जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

Jalgaon News

 • रावेर : रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रकने संगमनेर-रावेर बसला समोरून धडक दिली. १ फेब्रुवारीच्या पहाटे ३.३० वाजता रावेर-विवरे दरम्यान झालेल्या या अपघातामध्ये बसचालक राजू अवसाजी आशिरवाड, प्रवासी मुजाहीद शेख नूर मोहंमद (रा.रावेर) हे दोन्ही गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, जो खड्डा चुकवताना हा अपघात झाला त्याबाबत दिव्य मराठीने १० जानेवारीला वृत्त प्रकाशित करून अपघात होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली होती. अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावर रावेर ते विवरे दरम्यान अनेक ठिकाणी खड्डे...
  February 2, 11:17 AM
 • जळगाव : पंतप्रधान कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत प्रशिक्षण केंद्राच्या नावाने सुरू असलेला गोरखधंदा समोर आला आहे. एजंट व इतरांनी रायपूर येथील प्रशिक्षण केंद्राचे बनावट कागदपत्र, ठराव तयार करून ते पिंप्राळा येथे चालवण्यात येत असल्याचे भासवले. त्या माध्यमातून अनुदानापोटी मिळणारी ४५ लाख रुपयांची रक्कम एजंटने पत्नी अध्यक्ष असलेल्या संस्थेच्या खात्यावर जमा करून प्रशिक्षण केंद्र चालकांची फसवणूक केली आहे. या प्रकरणात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती...
  February 2, 11:07 AM
 • जळगाव- भाजप-शिवसेनेची युती व्हावी, अशी इच्छा व प्रयत्न आहेत. मात्र, मित्रपक्ष सेनेचे मंत्री लंगोट बांधून तयार असल्याच्या घोषणा करताहेत. मंत्री गुलाबराव पाटील हे पट्टीचे पहिलवान आहेत. ते लंगोट बांधून नव्हे, तर खिशात घेऊन फिरतात. आम्ही मात्र नेहमीच कुस्तीसाठी तयार असतो. आमच्याकडे कापड तयार असतेच. वेळेवर लंगोट शिवून अंगाला तेल लावले की आम्ही कुस्ती जिंकतो, असा चिमटा भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेला शुक्रवारी घेतला. जळगावातील अजिंठा विश्रामगृहावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे...
  February 2, 09:29 AM
 • रावेर- संगमनेर-रावेर बसला शुक्रवारी (ता.1) भीषण अपघात झाला. रस्त्यातील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात समोरुन येणार्या भरधाव ट्रकने बसला जोरदार धडक दिली. या अपघातात बस चालक आर.एच. आशिरवाड गंभीर जखमी झाला आहे. मिळालेली माहिती अशी की, संगमनेर-रावेर बसला शुक्रवारी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास विवरे-रावेरदरम्यान घडली. रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. ट्रक थेट समोर येणार्या बसला धडकला. अपघातात चालक आशिरवाड गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी...
  February 1, 12:03 PM
 • धुळे : सोशल मीडियाचा विधायक कामांसाठीही वापर करता येतो हे लाडशाखीय वाणी समाजाने सिध्द केले आहे. लाडशाखीय वाणी समाजाने समाजातील तरूण-तरूणींचे विवाह जुळविण्यासाठी ऋणानुबंध हा व्हॉट्सअॅप ग्रुप सुरू केला आहे. या ग्रुपमुळे आतापर्यंत समाजातील ५७ जणांचे विवाह जुळले आहे. त्यामुळे समाजबांधवाच्या वेळेसह पैशांची बचत झाली आहे. विविध कारणांमुळे लग्न जुळविणे अवघड आणि खर्चिक झाले आहे. दुसरीकडे काहींनी लग्न जुळवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. दुसरीकडे लाडशाखीय वाणी समाजाने समाजातील...
  February 1, 11:21 AM
 • धुळे : साक्री रोडवरील मुलीचे निरीक्षणगृह असलेली पीडित अल्पवयीन तरुणी बेपत्ता झाली आहे. अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण केले असावे, अशी शक्यता व्यक्त करत याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्री रोडवर असलेल्या मुलींच्या निरीक्षणगृहात दहा अल्पवयीन मुलींना ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये सोळा वर्षीय मुलगीही होती. अपहरण व बलात्कारच्या घटनेतील ही पीडिता दि. २ ऑक्टोबर २०१८ पासून निरीक्षणगृहात होती. शासकीय नियमानुसार पीडितेला संरक्षण-संगोपन आणि शिक्षण दिले जात होते....
  February 1, 11:14 AM
 • जळगाव : हॉस्पिटलवर डॉक्टरांनी बनवलेल्या कुटीला अचानक आग लागल्याची घटना विसनजीनगरातील माॅन्साई हॉस्पिटलमध्ये गुरुवारी दुपारी २.१५ वाजता घडली. या वेळी डॉक्टर एका महिलेवर संतती नियमनाची शस्त्रक्रिया करीत असल्याने एकच धांदल उडाली. आगीच्या भीतीपोटी शस्त्रक्रिया झालेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक जीव वाचवण्यासाठी वेदनेसह रुग्णालयाच्या खाली पळाले. त्यानंतर रुग्णालयासमोरच गल्लीमध्ये रुग्णांना सलाइन लावून अक्षरश: रस्त्यावरच झोपवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विसनजीनगरात...
  February 1, 11:06 AM
 • अमळनेर- आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला अजून सुंदर बनवूया... असे आपण कथा, कवितांमध्ये वाचतो. परंतु एका कुटुंबात सर्व दिव्यांग असतील आणि कुटुंबातील कर्ता पुरुषच दुर्धर आजाराने त्रस्त असून तो मृत्यू शय्येवर असेल तर काय म्हणाल? अशा परिस्थिती कुटुंबापुढे संकटांचा डोंगर उभा ठाकतो. पैशांविना उपचार थांबतात. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, असा संदेश देणारे लोकशिक्षक, मानवधर्म, समतेची शिकवण देणारे साने गुरुजी यांची कर्मभूमी अर्थात अमळनेर येथील ही घटना आहे. शहरातील औषध विक्रेता अनिल...
  January 31, 03:21 PM
 • चाळीसगाव : रुग्णालयातील कामकाज आटोपून दुचाकीने घरी परतणाऱ्या परिचारिकेच्या दुचाकीस पाठीमागून येणाऱ्या डंपरने(क्.एमएच ४३, बीपी १७२६) धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालवित असलेल्या या महिलेची बहिण जखमी झाली. बुधवारी सायकांळी साडेपाच वाजता बस स्थानकासमोर ही घटना घडली. जयाबाई रवींद्र काटोले (बारी) (वय ४०) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या दुचाकीवर (क्र.एमएच १९ सीके ८११५) मागे बसल्या हाेत्या. तर त्यांच्या बहिण उषाबाई काटाेले दुचाकी चालवित हाेत्या. मागे बसलेल्या जयाबाई या...
  January 31, 11:48 AM
 • धानोरा : बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील धानोऱ्यापासून जवळच असलेल्या गवळी नाल्याजवळ पेटलेला महाकाय वृक्ष रस्त्यात काेसळला. यावेळी चार तरुणांनी समयसूचकता पाळत रस्त्याने जाणाऱ्यांना आवाज देऊन थांबवले. दुचाकीस्वार जागेवरच थांबल्याने त्यांचे प्राण वाचले. पेटलेल्या वृक्षाबाबत या तरुणांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवूनही अधिकाऱ्यांनी कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवूनदेखील कर्मचारी पाेहाेचले उशिरा...
  January 31, 11:41 AM
 • धुळे : चिठ्ठी घे, त्यावर नंबर लिहिला आहे, फोन करेल. प्रेमाला होकार दिला नाही तर उचलून नेईल, अशी धमकी तिघा अल्पवयीन तरुणींना मिळाली. मुलींनी देवपूर पाेलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. पाेलिसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे रोडरोमिओंविषयी रोष व मनातील खदखद काढण्यासाठी मुलीच्या काही नातलगांनीच रोडरोमिअाेंना पांझरा चौपाटीवर बोलविले. यानंतर अवघ्या पाच मिनीटात आलेल्या रोडरोमिओंना पालकांनी जाब विचारला. या वेळी मुलीनीच आक्रमक पवित्रा घेऊन रोडरोमिओंच्या श्रीमुखात सँडल...
  January 31, 11:34 AM
 • भुसावळ : शहरातील इंदिरा नगरात एका टपरीच्या आडाेशाला मारुती ओम्नीमध्ये अवैधपणे घरगुती वापरावयाचा गॅस भरताना बाजारपेठ पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत संशयित पसार झालेला असला तरी पोलिसांनी गॅस भरण्याच्या साहित्यासह ओम्नी गाडी ताब्यात घेतली. बुधवारी सकाळी ११.३० वाजता ही कारवाई झाली. इंदिरा नगरात एका टपरीच्या आडाेशाला वाहनांमध्ये घरगुती वापराचा गॅस भरला जातो, अशी माहिती बाजारपेठ पाेलिसांना मिळाली हाेती. त्यानुसार पाळत ठेवून पाेलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली...
  January 31, 11:26 AM
 • जळगाव : शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात नुकत्याच प्रसूत झालेल्या महिलेवर शस्त्रक्रिया केल्यानंतर तिच्या गर्भात कापसाचा बोळा राहिल्यामुळे तीची प्रकृती बिघडली होती. खासगी रुग्णालयात उपचार करुन हा बोळा काढण्यात आला. या प्रकारामुळे संतप्त कुटुंबीयांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन जाब विचारला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता हरिविठ्ठलनगरातील दुर्गा योगेश माळी (वय २३) या विवाहितेची प्रसूती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६ जानेवारी रोजी झाली. १८ रोजी डिस्चार्ज दिला....
  January 31, 11:18 AM
 • जळगाव : अवघ्या १२ दिवसांवर मुलाचे लग्न येऊन ठेपलेले असताना त्याच्या लग्नपत्रिका वाटप करीत असलेल्या पित्याच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी १२.१५ वाजता जळगाव-भुसावळ महामार्गावरील खेडी गावाजवळ हा अपघात झाला. दरम्यान, अपघातानंतर जखमी २० मिनिटे विव्हळला. मात्र, मदतीसाठी एकही वाहनचालक थांबला नव्हता. काही वेळाने जखमीला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, ताेपर्यंत उशिर झाला हाेता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...
  January 31, 11:08 AM
 • जळगाव- जमिनीवर कोठेही ६ रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप आल्यास आता त्याची पूर्वसूचना किमान १० सेकंद ते १ मिनिट आधी मिळेल, असे तंत्र विकसित केल्याची माहिती आयआयटी रुरकीच्या अर्थक्वेक इंजिनिअरिंगचे प्रा. मुकतलाल शर्मा यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली. प्रा. मुकतलाल शर्मा म्हणाले की, भूकंप येण्याआधी त्याची कंपने ओळखून त्या त्या भागात तातडीने अलर्ट जारी केल्यास रेल्वे, ऊर्जा प्रकल्प, जीवित हानी व सर्व प्रकारचे नुकसान कमी करता येईल. आयअायटी रुरकीला उत्तराखंडातील चमोली ते...
  January 31, 07:42 AM
 • जळगाव- अवघ्या 12 दिवसांवर मुलाचे लग्न येऊन ठेपलेले असताना लग्नपत्रिका वाटप करताना झालेल्या अपघातात वरपित्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी जळगाव-भुसावळ महामार्गावरील खेडी गावाजवळ घडली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीराम उत्तम पाटील (50, रा.खडके, ता.एरंडोल) असे मृताचे नाव आहे. पाटील यांचा लहान मुलगा गणेश याचे 10 फेब्रुवारी रोजी लग्न आहे. त्यानिमित्ताने पाटील हे बुधवारी खेडी (जि....
  January 30, 06:35 PM
 • भडगाव : बँकेतून बाेलत असल्याची बतावणी करून एटीएम कार्डचा नंबर विचारला अन् पुढच्या पाचच मिनिटातच खात्यातील पैसे कमी झाल्याच्या दाेन घटना शहरात घडल्या. अशा पद्धतीने फसवणुकीचे प्रकार दिवसागणिक वाढत असून जळगावच्या सायबर सेलच्या पथकाने येथे येऊन चाैकशी केली. तर शहरात व्हॅन फिरवून पाेलिसांनी फसवणूक हाेऊ नये यासाठी जनजागृतीही केली. बँक खातेदारांना अलर्ट राहण्याचे आवाहन पाेलिसांनी केले आहे. एटीएम कार्डचे स्वरूप बदलत असल्याची खूप चर्चा सध्या हाेतेय. याचाच फायदा घेऊन ढग एटीएम कार्डचा...
  January 30, 12:25 PM
 • धानोरा : चोपडा तालुक्यातील धानोरा येथील इंदिरानगर वसाहतीत सार्वजनिक नळाद्वारे येणाऱ्या पाण्यात चक्क कबुतराचे मांस, पंख आल्याने नागरिक संतप्त झाले हाेते. हा प्रकार ग्रामपंचायतीला कळवण्यात आला. त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन व प्राथमिक आरोग्य केंद्राकडून तत्काळ टाकीची स्वच्छता करण्यात आली. गावात पाण्याविषयी जनजागृती होत नसल्याची तक्रार येथील पंचायत समिती सदस्या कल्पना पाटील यांनी केली. धानोरा येथील इंदिरानगर वसाहतीतील वॉर्ड क्रमांक १ मधील सलीम गफ्फार शेख यांच्या घरात तसेच...
  January 30, 12:19 PM
 • जळगाव : मेहरूण परिसरातील रामनगरात राहणाऱ्या दहावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी २.३० वाजता उघडकीस आली. या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कीर्ती पवन दुसाने (वय १७)असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. मूळचे कानळदा येथील दुसाने कुटुंबीय काही वर्षांपासून रामनगर येथे वास्तव्यास आले आहे. कीर्ती श्रीराम माध्यमिक कन्या शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत...
  January 30, 11:59 AM
 • जळगाव : व्यवसाय वृद्धीसाठी केंद्र शासनाच्या स्टॅण्डअप योजनेंतर्गत मशिनरी खरेदी करण्यासाठी कंपनीचे कोटेशन तयार करून त्यानंतर प्रत्यक्षात कोणतीही मशिनरी खरेदी न करता पंजाब नॅशनल बँकेत बनावट कागदपत्र सादर करून ५ कोटी ४२ लाख रुपयांचे कर्ज काढून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेचे दोन तत्कालीन मुख्य प्रबंधकांसह आठ जणांविरुद्ध मंगळवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पंजाब नॅशनल बँकेचे सध्याचे...
  January 30, 11:51 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात