जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

Jalgaon News

 • भडगाव- जळगाव जिल्ह्यातील भगडाव येथे मुलाच्या विरहात आई-वडील आणि मुलगी अशा तिघांनीही सामूहिक आत्महत्या केल्याची घटना आज(दि.30)घडली आहे. 9 वर्षीय इसम बाबू सय्यद याची 22 मार्चला हत्या करण्यात आली होती. या हत्या होऊ इतके दिवस झाले तरीदेखील आरोपींचा शोध लागला नव्हता. यामुळेच बाबू सय्यद खूप तणावात होते. मुलाचा विरह आणि यातूनच आलेला मानसिक तणाव यामुळे कुटुंबातील तिघांनीही सामूहिक आत्महत्या केली.
  March 30, 12:57 PM
 • पहूर/जामनेर- वाकडी ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणेचा मृतदेह गुरूवारी (ता. २८ रोजी) छातीवर दगड बांधलेल्या अवस्थेत पाचोरा तालुक्यातील मोहाडी शिवारात एका निर्जन विहिरीत आढळून आला. त्यानंतर याप्रकरणी प्रमुख संशयित चंद्रशेखर वाणी यास अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेत समाजबांधवांनी जळगाव येथे आंदोलन केले. अखेर पोलिसांनी चंद्रशेखर वाणी याला पंढरपूर येथून गुरूवारी अटक केली. दरम्यान, याप्रकरणातील संशयित प्रदीप राजपूत फरार आहे. १९ मार्चपासून बेपत्ता...
  March 29, 12:45 PM
 • यावल/जळगाव- विदेशी बनावट दारु तयार करणाऱ्या डांभुर्णी (ता.यावल) येथील एका कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री छापा मारला. या ठिकाणाहून ३ लाख ४६ हजार १८५ रुपयांचा मुद्देमाल व बाटल्या सीलंबद करण्याचे मशीन जप्त करण्यात आले आहे. चार जणांना अटक करण्यात आली असून कारखान्याचा मुख्य सूत्रधार फरार आहे. या पाचही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुधीर आढाव यांच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री डांभुर्णी (ता.यावल) येथील कपिल...
  March 29, 12:15 PM
 • नंदुरबार- सलग आठ वेळेस काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आलेले माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनी अपक्ष लढण्याची तयारी केली आहे. 30 मार्च रोजी त्यांनी नवापूर येथे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांचा विचारविनिमयासाठी खास मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यामध्ये ते आपली भूमिका जाहीर करणार असून त्यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची डोकेदुखी देखील वाढणार आहे. काँग्रेस पक्षाचे उमेदवार ॲड. के. सी. पाडवी यांच्या...
  March 28, 02:14 PM
 • जळगाव- पाचोरा येथील शिवसेनेचे माजी आमदार तसेच निर्मल सिड्सचे कार्यकारी संचालक आर.ओ. तात्या पाटील यांचे मुंबईत आजाराने निधन झाले. आर.ओ. तात्या यांनी गुरुवारी पहाटे साडे चार वाजता अखेरचा श्वास घेतला. सायंकाळी 5 वाजता पाचोरा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
  March 28, 12:57 PM
 • जळगाव- काँग्रेसचे सरचिटणीस अजबराव पाटील यांच्यावर हल्ला करून त्यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना गुरुवारी घडली आहे. निलंबित महिला शहराध्यक्षा अरुणा पाटील यांनी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. शिक्षक आमदार तांबे, जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी अध्यक्ष उदय पाटील, महानगर कार्याध्यक्ष राधेश्याम चौधरी, ए.जी. भंगाळे यांनी शहर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन याप्रकरणी तक्रार नोंदविली आहे. पुढील स्लाइड्सवर...
  March 28, 12:53 PM
 • यावल- तालुक्यातील अंजाळे येथे विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणार्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अंजाळे येथे घडली. मिळालेली माहिती अशी की, गावातील ट्रान्सफॉर्मरची फ्यूज कोणीतरी काढून टाकले होते. फ्यूज टाकण्यास उशिरा का आला, असा जाब एकाने वायरमनला विचारत त्याला मारहाण केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दत्तू कृष्णा कोळी याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण भोजू भालेराव...
  March 26, 06:08 PM
 • जळगाव- पत्नीसोबत सुरू असलेला वाद सोडवल्याचा राग आल्याने सालदाराने वृद्ध शेतमालकाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे 4 वाजून 30 मिनिटांला तालुक्यातील वडनगरी येथे घडली. घटना घडल्यानंतर सालदार फरार झाला. प्रभाकर शंकर पाटील (75, रा. वडनगरी, ता.जळगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे, तर शांताराम बाबूलाल पावरा (35, रा. वडनगरी) असे आरोपी सालदाराचे नाव आहे. सोमवारी दुपारी सालदार शांताराम हा दारूच्या नशेत पत्नीसोबत भांडण करत होता. रागाच्या भरात तो कोयता घेऊन पत्नीच्या मागे धावत...
  March 26, 06:08 PM
 • भुसावळ -पूर्ववैमनस्यातून तीन मित्रांमध्ये झालेल्या वादात दोघांनी एका तरुणाच्या डोक्यावर गिटार वाद्याने, तर पोटात चाकूने वार केले. या घटनेत आनंदनगरातील १८ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. रविवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास ही घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर घडली. या प्रकरणी शहर पोलिसांत मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल झाला. जखमीवर गोदावरी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. जय अशोककुमार दुधाणी (१८ रा. आनंदनगर, जावळे हॉस्पिटलमागे, भुसावळ)असे जखमीचे नाव आहे. त्याचे एका तरुणीशी असलेल्या...
  March 26, 08:31 AM
 • यावल- बऱ्हाणपूर- अंकलेश्वर राज्यमार्गावर मंगरूळ (ता.चोपडा) फाट्याजवळ दुचाकी व ट्रकच्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. यशवंत लक्ष्मण वाघळे (वय-25) असे मृत तरुणाचे नाव आहे. अपघाताचे वृत्त साकळी गावात समजताच अनेकांनी चोपडा येथे कुटीर रूग्णालयात धाव घेतली. मिळालेली माहिती अशी की, साकळी (ता.यावल) येथील रहिवासी यशवंत उर्फ धर्मा लक्ष्मण वाघळे-धोबी व त्याचा मित्र विक्रम देविदास जाधव-कैकाडी(वय-20) हे दोघे दुचाकी क्रमांक (एम. एच. १९ ए. डी. ४१७१) वरून चोपड्याकडे जात असताना...
  March 25, 08:18 PM
 • शिरपूर- शिरपुरजवळ आमोदे येथील संगीता लॉज येथे एका नवविवाहीतेचा खून झाला. रेणुका धनगर (22, रा.जातोडा ता.शिरपूर) असे मृत तरुणीचे नाव आहे.सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास रेणुकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. रेणुकाचा गेल्या 23 मार्चला विवाह झाला होता. मिळालेली माहिती अशी की, रेणुका धनगर ही तरुणी सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता संशयित आरोपी नरेंद्र एकनाथ भदाने उर्फ पप्पू शेटे याच्यासोबत लॉजमध्ये आली होती. पप्पू शेटे याने सकाळी साडे दहा वाजता रेणुकाच्या आईला फोन केला होता. तुम्ही आमचे लग्न...
  March 25, 02:25 PM
 • यावल- भुसावळ टी-पाँइंट जवळील शेतकी संघाच्या व्यापारी संकुलालगत, झाकण नसलेल्या भूमिगत सांडपाण्याच्या टाकीत महिलेचा मृतदेह आढळल्याचा प्रकार रविवारी, दुपारी 3.30 वाजता उघड झाला. सायंकाळी मृत महिलेची ओळख पटली. कमलबाई भगीरथ महाजन (वय- 60, रा.धानोरा, ता.चोपडा) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या गुरुवारी फैजपूरच्या यात्रेत गेल्या होत्या, परतताना झालेल्या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. शेतकी संघाच्या व्यापारी संकुलाच्या पूर्वेस गटारीला लागून सांडपाण्याची भूमिगत टाकी आहे. त्या टाकीला झाकण...
  March 25, 11:46 AM
 • जळगाव -भारतात सन १९५१ मध्ये पहिली लोकसभा निवडणूक झाली. तेव्हा ४८९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ४४ मुस्लिम पुरुषांना उमेदवारी देण्यात आली होती. यापैकी फक्त १५ खासदारच निवडून आले होते. दरम्यान, १९५१ पासून तर २०१४ पर्यंत लोकसभेच्या १६ निवडणुका झाल्या असून या ६३ वर्षांत भारतात केवळ ४०० मुस्लिम उमेदवारांना लोकसभेवर जाण्याची संधी मिळाली असल्याचा अहवाल प्रा. डॉ. वखार शेख यांनी तयार केला आहे. लाेकसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे यंदाचे १७ वे वर्ष आहे. सन २०१४ पर्यंत म्हणजे एकूण १६...
  March 25, 09:26 AM
 • जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलेल्या खासगी सर्वेच्या निकालात वंचित आघाडीला ५० टक्के प्रतिसाद दर्शविला आहे. त्यामुळेच त्यांनी माढा मतदार संघातून माघारीचा निर्णय घेतला. राज्यातील प्रत्येक मतदारसंघातील आम्ही मानताे. त्यामुळे राज्यभरात वंचित आघाडीला यशाची खात्री असल्याचा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. कुटुंबशाही, एका विशिष्ट जातीचे राजकारणाला पर्याय देण्यासाठी वंचित आघाडीतर्फे जात सांगून उमेदवार देत आहाेत. राष्ट्रवादी व कांॅग्रेस स्पर्धेत आहे...
  March 22, 02:24 PM
 • यावल - तालुक्यातील वाघझीरा येथील २५ वर्षीय आदिवासी युवतीस युवतीच्या लग्नापूर्वी व लग्नांनतर प्रेमाचे व लग्नाचे आमीष दाखवून सुमारे अडीच वर्ष तीच्यावर अत्याचार करीत तीच्याशी लग्न न केल्याने युवतीची फसवणूक केल्यरप्रकरणी तालुक्यातील वाघझीरा येथील मुळ रहीवाशी तथा नंदुरबार पोलीस मुख्यालय पोलीस कॉस्टेंबल म्हणून नोकरीस असलेल्या इरफान अकबर तडवी या पोलिसांविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तालुक्यातील वाघझीरा येथील २५ वर्षीय युवतीने येथील पोलीस...
  March 22, 11:31 AM
 • पारोळा ।येथील गावहोळी चौक परिसरातील शिरसमणीकर ज्वेलर्ससह तीन दुकानांना बुधवारी पहाटे ६ वाजता शाॅर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत एक कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. १९ मार्च रोजी रात्री ९ वाजता शिरसमणीकर ज्वेलर्स, सुनील ड्रेसेस, सरसवान किराणा यांनी दुकान बंद केले. बुधवारी सकाळी सहा वाजता किराणा दुकानाचे मालक रमेश अमृतकर यांना ज्वेलर्सच्या दुकानातून धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी ज्वेलर्सचे मालक सुनील भालेराव यांना माहिती दिली. दुकानाचे शटर उघडले असता...
  March 21, 09:46 AM
 • धुळे- मोदी आपसे बैर नहीं, डॉ. भामरे तुम्हारी खैर नहीं, असे आव्हान देतच आमदार अनिल गोटे यांनी लोकसभेच्या रिंगणात उडी घ्यायची तयारी केली आहे. धुळे मतदारसंघाला टक्केवारी, गुंडगिरी व गटबाजीचा लागलेला कॅन्सर मुळापासून उखडून फेकण्यासाठी आपली उमेदवारी राहील, असे गोटे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले. सध्या या मतदारसंघातून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे भाजपचे प्रतिनिधित्व करतात. मात्र धुळे मनपा निवडणुकीपासून भामरे व गोटे यांच्यात वितुष्ट निर्माण झाले आहे. त्यामुळे गोटेंनी...
  March 20, 12:09 PM
 • यावल- टिक टॉकवर तलवारीसह व्हिडिओ तयार करुन तो सोशल मीडियावर अपलोड करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. तलवार हातात घेवून व्हायरल झालेल्या या व्हिडिओवरून तरुणाच्या पोलिसांनी मुसक्या आवळून त्याला कोठडीत टाकले आहे. सागर अशोक पाटील (वय-19, रा.साकळी, ता.यावल) असे आरोपी तरुणाचे नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सागर पाटील याच्याकडे तलवार असल्याची माहीती फैजपूर उपविभागीय पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे व पोलिस निरीक्षक डी. के. परदेशी...
  March 19, 12:29 PM
 • जळगाव । घरात एकट्या असलेल्या मेहुणीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या एका आरोपीस न्यायालयाने सोमवारी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या आरोपीस आजन्म कारागृहात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. नरेंद्र बीनाबाई रतवेकर (४१, रा.बळीरामपेठ) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने २२ नोव्हेंबर २०१६ रोजी सायगाव (ता.चाळीसगाव) येथे त्याच्या ३२ वर्षीय मेहुणीवर अत्यावर करुन नंतर डोक्यात दगड मारुन खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह वाळूच्या ढिगाऱ्याखाली पुरण्याचा प्रयत्न केला होता....
  March 19, 10:08 AM
 • यावल- यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात एक कोटीहून अधिक रकमेचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. तत्कालीन पाच प्रकल्प अधिकारी तसेच एक मक्तेदार आणि कार्यालयातील तत्कालीन कर्मचार्यांविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन 2005 ते 2010 दरम्यानहा अपहार झाल्याचे राज्य शासनाकडून नियुक्त निवृत्त न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड यांच्या समितीने केलेल्या चौकशीत उघड झाले आहे. त्यात दुधाळ जनावरे, कन्यादान योजना आदींचा समावेश आहे. तत्कालीन अधिकार्यांवर गुन्हा दाखल झाल्याने...
  March 18, 12:49 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात