जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Ratnagiri

Ratnagiri News

 • सिंधुदुर्ग (प्रतिनिधी ) सध्या जिल्ह्यात गाजत असलेल्या पारंपारीक आणि पर्ससीन नेट मासेमारीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी मालवण येथे रविवारी होणार्या दोन्ही गटाच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.सिंधुदुर्ग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत यबाबत बैठक घेण्यात आली होती. त्यात पर्ससीन नेट मासेमारी १० गावाच्या बाहेर करण्यात यावी तसेच पर्ससीन नेटची मासळी स्थानिक बाजारपेठेत विकण्यात येऊ नये, असे निर्णय घेण्यात आले होते....
  October 15, 10:07 AM
 • सिंधुदुर्ग - साटेली भेडशी ग्रामपंचायतीचे विभाजन करून स्वतंत्र भेडशी ग्रामपंचायत निर्मितीच्या शासन निर्णयाच्या विरोधात साटेली ग्रामस्थ एकवटले. साटेली ग्रामस्थांनी दोडामार्ग तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा नेऊन साटेली भेडशी ग्रामपंचायत विभाजनाला आपला तीव्र विरोध दर्शवला यावेळी प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात जोरदार खटके उडाले. साटेली भेडशी ग्रामपंचायतीचे सरपंच नयना कदम यांना पोलिसांनी मागे ढकलल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी तहसीलदार आणि पोलीस...
  October 14, 01:16 PM
 • रत्नागिरी - तीन ते पाच ऑक्टोबर या कालावधीमध्ये शाळा आणि पटपडताळणीची मोहीम राबवण्यात आली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील 3 हजार 310 शाळांमधील 3 लाख 25 हजार विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 15 हजार विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. म्हणजेच नोंदल्या गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी 96.78 टक्के इतके विद्यार्थी प्रत्यक्षात होते.अनधिकृत शाळांबाबत प्रभारी जिल्हाधिकारी पवार यांनी सांगितले की, जिल्ह्यातील 23 शाळा अनधिकृत असून, त्यातील 890 बनावट विद्यार्थी सापडले आहेत. मात्र, या सर्व शाळांचा प्रस्ताव मंजुरीसाठी...
  October 13, 11:47 AM
 • सिंधुदुर्ग - काही दिवसांपासून वीज वितरण कंपनीच्या वतीने नियमित भारनियमनाबरोबरच तातडीचे भारनियमन केले जात आहे. दिवसा,मध्यरात्री अनेक वेळा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. विजेचा लपंडाव आणि सतत वाढणारे भारनियमन यामुळे वैतागलेल्या रहिवाशांनी भारनियमनाविरोधात महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला.गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्गात विजेचा लपंडाव सुरू असतानाच आता मोठय़ा प्रमाणात भारनियमन केले जात आहे. त्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी दिवसागणिक झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे लोकांना...
  October 11, 12:52 PM
 • कुडाळ- वेतोरेहून कुडाळच्या दिशेने भरधाव येणा-या टॅ्क्सने रिक्षाला दिलेल्या धडकेत रिक्षाचालकासह तीन जणांचा मृत्यू झाला. यात रिक्षातील अमोल मलबारी, प्रसाद भोसले दोघेही जागीच ठार झाले. तर रिक्षाचालक शामला उपचारासाठी बांबोळी-गोवा येथे नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. मुंबई उल्हासनगरात राहणारे अमोल मलबारी, किरण साळवी व प्रसाद भोसले हे तिघेही मित्र सिंधुदुर्ग पाहण्यासाठी शनिवारी कुडाळ येथे आले होते. अपघातात जखमी झालेला किरण साळवी याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीच्या...
  October 11, 12:50 PM
 • सिंधुदुर्ग - उच्च न्यायालयाने पर्सिसन नेट मासेमारीवरील बंदी उठविल्यामुळे सिंधुदुर्गातही पर्सिसन नेट मासेमारीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्हय़ात स्थानिक पर्सिसन नेटधारक व पारंपरिक मच्छीमारांमध्ये संघर्ष निर्माण होऊन बुधवारी तळाशिलच्या समुद्रात या दोन गटांमध्ये संघर्षाचा भडका उडाला होता. या वादावर तोडगा काढण्यासाठी गुरुवार 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता ओरोस येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला पालकमंत्री नारायण राणे हे उपस्थित राहणार आहेत.उच्च न्यायालयाने...
  October 11, 12:48 PM
 • रत्नागिरी- पाळंदे हर्णे येथे समुद्रकिनायावर शनिवारी सायंकाळी उतरलेल्या हेलिकॉप्टरची ओळख पटली असून ते ग्लोबल व्हेक्ट्रा या कंपनीचे आहे. ते बंगळुरूहून मुंबईतील जुहू एरोड्रोम येथे जात असताना तांत्रिक बिघाडामुळे या ठिकाणी उतरवावे लागले. मात्र या हेलिकॉप्टरमधून उतरलेल्या दोघांनी परिसराची छायाचित्रे काढल्याने येथील नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांनी तातडीने याबाबत पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी अधिक तपास केला असता हे हेलिकॉप्टर बंगळुरू येथील ग्लोबल...
  October 10, 12:02 AM
 • रत्नागिरी: पाळंदे-हर्णे (ता.दापोली) समुद्रकिनार्यावर उतरलेले संशयित हेलिकॉप्टर हे हेलिकॉप्टर बंगळुरू येथील ग्लोबल व्हेक्ट्रा कंपनीचे असल्याची माहिती मिळाली आहे. ते बंगळुरूहून मुंबईला जात होते. अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने या ठिकाणी उतरविण्यात आल्याचे समजते. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्ह्यातील दापोलीजवळच्या असलेल्या पाळंदे- हर्णे गावात शनिवारी संध्याकाळी एक हेलिकॉप्टर उतरलं होतं. या हेलिकॉप्टरमधून उतरलेली तीन जण संशयास्पद दिसून आल्याचे स्थानिक नागरिकांनी पोलिसांना...
  October 9, 02:26 PM
 • सिंधुदुर्ग - जिल्ह्यात तापेचे १८ बळी गेला असून, दिवसेंदिवस तापेची साथ वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तीन दिवसापासून ताप येत असल्येल्या कसाल बालमवाडी येथील संतोष कृष्णा परब (३२) या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सरु होते, मात्र प्रकृती चिताजनक बनल्याने त्यांना कोल्हापूर रुग्णालयात हलवीत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. परब यांच्या मृत्यू मुळे तापबळींची संख्या १८ वर पोहचली आहे. दरम्यान परब यांचे लेप्टो आणि...
  October 4, 04:37 PM
 • रत्नगिरी - जिल्ह्यातील बोगस विद्यार्थी आणि अनधिकृत शाळा शोध मोहिम सोमवारपासून सुरु झाली आहे. जिल्ह्यात शाळांची तपासणी करणारी भरारी पथके उदंड झाली असून त्यांच्याकडे शाळा तपासणीचे व्हिडीओ शुटींग करणा-या कॅमे-यांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत ही मोहीम पूर्ण कशी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात ३ लाख २२ हजार २६२ विद्यार्थ्यांची पटावर नोंद आहे. तर ३२९६ शाळा आहेत. यांची तपासणी करण्यासाठी २४१ पथक नियुक्त करण्यात आले आहेत. त्याच्यांसाठी २३० वाहने तैनत करण्यात आली...
  October 4, 03:29 PM
 • देवरुख - सध्या नवरात्रीची धुम सुरु आहे. मात्र या उत्सवालाच काळीमा फासणारा प्रकार देवरुख येथे घडला आहे. रात्री उशिरापर्यंत दांडिया रंगत असतांनाच काळोखाचा फायदा घेत एका अल्पवयीन मुलीला फूसलावून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना निवे बुद्रुक गावात उघडकीस आली आहे. बलात्कार करणारा संदीप बबन यादव (२२) याला पोलिसांनी अटक केली आहे. निवे बुद्रुक गावात असलेल्या माता मंदिरासमोर रास दांडिया सुरु असतांना १ ऑक्टोबरच्या रात्री उत्सवाला काळीमा फासणारे कृत्य संदीप यादव या युवकाने केले. हे कृत्य...
  October 4, 03:12 PM
 • रत्नागिरी - मला वारस नसल्याने माझी संपत्ती तुमच्या नावावर करीत असल्याचा ई-मेल रत्नागिरीतील एका व्यक्तिला आला. त्यानेही या ई-मेलला प्रतिसाद दिल्यानंतर त्याला वारंवार ई-मेल येत राहिले आणि नंतर ही संपत्ती मिळविण्यासाठी बँकेच्या कागदपत्रांसाठी ५८०० युरो म्हणजेच सुमारे ३ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. हे पैसे घेण्यासाठी बँकेचा अधिकारी रत्नागिरीत पाठवीत असल्याचेही त्या महिलेने कळविले. रत्नागिरीत पैसे नेण्यासाठी आलेल्या या नायजेरियन नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने दिलेल्या...
  October 2, 06:22 PM
 • रत्नागिरी: शहर आणि परिसरात चोरी सत्र सुरूच आहे. चोरट्यावर पोलिसांचा वचक राहीलेला नाही. त्यामुळे चक्क पोलिसांच्या घरांवरच डल्ला मारण्याचा प्रयत्न चोरट्याकडून होऊ लागला आहे. शहरातील राधाकृष्ण नगरात श्री जाधव हे हवालदार राहतात. त्यांच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न चोर्यांनी केला होता. त्यामुळे पोलिस यंत्रणा खळबळून जागी झाली आहे. श्री. जाधव यांच्या घराची मागची खिडकी चोरट्यांनी फोडली. खिडकीच्या बाजूला असलेली पर्स काढण्याच्या ते प्रयत्नात होते. मात्र तितक्यात श्री. जाधव यांच्या मुलीला...
  September 29, 05:08 PM
 • सिंधुदुर्ग- सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताप, कावीळ, लेप्टोची साथ पसरली आहे. साथ आटोक्यात येत नसल्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर फार मोठे प्रश्न चिन्ह उभे ठाकले असून कणकवली तालुक्यातील तोंडवली बोभाटे वाडी येथील नितीन बोभाटे या तापाच्या रुग्णाची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला कोल्हापूर येथे उपचार साठी हलविण्यात आले आहे. तापाबरोबरच बोभाटे याचा डावा पाय निकामी झाला. त्यामुळे त्याची प्रकृती गंभीर झाली आहे. जिल्ह्यात यावर्षी ताप, कावीळ आणि लेप्टोच्या साथीने आतापर्यंत १३ जणाचे बळी घेतले आहेत. साथ...
  September 21, 04:03 PM
 • रत्नागिरी: रत्नागिरी- कोल्हापूर मार्गावर असलेल्या नाणीज गावाजवळ एसटी उलटून झालेल्या अपघातात 82 विद्यार्थी जखमी झाले. यातील 20 विद्यार्थी गंभीर आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास हा अपघात झाला होता. देवळे-पाली एसटी (एमएच-20-डी-5566) ही बस सकाळी सहा वाजता आगारातून निघाली. नाणीज गावाजवळ समोरून मालवाहू ट्रकला जाण्यासाठी ही बस रस्त्यावरील साईटपट्टीवर थांबली. मात्र पावसामुळे साईटपट्टी खचल्याने एसटी उलटली. बसमध्ये मर्यादेपेक्षा...
  September 20, 05:49 PM
 • सिंधुदुर्ग- मुसळधार पावसाने थैमान घातल्यानंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात साथीच्या रोगांनी पाय पसरले आहेत. जिल्ह्यात लेप्टोस्पायरोसिसचा पहिला बळी गेला असून या रोगाची साथ पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आठ दिवसांपूर्वी मालवण तालुक्यातील मसुरे कावा वाडी येथे राहणाऱ्या प्रकाश अच्युत मसुरकर यांचा तापाने मृत्यू झाला होता. तर आता कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार घेणाऱ्या फोंडाघाट येथील रमेश बालक्रिष्ण सावंत या ५० वर्षीय नागरिकाचा लेप्टोस्पाय्रेसीसमुळेमृत्यू झाल्याची घटना...
  September 18, 11:36 AM
 • सिंधुदुर्ग- मालवण सोमवार पेठ येथे राहणाऱ्या मृणाल महेश गिरकर या तीन वर्षीय बालिकेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. इलेक्ट्रिक शिलाई मशिनच्या वायरला मृणालने हात लावल्याने तिला विजेचा जबर धक्का बसला व ती फेकल्या गेली. अतिशय जोरात ती भिंतीवर आदळली व त्यातच तिचा मृत्यू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध कबड्डीपटू महेश गिरकर यांची मृणाल ही एकुलती एक मुलगी होती. महेश गिरकर यांच्या आईचा टेलरिंग चा व्यवसाय आहे. मृणालच्या या आकस्मिक मृत्यू मुळे मालवणातहळहळ व्यक्त करण्यात येत आहे
  September 18, 09:56 AM
 • रत्नागिरी - नियोजित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांना आपले म्हणणे मांडता यावे यासाठी शनिवारपासून तीन दिवस लोकअदालत भरणार आहे. मिठगवाणे येथील अंजनेश्वर मंदिराच्या परिसरात तीन निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली लोकअदालतीचे कामकाज चालणार आहे.केंद्र शासनाने राजापूर तालुक्याचा जैतापूर परिसरात महत्त्वाकांक्षी अणुऊर्जा प्रकल्प उभारायचे ठरवले आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी येथील नागरीकांनी विविध मार्गांनी विरोध करूनही प्रकल्पाची उभारणी करण्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य...
  September 17, 11:24 PM
 • रत्नागिरी - गणपती पुळे येथील समुद्रातील दुर्घटना टाळण्यासाठी तसेच पर्यटक समुद्रात पोहत असताना त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी किना-यावर वॉच टॉवर उभारण्यात आले आहे. येथील समुद्रात पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या असल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सरकारने आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथे वॉच टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. गणपती पुळे येथे दररोज मोठ्या प्रमाणात लाखो भाविक येत असतात.
  September 17, 11:23 PM
 • गणपतीपुळे/रत्नागिरी - संकष्टीचतुर्थीनिमीत्त कोल्हापूर, इचलकरंजी येथील भाविक देवदर्शनासाठी आले असतांना त्यातील अनेक जण समुद्रस्नानाचा आनंद घेण्यासाठी समुद्रात उतरले. त्यातील सतीश आवळे (२३) युसोफ कांबळे (५०) हे समुद्रात बुडू लागले. यावेळी ओहोटीची वेळ असल्याने यांच्या बचाव कार्यात मोठ्या अडचणी आल्या. मात्र ग्रामस्थांनी प्रयत्नांची शिकस्त करुन युसोफ कांबळे यांना वाचविण्यात यश मिळविले, तर सतीश आवळे अजूनही बेपत्ता आहे. त्याचा शोध पोलिस आणि ग्रामस्थ घेत आहे. याशिवाय कोल्हापूरचे आप्पा...
  September 17, 12:38 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात