Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

Jalgaon News

 • धुळे: चाळीसगाव रोड परिसरातील जयशिवशंकर कॉलनीत एका घरातून बीटी कपाशीचे सुमारे दहा लाखाचे बियाणे जप्त करण्यात आले. कृषी विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. कपाशीच्या बियाणाला सर्वत्र वाढती मागणी असून काही जण बियाणांचा साठा करून काळाबाजारात जादा दराने विक्री करीत असल्याचे आढळून आले आहे. कृषी विभागाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई केली असल्याचे कृषी अधिका-यांनी सांगितले. जिल्ह्यातील ही सगळ्यात मोठी कारवाई असल्याचे ही ते म्हणाले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, बियाणे...
  June 8, 08:11 PM
 • भुसावळ: भ्रष्टाचाराविरोधात रामदेव बाबांनी रामलीला मैदानावर सुरु केलेले उपोषण सरकारने मोडून काढले. त्याचा येथील पंतजली योगसमितीतर्फे शहरातून मूकमोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आज (बुधवारी) दिल्लीत एक दिवसीय उपोषण केले. त्याला पाठिंबा म्हणून येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर अण्णांच्या समर्थकांनीही एकदिवसीय उपोषण केले. वाकोदमध्ये मशाल रॅली:जामनेर तालुक्यातील वाकोद येथील पंतजली योगसमितीचे संस्थापक शेषराव देशमुख यांच्या...
  June 8, 06:56 PM
 • जळगाव: जिल्ह्यातील भडगाव येथे रासायनिक खत घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पडकला. जादा दराने विक्री करण्याच्या उद्देशाने हे खत शहराबाहेर नेण्यात येत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ट्रकचालकासह संबंधित कृषी केंद्राच्या मालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळ्या बाजारात जादा दराने विक्री करण्याच्या उद्देशाने रासायनिक खत भरलेला ट्रक शहराबाहेर जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पाचोरा रस्त्यावर सापळा रचून पोलिसांनी हा ट्रक पकडला. युरियाच्या शंभर गोण्या,...
  June 8, 06:05 PM
 • जळगाव: चाळीसगाव येथील रहिवासी आणि पोलीस मुख्यालयातील पोलीस शिपायाने पत्नी आणि पंधरा दिवसांच्या चिमुकल्याला विषारी द्रव्य पाजून स्वत: आत्महत्या केली. ही घटना बुधवारी पहाटे घडली. पुरुषोत्तम प्रभाकर वाघ (38) असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कौटुंबिक वादाचा कंटाळून पुरुषोत्तम वाघ यांनी पत्नी व मुलाला संपवून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
  June 8, 02:29 PM
 • जळगाव- रामदास आठवले यांनी पदाच्या हव्यासापोटी युतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, अशी टीका रिपब्लिकन पक्षाचे राष्टीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी मंगळवारी केली. आठवले सत्ता आणि पदापासून फार काळ दूर राहू शकत नाहीत. युतीसोबत जाण्याची त्यांची भूमिका संशायास्पद असून रिडालोसबरोबर आघाडी करत असताना ते सर्वात पुढे होते. त्यामुळे त्यातून बाहेर पडताना त्यांनी संयुक्त बैठकी घेऊन आपला निर्णय सांगणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. युतीसोबत गेल्यानंतर ते आरपीआयचा उल्लेख भीमशक्ती...
  June 8, 04:30 AM
 • जळगाव-जिल्ह्यात रविवारी आलेल्या चक्रीवादळामुळे केळीबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात सर्वाधिक नुकसान असून, सुमारे एक हजार ३०० हेक्टरवरील केळीबागा नेस्तनाबूत झाल्या आहेत. वादळाने जिल्ह्यातील केळीपिकाचे पंधरा कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. २५ मे रोजी पाल परिसराला (ता. रावेर) वादळचा तडाखा बसला होता. त्यानंतर रविवारी सायंकाळी चक्रीवादळ आले आणि त्यात रावेर तालुक्यातील चौदा गावांमधील २३५ तर मुक्ताईनगर तालुक्यातील तेरा गावांतील ५०० हेक्टरवरील...
  June 8, 04:24 AM
 • जळगाव: रामदास आठवले यांची युतीसोबत जाण्याची भूमिकाच मुळात संशयास्पद असून ते पदासाठी इकडून तिकडे गरबडणारे आहेत. त्यांच्यात पदाची लालसा आहे, अशी टीका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी मंगळवारी जळगावी केली. आठवले हे सत्ता आणि पदापासून फार काळ दूर राहू शकत नाही, असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले. रिडालोसबरोबर आघाडी करण्याचा त्यांचा आग्रह होता. परंतु त्यातून बाहेर पडताना त्यांनी कोणतीही संयुक्त बैठक घेऊन त्यांचा निर्णय जाहीर केला नाही. त्यामुळे युतीसोबत...
  June 7, 06:57 PM
 • जळगाव: रामदास आठवले यांची युतीसोबत जाण्याची भूमिकाच मुळात संशयास्पद असून ते पदासाठी इकडून तिकडे गरबडणारे आहेत. त्यांच्यात पदाची लालसा आहे, अशी टीका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी मंगळवारी जळगावी केली. आठवले हे सत्ता आणि पदापासून फार काळ दूर राहू शकत नाही, असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले. रिडालोसबरोबर आघाडी करण्याचा त्यांचा आग्रह होता. परंतु त्यातून बाहेर पडताना त्यांनी कोणतीही संयुक्त बैठक घेऊन त्यांचा निर्णय जाहीर केला नाही. त्यामुळे युतीसोबत...
  June 7, 06:56 PM
 • जळगाव: जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात रविवारी मुसळधार पाऊस झाला असून वीज पडून दोन जण ठार झाले आहेत. त्यात एका महिलेचा समावेश आहे. जिल्हातील मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्नाड येथे वीज पडून महिलेचा मृत्यु झाला. तर नंदुरबार जिल्हातील शहादा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. झाडावर वीज पडल्याने झाडे उन्मळून पडले. या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला.
  June 5, 11:37 PM
 • ग्रामीण भागातील पाणीपट्टी वाढीच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. जळगाव तालुक्यातील असोदा गावच्या सरदार वल्लभभाई पटेल मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेवेळी घोषणाबाजी करत निदर्शने केली.जिल्हापरिषदेने 16 मार्चला पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत कोणाचीही तमा न बाळगता, व्यापारी दृष्टिकोन ठेवून सामूहिक योजनांमध्ये समाविष्ट असलेल्या गावांची पाणीपट्टी वाढविण्याचा ठराव मांडला.ग्रामीणभागांमध्ये आधीच पाणी योजना जीर्ण व कालबाह्य...
  June 5, 06:41 PM
 • अमळनेर: येथील रेल्वे स्टेशन परिसरातील एका नामवंत खासगी कोचिंग क्लासेच्या शिक्षकानेच आपल्या विद्यार्थिनीला पळविले असल्याची घटना उघडकीस आली आहे. याच परिसरातील 20 वर्षीय तरुणीस भूलथापा देऊन या शिक्षकाने पळवून नेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या पूर्वीही या शिक्षकाने दोन मुलींना असेच पळवून नेले होते. परंतु तत्कालीन डीवायएसपी खालीद यांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटविण्यात आले होते.
  June 3, 05:57 PM
 • चाळीसगाव: येथून जवळच असलेल्या पाटणादेवी जंगलात एक बिबट्याचा मृतदेह आढळून आला असून त्याचा चारपैकी तीन पायांचे पंजे गायब आहेत. यावरुन परिसरात बिबट्याच्या नखांची तस्करी सुरु असल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. मात्र वनविभागाचे अधिकार्यांनी या गोष्टीचा इन्कार केला आहे. बिबट्याच्या नखासाठी त्याची शिकार झाली असावी, असा संशय परिसरातील नागरीकांकडून व्यक्त केला जात आहे.
  June 3, 10:50 AM
 • जळगावः जळगाव महानगरपालिकेच्या १९ कर्मचार्यांना सेवानिवृत्तनिमित्त मंगळवारी (ता. ३१ मे) एका छोटेखानी कार्यक्र्रमात निरोप देण्यात आला. गोकुळ पवार(आयुक्त स्वीय सहा.), यशवंत ठाकरे (उपलेखपाल), भिकचंद भुतडा(परिवहन अधीक्षक), अशोक सोनवणे (जकात निरीक्षक), अरुण जराड (नाकेदार), अशोक भावसार (चौकीदार), दामू सपकाळे (चौकीदार), लियाकत अली अजगर अली (क्लोरीन ऑपेरॅटर), सुरेश कुरकुरे (वायरमन), हसन अली कासमअली (वाहनचालक), हिरालाल यादव (वाहनचालक), परशुराम जोशी, (शिपाई), रमेश बनकर (मजूर), रामदास झुंझारवार(वाहनचालक), प्रकाश...
  June 1, 01:39 PM
 • जळगाव - निवडणुकांच्या तोंडावर सामान्य माणसांकडे मत मागायला जाता, तसेच निवडून आल्यानंतरही सामान्य माणसाच्या दारी जाऊन त्यांना सरकारच्या योजना समजावून द्या, असा आदेश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिला आहे.जळगावचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या मुलाच्या शाही विवाहासाठी ते जळगाव येथे आले असता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यर्कत्यांशी संवाद साधला. या सभेत निवेदने आणि तक्रारींचा पाऊस पडला. सामान्य कार्यकर्ता हा नेहमीच समाधानी असतो. पण जसजसा तो वरवर...
  May 27, 10:57 PM
 • जळगाव - गेल्या 14 महिन्यापासून जळगाव महापालिकेअंतर्गत स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी लागू झाला आहे. मात्र एलबीटी प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थापन झालेल्या समन्वय समितीचा मनपाला विसर पडला असून स्थापनेपासून एकही बैठक झाली नसल्याची माहिती महाराष्ट्र व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी यांनी दिली. व्यापारी एकता दिवसानिमित्त आयोजित या पत्रकार परिषदेला श्री. टावरी यांच्यासह व्यापार उद्योग आघाडीचे अध्यक्ष दिलीप गांधी, दाणा बाजार व्यापारी असोसिएशनचे प्रवीण पगारीया, गोलाणी...
  May 27, 09:58 PM
 • जळगाव - आगामी काळात होणार्या भुसावळ नगरपालिकेच्या निवडणूकीत प्रभाग रचनेत सत्ताधार्यांकडून दबावतंत्राचा वापर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून या संदर्भात भुसावळच्या भाजप व सेनेच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन देवून निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. भुसावळच्या नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 2001 मध्ये भुसावळ न.पा.निवडणूक प्रभाग पध्दतीने झाली होती. त्यात निवडणूक आयोगाचे नियम धाब्यावर बसवून सोयीनुसार बेकायदेशीर...
  May 27, 09:53 PM
 • जळगाव - जळगावच्या मेहरूण तलावात एका महिलेने आपल्या दीड आणि पाच वर्षांच्या मुलांसह उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी महिलेला आणि तिच्या पाच वर्षांच्या मुलीला वाचवण्यात लोकांना यश आले. मात्र या महिलेच्या दीड वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. या आत्महत्येच्या प्रयत्नामागील कारण समजू शकले नाही. मेहरूण तलाव परिसरातील संचार नगर भागात राहणाऱ्या कविता लोंधे ही विवाहित महिलेने आपल्या चेतन (दीड वर्ष) आणि लाजरी (५) या मुलांसह तलावात उडी घेतली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी हे...
  May 27, 09:41 PM
 • जळगाव - एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे मंगळवारी जादा भावाने बियाणांची विक्री केल्याप्रकरणी बुधवारी दुपारी पोलिसांनी प्रवीण हार्डवेअर ऍण्ड जनरल स्टोअर्सकडे तपासणी केली. या छाप्यात १० लाख ६७ हजार रुपयांचा बियाणांचा साठा सापडला. नाशिक विभाग भरारी पथक आणि कृषी उपसंचालक, जळगाव यांनी संयुक्तरित्या मंगळवारी धाड टाकून कासोदा येथे पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. अधिक तपासासाठी बुधवारी दुपारी पोलिसांनी धाड घातली असता ५८ खोक्यांत दडवलेला १० लाख ६७ हजार रुपये किमतीचा बियाणांचा साठा आढळला. हा...
  May 27, 09:32 PM
 • जळगाव - धुळे ते अमरावती या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला दीड वर्षात सुरुवात होईल , असी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी दिली . बांधकाम आणि पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते बोलत होते.
  May 24, 05:32 PM
 • जळगाव - पक्षात कार्यकर्ता चांगला असतो; परंतु वरच्या स्तरावरील नेत्यांमध्येच बिघाड असतो. पदावरून ते असंतुष्ट असतात. याचे परिणाम मात्र निवडणुकीवर होतात. गोष्ट कुठपर्यंत ताणायची, याचा त्यांनी विचार केला पाहिजे. योग्य पद्धतीने हे वाद मिटविण्यात येतील. पक्षाच्या बळकटीसाठी त्यांनी कार्य करण्याची गरज आहे. हा इशारा त्यांच्यापर्यंत निश्चितच जाईल, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले.येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पक्षाच्या आकाशवाणी चौकातील...
  May 24, 05:25 PM
 
जाहिरात

RECOMMENDED