जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan

Kokan

 • रायगड महाराष्ट्राची अस्मिता आणि जगातील थोर राजांपैकी एक असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला होता. याच ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यामुळे या किल्लाला अन्यन साधारण महत्त्व आहे. हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. गडावर पोहोचायला जवळ-जवळ १४००-१४५० पाय-या आहेत. पण, हा किल्ला कोणी बांधला ? त्याचा इतिहास काय ? हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक कराच... रायगडाचा इतिहास...
  July 15, 12:49 PM
 • ठाणे - दांपत्याच्या जेवणात गुंगीचे औषध टाकून २५ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी ठाण्याच्या स्थानिक न्यायालयाने स्वयंपाक्यास तीन वर्षांचा कारावास ठोठावला आहे. सुब्रतो सन्याल असे आरोपीचे नाव असून तो मूळ कोलकात्याचा आहे. सत्यकाम राऊत यांच्या आईवडिलांसाठी स्वयंपाक करण्यासाठी सुब्रतोला ठेवण्यात आले होते. मात्र, ३० एप्रिल आणि १ मे २०१३ च्या रात्री त्याने राऊत दांपत्याच्या जेवणात गुंगीचे औषध टाकले आणि दागिन्यांसह २५ लाख १४ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या औषधीमुळे राऊत यांच्या...
  July 8, 02:00 AM
 • मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. गेल्या काही वर्षात कोकणात मनसेची झालेली दयनिय परिस्थिती पाहाता राज यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरूवात केली आहे. राज यांच्या या दौऱ्यातून ते कोकणातील पक्षाची बांधणी मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. या दरम्यान आज राज ठाकरे यांनी मुंबई- गोवा महामार्गावरील चिपळूण इथल्या सवतसडा धबधब्याचा आनंद घेतला आणि धबधब्याची मनसोक्त छायाचित्रेही घेतली. तसेच राज यांनी बुरोंडी (दापोली) येथील भगवान परशुरामांच्या ४० फुटी भव्य...
  June 24, 03:33 PM
 • रायगड - सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला झालेल्या अपघातात स्फोट होऊन दोन जण जखमी झाले आहेत. मुंबईगोवा महामार्गावरील पेण-हमरापूर फाट्यावर रविवारी पाहाटे सहाच्या दरम्यान दोन ट्रक एकमेकांना धडकून अपघात झाला. यातील एक ट्रक एलपीजी सिलिंडरने भरलेला होता. दोन्ही ट्रकची टक्कर एवढी भीषण होती की त्यामुळे सिलिंडरचा स्फोट होऊन घटनास्थळी आगीचे लोळ उठत होते. सकाळी दहा वाजता दरम्यान आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र अजूनही मार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. अपघात झाल्यानंतर सिलिंडरचे...
  May 24, 11:24 AM
 • मुंबई - शेतकऱ्यांच्या फायद्यासह देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे पीक म्हणजे फळांचा राजा आंबा. आता हा आंबाही चांगलाच हायटेक आणि स्मार्ट झाला आहे. म्हणून तर, आंबा बाजारपेठेसह ऑनलाईन आणि व्हॉट्सअॅपवरही दिसत आहे. विशेष म्हणजे आंबा पिकवणारे शेतकरी हे हायटेक फंडे वापरत आहेत. अनेक स्वप्न मनाशी बाळगून कोकणातील शेतकरी मोठ्या आशेने आपला आंबा मुंबईतील बाजारपेठेत विक्रिसाठी आणतो. मात्र, या आंबा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा अडथळा ठरताता ते घाऊक बाजारपेठेतील दलाल. कोकणातील आंबा...
  May 10, 07:19 PM
 • ठाणे - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी भिवंडी न्यायालयात हजेरी लावली. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राहुल यांना न्यायालयात उपस्थित राहण्यापासून सूट दिली होती. तरीही राहुल सकाळी ११ वाजता हजर झाले. न्यायालयासमोर उपस्थित राहीन असे वचन मी दिले होते, ते पूर्ण करण्यासाठीच मी हजर झालो, असे त्यांनी सांगितले. न्यायालयाचा आदर करतो : राहुल गांधी...
  May 9, 03:22 AM
 • मुंबई- आठ दिवसापूर्वीच लग्न झालेल्या आणि माहेरी परीक्षा देण्यासाठी आलेल्या नवविवाहितेची दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी चाकूने भोकसून हत्या केल्याची खळबळजनक घटना ठाण्यातील जुना पासपोर्ट ऑफिस परिसरात घडली. भररस्त्यात बुधवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेत नवविवाहितेचा जागीच मृत्यू झाला तर हल्लेखोर फरार झाले आहेत. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. प्रियंका प्रमोद खराडे (24) असे या मृत तरूणीचे नाव आहे. प्रियंका ठाण्यातील किसननगरमध्ये राहते....
  May 7, 02:18 PM
 • रत्नागिरी- टोयोटा इटिऑस ही आलिशान कार आणि ट्रक एकमेकांवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात मुंबई-गोवा महामार्गावर तिघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दीड वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये यावर अनेक भीषण अपघात झाले आहेत. त्यात अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. हा महामार्ग अपघात प्रवण असल्याने त्यात सुधारणा करण्याची मागणी नागरिकांकडून वेळोवेळी केली जात आहे. मुंबई-गोवा महामार्गावर आज झालेल्या अपघातात मुंबईतील...
  April 29, 01:42 PM
 • मुंबई- पक्षाचा आदेश डावलत पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे ठाणे महानगरपालिकेतील मनसेच्या तीन नगरसेवकांची हकालपट्टी करण्यात आली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीच ही कारवाई केली आहे. ठाणे महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती सुधाकर चव्हाण, नगरसेविका तेजस्विनी चव्हाण व राजश्री सुनिल नाईक अशी तीन नगरसेवकांची नावे आहेत. या तिघांना पक्षातून निलंबित केल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस शिरीष सावंत यांनी दिली आहे.
  March 31, 04:08 PM
 • ठाणे - आपल्या मुलीवर आरोपींनी दुस-यांदा बलात्कार करू नये म्हणून आईने आपल्या १३ वर्षांच्या मुलीचे मुंडन केल्याची घटना ठाण्यात घडली. काही दिवसांपूर्वी घडलेली ही घटना शुक्रवारी उजेडात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळवा भागात राहणा-या अल्पवयीन मुलीवर सहा महिन्यांपूर्वी बलात्कार झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी मोहम्मद लियाकत आणि रोहित या दोन युवकांना अटक केली होती. काही दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी या मुलीच्या कुटुंबियांना मारहाण केली. केस परत घेतली नाही तर...
  March 21, 04:49 AM
 • ठाणे - मुस्लिम यूथ फोरम तर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानांचे शत्रू होते का? या परिसंवादाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुरोगामी महाराष्ट्रात पुरोगामी विचार मांडायचे की नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. मुस्लिम यूथ फोरमच्या वतीने शनिवारी (21 फेब्रुवारी) ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादाचा विषय छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानांचे शत्रू होते का? हा आहे. मात्र, ठाणे पोलिसांनी...
  February 20, 06:03 PM
 • फू बाई फू फेम मराठी हास्य कलाकार आणि चित्रपट अभिनेत्री सुप्रिया पाठारेला कैद करुन तिच्याकडून एका निर्मात्याने बंदुकीचा धाक दाखवून तीन महिने अभिनय करुन घेतला होता. हा खळबळजनक खुलासा स्वतः सुप्रियाने एका कार्यक्रमात केला आहे. निर्मात्याने कैद करुन ठेवल्यानंतर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मध्यस्थीमुळे सुटका झाल्याचे तिने सांगितले आहे. ठाण्यात आयोजित महिला सुरक्षा परिसंवादात सुप्रिया पाठारे हिने हा खळबळजनक आरोप केला आहे. मात्र, कोणत्या निर्मात्याने तिला डांबून...
  January 6, 02:16 PM
 • ठाणे - पाच कोटींचा हुंडा मागणा-या वरासह त्याच्या आई-वडिलांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली. साहिल जोगळेकर, राजेंद्र जोगळेकर आणि पल्लवी जोगळेकर अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अंबरनाथ येथील बांधकाम व्यावसायिक विजय पनवेलकर यांनी तक्रार दिली आहे. पनवेलकर यांच्या मुलीचा विवाह मुंबईतील साहिल जोगळेकर याच्याशी ठरला होता. या दाेघांचेही आधी प्रेम हाेते. दाेन्हीकडील मंडळींनी त्यांना संमती देऊन २३ ऑगस्ट रोजी साखरपुडाही पार पडला. १६ डिसेंबर रोजी तारीख काढली हाेती. मात्र, त्यापूर्वी ७ डिसेंबर...
  December 19, 05:28 AM
 • ठाणे- लोकलची धडक बसल्याने एका ट्रॅकमनचा जागीच मृत्यु झाल्याची घटना सोमवारी घडली. ही घटना ठाणे ते मुलुंड स्टेशन दरम्यान दुपारी दीड वाजेदरम्यान घडली. महादेव स्वामी असे मृत ट्रॅकमनचे नाव आहे. रेल्वे कर्मचार्याचा मृत्यु झाल्यानंतर संतप्त झालेल्या कर्मचार्यांनी रेल रोको आंदोलन केले. कर्मचार्यांनी तब्बल दोन तास रेल्वे गाड्या रोखून ठेवल्या. यामुळे ठाण्याहून मुंबईकडे तसेच कल्याणकडे जाणार्या गाड्या रोखून धरल्याने काहीकाळ वाहतुकीचा ठप्प झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे आणि मुलुंड...
  December 15, 08:29 PM
 • (फोटो: वैज्ञानिक खेळणी कार्यशाळेत सहभागी झालेले स्वामी विवेकानंद प्राथमिक आणि माध्यमिक आदिवासी शाळेचे विद्यार्थी) ठाणे- मित्रयू फाउंडेशनतर्फे शहापूर तालुक्यातील चिंध्याची वाडी येथील स्वामी विवेकानंद आदिवासी माध्यमिक आश्रमशाळेत नुकतीच वैज्ञानिक खेळणी याविषयावर कार्यशाळा घेण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. मित्रयू फाउंडेशनने मराठी विज्ञान परिषदेचे वैज्ञानिक अभय यावलकर यांनी इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांकडून या कार्यशाळेत विविध...
  December 13, 08:15 PM
 • नाशिक/रत्नागिरी- नाशिकसह धुळे जिल्ह्याला दुसर्या दिवशीही गारपिटीचा तडाखा बसला आहे. त्यामुळे उरली सुरली पिके गमवण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. डाळिंब आणि द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे, कोकणात अवकाळी पावसाने झोडपले आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकर्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे. नाशिकमधील चांदवड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. पुणे आणि औरंगाबादलाही पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील निफाड, सिन्नर, मालेगाव,...
  December 12, 07:32 PM
 • सिंधुदुर्ग - महाराष्ट्राच्या एका टोकावर सिधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील मठ बोवलेकरवाडी हे गाव सध्या भगवान बोवलेकर या युवकाच्या जिद्दीमुळे चर्चेत आहे. ही जिद्द आहे विश्वविक्रम स्थापन करण्याची. बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे शेतीत काम करतच काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास भगवान याने वीस वर्षांपूर्वी घेतला आणि आज तो या विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे. अपार कष्ट करत या युवकाने शेतीत तूर, वांगी आणि मिरचीच्या रोपांवर सेंद्रिय खत पुरवून सतत वेगवेगळे प्रयोग केले. या...
  December 7, 05:19 AM
 • छायाचित्र - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या पार्थिवावर बुधवारी रायगड जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी आंबेत येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच पक्षांतील नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. अलिबाग - माजी केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या पार्थिवावर रायगड जिल्ह्यातील आंबेत या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
  December 4, 03:31 AM
 • ठाणे- लग्नाचे आमिष दाखवून एका सतरा वर्षीय मुलीवर तरुणाने बलात्कार केल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली आहे. विकी रमेश भोईन (२२) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी ही पडघा जिल्ह्यातील चिखनगर भागात राहत होती. काही महिन्यांपूर्वी मुलीची विकीशी मैत्री झाली. या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. त्यानंतर त्याने लग्नाचे आमिष दाखवून गेल्या दहा महिन्यांत अनेकदा तिच्यावर बलात्कार केला. मुलीने सतत लग्नासाठी विचारणा करूनही त्याने तिला नकार दिल्याने अखेर पीडित मुलीने पोलिस ठाण्यात विकीविरोधात तक्रार...
  November 24, 12:56 PM
 • अमरावती - शिराळायेथे विषबाधा झालेल्या शेतकऱ्याला डॉक्टर्सच्या गैरहजेरीमुळे वेळीच उपचार मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करून सोमवारी गावकऱ्यांनी मृतदेह आरोग्य केंद्रात ठेवून ठिय्या दिला. सुरेश शंकरराव समरीत (४५ रा. शिराळा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. समरीत यांना रविवारी सायंकाळी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर, तत्काळ उपचारांची आवश्यकता होती. मात्र, त्यावेळी आरोग्य केंद्रात डॉक्टर हजर नव्हते. गावकऱ्यांनी संबंधित डॉक्टरांना फोन करून घटनेची...
  November 11, 04:52 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात