Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

Jalgaon News

 • जळगाव- राजीव गांधीनगरातील युवक राहुल प्रल्हाद सकट याच्यावर परिसरातच राहणाऱ्या बावरी कुटुंबियांनी मार्च महिन्यात चॉपरने हल्ला केला होता. यात राहूलचा मृत्यू झाला हाेता. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन संशयितांना अटक केली आहे. तर गुरूवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २ संशयितांना कजगाव (ता. चाळीसगाव) येथून अटक केली अाहे. रविंद्रसींग मायासिंग बावरी (वय २४) व मालाबाई सत्यासिंग बावरी (वय ६०) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. राहुल याचा खून...
  September 28, 11:02 AM
 • जळगाव- गांधीजी आजच्या काळात प्रासंगिक आहेत का? याबाबत आपल्याच देशात चर्चा होऊ शकते हे आपले दुर्दैव आहे. गांधीजींना राष्ट्रधर्म हवा होता, धर्मराष्ट्र नव्हे. मात्र, आजची सर्वच परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. या परिस्थितीतून बाहेर पडायचे असेच तर गांधी विचारांशिवाय पर्याय नाही, असे ठाम प्रतिपादन डॉ. विश्वास पाटील यांनी व्यक्त केले. गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे आयोजित नॅशनल गांधीयन लिडरशीप कॅम्पच्या गुरुवारी दुसऱ्या दिवसाच्या सत्रात डाॅ. पाटील बोलत होते. गांधी प्रासंगिकता का मर्म या...
  September 28, 10:56 AM
 • नंदुरबार - शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी अयोध्येच्या मुद्द्यावरून वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अयोध्या हा श्रद्धेचा विषय आहे. मोदी सरकारने राम मंदिरासंदर्भात अध्यादेश काढून मंदिराचे काम सूरू करावे. सुप्रीम कोर्टात सुनावणीद्वारे हा प्रश्न सुटणार नाही, असे त्यांनी नंदूरबार येथे पत्रकार परिषदेत म्हटले आहे. आगामी जिल्हा परिषद आणि लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पक्षबांधणीसाठी ते नंदूरबारला आले होते. यावेळी संजय राऊत म्हणाले, 25 वर्षांपुर्वी आम्ही बाबरी मस्जिदचा ढाचा...
  September 27, 07:58 PM
 • जळगाव- शहरात दररोज चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र सुरू आहे. यातच बुधवारी दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी महामार्गालगत असलेल्या विद्युत कॉलनी व शिव कॉलनीत दोन वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबवल्या. १० मिनीटांच्या अंतरात या घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तर दुसरीकडे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. भामट्यांनी लंपास केलेल्या साेनसाखळ्यांची किंमत १ लाख ५ हजार रुपये अाहे. शहरातील कोल्हेनगर परिसरातील गुरूकुल कॉलनीत राहणाऱ्या सुधा अशोक नेहेते (वय ६१)...
  September 27, 11:14 AM
 • जळगाव- अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले तरी नोकरी मिळत नसल्याने नैराश्य आल्याने एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी ३.३० वाजता उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हितेंद्र विलास महाजन (वय २२, रा. अासोदा) असे मृत अभियंता तरुणाचे नाव आहे. हितेंद्र याने शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीच्या पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. वडील विलास महाजन हे एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत. तर आई वैशाली ह्या शेतीकाम...
  September 27, 11:11 AM
 • जळगाव- शिक्षकांच्या वेतनासाठी व संस्थाच्या वेतनेत्तर अनुदान दिवाळीपर्यंत मिळवून देण्याचे प्रयत्न असून यासंदर्भात मुख्यमंत्री अाणि शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार अाली अाहे. तसेच जिल्हा पातळीवर शिक्षकांचे वेतन या पुढे १ तारखेला हाेईल, अशी माहिती अामदार किशाेर दराडे यांनी दिली. तसेच १ तारखेला शिक्षकांचे वेतन करण्याबाबत काेणतेही कारण पुढे न करता काम करावे अशा सूचना दाेन्ही शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या. माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात बुधवारी अामदार दराडे यांच्या...
  September 27, 11:08 AM
 • जळगाव- आपण नेहमी तरुण म्हणजे देशाचे भविष्य आहे असेच म्हणतो आणि तरुणांना भविष्यासाठी जगण्याचा सल्ला देत असतो. वास्तविकता ही आहे की तरुणाई देशाचं वर्तमान आहे, त्यांना वर्तमानाची जाणीव करून द्यायला हवी. ती जाणीव झाल्यास त्यांना प्रश्न समजायला लागतील. ते सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतील, असे प्रतिपादन महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी केले. गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे कस्तुरबा सभागृहात बुधवारी नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्पच्या उद्घाटन झाले. या वेळी बोलत होते. व्यासपीठावर...
  September 27, 10:59 AM
 • नंदुरबार- येथील गजबजलेल्या जळका बाजार परिसरात एका घरात पैशांचा पाऊस आणि चांगल्या वधूप्राप्तीसाठी अघोरी पूजा करण्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. विवस्त्र करून पूजा केल्यानंतर बाबाने नरबळी देण्याचा सल्ला तरुणाला दिला होता. मात्र, त्या तरुणाने नरबळीची गोष्ट आपल्या आई-वडिलांच्या कानावर घातल्यामुळे भोंदू बाबाचे बिंग फुटले. या प्रकरणी बाबासह एकास पोलिसांनी अटक केली आहे. सुरूपसिंग नाईक असे या बाबाचे नाव आहे. तरुणाच्या आई-वडिलांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. शहरातील परेश राजेंद्र सोनार...
  September 27, 06:43 AM
 • जळगाव- शहरातील गणेश कॉलनी परिसरात एका खासगी क्लासमध्ये जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा गेल्या १५ दिवसांपासून दोेन टवाळखोर सातत्याने पाठलाग करून छेड काढत होते. अखेर या मुलीने मैत्रीण व कुटंुबीयांच्या मदतीने धाडस करुन मंगळवारी या दोन्ही टवाळखोरांना सापळा रचून पकडले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्यांना चोप देऊन जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश कॉलनी परिसरातच राहणारी व आठवीच्या वर्गात शिकणारी ही...
  September 26, 10:25 AM
 • जळगाव- देशाच्या सामाजिक, विकास आणि प्रगतीत युवाशक्तीचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो. अशा युवावर्गात गांधीयन नेतृत्वगुणांचा विकास व्हावा, या उद्देशाने गांधीतीर्थ येथे २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान नॅशनल गांधीयन लिडरशिप कॅम्पचे अायाेजन करण्यात अाले आहे. महात्मा गांधी आणि कस्तुरबा अर्थात बा-बापू १५० व्या जयंतीवर्षाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन २६ रोजी सकाळी ११ वाजता हाेईल. महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा आयआयटी पवईचे चेअर...
  September 26, 10:18 AM
 • जळगाव- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने उत्तर महाराष्ट्रातून फैजपूर येथून ४ ऑक्टोबरपासून जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण हे तिन्ही माजी मुख्यमंत्री जिल्ह्यात येणार आहेत, अशी माहिती मंगळवारी काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली. जनसंघर्ष यात्रेचा पहिला टप्पा ८ सप्टेंबरला संपून ४ ऑक्टोबरपासून जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला फैजपुरातून सुरुवात होत...
  September 26, 10:11 AM
 • अमळनेर- तालुक्यातील कन्हेरे येथील दोन तरुणांचा फापोरे बुद्रूक येथील नदी काठावरील विहिरीत मंगळवारी दुपारी बुडून मृत्यू झाला. ही विहीर पाणीपुरवठ्याची होती. दुपारी २.३० ते ३ वाजेच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. समाधान जगन्नाथ पाटील (वय ३०) आणि सतीश विश्वास पाटील (वय २४, रा.गंगापुरी, ह. मु. कन्हेरे) अशी दुर्दैवी तरुणांची नावे अाहेत. दोघांचे मृतदेह सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास विहिरीतून बाहेर काढण्यात आले. याबाबत अमळनेर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू...
  September 26, 10:09 AM
 • बीड- माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी केंद्र शासनाला महाराष्ट्रातील जळगाव ते सोलापूर हा लोहमार्ग करण्याचे निर्देशित केले होते. त्यानुसार २०१२ मध्ये सर्वेक्षण पूर्ण झाले होते. आता या मार्गासाठी ९८७ कोटी रुपयांची तरतूद झाली असून चारशे वीस किलोमीटरपैकी १२० किलोमीटरच्या कामास मंजुरी मिळाली आहे. याचबरोबर सोलापूर-जळगाव हा नवीन लोहमार्ग उस्मानाबाद - बीड - जालनामार्गे व्हावा अशी मागणी स्वातंत्र्यसैनिक रेल्वे मागणी आंदोलन समिती बीडच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात...
  September 26, 07:23 AM
 • जळगाव- शहरात पारंपरिक वाद्यांच्या तालात गणरायाला रविवारी निराेप देण्यात अाला. सकाळी १०.३० वाजता निघालेल्या मुख्य मिरवणुकीची सांगता साेमवारी पहाटे साडेपाच वाजता झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शहरातील मेहरूण तलावावर जीवरक्षकांसह सुरक्षेच्या उपाययाेजना व्यापक स्वरुपात करण्यात अाल्या हाेत्या. त्यामुळे येथील विघ्नर्हता गणरायाचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पडले. शहरातील सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत ५४ मंडळे सहभागी झाली. ढाेल-ताशा, लेझिमच्या तालावर गणेशभक्तांनी ठेका धरला....
  September 25, 10:58 AM
 • जळगाव- सद्य:स्थितीत कपाशीचे पीक पात्या, फुले व बोंड अवस्थेत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी झालेल्या कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा ५ ते १० टक्केपर्यंत प्रादुर्भाव फुलामध्ये ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात दिसून आला. शेतकऱ्यांनी नियोजन करून बोंडअळीचा हल्ला परतवून लावला आहे. सद्य:स्थितीत हा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी उपाय करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. फेरोमोन सापळे, डोमकळ्या वेचून नष्ट करणे, निंबोळी अर्काची फवारणी व लक्षणीय प्रादुर्भावाच्या ठिकाणी रासायनिक...
  September 25, 10:55 AM
 • जळगाव - गणपती विसर्जनासाठी गेलेल्या चौघा भाविकांचा जिल्ह्यात रविवारी वेगवेगळ्या घटनेत बुडून मृत्यू झाला. यामध्ये जळगाव शहरातील एक, भडगाव तालुक्यातील वलवाडी, जामनेर आणि वरणगाव फॅक्टरी येथील रहिवासी आहेत. यात तिघे युवक तर एका शाळकरी विद्यार्थ्याचा समावेश आहे. मन्यारखेडा तलावात जळगावच्या युवकाचा पाय घसरला जळगाव : गणपती विसर्जनासाठी मन्यारखेडा तलाव येथे गेलेल्या सुप्रीम कॉलनीतील तरुणाचा तलावात पाय घसरल्याने बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी ४ वाजता ही घटना घडली. दरम्यान, मन्यारखेडा...
  September 25, 10:42 AM
 • जामनेर- बँकेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना जामनेर पोलिसांनी जेरबंद केले. पहूर रोडवरील नेरीजवळील पेट्रोल पंपापासून देवपिंप्री फाट्याकडे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका शेतातून या दरोडेखोरांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस अन्य साहित्य जप्त केले आहे. दरम्यान, त्यांनी जळगाव येथील कारागृहातील कैद्यांकडून प्रशिक्षण घेऊन बँकेवर दरोडा टाकण्याचा कट रचला होता. मात्र, तो पोलिसांनी उधळून लावला. जामनेर तालुक्यातील खादगावच्या जिल्हा...
  September 25, 09:56 AM
 • यावल- यावल-भुसावळ रस्त्यादरम्यान अंजाळे घाटाजवळ प्रवासी घेऊन जात असलेली मिनीडोअर रिक्षा वेग मंदावल्याने अचानक उलट्या दिशेने खाली येत दरीत कोसळली. सुदैवाने रिक्षातील आठ प्रवासी थोडक्यात बचावले. सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. भुसावळ यावल मार्गावर अनेक कालबाह्य झालेल्या वाहनांद्वारे अवैध प्रवासी वाहतूक अद्याप सुरु आहे. यावल पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आहे. पोलिसांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी...
  September 24, 01:01 PM
 • जळगाव -नाशकात फ्लॅट, नांद्र्यात अडीच बिघे शेती घेऊन दिली. मात्र, तरीही सासरवासीयांनी मेहरुण येथील रामेश्वर काॅलनी भागात विवाहितेला विष पाजून मारले. तिने मृत्युपूर्व लिहिलेली चिठ्ठी माेबाइलवरून काैटुंबिक व्हाॅट्सअॅप ग्रुपवर व्हायरल केली हाेती. त्यावरून माहेरवासीयांनी शनिवारी हा अाराेप केला. जळगावात खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलेल्या या विवाहितेच्या नातेवाइकांनी सासरच्या मंडळींना बदडण्याचा प्रयत्न केला. जळगावातील मेहरूण भागात साेनिया कमलाकर पाटील (वय ३२) पती, सासू,...
  September 24, 07:44 AM
 • यावल- भुसावळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे दोन दिवसांत चार अपघात झाले आहेत. या अपघातात चार गंभीर जखमी अपघाताचा सापळा बनत चालला आहे. शुक्रवारी तीन दुचाकींच्या अपघातानंतर शनीवारी (दि.22) खड्डे चुकवतांना दोन ट्रक समोरासमोर धडकल्या. त्यात दोन जण गंभीर जखमी झाले तर या अपघातात यावल- भुसावळ रस्ताच बंद पडला आहे. एसटी व खासगी वाहतुक तब्बल सहा तासांपासून भालोद-बामणोद व बोरावलटाकरखेडामार्गे भुसावळ अशी वळवण्यात आली आहेत. रस्त्याच्या परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या अपघातामुळे नागरीकातून तीव्र...
  September 24, 07:40 AM
 
जाहिरात

RECOMMENDED