Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

Jalgaon News

 • मोदी म्हणाले...प्रसिद्ध चौधरी चहा घेण्यासाठी नंदुरबारला यायचो नंदुरबार- हर घर पोषणआहार त्योहार अंतर्गत मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील अंगणवाडी सेविका,आशा कर्मचारी आणि आरोग्य सेविका यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. राज्यातील सर्वाधिक कुपोषणग्रस्त भागापैकी एक असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातीलअंगणवाडी सेविका,आशा कर्मचारी आणि आरोग्य सेविका यांना पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा, वाहणार्या...
  September 11, 03:22 PM
 • यावल-किनगाव (ता.यावल) येथे रविवारी अतिसार सदृश्य लागण झाल्याने २ जण दगावले, तर ४० जणांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू होते. सोमवारी देखील १७ रुग्णांची तपासणी करत त्यांना जळगावला हलवण्यात आले. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर ह्या पथकासह गावात तळ ठोकून होत्या. आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, माजी जि. प. सदस्य आर.जी.पाटील यांनी रुग्णालय गाठून मदत कार्याचा आढावा घेतला. किनगाव येथे रविवारी सकाळी अतिसार सदृश्य लागण झाली. त्यात प्रकृती खालावल्याने नाना माधव साळुंखे (वय...
  September 11, 11:09 AM
 • जळगाव- पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले भाव, महागाई याकडे केंद्र आणि राज्यातील सरकारचे लक्ष वेधण्यासाठी साेमवारी घाेषित करण्यात अालेला भारत बंद यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या कांॅग्रेस, राष्ट्रवादी, मनसे अाणि समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांना भाजप कार्यकर्ते अाणि व्यापाऱ्यांनी हरहर माेदीच्या घाेषणांनी प्रत्युत्तर दिले. त्यामुळे जळगावात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरून दाणा बाजार, फुले व्यापारी संकुल, गोलाणी...
  September 11, 11:03 AM
 • वराड- धरणगाव तालुक्यातील मुसळी येथे २६ वर्षीय युवकाने नाेकरी न मिळाल्याने विहिरीत उडी घेऊन अात्महत्या केली. संदीप गोविंद घोलप असे त्याचे नाव अाहे. संदीप घाेलप ७ सप्टेंबरपासून बेपत्ता होता. रविवारी विहिरीमध्ये त्याचा मृतदेह आढळला. संदीप हा पदवीधर होता. नोकरीच्या शोधात ताे फिरत होता. तो मानसिक तणावात असल्याने त्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या करू जीवन संपवले.
  September 11, 10:52 AM
 • जळगाव- अल्पावधीतच लाखाे जळगावकरांच्या हृदयात स्थान मिळवणाऱ्या दिव्य मराठीचा सातवा वर्धापन दिन मंगळवारी साजरा हाेत अाहे. यानिमित्ताने स्नेहमिलनाचे अायाेजन करण्यात अाले अाहे. वाचकांच्या विश्वासाची सात वर्षे दिव्य मराठीने पूर्ण केली आहेत. या यशस्वितेत जळगावकरांचा मोठा वाटा आहे. त्यांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे ही यशपूर्ती होऊ शकली. म्हणून मंगळवार, दि. ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेपासून लाडवंजारी मंगल कार्यालय, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६, इच्छादेवी चौफुली, जळगाव येथे...
  September 11, 10:33 AM
 • यावल- तालुक्यातील किनगाव येथे रविवारी अतिसार सदृश्य लागण झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. रात्रीपासून सकाळपर्यंत प्राथमिक बारोग्य केंद्रात सुमारे 50 हून जास्त रूग्ण उपचारार्थ दाखल झाले आहे तर काहींना जळगाव येथील जिल्हा रुग्णालवात हलविण्यात आले आहे. गावात आरोग्य पथक, लोकप्रतिनिधी तळ ठोकून आहेत. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ज्या भागातील रूग्ण आहेत त्या भागात सार्वजनिक पाणी पुरवठा सह स्वच्छतेविषयी विशेष काळजी घेतली जात आहे. तसेच डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची सोमवारी आरोग्य...
  September 10, 11:54 AM
 • जळगाव- घरमालकाच्या संपत्तीवर नजर ठेवून असलेल्या मोलकरणीनेच नियोजन करून भावासह तिघांच्या मदतीने वृद्धेस बांधून जबरी चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. मोलकरणीने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे बटन बंद केल्यामुळे तिच्यावर सर्वप्रथम पाेलिसांचा संशय बळावला होता. त्यामुळे पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर शेतात दडवून ठेवलेला एेवज काढून दिला. डॉ. नरेंद्र दोशी यांच्या घरात शनिवारी दुपारी १.३० वाजता घडलेल्या या जबरी चोरीच्या नाट्यावरून रात्री ११ वाजता पडदा उठला....
  September 10, 10:56 AM
 • जळगाव- तांबापुरातील मच्छी बाजार, गवळीवाड्यात रविवारी दुपारी झालेल्या किरकोळ भांडणावरून रात्री ९.४५ वाजता दोन गटात तुफान हाणामारी झाली. या वेळी गोठ्याजवळील बैल बिथरल्याने हाणामारीचे रूपांतर जोरदार दगडफेकीत झाले. यात दोन्ही गटांकडून दगड, विटा, काचेच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या घटनेत १० दुचाकींचे नुकसान तर १० घरांची नासधूस झाली. तसेच एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या ६ कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत तर २ तरुण व एक बालक...
  September 10, 10:45 AM
 • चाळीसगाव- जेसीबी मशीन व ट्रॅक्टर सोडण्यासाठी एक लाख २० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या उपखेड (ता.चाळीसगाव) येथील वनरक्षकास जळगावच्या लाचलुुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास चाळीसगाव वन विभागाच्या कार्यालयात झाली. प्रकाश विष्णू पाटील (५०) असे या वनरक्षकाचे नाव असून तो चाळीसगावमध्ये राहतो. तक्रारदाराचे स्वतःच्या मालकीचे जेसीबी मशीन असून ते वन विभागाच्या हद्दीत मुरूम उत्खनन करताना वनरक्षक प्रकाश पाटील यांना आढळले होते. त्यांनी...
  September 10, 07:47 AM
 • यावल- नालासाेपारा येथील स्फाेटक प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील साकळी (ता. यावल) येथून अटक करण्यात अालेल्या संशयितांना रविवारी मुंबईच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात अाले. न्यायालयाने या दाेघांना १७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सूर्यवंशी व लोधी यांच्याकडून ज्वालाग्राही पदार्थ, पेनड्राइव्ह, मोबाइल असे साहित्य जप्त केल्याचे एटीएसने न्यायालयात सांगितले. एटीएसने १० ऑगस्ट रोजी नालासोपारा येथून काही शस्त्रे व बाॅम्ब जप्त करून वैभव राऊतला अटक केली हाेती. नंतर याच प्रकरणात शरद कळसकर,...
  September 10, 07:28 AM
 • पिंपळनेर (धुळे)- जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत पिंपळनेरचा थेट सरपंचपदासह निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 17 सदस्यसंख्या असलेल्या पिंपळनेर ग्रामपंचायतीत ६ वॉर्डांचा समावेश आहे. जिल्ह्यात आर्थिकदृष्ट्या मजबुत ग्रामपंचायत म्हणून या ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. निवडणूकीची घोषणा होताच प्रमुख राजकीय पक्षांच्या आजी-माजी सदस्यांसोबत अनेक तरुण उमेदवारांची रेलचेल सुरू आहे. जिल्ह्य़ातील सवाँत मोठी लोकसंख्या व आर्थिक विकासाबरोबर उत्पन्न गटात प्रथम क्रमांक असलेली...
  September 9, 01:04 PM
 • यावल (जळगाव)- साकळी येथून अटक करण्यात आलेल्या 2 तरूणांना आज (रविवारी) मंबई विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. गुरूवारी (दि.6) व शुक्रवारी वासुदेव भगवान सूर्यवंशी व विजय उर्फ भैय्या उखर्डु लोधी या तरूणांना राज्याच्या एटीएसविरोधी पथकाने ताब्यात घेतले होते. दोन दिवस त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना नालासोपारा स्फोटकेप्रकरणी अटक करण्यात आल्याचे दहशतवादविरोधी पथकातर्फे सांगण्यात आले आहे. 10 ऑगस्ट रोजी नालासोपारा येथे एटीएसने कारवाई करून 20 जिवंत बॉम्ब व बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करीत...
  September 9, 11:34 AM
 • जळगाव- राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीतून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. या प्रवाशांना नेहमी अनेक समस्यांना ताेंड द्यावे लागते. या समस्या जाणून घेण्यासाठी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी पाळधी ते जळगाव बसने प्रवास करत बसधील प्रवाशांसह चालक, वाहकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी जळगाव बसस्थानकाची अतिशय बारकाईने पाहणी केली. राज्य परिवहन महामंडळाच्या बैठकीसाठी जळगावात येतांना राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासकीय...
  September 8, 10:38 AM
 • जळगाव- शाळेचा गणवेश का घातला नाही? या कारणावरुन शिक्षकाने एका नववीच्या विद्यार्थ्यास हटकले. त्याचा राग आल्यामुळे त्याने बाहेरुन टवाळखोरांना बोलावून थेट शिक्षकांना दमबाजी केली. मोबाइलमध्ये व्हिडिओ शूटिंग काढून ती साेशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिली. शहरातील ला. ना. शाळेत शुक्रवारी दुपारी १२ वाजता हा प्रकार घडला. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यास जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. शिक्षक दिन साजरा करुन दोन दिवस लाेटले जात नाहीत, तोपर्यंत शिक्षकांच्या अंगावर...
  September 8, 10:36 AM
 • जळगाव- आरोग्य केंद्र, उपकेंद्रांचे अपूर्ण बांधकाम, रुग्णालयांमध्ये उपस्थित राहत नसलेले डॉक्टर्स, सिव्हिलमधील औषधांचा तुटवडा, डॉक्टरांची कट प्रॅक्टिस तसेच तोट्यात असलेले परिवहन महामंडळ, विभागातील खिळखिळ्या बसेस, फेऱ्यांमधील कपातीचे धोरण, प्रवासी निवाऱ्यांची थांबलेली कामे, या आरोग्य व परिवहनाच्या विविध विषयांवर असलेल्या तक्रारींबाबत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत अधिकाऱ्यांची बोलतीच बंद केली. माणूस मेल्यानंतरही जागे हाेत...
  September 8, 10:28 AM
 • जळगाव- भुसावळ न्यायालयातील काम आटोपून सात कैद्यांसह जळगावकडे निघालेल्या पोलिस व्हॅनने शुक्रवारी सायंकाळी महामार्गावरील टि.व्ही.टॉवरसमोर दुचाकीला उडवले. दुचाकीला उडवल्याने चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव पोलिस व्हॅन कलंंडली.दोन वेळा पलटी घेऊन ती रस्त्याच्या कडेला आडवी झाली.या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुण-तरुणी ठार झाले. तर चालकासह ४ पोलिस आणि एक कैदी असे एकूण ५ जण जखमी झाले आहेत.शुक्रवारी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास जळगाव-भुसावळ महामार्गावर हा अपघात झाला. उमेश संजय वारुळे (वय २२, रा....
  September 8, 10:16 AM
 • यावल- तालुक्यातील साकळी गावात सलग दुसऱ्या दिवशी दहशतवाद प्रतिबंधक पथकाने (एटीएस) कारवाई करून आणखी एका तरुणास ताब्यात घेतले. विजय उर्फ भैया उखर्डू लोधी असे त्या तरुणाचे नाव असून गुरुवारी ताब्यात घेतलेल्या वासुदेव भगवान सूर्यवंशी या तरुणाचा विजय हा मित्र अाहे. शुक्रवारी सायंकाळी एटीएसच्या कारवाईसाठी आलेल्या पोलिस पथकाने कुटुंबीयांना बाहेर काढून विजय लोधी यांची त्याच्या घरातच सुमारे तासभर चौकशी केली. त्यानंतर त्याला पोलिस वाहनात घेऊन गेले. दरम्यान,सलग दोन दिवस एटीएस पथकाच्या...
  September 8, 08:03 AM
 • जळगाव- संशयी वृत्तीमुळे पत्नीला ७ वर्षांपासून घरात कोंडून दररोज मारहाण करणाऱ्या पतीविरुद्ध शेजाऱ्यांनी महिला व बाल सहायक कक्षाकडे तक्रारी अर्ज केला. त्याची दखल घेऊन कक्षातील महिला सदस्यांनी गुरुवारी एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने त्या तरुणास ताब्यात घेऊन तंबी दिली. नेहरूनगर परिसरातील ही घटना आहे. नेहरूनगरात ७ वर्षांपासून नीलेश प्रताप पाटील (वय ३७) हा पत्नीसाेबत राहताे. त्याला ५ वर्षांचा एक मुलगा व ४ वर्षांची एक मुलगी आहेत. ताे ७ वर्षांपासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्याने...
  September 7, 12:44 PM
 • देवळा- देवळ्यापासून तीन किलोमीटर अंतरावरील रामेश्वर फाट्याजवळ बस व मालवाहतूक पिकअपचा अपघात होऊन १२ प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी भावडबारी घाटाच्या पायथ्याशी अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झाला होता. त्याच ठिकाणी नंदुरबार आगाराच्या बसचा अपघात झाला. खडकतळे (ता. देवळा) येथील मालवाहतूक पिकअप पिंपळगाव बसवंत येथे टाेमॅटाे घेऊन जात होती. दुपारी दीड वाजेच्या सुमारास रामेश्वर फाट्याजवळ भरधाव असलेल्या मुंबई-नंदुरबार बसने (एम. एच....
  September 7, 10:16 AM
 • चोपडा- मुलास टोकरे कोळी जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने तालुक्यातील वेले येथील माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश एकनाथ कोळी (वय ४२) यांनी गुरूवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. अात्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याचा उल्लेख आहे. सुरेश कोळी हे मागील अनेक दिवसांपासून मुलाच्या शिक्षणासाठी टोकरे कोळी जात वैधतता प्रमाणपत्र मिळावे म्हणून प्रयत्न करत असताना त्यांना ते मिळत नव्हते. त्यांचा मुलगा इयत्ता आठवी आणि मुलगी पाचवीमध्ये चोपड्यात शिक्षण घेत आहेत. कोळी यांनी गुरूवारी...
  September 7, 10:04 AM
 
जाहिरात

RECOMMENDED