Home >> Maharashtra >> Kokan

Kokan

 • रत्नागिरी - मुंबई- गोवा मार्गावर या महिन्यात अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी असतानाही जड वाहनांची वाहतूक होत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सर्वांना सुट्ट्या असून, मार्गावर लहान वाहनांची गर्दी असते. त्यामुळे कंटेनर, ट्रेलर्स यांची वाहतूक मे महिन्यात थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यांचे सर्रास उल्लंघन होत असून गेल्या आठवड्यात मार्गावर झालेल्या विविध अपघातांमध्ये १० जणांना जीव गमावावा...
  May 20, 05:18 PM
 • रत्नागिरी - रत्नागिरीतील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण कार्यालयातर्फे मच्छीमार तरुणांना एक जुलैपासून मत्स्यव्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.या प्रशिक्षणासाठी कार्यालयातर्फे अर्ज मागविण्यात आले आहेत. या प्रशिक्षणात तरुणांना नौकानयनाची तत्त्वे, मासेमारी अवजारांचा वापर व मरीन डिझेल इंजिनची देखभाल व निगा याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणासाठी त्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या आत असावे. अर्ज करताना जन्मतारखेच्या दाखल्यासह शैक्षणिक पात्रतेच्या दाखल्याची झेरॉक्स...
  May 20, 05:16 PM
 • रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नीलेश राणे यांच्या खासदार निधीतून चिपळूण तालुक्यात 70 लाखांची कामे करण्यात आली आहेत. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जीवन रेळेकर यांनी खासदार निधीतून कामे होत नसल्याचा कार्यकर्त्यांचा झालेला गैरसमज आम्ही कामे करून दूर केल्याचे म्हटले आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचारविनिमय करण्यासाठी येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात बोलविण्यात आलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी "खासदार कामे करीत नाहीत', अशी...
  May 20, 05:13 PM
 • रत्नागिरी - उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कोकणात येणाऱ्या नागरिकांमध्ये वाढ झाल्याने कोकण रेल्वे हाऊसफुल्ल झाली आहे. मुंबईहून कोकणात येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व गाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. गर्दीमुळे आरक्षित डब्यांमध्ये घुसखोरी वाढत असून, प्रवाशांना त्रास होत आहे. याबाबत तक्रार करण्यात आली असली तरी प्रवाशांच्या गर्दीपुढे रेल्वे कर्मचारीही हतबल झाले आहेत. सिंधुदुर्गात जाणाऱ्या कोकणकन्या, मांडवी, जनशताब्दी, दिवा पॅसेंजर, दादर-सावंतवाडी या गाड्यांमध्ये पाय ठेवण्यासही...
  May 20, 04:01 PM
 • रत्नागिरी - भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्याच्या उच्च शिक्षणासंदर्भात विविध योजना आखण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत कोकणात तीन मॉडेल महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत.राज्यभरात अशी एकूण सात महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत. कोकणात उभारण्यात येणाऱ्या तीन मॉडेल महाविदयालयांपैकी दोन महाविद्यालये मुंबई विद्यापीठाअंतर्गत असणार आहेत. उच्च शिक्षणाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्य सरकार...
  May 20, 03:59 PM
 
जाहिरात

RECOMMENDED