जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

Jalgaon News

 • यावल- येथील पोलिस ठाण्यात अनेक पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण आहे. त्यामुळे पोलिस कर्मचारी आणि हजेरी मास्टरमध्ये नेहमी खटके उडतात. याचाच प्रत्यय रविवारी घडलेल्या प्रसंगातून आला. नियमित कामकाजाव्यतिरिक्त कुटुंबाला वेळ देऊ शकेल अशा पद्धतीने माझी ड्युटी लावा, असे सांगण्यासाठी एका हवालदाराने पोलिस ठाण्यात चक्क आपल्या आजारी आईलाच साहेबांसमोर हजर केले. सतत ड्युटी, अतिरिक्त काम करावे लागत असल्याने कुटुंबाला वेळ द्यायचा कधी, असा प्रश्न हवालदाराने पोलिस निरीक्षक...
  February 19, 05:27 PM
 • धुळे- काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांची जाहीर सभा एक मार्चला शहरात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झालेल्या गोशाळेच्या मैदानावरच ही सभा होणार आहे. याच सभेपासून महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रचाराचा शुभारंभ होईल, असे बोलले जात आहे. काँग्रेसतर्फे सोमवारी नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी माजी मंत्री रोहिदास पाटील व माजी मंत्री आदार अमरिश पटेल यांनी राहूल गांधी यांच्या सभेची माहिती दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जाहीर सभांचा धडका सुरू झाला...
  February 18, 06:53 PM
 • नंदूरबार- जम्मू-काश्मीरमधील पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भ्याड हल्ल्याचा ठिकठिकाणी निषेध केला जात आहे. अशातच पेट्रोलचा भडका होऊन एका तरुणाचा चेहरा गंभीररित्या भाजल्याची घटना समोर आली आहे. नंदूरबार जिल्ह्यातील शहादा शहरात सोमवारी (ता.18) सकाळी 11 वाजता दहशवादाचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करताना एक तरुण भाजला. राजी इलियास मेमन (वय-43) असे जखमी तरुणाचे नाव आहे. राजी यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे....
  February 18, 06:35 PM
 • धुळे- महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या बिजासनी देवीच्या मंदिराजवळील घाटात खासगी बसने अचानक पेट घेतला. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली. अपघातग्रस्त बस इंदूरहून पुण्याला जात होती. आग एवढी भीषण होती की, काही क्षणात बस पूर्णपणे जळून खाक झाली. चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. बसला आग लागल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र, या दुर्घटनेत बहुतांश प्रवाशांचा सामान जळून खाक झाला. बसमध्ये 35-40 प्रवासी होते. मिळालेली माहिती...
  February 18, 04:40 PM
 • धुळे- देशाच्या शूर सैनिकांवर बंदूक चालविणाऱे असो की त्यांच्या हातात बंदुका देणारे असोत किंवा बॉम्ब टाकणारे अ्सो की त्यांच्या हातात बॉम्ब देणारे असोत. यातील कोणत्याही दहशतवाद्याला अन् त्यांना आश्रय देणाऱ्यांना सुखाने झोपू देणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळे येथील सभेत दिला. त्याचबरोबर शहीद झालेल्या जवानांच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा व देशवासीयांच्या डोळ्यातील अश्रूंचा बदला घेणार, असा इशाराही मोदी यांनी दिला. धुळे येथे मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाच्या...
  February 16, 06:52 PM
 • यावल- विस्फोटक घेऊन जाणारा ट्रक व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाल्याची घटना, शुक्रवारी रात्री 8 वाजता यावलमधील खडकाई नदीच्या पुलावर घडली. या अपघातात दोन जण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. अपघातामुळे सुमारे तीन तास वाहतूक खोळंबली होती. विस्फोटक पदार्थ घेऊन ट्रक (क्र.जीजे. 03-बी.व्ही.7273) चालक करसनभाई (वय-58, रा. गोंद जि.राजकोट) हा जात होता. तर ऊसाच्या टिपऱ्या घेऊन ट्रॅक्टरचालक अजित सलीम तडवी (वय-19, रा.विरावली) येत होता. पुलावर दोन्ही वाहने एकमेकांच्या जवळून जाताना ट्रॅक्टरला...
  February 16, 03:06 PM
 • यावल- फैजपूर मार्गावर चितोडा गावाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन तीन जण जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले आहे गेल्या दोन दिवसापासून यावल शहरात अपघातांची मालिका सुरू आहे. यावल फैजपुर रस्त्यावर चितोडा गाव आहे या गावाजवळील पुलाजवळ वैभव गोपाळ इंगळे (वय-16) व त्याची आई उज्ज्वला गोपाळ इंगळे (वय-43, दोघे रा.हिंगोणा, ता.यावल) हे...
  February 16, 02:52 PM
 • जळगाव- अवैध सावकाराविरोधात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी उत्राण(ता.एरंडोल) येथील डिगंबर चिंधा मराठे शेतकऱ्याने शुक्रवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाबाहेर स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. या शेतकऱ्याच्या अर्जाची मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेतली. याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश कार्पोरेशन मार्केटिंग अॅण्ड टेक्सटाइल यांना दिले आहे. या स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून बेदखल होत असल्याने शेतकरी मराठे यांनी हे आंदोलन केले. मराठे यांनी अजय शालीग्राम बियाणी या...
  February 15, 06:43 PM
 • बुलडाणा/धुळे- जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 42 जवान शहीद झाले आहेत. त्यात बुलडाणा जिल्हयातील दोन जवानांचा समोवेश आहे. मलकापूर येथील संजय राजपूत तर लोणार तालुक्यातील नितीन शिवाजी राठोड या दोन्ही जवानांनी भारतमातेसाठी बलिदान दिले आहे. मामाच्या गावात पसरली स्मशान शांतता.. शहीद मेजर संजय राजपूत हे मलकापुरातील माता महाकाली नगरातील रहिवाशी आहेत. सात महिन्यापूर्वी भावाचा अपघातात मृत्यू झाला झाला होता. संजय राजपूत हे धुळे जिल्ह्यातील...
  February 15, 02:20 PM
 • रावेर लोकसभेतून नितीन कांडेलकर यांची उमेदवारी जाहीर मुक्ताईनगर- कोणतेही शासन हे कल्याणकारी असायला हवे. आताचे शासन हे नफेखोर असून केवळ लुटण्याचे काम सुरू आहे. ओबीसी आमदारांसाठी स्वतंत्र चळवळ सुरू झाली आहे. महाराष्ट्रात मराठ्यांचे नव्हे, तर अवघ्या 169 कुटुंबाचे राज्य असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. मुक्ताईनगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन सभेत त्यांनी रावेर लोकसभेतून नितीन कांडेलकर (रा.कोऱ्हाळा) यांची...
  February 15, 12:57 PM
 • शहादा- येथील शहादा-प्रकाशा रस्त्यावरील शिरूड चौफुलीजवळ असलेल्या सालदारनगर भागातील सूर्या नमकीन कंपनीला बुधवारी मध्यरात्री सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. या आगीत कंपनीतील मशिनरीसह साहित्य जळाल्याने सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले. येथील शिरूड चौफुलीजवळ सूर्या नमकीन फॅक्टरी आहे. या ठिकाणी कुरकुरे, चिवडा, सुकी भेळ, वेफर्स तयार केले जातात. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्रात या नमकीनची निर्यात होते. या फॅक्टरीत सुमारे दोनशे कामगार काम करतात. नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री ९...
  February 15, 10:39 AM
 • हॅलेंटाइन दिनी जोडपी एकत्र फिरतील, हातात हात घेतात, लग्नाच्या आनाभाका खातात. परंतु कदाचित तुम्हाला माहीत नसावे, मानवच नव्हे सारस, धनेश पक्षीही प्रेम बंधनात अडकतात. आयुष्यभर विरहात राहातात मात्र, नवा जोडीदार शोधत नाहीत... आयुष्यभर विरह... मात्र, शोधत नाहीत नवा जोडीदार.. सारस : एकच जोडीदार, मृत्यूनंतर विरह सारस म्हणजेच क्रोंच हा पक्षी नेहमी नर-मादीच्या जोडीनेच दिसून येतो. जगात सारस पक्ष्यांची सर्वाधिक संख्या भारतात आहे. आपला जोडीदार गमवल्यानंतर एकटा सारस नर किंवा मादी संपूर्ण आयुष्य...
  February 14, 04:08 PM
 • भुसावळ- मुंबईतील जे.जे. हास्पिटलमध्ये फेलोशिप करताना भुसावळातील डॉ.नीलेश पाटील व तामिळनाडूतील पंड्यानाडू विभागातील तुतूकुरीन जिल्ह्यातील कोथाली येथील डॉ.रेणुका पेचीमुथ्थू यांचा प्रेमविवाह झाला. हे दाम्पत्य आता वरणगावातील वासुदेव नेत्रालयातून नेत्र रुग्णांना सेवा देत आहे. तामिळ आणि खान्देशी या संस्कृतीचा मिलाप झाल्याने डॉ. पाटील यांच्या निवासस्थानी मराठी नववर्ष गुढीपाडव्याप्रमाणेच तामिळी सण पोंगलही तेवढ्याच जल्लोषाने साजरा केला जातो. प्रेमाला भाषावादच काय कोणताही अडसर...
  February 14, 03:36 PM
 • धुळे- आमदार झालोच पाहिजे, अशी काही माझी धारणा नाही. पण तुमचा हिशेब चुकता करण्यासाठी जामनेरला यावे लागले तरी हरकत नाही, असे खुले आव्हान आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे. मंत्री गुलाबराव पाटलांनी गादीवरच्या कुस्त्यांसाठी लंगोट घालणारे महाजन तुम्ही आहात या शब्दांत हिणवले. ही कमरेखालची टीका नाही का, असा प्रश्नही गोटे यांनी केला. आमदार अनिल गोटे यांनी मंगळवारी पुन्हा पत्रक काढले. त्यात गोटे यांनी म्हटले आहे की, मोगलांना संताजी-धनाजी दिसायचे. तसे मंत्री...
  February 13, 08:30 AM
 • जळगाव- यवतमाळहून सुरतला ट्रॅव्हल्स घेऊन जाणाऱ्या मद्यधुंद चालकाने समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालकांसह ३ ठार तर १३ जण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी रात्रीच्या दोनच्या सुमारास घडला. दरम्यान, भुसावळ येथे बस थांबली असता चालकाने मद्य प्राशन केले. त्यानंतर तो बेदरकारपणे बस चालवत होता. प्रवाशांनी त्याला दोनदा हटकले. मात्र, त्याने प्रवाशांना दमदाटी करून बस चालवणे सुरू ठेवल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. राजूराम गेनाराम चौधरी (२६, रा. बाडनेर, राजस्थान)...
  February 13, 08:27 AM
 • जळगाव- गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारमध्ये विरोधक आरोप करू शकतील असे एकही काम झाले नाही. विरोधकांकडे बोलायला काहीच नसल्याने रफालवर वायफळ चर्चा केली जात आहे. रफाल खरेदी हा सर्वात पारदर्शी व्यवहार आहे. यात अनिल अंबानींना काम देण्यात आलेले नाही. विरोधकांच्या आरोपातील मुद्दे पाहता राहुल गांधी यांचा बुद्ध्यांक कमी असल्याचा आरोप केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी केला. दरम्यान, काँग्रेस सरकारने निश्चित केलेल्या किमतीपेक्षा आमच्या सरकारने ९ टक्के स्वस्त दराने हे विमान...
  February 11, 08:19 AM
 • जळगाव- जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे महिलेची छेड काढल्यावरून दोन गटात दंगल उसळली. या घटनेमुळे संपूर्ण गावात तणाव पसरला आहे. पोलिसांनी 14 जणांना ताब्यात घेतले आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..
  February 8, 03:27 PM
 • जळगाव- महामार्गावर हेल्मेट न घालणाऱ्यांना दंडात्मक कारवाई करण्यास पोलिसांनी सुरुवात केलेली आहे; परंतु नागरिक स्वत:च्या सुरक्षिततेला प्राधान्य न देता कारवाईपासून पळ काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पत्नीला हेल्मेट न घातल्याप्रकरणी दंड आकारत असल्याने व्यवसायाने शिक्षक असलेल्या पतीने वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातली. तसेच महामार्गावर झोपून आरडाओरड करीत गोंधळ घातला. शहर वाहतूक शाखेचे पुरुष व महिला कर्मचारी गुरुवारी महामार्गावर हेल्मेट न घालणाऱ्या...
  February 8, 12:17 PM
 • जळगाव- ट्रू जेट या विमान कंपनीला जळगाव- अहमदाबाद विमानसेवा देण्यासाठीची परवानगी गेल्या ऑक्टोबर महिन्यात मिळालेली आहे. त्यापाठोपाठ याच कंपनीला आता जळगाव-मुंबई विमान सेवेचेही परवानगी मिळालेली आहे. अहमदाबाद-जळगाव- मुंबई असा ट्रँगल पूर्ण झाल्याने त्याचा अधिक जणांना लाभ होऊन ही सेवा अखंडित राहील, असे जाणकाराना वाटते. दोन रुटची विमानसेवा असल्याने कंपनीतर्फे 70 आसनी जेट विमानाद्वारे ही सेवा पुरवली जाणार आहे. दरम्यान, ही सेवा केव्हा सुरू होईल, याबाबत कंपनीकडून संकेतस्थळावरच अधिकृतपणे जाहीर...
  February 8, 12:05 PM
 • यावल- व्हीप झुगारल्या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवलेल्या यावलमधील नगरसेविका रेखा युवराज चौधरी यांना नगरविकास राज्यमंत्र्यांनी दिलासा देत त्यांचे पद कायम ठेवले आहे. 6 फेब्रुवारीला त्यांनी जिल्हाधिकाऱ्याचा निर्णय रद्द केला. 15 जानेवारी 2018 रोजी यावल पालिकेत विषय समिती सभापती निवडीवेळी महर्षी व्यास शविआचे गटनेते राकेश कोलते यांनी त्यांच्या गटातील नगरसेविका रेखा चौधरी यांना व्हीप काढून बालकल्याण समिती सभापती पदासाठी रुख्माबाई भालेराव यांना सूचक म्हणून स्वाक्षरी दिली...
  February 8, 11:59 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात