Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon

Jalgaon News

 • जळगाव- नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाल्यापासून १७ वर्षांच्या खंडानंतर प्रथमच भाजपने सत्ता स्थापन केली. चाैदाव्या महापाैरपदी सीमा भाेळे, तर उपमहापाैरपदी डाॅ. अश्विन साेनवणेंची निवड झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी निवडीची घाेेषणा करताना पालिकेच्या अावारात फटाक्यांची अातषबाजी, गुलालाची उधळण करण्यात अाली. सभागृहातही वंदे मातरम्च्या घाेषणा देण्यात अाल्या. नवनिर्वाचित महापाैर, उपमहापाैर व अन्य पदाधिकारी मनपाचे वाहन वापरणार नाहीत, अशी माहिती निवडीनंतर अामदार सुरेश भाेळे यांनी दिली....
  September 19, 10:53 AM
 • जळगाव- नगरपालिका असताना लाेकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजयानंतर भाजपने तब्बल १७ वर्षांनंतर पुन्हा महापालिकेत पुनरागमन करत सत्ता स्थापन केली आहे. महापाैरपदी सीमा सुरेश भाेळे तर उपमहापाैरपदी डाॅ.अश्विन साेनवणे हे विजयी झाले. त्यांना प्रत्येकी ५६ मते पडली. शिवसेनेने निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यामुळे ही निवड एकतर्फीच झाली. तर एमअायएमने तटस्थ भूमिका घेतली. महापालिकेची चाैथी सार्वत्रिक निवडणूक अाॅगस्ट महिन्यात पार पडली. सन २०१३मध्ये विजयी नगरसेवकांचा कार्यकाळ १९...
  September 19, 10:13 AM
 • जळगाव महापौरपदाच्या निवडणुकीत चमत्कार घडेल आणि महापौर शिवसेनेचाच होईल. भाजपचे अनेक नाराज नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत, असा दावा करत शिवसेनेच्या गटनेत्यांसह काही पदाधिकाऱ्यांनी भाजप नेत्यांना घाम फोडण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे त्यांनी हा दावा पत्रकार परिषद घेऊन केला. भाजपचे आमदार सुरेश भोळे, पक्षाचे महानगराध्यक्ष आहेत. त्यांच्या नगरसेवक पत्नीलाच महापौरपदाची उमेदवारी दिल्यामुळे ही नाराजी उफाळून आली आहे, असा शोधही सेनेच्याच नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी लावला. त्यामुळेच...
  September 19, 09:15 AM
 • जळगाव- नगरपालिका असताना लाेकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजयानंतर भाजपने तब्बल १८ वर्षांनंतर पुन्हा महापालिकेत सत्ता स्थापन केली. महापाैरपदी सीमा सुरेश भाेळे तर उपमहापाैरपदी डाॅ.अश्विन साेनवणे विजयी झाले. शिवसेनेने निवडणुकीवर बहिष्कार टाकला तर एमअायएमने तटस्थ भूमिका घेतली. सीमा या भाजपचे जळगावातील अामदार सुरेश भाेळे यांच्या पत्नी अाहेत. यापूर्वी जिल्ह्यातील जामनेर नगरपालिकेवरही भाजपने एकहाती वर्चस्व मिळवले हाेते, तिथेही थेट मंत्री गिरीश महाजनांच्या पत्नी साधना...
  September 19, 07:31 AM
 • जळगाव- नगरसेवक अनंत जाेशींविरुद्ध गुन्हा दाखल हाेऊन त्यांच्या अटकेनंतर शिवसेना अाक्रमक झाली अाहे. महापाैर निवडणुकीत चमत्कार घडणार असल्याने राज्यातील सत्तेचा वापर करून खाेटा गुन्हा दाखल केला अाहे. शहरात हुकूमशाही पर्वाला सुरुवात झाल्याचा गंभीर अाराेप करत महापाैर निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याची घाेषणा महानगरप्रमुख शरद तायडे व माजी उपमहापाैर सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत केली. महापालिकेच्या तेराव्या महापाैर व उपमहापाैरपदासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता विशेष सभा हाेत...
  September 18, 11:34 AM
 • जळगाव- जिल्हा, पोलिस, महसूल अशा सर्वच प्रशासनाच्या अंगात आता मंत्री गिरीश महाजनांचे भूत संचारले अाहे. ते सांगतील तशाच पद्धतीने अधिकारी बदल्यांची प्रक्रिया राबवतात. परंतु, पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात कोणत्याच मंत्र्याचे चालणार नाही. तेथे फक्त शिवसेनेच्याच पद्धतीने कामे चालतील, अशा शब्दात आमदार किशोर पाटील यांनी सोमवारी एसपी कार्यालयाच्या अावारात ठिय्या मांडून संताप व्यक्त केला. पिंपळगाव (हरे) पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना बेकायदेशीरपणे कार्यकाळ...
  September 18, 11:27 AM
 • जळगाव- राष्ट्रीय बांबू अभियानांतर्गत ग्रामीण भागात बांबू शेतीला प्रोत्साहन मिळून खासगी जमिनीवर बांबू लागवड वाढावी, यासाठी जळगाव येथे १ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, नॅशनल बांबू मिशन कार्यकारी समितीचे अध्यक्ष एम. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बांबू शेती कार्यशाळा आयोजित करण्यात आली अाहे, अशी माहिती जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी दिली. बांबू शेती कार्यशाळेच्या पूर्वतयारीकरिता येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात नॅशनल बांबू मिशन...
  September 18, 11:22 AM
 • पाचोरा (जळगाव) - भुसावळजवळ असलेल्या पाचोरा रेल्वे स्टेशन येथे हुबळी एक्सप्रेसला (ट्रेन नं. 17324) जनावरांनी धडक दिल्याने इंजिनमागील एक डब्बा रूळावरून घसरला. आज (सोमवारी) संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान ही घडना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही व्यक्ती जखमी झाली नाही. मात्र रेल्वेची धडक बसल्याने काही जनावरे जागीच ठार झाले. पुढील स्लाइडवर पाहा, अधिक फोटो...
  September 17, 07:47 PM
 • नंदुरबार- अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी अमळनेरहून नंदुरबारकडे येत असताना वावद गावाजवळ त्यांच्या भोजुरी पजेरो स्पोर्ट या गाडीचा अपघात झाला. ट्रकने हुलकावणी दिल्यामुळे त्यांची गाडी रोडच्या खाली खोल खड्ड्यात कोसळली. या अपघातात आमदार शिरीष चौधरी यांच्यासह तीन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नंदुरबार येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार चौधरी धुळे-नंदुरबार मार्गाने नंदुरबार येथे येत असताना नंदुरबार शहरापासून पाच किलोमीटरवर असलेल्या वावाद गावाजवळ हा अपघात झाला. अपघाताची...
  September 17, 06:48 PM
 • यावल (जळगाव)- नालासोपारा स्फोटके प्रकरणी साकळी येथुन ताब्यात घेण्यात आलेल्या वासुदेव भगवान सूर्यवंशी व विजय उर्फ भैय्या उखर्डु लोधी यांना २५ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या ९ दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत आज (सोमवारी) संपल्यामुळे त्यांना मुंबई न्यायालयात हजर करण्यात आले होते. नालासोपारा स्फोटके प्रकरणी महाराष्ट्र एटीएसने वैभव राऊतसह शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर व अविनाश पवार यांना अटक केली आहे. तर ६ सप्टेंबररोजी एटीएसने साकळी येथून...
  September 17, 06:47 PM
 • जळगाव - शहरातील गजबजलेल्या इस्लामपुरा भागात एका तीन मजली इमारतीला रविवारी रात्री ८ वाजता अाग लागली. यात लाखाेंची प्लास्टिकची खेळणी, ज्वेलरी, कटलरीचे साहित्य जळून खाक झाले. परिसरातील शेकडाे तरुणांनी एकत्र येऊन अग्निशमन विभाग व पाेलिसांच्या मदतीने शेजारच्या इमारतीवर चढून अडीच तासांत अर्थात १०.३० वाजेपर्यंत पाणी मारून ही अाग अाटाेक्यात अाणली. शाॅर्टसर्किटने ही अाग लागल्याचा प्राथमिक अंदाज अाहे. हनीफ शाह मस्तान शाह (रा.सालारनगर) यांच्या मालकीची ही इमारत आहे. इमारतीच्या पहिल्या...
  September 17, 10:56 AM
 • भडगाव (जळगाव) - मोदींच्या राज्यात शेतकरी जीव देत अाहे. शेतकऱ्यांचे-गरिबांचे कर्ज माफ होत नाही. मात्र, धनाढ्यांचे मोठ्या बँकेतील कर्ज सरकार माफ करते. धनाढ्यांकडून कर्जाची वसुली होत नाही, दुसरीकडे शेतकऱ्याला वारंवार नोटिसा दिल्या जातात, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. पेट्रोल-डिझेलचे रोज सातत्याने वाढत चाललेले दर म्हणजे विद्यमान राज्यकर्त्यांनी केलेला विक्रमच आहे, अशा शब्दांत पवार यांनी टीका केली. रविवारी येथे आयोजित...
  September 17, 07:31 AM
 • रावेर - कॉँग्रेसच्या काळात दणका मारताच कामे व्हायची. आता आपलेच सरकार असूनही कामे होत नाहीत. रस्ते खराब झाले असून जनता आमच्याकडे विचारणा करते. सरकार काही करत नसेल तर आता आपण श्रमदानाने कामे करू. यासाठी मी हाती घमेले घेतो. हरिभाऊ आपण फावडे घ्यावे. आपण श्रमदान करून रस्ते सुधारू, अशा मार्मिक शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राज्यातील भाजप सरकारला घरचा आहेर दिला. शनिवारी तालुक्यातील रमजीपूर येथे पाल-केऱ्हाळे व विवरे-वाघोदा गटातील बूथ समिती सदस्य, बूथ प्रमुख, शक्ती...
  September 16, 08:43 AM
 • जळगाव - हिमालयातील अतिदुर्गम भागातील समाजकार्यासाठी नुकताच रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळालेले लडाखी अभियंता तथा प्रख्यात संशाेधक साेनम वांगचुक यांच्या हिमस्तूपच्या संकल्पनेला जळगावातून पाठबळ मिळाले अाहे. चीन अाणि नेपाळच्या सीमेवर ९ हजार फूट उंचीवर वसलेल्या लेह-लडाखमध्ये तांत्रिक अडचणींनी निराश हाेऊन काम थांबवलेल्या वांगचुक यांना जळगावातून अाशेचा किरण दिसला. या अनाेख्या प्रयाेगासाठी उणे ४० तापमानात टिकू शकतील असे काेट्यवधी रुपयांचे क्विक कनेक्ट एचडीपीई पाइप अाणि स्पिंक्लरचे...
  September 16, 06:02 AM
 • पिंपळनेर- शेलबारी घाटाजवळ शनिवारी 2 वाजून 15 मिनिटांला राज्य परिवहन मंडळाची साक्री-नाशिक बस व ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघातात 29 प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यापैकी 10 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना ग्रामीण रुग्णालय येथे तर गंभीर जखमींना धुळे येथील शासकिय रुग्णालय हलविण्यात आले आहे. पिंपळनेर पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक पंजाबराव राठोड घटनास्थळी दाखल झाले व एसटी महामंडळाचे साक्री आगार व्यवस्थापक देखील दाखल झाले. मिळालेली माहिती अशी की,...
  September 15, 08:08 PM
 • जळगाव- पुण्याच्या राजगुरुनगरातून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जळगावच्या रामेश्वर काॅलनीतील एक कुटुंब जात हाेते. नाराणगावजवळ रस्त्यावर अाडव्या लावलेल्या सिमेंटच्या ब्लाॅकवर त्यांची चारचाकी अादळली. यात काकू अाणि पुतण्या जागीच ठार झाले. ही दुर्घटना गुरुवारी मध्यरात्री २ वाजता घडली. अपघातानंतर ही चारचाकी तीन वेळा कलंडुन रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पडली. संध्या दिलीप पाटील (वय ४५, रामेश्वर काॅलनी, जळगाव) राजेंद्र उर्फ मुन्ना प्रकाश पाटील (वय ३३, मूळ रहिवासी रामेश्वर कॉलनी,...
  September 15, 11:31 AM
 • जळगाव- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार १६ सप्टेंबर राेजी जिल्हा दाैऱ्यावर येणार अाहेत. सकाळी ९ वाजता खासगी विमानाने जळगावच्या दाैऱ्यावर येत असलेल्या खासदार पवार यांच्या उपस्थितीत जळगाव, नेरी, पाचाेरा अाणि भडगाव या ठिकाणी कार्यक्रम अाहेत. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता ते विमानाने परत जाणार अाहेत. रविवारी सकाळी ९ वाजता जळगाव विमानतळावर अागमन झाल्यानंतर खासदार शरद पवार हे एमअायडीसीमध्ये रमेश पाटील यांच्या क्वाॅलिटी अॅग्राे इंडस्ट्रीजचे उद्घाटन करतील. त्यानंतर नेरी येथे सकाळी...
  September 15, 11:00 AM
 • जळगाव- शुक्रवारचा दिवस खान्देशवासीयांसाठी अपघात वार ठरला. मुंबई- आग्रा महामार्गावर शहापूरजवळ पहाटे झालेल्या भीषण अपघातात धुळ्याच्या नगरसेवकासह तीन व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला. तर, पुण्याहून शिर्डी येथे साईदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचे वाहन मध्यरात्री नारायणगावनजीक सिमेंट ब्लॉकवर आदळले. यात जळगावचे काकू आणि पुतण्या असे दोन ठार झाले. तसेच लासगाव-सामनेर रस्त्यावर सायंकाळी रिक्षा- दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार झाले. तर दहा जण जखमी झाले. ते पाचोरा तालुक्यातील रहिवासी आहेत....
  September 15, 09:19 AM
 • धुळे- मुंबई-आग्रा महामार्गावरील शहापूरजवळ धुळे शहरातील व्यापाऱ्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात काँग्रेसचे नगरसेवक तसेच व्यावसायिक कुमार डियालानी यांच्यासह तीन जण ठार झाले, तर इतर दोघांची प्रकृती गंभीर आहे. दुचाकीस्वारास वाचवण्याच्या नादात हा अपघात झाला. त्यांची कार दोन-तीन वेळा कलंडून दरीत कोसळली. कुमारनगरमधील भाजीपाला मार्केटपासून जवळ असलेल्या नरोत्तम निवास येथून शुक्रवारी सकाळी नगरसेवक कुमार डियालानी, ललितकुमार मनोहरलाल भारद्वाज ऊर्फ लखू महाराज, राजकुमार...
  September 15, 07:03 AM
 • भुसावळ- बोदवडला हरितालिकेच्या उपवासादरम्यान उलटी होऊन तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बुधवारी रात्री अकरा वाजता घडली. राजश्री संजय महाजन (२०) असे मृत तरुणीचे नाव आहे. राजश्री ही बोदवड येथे शारदा कॉलनीमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत वास्तव्यास होती. बुधवारी हरितालिकेचा उपवास होता. राजश्री हिनेदेखील हा उपवास केला. मात्र, सायंकाळी तिला अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे वडिलांनी तिला खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, त्यानंतरही तिची प्रकृ़ती अधिक बिघडली. उपचारादरम्यान...
  September 14, 06:19 PM
 
जाहिरात

RECOMMENDED