Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

Jalgaon News

 • भुसावळ- भुसावळजवळ पुरामुळे रेल्वेपुलाचे नुकसान झाल्यामुळे भुसावळ-इटारसी-भोपाळच्या दिशेने होणारी रेल्वेवाहतूक पुर्णपणे थांबविण्यात आली आहे. ही वाहतूक भुसावळ-नागपूर-इटारसी तसेच वसई रोड-रतलाम मार्गे वळविण्यात आली आहे. तर काही गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. भुसावळजवळ असलेल्या वाघोडा रेल्वेस्थानकाजवळून मंजोबा नदी वाहते. या नदीला अचानक पुर आला. पाण्याचा जोर प्रचंड असल्यामुळे नदीवरील रेल्वेपुलाच्या गर्डरचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काल रात्रीपासून तत्काळ...
  July 29, 12:19 PM
 • जळगाव: धुळे जिल्ह्यातील साक्रीकडे येणा-या एसटी बसला (एमएच 20 डी 9897) गुरुवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारात समोरून येणाया टँकरने धडक दिली. नागपूर- सूरत या महामार्गावरील म्हसदी या गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात 16 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस चालक आणि टँकर चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
  July 28, 06:53 PM
 • नंदुरबार - उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वारंवार उडावाउडवीची उत्तरे देत असल्याने तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. तरुणाला कार्यालयात नाहरकत दाखला मिळत नसल्याने, अधिकारी कार्यालयात बोलवुन आज काम करु, उद्या करु असे आश्वासन देत होते. तरुण दररोज या कार्यालाचे हेलपाटे मारत होता. तरीही अधिकारी त्याच्याकडे लक्ष देत नव्हते त्यामुळे संतप्त झालेल्या या तरुणाने उपप्रादेशिक परीवहन अधिकारी यांच्या कार्यालयाच्या आवारात अंगावर पेट्रोल टाकुन आत्मदहनाचा प्रयत्न केला....
  July 28, 01:14 PM
 • जळगाव - जिल्ह्यातील वाळु लिलावासाठी आता ई-टेंडरींगच्या प्रक्रियेची अंमलबजावणी केली जाणार आहे.जास्तीत जास्त महसूल मिळावा आणि वाळू लिलाव प्रक्रियेत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा, यासाठी शासनाच्या वेबसाईटवर ई-टेंडर टाकण्यात येणार आहे.त्यामुळे देशभरातून वाळुचा ठेका घेण्यासाठी निविदा येण्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांनी वर्तवली आहे. या वाळू गटांच्या ई-टेंडरमुळे वाळू गटाच्या लिलावात मोठय़ा प्रमाणात स्पर्धा होणार आहे.
  July 28, 01:07 PM
 • साक्री - तालुक्यातील शेवाडे येथील शेतकर्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली. शेतकरी चतुर झिपा निकम हे शेतात काम करीत असताना बैलासाठी चारा काढत असताना अचानक त्यांच्या हाताला सापाने चावा घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशावर उपचाराची सोय नसल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले ; परंतु रुग्णालयात दाखल करण्यास उशीर झाल्याने त्याचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा, वृद्ध वडील असा परिवार आहे.
  July 28, 01:04 PM
 • चाळीसगावात - येथील रा.सह. शिक्षण प्र. मंडळ संचलित अंध शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह गणवेशाचे वाटप सदाशिव वैद्य यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्य यांनी दृष्टीहीन मुलांच्या डोक्यावरील शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च करण्याचा संकल्प केला.कार्यक्रमाचे आयोजन करगाव रोड अंधशाळेत करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ. विनायक चव्हाण, सचिव डॉ. नरेश देशमुखही उपस्थित होते. मुख्याध्यापिका प्रभा मिश्र यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
  July 28, 01:01 PM
 • लोहारा,ता.पाचोरा - येथील 33/11 के.व्ही. सबस्टेशनच्या व सोनद नदीवरील पुलाच्या कामास विधान परिषद सदस्य आ.मनीष जैन यांच्या प्रयत्नानेच चालना मिळाली असून यापैकी सोनद नदीवरील पुलाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेत आ.मनीष जैन यांनी पल्रंबीत दोन्ही प्रश्न विचारून सभागृहाचे लक्ष वेधल्याने या कामांना चालना मिळाली आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी नियोजित जागा सबस्टेशनसाठी ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेली जागा वीज वितरण कंपनीस हस्तांतरीत करण्याचे...
  July 28, 12:59 PM
 • मनिला- प्रतिष्ठेच्या रेमन मॅगसेसे पुरस्कारावर तीन वर्षांनी दोन कर्तृत्ववान भारतीय व्यक्तींनी ठसा उमटवला आहे. सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा मिश्रा व उद्योजक हरीश हांडे यांना बुधवारी यंदाचे मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाले.रेमन मॅगसेसे फाऊंडेशनच्या वतीने बुधवारी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदाच्या पुरस्कारांत इंडोनेशियाचे हसनानी जुएन व ट्री मुमपू, कम्बोडियाच्या कौल पन्हा व फिलिपाइन्सच्या अल्टरनेटिव्ह इंडिगेनस डेव्हलपमेंट फाऊंडेशनचा समावेश आहे. 31 ऑगस्ट रोजी मनिला येथे एका...
  July 28, 06:01 AM
 • जळगाव- चालू खरीप हंगामातील कापूस खरेदी करण्याची तयारी कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडियातर्फे (सीसीआय) सुरू झाली आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश या भागांत 29 केंद्रे कापूस खरेदीसाठी कार्यान्वित करण्यात येणार आहेत. राज्यातील जिनिंग प्रेसिंग संस्था अथवा सहकारी खरेदी-विक्री केंद्रांच्या चालकांनी कापूस खरेदीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात संस्थाचालकांकडून 10 आॅगस्टपर्यंत निविदाही मागविण्यात आल्या आहेत.कापूस हंगाम हातात येण्यात अद्याप बराच अवकाश असताना सीसीआयने खरेदीच्या...
  July 28, 12:58 AM
 • नंदुरबार - प्रकल्पग्रस्त अंबाबारी गावात शाळा इमारत नसल्याने जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना उघड्यावर बसून शिकावे लागते. वारंवार मागणी करूनही शिक्षणाची होणारी गैरसोय दूर करण्यात शासन अपयशी ठरले. अखेर आपल्या न्याय हक्कासाठी लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 143 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या दालनात शाळा भरविली. पोलिसांनाही या आंदोलनाची पूर्वसूचना न देण्यात आल्याने त्यांचीही तारांबळ उडाली. दरम्यान लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.तीन...
  July 27, 12:20 PM
 • नंदुरबार - बसचालक अशोक चिंतामण कोळी यांना अपघात प्रकरणी दोषी ठरवत बडतर्फीची नोटीस बजावल्याने शहादा आगारातील चालक, वाहकांनी दुपारी काम बंद आंदोलन केले. अधिकारी, पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन मिटले.आंदोलनामुळे शहादा आगाराचे आर्थिक नुकसान झाले नाही. तासभर फक्त गाड्या उशिराने सोडण्यात आल्या, असा खुलासा शहादा स्थानकप्रमुख संजय कुलकर्णी यांनी केला. 2007 साली शहादा-अहमदाबाद ही गाडी रस्त्यावरून उतरून समोरून येणारे दोन प्रवासी ठार झाले होते. या प्रकरणी चालक अशोक कोळी यांना दोषी ठरवत बडतर्फीची...
  July 27, 12:13 PM
 • जळगाव - जिल्ह्यातील भुसावळ येथील संतोषी माता नागरी सहकारी पतसंस्थेकडून ठेवीदाराची सुमारे अडीच लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष वासुदेव आनंदा इंगळे यांच्यासह संचालकांवर भुसावळ पोलिसांनी गुन्हा केला.याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संतोषी माता पतसंस्थेचे ठेवीदार चित्रदास केशव पाटील (66, रा. भुसावळ) यांनी या पतसंस्थेत दोन लाख 60 हजार रुपयांची मुदत ठेव ठेवली होती. मुदतीनंतर ठेवीची रक्कम तीन लाख 20 हजार रुपये एवढी झाली. यातून ठेवीदार पाटील यांना 53 हजार रुपये...
  July 27, 12:11 PM
 • नंदुरबार - नर्मदा विकास विभागाने प्रकल्प बाधितांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले. सरदार सरोवर प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचे प्रश्न सोडविण्यासाठी पुनर्वसन विभागाबरोबरच नर्मदा विकास विभागाचीही मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी झटकणार्या या विभागाच्या अधिकार्यांना वसाहतीतील लोकांनी घेराव घातला. नर्मदा बचाओ आंदोलनाच्या नेतृत्वाखाली नर्मदा विकास कार्यालयात आंदोलन करण्यात आले. विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला.नर्मदा विकास विभागाला अनेकदा समस्यांचा पाढा वाचून दाखविण्यात...
  July 26, 12:19 PM
 • जळगाव: ठेवीदारांची पै न पै परत करण्यासाठी जळगावात लवकरच राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे विभागीय कार्यालय सुरु करण्यात येईल, अशी घोषणा राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे प्रदेश अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी सोमवारी केली. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन पुणे आणि जळगाव मार्गदर्शन अभिनव संस्थेतर्फे येथील आयएमए सभागृहात पतसंसस्था चालकांचा मेळावा झाला, यात ते बोलत होते. पतसंस्था चळवळीतील अपप्रवृत्तींना शिक्षा ही झालीच पाहिजे. परंतु त्याच बरोबर ज्या थकबाकीदारांमुळे पतसंस्था...
  July 26, 12:18 PM
 • नंदुरबार - शहादा येथील बहुचर्चित गांडूळ खत प्रकल्प गैरव्यवहार प्रकरणी आजी-माजी नगराध्यक्षांसह 25 नगरसेवकांना अपात्र ठरविणारा ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांचा आदेश आज औरंगाबाद खंडपीठाने रद्द ठरविल्याने नगरसेवकांना राजकीय जीवदान मिळाले आहे.जून महिन्यात ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव पी. सी. बेंजामिन यांनी या सर्व 25 नगरसेवकांना पाच वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले होते. त्यामुळे सर्वच नगरसेवकांच्या मानेवर अपात्रतेची टांगती तलवार लटकत होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या...
  July 26, 12:17 PM
 • जळगाव - जळगाव महानगर शिवसेनेतर्फे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 29 ते 31 जुलै 2011 दरम्यान राज्यस्तरीय मराठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेना महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनी दिली.या महोत्सवाचे वैशिष्ट्य असे की यात समूह नृत्य, एकल मराठी नृत्य, आदिवासी पावरा नृत्य, धनगर नृत्य, जोगवा, गोंधळ आणि लावणी नृत्य सादर केले जाणार आहे. महाराष्ट्रात लुप्त होत चाललेली नृत्यकला, लोकसंस्कृती जोपासून ठेवता यावी तसेच मराठी कलावंतांना त्यांची कला सादरीकरणाची संधी मिळावी या हेतूने हा...
  July 26, 12:15 PM
 • जळगाव - देशात मोठय़ा प्रमाणात अन्नधान्याची नासाडी होत आहे. उपलब्ध असलेले धान्य नागरिकांना वाटण्याचे आदेश न्यायालयाने दिले असले, तरी शासनाकडून मात्र आहे ते धान्यही पुरेशा प्रमाणात दिले जात नाही, असा आरोप रेशनिंग दुकानदार फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. कटारिया यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.रेशनिंग दुकानदारांच्या विविध मागण्यांसाठी ऑल महाराष्ट्र फेअर प्राइज शॉप किपर्स व केरोसिन परवानाधारक संघटनांचे फेडरेशन यांच्या कार्यकारिणीची बैठक शनिवारी येथे झाली. या बैठकीनंतर झालेल्या...
  July 26, 12:14 PM
 • नंदुरबार - तळोदा तालुक्यातील शिर्वे आश्रमशाळेत अनेक सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.शिर्वे आर्शमशाळेत पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. या आर्शमशाळेत 457 मुले व 256 मुली शिक्षण घेत आहेत. 713 विद्यार्थी संख्या असलेल्या या आर्शमशाळेत अधीक्षक व महिला अधीक्षकाचे पद रिक्त आहे. वर्ग चारची 19 पैकी सहा पदे रिक्त आहेत, तर वर्ग तीनचे 23 पैकी 13 पदे रिक्त आहेत. या आर्शमशाळेत नऊ शिक्षक रोजंदारीने अध्यापनाचे काम करतात. सध्या प्रभारी मुख्याध्यापक...
  July 26, 12:10 PM
 • धुळे । येथील रोटरी क्लबतर्फे सामाजिक जाणिवेतून उभारलेल्या मदतीचे वाटप कुसुंबा येथील दत्तनगर आदिवासी वस्तीत व सबस्टेशन आदिवासी वस्तीत करण्यात आले. सुदामाकी झोली या योजनेंतर्गत रोटरी पदाधिकार्यांनी गोळा केलेला तांदूळ वाटण्यात आला. या प्रसंगी आमदार शरद पाटील उपस्थित होते. रोटरीचे अध्यक्ष अशोक अग्रवाल, हर्षल देशपांडे, महेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. प्रास्तविक अग्रवाल यांनी केले तर आारप्रदर्शन महेश कुलकर्णी यांनी केले.
  July 26, 12:09 PM
 • जळगाव - जळगावचे माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे यांच्या घरावर एका जमावाने रविवारी सायंकाळी 7 ला दगडफेक करून हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. यात एक तरुण गंभीर जखमी झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, दोन भिन्न जातीच्या गटातील वीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून शहराच्या बळीराम पेठेत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अल्तमश नावाचा तरुण रविवारी सायंकाळी माजी नगराध्यक्ष ढंढोरे यांच्या निवासस्थानासमोरून...
  July 25, 07:23 AM
 
जाहिरात

RECOMMENDED