या शेतक-याचे नाव आहे. याप्रकरणी यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मनवेल गावापासून सुमारे काही अंतरावर गट क्रमांक 116 या शेतातच राजेंद्र हे कुटुंबासह राहतात. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता घरात पाणी भरायचे असल्याने ते शेतविहीर मधील इलेक्ट्रिक मोटर सुरू...
  July 17, 07:05 PM
 • पिंपळनेर - पिंपळनेर-सटाणा रस्त्यावरील अपघाताची मालिका सुरूच असून देशशिरवाडे शिवारात आज दुपारी १ वाजता एसटी बस व कंटेनर यांच्यात मोठा अपघात होता होता टळला. पिंपळनेरहुन नाशिककडे जाणा-या साक्री-नाशिक बसला ( क्रमांक MH 20 BL 1603) मागून येणा-या कंटेनरने जोरदार धडक दिली. यामुळे एसटी बस रस्त्याच्या कडेला ढकलली गेली व पलटी होता होता वाचली. यामुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचले. यात अनेक विद्यार्थीही प्रवास करत होते. एसटीचे मागील भागाचे थोड्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने...
  July 17, 04:33 PM
 • जळगाव- महापालिका निवडणुकीतील उमेदवारांचे अंतिम चित्र मंगळवारी माघारीनंतर स्पष्ट हाेणार अाहे. माघारीसाठी शेवटचे दाेन दिवस शिल्लक असताना साेमवारी २० जणांनी माघार घेतली. गेल्या चार दिवसांत २४ उमेदवारांनी माघार घेतली. विराेधी पक्षाच्या जास्तीत जास्त उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी भाजपचे मंत्री गिरीश महाजन हे शर्थीचे प्रयत्न करीत अाहेत. लढत साेपी व्हावी म्हणून बहुतांश प्रभागांत माघारीसाठी प्रस्थापितांकडून अपक्षांची मनधरणी केली जात अाहे. महापालिकेसाठी १ अाॅगस्ट राेजी मतदान...
  July 17, 11:37 AM
 • जळगाव- जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यांसाठी सुरक्षा रक्षक पदासाठी शासनाने जाहिरात देऊन अर्ज मागवले हाेते. त्यानुसार अालेल्या ८ हजार अर्जातून २७६ जणांची शारिरिक चाचणीतून निवड करून तत्काळ वैद्यकीय तपासणी देखील करुन घेण्यात अाली. मात्र, याला तीन वर्ष उलटून देखील या उमेदवारांना नियुक्ती मिळत नसल्याने वंचित असलेल्या या उमेदवारांनी धुळ्याचे माजी अामदार शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगार अायुक्त (माथाडी) कार्यालयातील निरीक्षकांना साेमवारी घेराव घातला. शासनाने ३१...
  July 17, 11:33 AM
 • नागपूर- आमदार सुरेश भोळे यांचे लेटरहेड वापरून माजी मंत्री एकनाथ खडसे यांची बदनामी करणाऱ्या पत्रावरून सोमवारी विधानसभेत गदारोळ झाला. आमदार भोळे यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या तक्रारीवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. याची दखल घेत अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, याबाबत रात्री उशिरा जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार सुरेश भोळे यांच्या लेटरहेडचा वापर करून माजी मंत्री खडसे यांची बदनामी करणारे...
  July 17, 11:32 AM
 • नागपूर/ जळगाव- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याबाबतच्या विधेयकाला सोमवारी विधानसभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठामध्ये बोली भाषा वर्ग सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या वेळी दिले. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हे विधेयक सभागृहात मांडले. तावडे म्हणाले, बहिणाबाईंना त्यांच्या कवितेमधून जो माणूस अपेक्षित होता, तो या विद्यापीठाच्या माध्यमातून...
  July 17, 11:20 AM
 • यावल -मुंबापुरीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक डॉ.श्रीराम डाल्टन हे चित्रपट सृष्टीत जम बसलेला असताना भविष्यात निर्माण होऊ पाहणाऱ्या जल संकटाबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी १५ मे पासून मुंबई ते झारखंड अशा ७ राज्यातील २ हजार किलोमीटर अंतराच्या पदयात्रेस निघाले आहे. फ्री वॉटर इंडिया असा त्यांचा नारा असून सध्या ज्या पद्धतीने पाणी विक्रीचा व्यवसाय वाढत आहे, त्यावर डॉ.डाल्टन यांचा आक्षेप आहे. गेल्या वर्षी स्प्रिंग थंडर या चित्रपटाच्या शुटींगच्या वेळी डॉ.डाल्टन यांना...
  July 16, 05:50 PM
 • जळगाव- महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ४६९ मतदान केंद्रांची अाखणी करण्यात अाली अाहे. त्यात ४८ इमारतींमधील तब्बल १४६ मतदान केंद्र संवेदनशील तथा उपद्रवी असल्याचा अहवाल पाेलिस प्रशासनाने दिला अाहे. उपद्रवी उमेदवार, राजकीय शत्रुत्व त्यात मतदान केंद्रांना संरक्षण भिंती नसल्याचे प्रमुख कारण देण्यात अाले अाहे. या केंद्रांच्या बाहेर व्हिडिअाे चित्रीकरण करून उपद्रवींवर लक्ष केंद्रित केले जाणार अाहे. मनपा निवडणुकीसाठी १ अाॅगस्ट राेजी मतदान हाेणार अाहे. यादृष्टीने पालिका व...
  July 16, 10:44 AM
 • जळगाव- महावितरणने सुमारे ३४,६४६ कोटी रुपयांच्या बहुवार्षिक महसुली तुटीच्या वसुलीसाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे मध्यावधी फेरआढावा याचिका दाखल केली आहे. या प्रस्तावात राज्यातील सुमारे १.२० कोटी ग्राहकांच्या वीजदरात ८ पैसे एवढी दरवाढ प्रस्तावित करण्यात आलेली आहे. या याचिकेत राज्यात येणाऱ्या नवीन उद्योजकांना प्रति युनिट एक रुपया सवलत, ऑनलाइन वीजबील भरणाऱ्या वीजबिलांवर ०.५ टक्के सूट या याचिकेत प्रस्तावित करण्यात आली आहे. याशिवाय २०१९-२० करिता कोणतीही दरवाढ प्रस्तावित...
  July 16, 10:21 AM
 • जळगाव- शाळा प्रगत करण्यासाठी केंद्रप्रमुखांना आता शैक्षणिक नेतृत्वाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. १०० टक्के शाळा प्रगत करण्याचे उद्दिष्ट केंद्र प्रमुखंाना देण्यात आले आहे. या उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगाने यंदाच्या शैक्षणिक सत्रात शिक्षण विभागाकडून लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. प्राथमिक शैक्षणिक क्षेत्रात काही वर्षात नवनवीन प्रयोग राबविले जात आहेत. महाराष्ट्र प्रगत शैक्षणिक कार्यक्रमातुन विविध प्रयोग राबवत विद्यार्थांना शैक्षणिक दृष्ट्या प्रगत करण्याचे प्रयत्न या माध्यमातून...
  July 16, 10:17 AM
 • जळगाव- दुधाच्या दरात वाढ हाेण्यासाठी दूध भुकटी निर्यातीवर प्रतिकिलो ५० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला अाहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिली. जळगाव महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ते अाले हाेते. त्या वेळी भाजपचे उमेदवार पांडुरंग काळे यांच्या निवासस्थानी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बोंडअळीचे अनुदान गेल्या वर्षी बाेंडअळीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्याचे अनुदान अद्याप मिळाले नसल्याबाबत विचारले असता, राज्य शासनाने ३ हजार...
  July 16, 10:01 AM
 • जळगाव - महापालिका निवडणुकीच्या कामांना गती अाली अाहे. प्रत्येकाला अापापली जबाबदारी पूर्ण करण्याची चिंता असणे अपेक्षित असताना मात्र सायंकाळी घरी जाण्याची घाई केली जाते. निवडणुकीच्या कामासाठी पुरेसा वेळ न देणाऱ्या कर्मचाऱ्यांना फैलावर घेत थेट निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात अाला अाहे. निवडणुकीच्या निमित्ताने दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू हाेता. मतदारांना मतदानाच्या स्लीप वाटपाची जबाबदारी बीएलअाेंवर साेपवण्यात अाली अाहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी प्रभाग निहाय पथकांची...
  July 15, 11:28 AM
 • जळगाव - अाठवडाभराच्या विश्रांती नंतर शनिवारी शहरात पावसाचे जाेरदार पुनरागमन झाले. सुमारे दीड ते दाेन तास धाे-धाे बरसलेल्या पावसाने शहरवासियांचे जनजीवन विस्कळीत केले हाेते. त्यासाेबतच महापालिकेच्या अाराेग्य विभागाच्या कामाचा पंचनामा केला. शहरातील अनेक प्रमुख चाैकात तब्बल एक ते दीड फुट पाणी साचलेले हाेते. पिंप्राळा परिसराला जाेडणाऱ्या जुन्या व नव्या बजरंग बाेगद्यात गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक खाेळंबली हाेती. जुलैचा पहिला पंधरवडा उलटून देखील शहरात समाधानकारक पाऊस न झाल्याने...
  July 15, 11:26 AM
 • जळगाव - दीड वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताचा विमा मिळवण्यासाठी बेशुद्धावस्थेतील एक रुग्ण रतलाम (मध्यप्रदेश) येथून चक्क लोक अदालतीत दाखल झाला. न्यायालयाने पाहणी केल्यानंतर त्यांना साडेसात लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश विमा कंपनीला देण्यात आले. दरम्यान, चारचाकीतून आलेल्या रुग्णाला पाहण्यासाठी लोकांनी माेठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शरद विठ्ठल इंगळे (वय ४२, रा.मस्कावद, ता.रावेर) असे रुग्णाचे नाव आहे. २० जानेवारी २०१७ रोजी इंगळे यांचा अपघात झाला होता. त्यांचे मामे सासरे विश्वनाथ...
  July 15, 11:23 AM
 
जाहिरात

RECOMMENDED