Home >> Maharashtra >> Kokan

Kokan

  • जळगाव - चिमुकल्याच्या सतर्कतेमुळे घरफोडी करून पळणाऱ्या चोरट्यास रातोरात पकडण्यात आैद्योगिक वसाहत पोलिसांना यश आल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. मोहाडी रस्त्यालगत एक बंद घर फोडून चांदीचे शिक्के, रोख रक्कम,गॅस हंडीसह दोन चोरट्यांनी चारचाकीमधून पोबारा केला होता. परंतु या दोघांनाही चोरी करताना समोरच्या अपार्टमेंटमधील एका लहान मुलाने खिडकीतून पाहिले होते. त्याने आई-वडिलांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यांनी पोलिसांना पाचारण केल्यानंतर या धाडसी मुलाने चोरट्यांचे वर्णन कथन केेले....
    April 21, 09:40 AM
  • कल्याण- राज्यातील अनेक शहरात आजकाल युवा नेते, दादा, भाई, यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी किंवा सण उत्सवा यात्रेनिमित्त मोठमोठे डिजीटल फलक उभारले जातात. या निमित्ताने शहरात बॅनर लावण्याची जणू स्पर्धाच सुरू होते. मग अशा या पोस्टरबाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण होते. या पोस्टरबाजीला आणि बॅनरला कंटाळलेल्या शहरातील नागरिकांनी आज अनोखे पोस्टर उभारून बॅनरबाजांना जरा हटकेच संदेश दिला. कल्याणच्या पूर्वेकडील नेतवली नाका परिसरात चक्क एका मॅक्सभाई नावाच्या कुत्र्याला वाढदिवसाच्या...
    April 17, 08:29 PM
  • कल्याण- शहागड भागात लोकल ट्रेनमधून एक युवक नाल्यात पडला पण तो बुडत असताना बघ्यांनी त्याला वाचवण्याएेवजी त्याचे व्हिडिओ शूट करण्यातच धन्यता मानली. यामुळे पुन्हा एकदा लोकांच्या असंवेदनशीलतेचा प्रत्यय आला. प्रकार सोमवारी सकाळी 11.30 वाजता घडला. कल्याणच्या शहाड भागात एका नाल्याशेजारी स्थानिकांची अचानक गर्दी झाली. काय झालं हे पाहण्यासाठी अनेक जण आपापल्या गाड्या थांबवून नाल्याशेजारी धावले. यावेळी नाल्यात एक युवक बुडत असल्याचं लोकांना दिसलं. पण त्याला वाचवण्यासाठी कुणीही पुढे गेले नाही...
    April 17, 07:23 PM
  • ठाणे -प्रियकरासोबत शय्यासोबत करण्यासाठी घेतलेल्या सेक्स पॉवरच्या इंजेक्शनमुळे त्याच्या प्रेयसीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील लॉजमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत 29 वर्षीय महिला ही मुंब्रा परिसरातील अमृतनगर येथे राहणारी आहे. तिला दोन मुलेही आहेत. महिला 8 एप्रिल आपल्या प्रियकरासोबत अशोका लॉज येथे आली होती. प्रियकरासोबत ती रुममध्ये गेली. तिने सेक्स पॉवर वाढवणारे इंजेक्शन घेतले होते मात्र अचानक तिची प्रकृती बिघडली. त्यावेळी तिच्यासोबत असलेला प्रियकर तिला त्याच अवस्थेत...
    April 10, 06:54 PM
  • औरंगाबाद/ठाणे- ठाणे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर यांचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. औरंगाबादेत काँग्रेसचा इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष सोहळा आटोपून मुंबईकडे निघालेल्या नेत्यांच्या फॉर्च्युनर एसयूव्ही कारला औरंगाबाद-पुणे हायवेवर रविवारी (13 ऑगस्ट) सायंकाळी सहाच्या सुमारास गंगापूर तालुक्यातील भेंडाळा फाट्यानजीक भीषण अपघात झाला होता. या अपघातात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव संजय लक्ष्मीकांत चौपाने (60) हे जागीच ठार झाले होते. तसेच ठाणे...
    August 16, 05:00 AM
  • मुंबई/ठाणे- मुंबईत पावसाला परत सुरूवात झाली असून अनेक सखल भागात पाणी साचले आहे.संततधार पावसाने मोडकसागर धरण भरले आहे.धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आल्याने वैतरणा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यात मात्र मुसळधार पाऊस सुरू असल्याने टिटवाळा-रुंदे गावातील काळू नदीला पूर आला आहे आणि यामुळे कल्याण-टिटवाळा शहराशी १५ गावाचा संपर्क तुटला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, आंबिवली,...
    July 15, 02:50 PM
  • मुंबई/सिंधुदुर्ग- कणकवलीजवळ ओरोस येथे रेल्वे रूळावर माती आल्याने ठप्प झालेली रेल्वेची वाहतूक सुरू झाली आहे.कोकणात सध्या दमदार पाऊस होत आहे. या पावसाचा कोकण रेल्वेमार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. येत्या 24 तासात कोकण, गोव्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुसळधार पावसाचा अंदाज दरवर्षी पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर माती येण्याच्या आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतात.गेले काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने आज कोकणासह राज्यभरात ठिकठिकाणी जोरदार हजेरी...
    July 14, 03:52 PM
  • ठाणे: शेजारी राहणाऱ्या विवाहित महिलेवर शस्त्राच्या धाकावर बलात्कार करणाऱ्या दोन तरुणांना जिल्हा सत्र न्यायालयाने २० वर्षे सश्रम तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. विकास आव्हाड (२१) आणि गोपीचंद तिलोरे (२०) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी २४ वर्षीय महिलेने तक्रार दिली होती. गेल्या वर्षी मे महिन्यात महिला घरी एकटी होती. ही संधी साधून दोघांनी तिच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर शस्त्राचा धाक दाखवून दोघांनी तिच्यावर अत्याचार केले. याबाबत कुणालाही काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली....
    May 20, 01:08 AM
  • सिंधुदुर्ग - जिल्ह्यात एकही पशुवैद्यकीय दवाखान्याला आय.एस.ओ प्रमाणपत्र मिळाले नाही. शासकीय योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत. जिल्ह्यात पशुसंवर्धनचे काम समाधानकारक नसून याबाबत महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हा बोगस आहे. अशी नाराजी राज्याचे पशु, दुग्ध व मत्स्य व्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केली. 8 दिवसांत सुधारणा करा वैभववाडी दौऱ्यावर आले असता त्यांनी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट देऊन कार्याचा आढावा घेतला. यावेळी बोलताना त्यांनी कामगिरीवर...
    May 19, 06:31 PM
  • मुंबई -राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रामुख्याने कोरडवाहू कडधान्यांचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या आहेत. आपल्या शेतमालाला बाजारपेठ मिळत नसल्याने शेतकरी वैफल्यग्रस्त झाला आहे. त्यामुळे भाजीपाला प्रमाणेच कडधान्य नियमनमुक्त करण्याची गरज आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवणार असे पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले आहे. या कार्यक्रमात नाम फाउंडेशनतर्फे अभिनेते मकरंद अनासपुरे यांनीही उपस्थिती लावली. कडधान्य विक्रीला कायद्याने बंदी असून ती रद्द...
    May 1, 08:35 PM
  • वैभववाडी (सिंधूदुर्ग) - उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विनापरवाना बॅनर लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यामध्ये तीन वर्षे कैद किंवा दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते. यापुढे निर्णयाची काटेकोरपणे अमंलबजावणी केली जाणार आहे. वैभववाडी पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांनी स्थानिक राजकीय पक्षांच्या पाधिकाऱ्यांची बैठक बोलावून ह्या सूचना दिल्या आहेत. राजकीय पक्ष, पोलिसांची बैठक उच्च न्यायालयाच्या बॅनर विषयक निर्णयाची माहिती देण्यासाठी पोलीस निरीक्षक साळुंखे यांनी...
    May 1, 03:04 PM
  • ठाणे -मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपदरम्यान जोरदार चुरस असली तरीही शेजारच्या ठाण्यात मात्र शिवसेना सहज स्वबळावर सत्तेत येईल अशी चिन्हे आहेत. या महापालिकेत दुसऱ्या क्रमांकासाठी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात लढत असेल. राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करूनही काँग्रेसला मात्र फारसा फायदा होण्याची चिन्हे नाहीत. मनसे तर निव्वळ अौपचारिकता म्हणून निवडणुकीच्या मैदानात असल्याने ठाण्यात पुन्हा शिवसेेनेचाच अावाज घुमेल, असे चित्र अाहे. घराणेशाही आणि...
    February 15, 03:00 AM
  • ठाणे -चौदावर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाविरोधात ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अन्वर खल्पे असे शिक्षकाचे नाव आहे. अन्वर हा एका खासगी शाळेत कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी अन्वरने मुलीला शिक्षा म्हणून बाकावर उभे केले होते. वर्ग सुटल्यानंतर त्याने तिचा विनयभंग केला. घरी आल्यानंतर मुलीने झालेल्या प्रकाराबाबत आपल्या पालकांना माहिती दिली. त्यानुसार पालकांनी त्याच्याविरोधात तक्रार दिली. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच अन्वर हा फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत....
    January 22, 03:13 AM
  • मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवायची की युतीने याबाबत शिवसेना- भाजपमधील संभ्रम अजून दूर झालेला नाही. दाेन्ही पक्षातील कार्यकर्ते स्वबळाचा नारा देत अाहेत, तर पक्षनेतृत्व मात्र अजूनही युतीबाबत अाशावादी दिसते. ठाणे - नोटाबंदीच्या निर्णयानंतरही राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भरघोस यश मिळाल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास भलताच उंचावला आहे. यामुळे आगामी जिल्हा परिषद व महानगरपालिकांच्या निवडणुकाही स्वबळावरच लढवाव्यात, असा नारा...
    January 13, 03:10 AM
  • ठाणे - एका ४५ वर्षीय मोलकरणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ठाणे येथे बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी उल्हास मोरे, गणेश मोरे, निकुंज रावल आणि दीपक शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोलकरणीने पाेलिसांत तक्रार दिली आहे. पीडित महिला ही घरकाम करून उदरनिर्वाह करते. काही दिवसांपूर्वी चौघांनी आपल्यावर अत्याचार केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी एकाला अटक केली असून तिघे फरार झाले आहेत.
    December 29, 03:40 AM
  • ठाणे | प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या महिला लिपिकास शुक्रवारी उरणच्या विशेष भूसंपादन कार्यालयातून अटक करण्यात आली. १९८८ मध्ये नवी मुंबईत सिडकोच्या निर्मितीवेळी तक्रारदाराची जमीन भूसंपादनात गेली होती. त्यासंबंधी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळावे म्हणून तक्रारदाराने २ डिसेंबर २०१६ रोजी भूसंपादन कार्यालयात अर्ज केला. येथील महिला लिपिकाने प्रमाणपत्राच्या बदल्यात २४ हजार रुपयांची मागणी केली. २३ हजारांत तडजोड करून संबंधिताने लाचलुचपत विभागाकडे...
    December 17, 06:11 AM
  • पालघर - मंत्रालयापासून फक्त १०७ किलोमीटर अंतरावरच्या विक्रमगड तालुक्यातील दादडे गावातील ही अरविंद स्मृती संस्थेची अनुदानित आश्रमशाळा. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी १९९१ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अरविंद पेंडसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तीन अाश्रमशाळा सुरू केल्या. दाेन वाड्यांमध्ये अाणि एक विक्रमगडमध्ये. विक्रमगड तालुक्यातील दादरे गावातील या अाश्रमशाळेत तब्बल १३५० विद्यार्थी पहिली ते बारावीपर्यंतचे...
    December 12, 03:00 AM
  • रायगड - किल्ले रायगडावरील मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातील अर्धी तलवार गायब झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुरातन वास्तू संरक्षण अधिनियमांतर्गत अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पुरातन वास्तू संग्रहालय विभागाकडून रोज गडावर पाहणी केली जाते. शनिवारी सकाळी पाहणीदरम्यानच त्यांना शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील तलवार तुटलेल्या स्थितीत आढळून आली. या घटनेची माहिती कळताच कोल्हापूरच्या शिवाजी चौकात शनिवारी रात्री समर्थकांनी...
    December 12, 03:00 AM
  • रत्नागिरी- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा पुतण्या संदीप तडकरे यांनी आज अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. सुनील तटकरे यांचे बंधू अनिल यांचा तो मुलगा आहे. संदीपच्या शिवसेना प्रवेशाने तटकरे कुटुंबातील अंतर्गत नाराजी समोर आली आहे. शिवसेना भवनात झालल्या छोटेखाली समारंभात संदीप तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री अनंत गिते, आदेश बांदेकर, आमदार भरत गोगावले आदी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी घडाळ्याचा काटा अडकला, भगवा झेंडा फडकला...
    November 6, 05:52 PM
  • ठाणे -ठाण्यात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती मूकमोर्चाला प्रचंड प्रतिसाद लाभला. सुमारे ५ लाख मराठा बांधव मोर्चात सहभागी झाले होते. यात लहान मुले, वृद्ध, महिला व तरुणींचा सहभाग लक्षणीय होता. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यात मराठा समाजाची संख्या कमी असल्याने हा मोर्चा राज्याच्या इतर जिल्ह्यांसारखा विराट हाेणार नाही, असे वाटत होते. पण रायगड, पालघर, मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधून मराठा समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्याने ठाणे शहर अक्षरशः: भगवे झाले. ठाणे...
    October 17, 02:35 AM
 
जाहिरात

RECOMMENDED