जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan

Kokan

 • मुंबई - सिंधुदुर्ग- रत्नागिरी मतदारसंघात नीलेश राणे यांच्या पराभवाचे खापर त्यांचे धाकटे बंधू व उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश यांनी आपल्या पक्षातल्या पदाधिकार्यांवरच फोडले आहे. राणेंच्या अतिशय विश्वासू नेत्यांपैकी राजन तेली, काका कुडाळकर आणि सुरेश पडते यांच्यावर नितेश यांनी तोफ डागली. दुसरीकडे राणे समर्थकांनीही एक पत्रक काढून नितेश यांच्या आरोपांना जशास तसे उत्तर दिल्याने तळकोकणात कॉँग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचला असल्याची चिन्हे आहेत. लोकसभा...
  July 4, 03:57 AM
 • ठाणे - अनेक दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने बुधवारी हजेरी लावली असली तरी, चातकाप्रमाणे वाट पाहात असलेल्या शेतकर्याला ताहानलेलेच ठेवले आहे. ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, भाईंदर, वसई, विरार भागात पाऊस दाखल झाला. तर, वाडा, जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी आणि शहापूर भागात रिमझिम सरी झाल्या आणि थोड्याच वेळात थांबल्या. यामुळे शेतीची कामे अजूनही लांबलेलीच आहेत. ठाणे शहरात झालेल्या पावसाने महापालिकेच्या नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले, तर लोकल रेल्वेचे...
  July 3, 10:27 AM
 • चिपळूण - तालुक्यातील खेरशेत बेंडलवाडी येथे सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेली महिला विहिरीला कठडा नसल्याने विहिरीत पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला आहे. मृत महिलेचे नाव दर्शना संजय आग्रे (32) असे आहे. ही घटना मंगळवारी घडली. महिलेच्या मागे पती आणि तीन लहान मुली असे कुटुंब आहे. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खेरशेत बेंडलवाडी येथे दोन दिवसांपासून नळाला पाणी आले नाही, त्यामुळे दर्शना संजय आग्रे (32) या मंगळवारी सकाळी श्वेता सुरेश बेंडल (40), अमिता अनंत बेंडल (14), रोशन राजेंद्र बेंडल...
  July 3, 09:55 AM
 • ठाणे- पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या एका महिलेवर दोन अज्ञात व्यक्तींनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील शरणापूर तालुक्यात घडली. याप्रकरणी महिलेने दोघांविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. पीडित महिला ही घोटेघर येथील आपल्या घरी एकटीच होती. या वेळी दोघांनी घरात घुसून तिच्यावर अत्याचार केले. तिने आरडाओरडा केल्यानंतर शेजारी तिच्या मदतीसाठी आले. मात्र, तोपर्यंत दोघेही तेथून फरार झाले. पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
  May 22, 02:14 AM
 • रत्नागिरी - अपघातात मरण पावलेल्या 17 वर्षीय मुलीचा मृतदेह घेऊन गावी परत येताना कारवर जेसीबी आदळून आई-वडिलांचाही मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी हातखंबा (ता. खेड) येथे घडली. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांसह चार जणांचा मृत्यू झाला. प्रवीण कदम हे आपली मुलगी धनश्री व पत्नी प्रियंका यांच्यासह स्वत:च्या रिक्षातून खेडकडे चालले होते. मात्र, संगमेश्वरजवळ त्यांच्या रिक्षाला समोरुन येणार्या चारचाकीने धडक दिली. यात धनश्रीचा मृत्यू झाला. शवविच्छेदन झाल्यानंतर मुलीचा मृतदेह...
  May 9, 07:39 AM
 • ठाणे - रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या गर्भवती महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या डॉक्टरसह दोघांची ठाणे सत्र न्यायालयाने मुक्तता केली आहे. हिना सय्यद (23) ही महिला वाशी येथील एका रुग्णालयात दोन वर्षांपूर्वी दाखल झाली होती. या वेळी मुलाला जन्म दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याचे सांगत हिनाच्या नातेवाईकांनी डॉक्टर व इतर दोघांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी त्यांची मुक्तता...
  May 5, 01:18 AM
 • रत्नागिरी - हापूस आंब्याचा पिढीजात शेती व्यवसाय करणा-या देसाई कुटुंबाने एवढे वाईट दिवस कधीच पाहिले नव्हते. देसाई कुटुंबाच्या तिस-या पिढीचे प्रतिनिधी असलेले 39 वर्षीय आनंद शेतात राबत आहेत. त्यांचे आजोबा आंब्याचे पीक घेत होते. मात्र या वेळी पहिल्यांदाच देसाई कुटुंब अडचणीत आले आहे. हापूसला जगभरातील दरवाजे बंद झाले आहेत. हे केवळ व्यावसायिक नुकसान नाही तर लाजिरवाणी गोष्ट आहे, असे आनंद यांनी सांगितले. देसाई यांची आसपासच्या परिसरात ख्याती आहे. 1932 मध्ये त्यांचे आजोबा रघुनाथ देसाई यांनी...
  May 4, 05:37 AM
 • ठाणे- शहरात 1984 मध्ये झालेल्या एका जमीन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी 24 जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक एल.सी. गुप्ता (सध्या जिवंत नाहीत) यांच्या नावाचाही समावेश आहे. ठाण्याच्या विशेष सत्र न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. महसूल विभागातील अधिकारी, सहकार विभाग, सिडको, काही विकासक यांचीही नावे आरोपपत्रात आहेत. सुमारे तीन दशकांपूर्वी श्री ओम शांती सहकारी गृहनिर्माण संस्थेला सवलती देताना सरकारी...
  April 27, 02:06 AM
 • ठाणे- शहरात 1984 मध्ये झालेल्या एका जमीन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी 24 जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक एल.सी. गुप्ता (सध्या जिवंत नाहीत) यांच्या नावाचाही समावेश आहे. ठाण्याच्या विशेष सत्र न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. महसूल विभागातील अधिकारी, सहकार विभाग, सिडको, काही विकासक यांचीही नावे आरोपपत्रात आहेत. सुमारे तीन दशकांपूर्वी श्री ओम शांती सहकारी गृहनिर्माण संस्थेला सवलती देताना सरकारी...
  April 27, 02:06 AM
 • सावंतवाडी - माझ्या पक्षातील काही लोकांना याचवेळी अवदसा आठवली. एकत्र काम करत असताना भांड्याला भांडे लागतच असते. पण ज्यावेळी देशाचा प्रश्न येतो, तेव्हा सर्व मतभेद आणि मनभेद विसरून देशाचा विचार करायला हवा. काही लोकांना स्थानिक राजकारण आणि देशाचे हित यातला फरकच कळत नाही. स्थानिक पातळीवर आपल्या वेगवेगळ्या युती असतात. पण देशाच्या निवडणुकीत आघाडी म्हणूणच आपल्याला काम करायला हवे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी आपल्याच पक्षातील बंडोबांना...
  April 14, 04:39 AM
 • सिंधुदुर्ग - कॉग्रेसचे उमेदवार निलेश राणेंचा कोणत्याही परिस्थितीत प्रचार करणार नाही, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसकर यांनी घेतली आहे. दीपक केसकर यांच्या भूमिकेमुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये दुही माजली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिंधुदुर्गमध्ये सभा घेऊन कोकणात आघाडीत निर्माण झालेले बिघाडीचे वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. आता राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता निलेश राणेंचा प्रचार करणार असल्याचेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले....
  April 13, 03:49 PM
 • ठाणे/ उमरगा/ औरंगाबाद - राज्यासाठी शनिवारचा दिवस घातवारच ठरला. ठाण्याजवळ पेट्रोलचा टँकर उलटून झालेल्या स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात उमरग्याजवळ जीप व ट्रकच्या धडकेत पाच जण ठार झाले. करमाडजवळ नातलगाच्या अंत्यविधीहून परतणारी कार उभ्या ट्रकवर आदळल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. मुंबई-अहमदाबाद मार्गावर शनिवारी पेट्रोलचा टँकर उलटून झालेल्या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला. टँकरमधील तिघे व 4 पादचारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. टँकर मुंबईकडे जात होता. दुपारी तीन...
  March 23, 01:48 AM
 • ठाणे- ठाण्यातीत समतानगरातील सुंदरबन पार्क या इमारतीच्या बाराव्या मजल्याला आज (रविवार) पहाटे भीषण लागली आहे. या दूर्घटनेत तीन जण जखमी झाल्याचे समजते. इमारतीत अनेक रहिवाशी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आग आटोक्यात आल्याचे अग्नीशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले. अग्नीशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरु आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
  March 16, 07:53 AM
 • रायगड- अलिबागमधील भायमळ्यातील फटाक्याच्या फॅक्टरीत आज (गुरुवारी) भीषण स्फोट झाला. त्यानंतर संपूर्ण फॅक्टरीत आग पसरली. आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 20 जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमार फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला. त्यानंतर काही क्षणातच आग सर्वत्र पसरली. अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल पोहोचल्या असून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.
  March 4, 02:45 PM
 • दिल्लीच्या विधानसभेत अरविंद केजरीवालांचा झाडू 49 दिवस टिकला. विधानसभेत काय घडले, ते सार्या देशाने पाहिले. मुख्यमंत्र्यांनी आपल्याच सरकारची भ्रूणहत्या स्वत:च घडवली. खरे तर राजीनामा देऊन जबाबदारीतून पळ काढला. या नाटकानंतर दोनच दिवसांनी आपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यादीत उत्तर प्रदेश सात, महाराष्ट्र सहा, दिल्ली दोन, याखेरीज हरियाणा, मध्य प्रदेश, पंजाब, ओडिशा आणि अरुणाचल प्रदेशातील प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे. जी नावे जाहीर झाली, त्यातले...
  February 23, 12:46 AM
 • नाणीज (जि. रत्नागिरी) येथील सुंदरगडावर शुक्रवारपासून संतशिरोमणी गजानन महाराज प्रगट दिन व रामानंदाचार्य जयंती उत्सवाला प्रारंभ झाला. नवग्रह याग, शोभायात्रा यासह दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. शनिवारी प्रगट दिनाचा मुख्य सोहळा होत आहे. यानिमित्ताने देशभरातील असंख्य भाविक सुंदरगडावर जमा झाले असून परिसर गजबजून गेला आहे. भव्य शोभायात्रा व नरेंद्र महाराजांचे प्रवचन यासह विविध कार्यक्रम शनिवारी साजरे होणार आहेत.
  February 22, 12:40 AM
 • ठाणे - केंद्रीय कृषिमंत्री या नात्याने मी मुख्यमंत्र्यांना भेटतच असतो. मग त्यात गैर ते काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केला. काही दिवसांपूर्वी पवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. तेव्हा पवारांनी त्याचे खंडण केले होते. परंतु शनिवारी स्वत:हून त्यांनी याबाबत खुलासा केला. देशात अधिकाधिक प्रमाणात अन्नधान्याचे उत्पादन व्हावे ही कृषिमंत्री या नात्याने माझी जबाबदारी आहे. त्यासाठी वेगवेगळय़ा राज्यांत दौरेही...
  February 9, 05:30 AM
 • ठाणे - डिझेलने भरलेल्या टॅँकरला लक्झरी बसची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात बसचालकासह नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर इतर 14 जण गंभीर जखमी झाले. मुंबई- अहमदाबाद महामार्गावर पालघरनजीक मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात घडला. मृतांमध्ये काही पुण्यातील प्रवाशांचा समावेश आहे. पर्पल ट्रॅव्हल्सची ही बस पुण्याहून अहमदाबादकडे जात होती. मध्यरात्री पालघर तालुक्यातील मनोर पोलिस ठाण्याजवळील कुडे गावाजवळ ही बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टॅँकरला धडकली. टँकरमध्ये मोठ्या...
  January 30, 01:10 AM
 • मुंबई- मुंबई अहमदाबाद महामार्गावर काल रात्री दिडच्या सुमारास लक्झरी बस डिझेल टॅंकरला धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातानंतर बसने पेट घेतल्याने 8 जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला तर इतर 14 जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही लक्झरी बस पुण्याहून अहमदाबादला जात होती. बस जेव्हा पालघर तालुक्यातील मनोर पोलिस स्टेशनजवळ असलेल्या कुडे या गावाजवळ आली, तेव्हा ती रस्त्याच्या कडेला थांबलेल्या डिझेल टॅंकरला धडकली. अपघात होताच टॅंकरमधील डिझेलने पेट घेतल्याने या प्रवाशांचा झोपेतच...
  January 29, 12:11 PM
 • अलिबाग - राज्यातील व केंद्रातील कॉँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर खाली खेचण्याचा निर्धार तमाम शिवसैनिकांनी केला आहे. देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान, तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, अशा शब्दांत युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी अलिबागच्या मेळाव्यात शिवसेनेचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून उद्धव ठाकरेंची उमेदवारी जाहीर करून टाकली. युवा सेना पदाधिकार्यांच्या पहिल्या राज्यस्तरीय मेळाव्यात आदित्य म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 80...
  January 17, 04:57 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात