Home >> Maharashtra >> Kokan

Kokan

 • मुंबई- शिवसेनेचे नगरसेवक संजय मोरे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी बाजी मारली आहे. आज सकाळी झालेल्या निवडणुकीत मोरे यांनी काँग्रेसचे उमेदवार विक्रांत चव्हाण यांचा 20 मतांनी पराभव केला.उपमहापौरपदीही शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र साप्ते यांची निवड झाली आहे. मनसे या निवडणुकीत तटस्थ राहिली. मोरे यांना 66 मते मिळाली तर चव्हाण यांना 46 मते मिळाली. दरम्यान, पक्षाचा व्हिप झुगारून काँग्रेसच्या एका महिला नगरसेविकेने शिवसेनेच्या मोरेंना मतदान केले. याचबरोबर मागील महिन्यात आघाडीतून फुटून...
  September 10, 01:59 PM
 • मुंबई- कोकणातील वीर आणि करंजाडी रेल्वेस्थानकांदरम्यान रविवारी सकाळी साडेसहा वाजता मालगाडीचे सात डबे घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही वाहतूक पूर्ववत करण्यास किमान सात तास लागणार असून गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या प्रवाशांचे हाल होत आहेत. अपघात झाल्यानंतर कोकणकडे येणाऱ्या व जाणाऱ्या सर्वच गाड्या विध रेल्वेस्थानकांमध्ये अडकून पडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. मार्ग मोकळा करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वाहतूक पूर्ववत...
  August 25, 01:23 AM
 • रत्नागिरी - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि सिंधुदूर्गचे माजी खासदार निलेश राणे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मतदारसंघातून काँग्रेसने तिकीट दिले तर त्यांच्याकडून अन्यथा अपक्ष लढण्याची तयारी असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. हा मतदारसंघ आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसकडे असून राज्याचे मंत्री भास्कर जाधव येथून आमदार आहेत. निलेश राणे येथून उभे राहिले तर,...
  August 16, 07:24 PM
 • (छायाचित्र:पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑगस्ट रोजी उरण येथील जेएनपीटीला भेट देणार आहेत.) पुणे- उरणमधील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टसाठी (जेएनपीटी) जमीन देणा-या शेतक-यांना त्यांच्या जमिनीचा साडेबारा टक्के परतावा लवकरच देण्याचे केंद्र सरकारने मान्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑगस्ट रोजी जेएनपीटीला भेट देणार असून त्यापूर्वी शेतक-यांचा साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे, अशी माहिती मावळचे खासदार श्रीरंग...
  August 7, 04:57 PM
 • नवी मुंबई - तीन वेळचा भारत श्री किताब विजेता शरीरसौष्ठवपटू व पनवेलचा नायब तहसीलदार सुहास खामकरला 50 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. कदम नावाच्या एका व्यक्तीच्या सातबारा उतार्यावर नाव लावण्यासाठी खामकरने एक लाख रुपयांची लाच मागितली होती. शेवटी 50 हजारांत तडजोड करत कदम यांनी त्याची थेट लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली आणि खामकर अडकला. पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या... कोण आहे सुहास खामकर
  August 5, 04:04 AM
 • मुंबई: शरीरसौष्ठवाती भारतश्री (2011) सन्मानाने सन्मानित सुहास खामकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यंदा त्या चर्चेचा सूर त्याच्या शरीरसौष्ठव स्पर्धेतील अथवा त्याच्या पिळदार शरीराबद्दल नाही तर, लाचखोरीचा आहे. सुहासला रायगड लाचलूचपत प्रतिबंधक खात्याने 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. सुहासला बॉडीबिल्डींग क्षेत्रातील कामगिरीबद्दल सरकारी नोकरी देण्यात आली होती. सुहासने सातबार्यासाठी 50 हजाराची लाच मागितल्याची तक्रार लाचलूचपत प्रतिबंध खात्याला मिळाली होती. त्यानुसार लाचलूचपत...
  August 4, 06:56 PM
 • वांगणी - येथे घराची भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण जखमी आहेत. संततधार पावसामुळे भिंत कोसळी असल्याचे सांगितले जात आहे. नागपुरे कम्पाउंड येथे ही दुर्घटना झाली. यात शांताबाई सोनवणे (62) आणि मालसा हतागडे (25) यांचा मृत्यू झाला आहे. दोन वर्षांच्या मुलीसह तीन जण जखमी आहेत. त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करत आहेत. कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे भिंत कोसळली. आज (सोमवार) सकाळपासून मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे....
  August 4, 11:30 AM
 • ठाणे- ठाण्यातील ओवला गावात राजेंद्र ओवलेकर यांनी दोन एकरवर सुंदर बगिचा फुलवला आहे. यात बच्चे कंपनी बागडतेच, पण त्यासोबत विविध रंगी फुलपाखरे हक्काने विहार करायला येतात. पेशाने फिजिकल ट्रेनर असलेले राजेंद्र ओवलेकर यांना फुलपाखरे खूप आवडतात. त्यामुळे त्यांनी ठाण्यातील घोडबंदर रोडवर फुलपाखरांसाठी एक सुंदर बगिचाच तयार केला आहे. 130 फुलपाखरांच्या जाती : ओवलेकर यांनी फुलवलेल्या या बगिचात विविधरंगी आणि जातीच्या फुलपाखरांच्या जाती आढळतात. ऋतुबदलानुसार वर्षभरात जवळपास 130 फुलपाखरांच्या जाती...
  July 27, 09:54 AM
 • ठाणे- माजी मंत्री मोहन पाटील यांचे दीर्घ आजाराने ठाण्यात गुरुवारी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 68 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा आमदार धैर्यशील पाटील असा परिवार आहे. कोकणातील पेण या मतदारसंघातून ते सलग पाच वेळा आमदार राहिले होते. सध्या या मतदारसंघात त्यांचे पुत्र धैर्यशील आमदार आहेत. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्रिपदावर होते. त्यांच्या निधनामुळे अनेक राजकीय व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे.
  July 25, 01:31 AM
 • कणकवली/सावंतवाडी- सोमवारी उद्योगमंत्रिपदाचा राजीनामा देऊ, अशी घोषणा केलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरुद्ध पुन्हा जोरदार आघाडी उघडली आहे. काँग्रेसने चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका लढवल्यास निकाल हा लोकसभेतील पराभवापेक्षा वेगळा नसेल. या कारणांमुळेच आपण सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा देत आहोत. मात्र काँग्रेसमध्ये कायम राहू, असे राणे रविवारी कणकवलीत म्हणाले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सोमवारी सकाळी 10 वाजता...
  July 21, 05:30 AM
 • रत्नागिरी - स्वाभिमान संघ़टनेच्या कार्यकर्त्यांच्या गाडीला मुंबई- गोवा महामार्गावर उक्षीजवळ अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातामध्ये स्वाभिमान संघटनेचे प्रदेश संघटक सुभाष पाटील आणि अश्विन पाटील मृत्यू झाला आहे. हे कार्यकर्ते नारायण राणेंची कणकवलीतील सभा आटपून मुंबईकडे परत जात असताना कंटेनरची फॉरक्युनर गाडीला धकड बसुन हा अपघात झाला. फ़ोटो - संग्रहित छायाचित्र
  July 20, 09:28 PM
 • करमाळाः कणकवलीतील कार्यकर्ता मेळाव्यात नारायण राणेंनी केलेल्या टिकेला उत्तर देत उद्धव ठाकरे यांनी राणेंना राजकारणात किंमत नाही, त्यांना काय करायचे करू द्या, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका अशा शब्दात सोलापूरच्या करमाळा मेळाव्यात तोफ डागली आहे. दरम्यान केसरकरांनीही राणेंनी केलेल्या टिकेविरोधात पाच कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले आहे. काँग्रेसमध्ये एकाकी पडत चाललेले पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी सोमवारी मंत्री पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा...
  July 20, 08:17 PM
 • रत्नागिरी - बाळासाहेब ठाकरे यांचा आयुष्यात सर्वाधिक छळ कोणी केला असेल तर तो त्यांचा मुलगा उद्धव यांनीच, असा आरोप उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी केला. शिवसेनेला आता नेतृत्वच उरले नसून लोकसभा निवडणुकीत त्यांचे जे 17 खासदार निवडून आले ती सर्व मोदींचीच कृपा होती, असे सांगतानाच यापुढे माझ्यावर टीका केल्यास उद्धव यांचे पुरते वस्त्रहरण करीन, असा इशाराही राणेंनी दिला. शुक्रवारी रत्नागिरीत पत्रकरांशी बोलताना आपण पुढील भूमिका सोमवारीच स्पष्ट करू असे सांगत नवा पक्ष स्थापण्याची...
  July 19, 08:06 AM
 • सिंधुदूर्ग - लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी - सिधुदूर्ग मतदारसंघातून मुलगा निलेशच्या पराभवानंतर राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या राजकीय स्थानालाच धक्का बसला आहे. या पराभवामुळे राणेंचे समर्थकही हळू-हळू त्यांची साथ सोडून जाताना दिसत आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत कलहाला वैतागून राणेंचे जुने कार्यकर्ते पुन्हा शिवसेनेकडे जाण्याच्या तयारीत आहेत. यामुळे सिंधुदूर्ग मधील राणेंचा दबदबा कमी होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसमध्ये राणे एकटे पडल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातही...
  July 15, 03:20 PM
 • ठाणे- भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसारणी देशाला घातक आहे. त्यांच्याच विचारसारणीने राष्ट्रपिता महात्मा गांधींने मारले, या खळबळजनक वक्तव्यावरून भिवंडी कोर्टानेकॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना शुक्रवारी नोटीस बजावली. भिवंडी येथील एका प्रचारसभेत राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) वादग्रस्त टिप्पणी केली होती. याप्रकरणी राहुल यांना सात ऑक्टोबरला कोर्टात हजर राहण्याचेही आदेश देण्यात आले आहे. नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत...
  July 12, 11:35 AM
 • रायगड /मुरुड- येथील समुद्रात सहा पर्यटक बुडाले आहेत. दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उर्वरित चार जणांचा शोध सुरु आहे. मुरुड समुद्र किनार्यावर पर्यटनासाठी आलेले सहाजण पोहण्यासाठी गेले होते. त्यांना लाटांचा अंदाज आला नसल्याने ते सुमुद्रात ओढले गेले. सहा जण समुद्रात बुडाल्यानंतर प्रशासनाने स्थानिकांच्या मदतीने त्यांचा शोध सुरु केला आहे. दोन मृतदेह हाती लागले असून चार जणांचा शोध सुरु आहे. स्थानिक प्रशासनाकडून पर्यटकांना समुद्रात जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. असे, असतानाही...
  July 6, 04:07 PM
 • मुंबई - प्राथमिक शाळा शिकला की कोकणचा मुलगा मुंबईत कामास येतो. त्यामुळे कोकणात गुरुजीपासून डॉक्टरपर्यंत सर्व घाटावरले नोकरशहा असतात. कोकणाच्या या शैक्षणिक मागासलेपणाबाबत नेहमीच ओरड होते. कोकणची शैक्षणिक परवड आता थांबवण्याची चिन्हे आहेत. कारण, तळकोकणात म्हणजे सावंतवाडीमध्ये एक खासगी विद्यापीठ स्थापन होत आहे. राज्यात खासगी विद्यापीठ स्थापन करण्याबाबत राज्य विधिमंडळाने कायदा संमत केल्यानंतर शासनाकडे एकूण 14 प्रस्ताव आले आहेत. त्यातील चार विद्यापीठांच्या सर्व मंजुरी मार्गी...
  July 4, 04:02 AM
 • मुंबई - सिंधुदुर्ग- रत्नागिरी मतदारसंघात नीलेश राणे यांच्या पराभवाचे खापर त्यांचे धाकटे बंधू व उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश यांनी आपल्या पक्षातल्या पदाधिकार्यांवरच फोडले आहे. राणेंच्या अतिशय विश्वासू नेत्यांपैकी राजन तेली, काका कुडाळकर आणि सुरेश पडते यांच्यावर नितेश यांनी तोफ डागली. दुसरीकडे राणे समर्थकांनीही एक पत्रक काढून नितेश यांच्या आरोपांना जशास तसे उत्तर दिल्याने तळकोकणात कॉँग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचला असल्याची चिन्हे आहेत. लोकसभा...
  July 4, 03:57 AM
 • ठाणे - अनेक दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने बुधवारी हजेरी लावली असली तरी, चातकाप्रमाणे वाट पाहात असलेल्या शेतकर्याला ताहानलेलेच ठेवले आहे. ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, भाईंदर, वसई, विरार भागात पाऊस दाखल झाला. तर, वाडा, जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी आणि शहापूर भागात रिमझिम सरी झाल्या आणि थोड्याच वेळात थांबल्या. यामुळे शेतीची कामे अजूनही लांबलेलीच आहेत. ठाणे शहरात झालेल्या पावसाने महापालिकेच्या नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले, तर लोकल रेल्वेचे...
  July 3, 10:27 AM
 • चिपळूण - तालुक्यातील खेरशेत बेंडलवाडी येथे सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेली महिला विहिरीला कठडा नसल्याने विहिरीत पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला आहे. मृत महिलेचे नाव दर्शना संजय आग्रे (32) असे आहे. ही घटना मंगळवारी घडली. महिलेच्या मागे पती आणि तीन लहान मुली असे कुटुंब आहे. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खेरशेत बेंडलवाडी येथे दोन दिवसांपासून नळाला पाणी आले नाही, त्यामुळे दर्शना संजय आग्रे (32) या मंगळवारी सकाळी श्वेता सुरेश बेंडल (40), अमिता अनंत बेंडल (14), रोशन राजेंद्र बेंडल...
  July 3, 09:55 AM
 
जाहिरात

RECOMMENDED