जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Ratnagiri

Ratnagiri News

 • चिपळूण - येथील व्यापारी नंदकुमार गोविंद कामेरकर (६५) यांनी त्यांच्या राहत्या घराच्या आवारातील विहिरीत आत्महत्या केली आहे. गोटी सोडा आणि मसाला सोडासाठी प्रसिद्ध चिंचनाक्यातील समर्थ कोल्ड्रिंक्सचे ते मालक होते. बुधवारी सकाळ कामेरकर यांनी त्यांच्या राहत्या घराच्या आवारातील विहिरीत आत्महत्या केली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. कामेरकर यांनी आत्महत्येपूर्वी पोलिसांच्या नावे चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीत त्यांनी बहीण, मेहुणा आणि भाची हे वारंवार मानसिक त्रास देत असत आणि घरी येऊन...
  September 15, 04:07 PM
 • रत्नागिरी - महिला ग्रामपंचायत सदस्याची मोबाईलद्वारे छायाचित्र काढणा-या उपसरपंचाला विनयभंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. राजापूर तालुक्यातील दळे गावच्या ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्य सौ. गोरिवले यांची उपसरपंच महेश मोरेश्वर करगुटकर (३६) याने विनापरवाना छायाचित्र काढल्याचा संशय सौ. गोरिवले यांना आला. त्यामुळे त्यांनी उपसरपंचाला ग्राम पंचायत कार्यालयात जाब विचारला. त्यानंतर करगुटकर याच्या विरोधात नाटे पोलिस दुरक्षेत्रात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादवि ३५४, ५०४, ५०६ कलमान्वये गुन्हा...
  September 14, 05:49 PM
 • मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील खोळंबलेली वाहतूक आता करण्यात आली आहे. परंतु सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ हलक्या वाहनाना कशेडी घाटातून जाण्यास परवानगी दिली आहे. कोकणांत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कशेडी घातात दरड रस्त्यावर आडवी झाली होती. त्यामुळे या मार्गावरील दोन्ही बाजुंची वाहतूक गेल्या चार दिवसांपासून ठप्प होती. दरड बाजुला करण्याचे काम सुरु होते परंतू कोसळणार्या मुसळधार पावसामुळे अनेक वेळा कामात व्यत्यय येत होता. मंगळवारी दुपारी...
  September 6, 07:37 PM
 • सिंधुदुर्ग - गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आणखी दोन बळी घेतले आहेत. सावंतवाडी तालुक्यातील मळवाड येथील संग्राम काळोजी हा दोन वर्षांचा मुलगा ओढ्याच्या पाण्यात वाहून गेला, तर कोल्हापूरहून आलेल्या पुरोहित योगेश जोशी यांचा विजेच्या तारेचा धक्का लागून मृत्यू झाला. दोन दिवसांत जिल्ह्यातील पावसाच्या बळींची संख्या पाचवर पोहोचली आहे. सिंधुदुर्गात माणगाव खोयासह जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग...
  September 6, 05:56 AM
 • रत्नागिरी - पोमेंडी येथे रुळावर आलेली माती व चिखल हटविण्यात यश आल्यानंतर रविवारी कोकण रेल्वेची वाहतूक तात्पुरती का होईना सुरळीत झाली. मात्र रेल्वे रुळावरून गेल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा माती व चिखल येत आहे, त्यामुळे तास- दोन तासाचा ब्रेक घेऊन चिखलमाती हटविण्यात येते व पुन्हा गाड्या सोडण्यात येत आहेत. कोकणात पावसाचे प्रमाण थोडे कमी झाल्याने माती व चिखल हटविण्याच्या कामाला वेग आला आहे. रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास रेल्वेसेवा सुरळीत झाली, मात्र अजूनही पाण्यातूनच रेल्वेने...
  September 5, 12:45 AM
 • सिंधुदुर्ग- जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे दोन सख्ख्या बहिणींसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. वेंगुर्ले कॅम्प-भटवाडी येथील कुडपकर कुटुंबातील वैदेही (वय ६) व चिन्मयी (४) संतोष कुडपकर या सख्ख्या बहिणींसह सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड आणि खारेपाटणमध्ये शनिवारी आलेल्या पुरामध्ये चौघांचा बुडून मृत्यू झाला.सकाळी वैदेही व चिन्मयी या दोघी ओहोळात कचरा टाकण्यासाठी गेल्या होत्या. बराच वेळ झाला तरी त्या परत आल्या नाहीत. त्यामुळे घरातील व्यक्तींनी त्यांची...
  September 4, 06:06 PM
 • रत्नागिरी: जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेमार्गावर पोमेंडीजवळ शनिवारी पहाटे मोठ्या प्रमाणावर माती पडल्याने हा रेल्वेमार्ग चौथ्या दिवशीही ठप्प होता. परिणामी रेल्वे प्रशासनाला या मार्गावरील अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या, तर काही गाड्या अर्ध्यावर थांबवण्यात आल्या आहेत. सकाळपासून ही माती हटविण्याचे काम सुरू असून रेल्वेमार्ग कधी सुरळीत होणार याचे चित्र अद्यापही स्पष्ट नाही. पोमेंडीजवळ रुळांवर चिखल पडल्याने रत्नागिरी ते निवसदरम्यानचा संपर्क तुटला आहे. रुळावर झालेला गाळ...
  September 4, 02:32 AM
 • रत्नागिरी- मुसळधार पावसाने कोकणाला पुन्हा झोडपून काढले आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. याचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. कोकण रेल्वेची वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. पोमेंडीजवळ रेल्वेरुळांवर प्रचंड माती आणि चिखल आला आहे. तसेच गांभीर्याची गोष्ट म्हणजे या ठिकाणी डोंगरही रेल्वेरुळांच्या दिशेने सरकल्याचे तज्ज्ञांनी सांगीतले आहे. त्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. वाहतूक बंद असल्यामुळे अनेक गाड्या खोळंबल्या आहेत. निवसर, कणकवली, रत्नागिरी...
  September 3, 10:17 AM
 • रत्नागिरी- पोमेंडीजवळ रेल्वेरुळांवर माती आणि चिखल आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक पुन्हा ठप्प झाली आहे. सकाळपासून ही माती हटवण्याचे काम सुरु आहे. पण या कामाला किती वेळ लागेल हे सध्यातरी सांगणे शक्य नसल्याचे कोकण रेल्वेच्या अधिका-यांनी सांगीतले. कोकणात एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रेल्वे रुळाजवळची माती खचली. ही माती रुळांवर येत असल्यामुळे त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होत आहे. गणेश चतुर्थीच्या दोन दिवसांपुर्वी पोमेंडीजवळच्या...
  September 2, 12:05 PM
 • रत्नागिरी- पोमेंडीजवळ रेल्वेरुळांवर माती आणि चिखल आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक पुन्हा ठप्प झाली आहे. सकाळपासून ही माती हटवण्याचे काम सुरु आहे. पण या कामाला किती वेळ लागेल हे सध्यातरी सांगणे शक्य नसल्याचे कोकण रेल्वेच्या अधिका-यांनी सांगीतले. कोकणात एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रेल्वे रुळाजवळची माती खचली. ही माती रुळांवर येत असल्यामुळे त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होत आहे. गणेश चतुर्थीच्या दोन दिवसांपुर्वी पोमेंडीजवळच्या...
  September 2, 12:05 PM
 • सिंधुदुर्ग- लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेसत्वाची संकल्पना मांडण्यापूर्वीपासूनमालवण तालुक्यातील कोइलं या गावात एक गाव एक गणपती अशी संकल्पना रूढ झाली होती. ती आजही कायम आहे. आचरा-कणकवली मार्गावरून ४ किलो मीटर अंतरावरकोइलं हे खाडी किनारी वसलेले गाव. या गावात गणपतीचे एक लहान मंदिर आहे. नवसाला पावणारा गणपती अशी या गणपतीची ख्याती आहे. या गावातील लोक आपल्या घरात गणेश चतुर्थीलाच नव्हेत तर इतर कधीही गणपतीची पूजा करीत नाही. एवढेच नव्हे तर दुसऱ्याच्या गणपतीला हात लावत नाहीत. या गावात...
  September 2, 10:33 AM
 • रत्नागिरी: जिल्ह्यातील गुहाघर येथील कोळी समाजातील लोकांना समुद्रात एक गणेशमूर्ती सापडली होती. सर्वांनी मिळून या गणेशाची प्रतिष्ठापना केली. एकदा समुद्राला भरती येऊन गुहागर बुडण्याची वेळ आली असताना ग्रामस्थांनी या गणपतीची आराधना केली. त्या वेळी पूर्वाभिमुख गणेशाने आपले तोंड पश्चिमेकडे करून समुद्राची दिशा बदलल्याची दंतकथा आहे. त्यामुळे या गणपतीचे नाव उरफाटा गणपती असे पडले. या गणपतीची प्रतिष्ठापना सुमारे तीनशे वर्षांपूर्वी झाल्याचे सांगण्यात येते. हा गणपती खरे कुळाचा आहे. खरे...
  September 2, 01:37 AM
 • सिंधूदुर्ग - येथील देवबागमध्ये उधानलेल्या सागराच्या लाटांनी अनेकांचे संसार पाण्याबरोबर वाहून नेले आहेत. देवबाग मोबारवाडीत शासनाने संरक्षक भिंत बांधली नसल्यामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सागराला आणखी उधान आले तर देवबागवासीयांची आणखीही घरे उदध्वस्त होण्याची भीती येथील रहिवाशांना वाटत आहे.
  September 1, 08:08 PM
 • सिंधूदुर्ग- विघ्नहर्त्याचे आगमन होत असतानाच केवळ शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे देवबाग या अतिक्रमणग्रस्त गावाला सागराच्या अजस्त्र लाटांनी तडाखा दिला. देवबाग मोबारवाडी येथे संरक्षक बंधारा बांधला नसल्यामुळे सागराच्या उधाणाच्या लाटांनी शिरकाव करून खासगी मालमत्तेचे मोठयाप्रमाणात नुकसान केले. सागराच्या अजस्त्र लाटांनी २० मीटर एवढा भाग गिळंकृत केला तसेच २०० फूट लांबीचा बंधारा उद्ध्वस्त केला तसेच २०० फूट लांबीचा बंधारा देखील उद्ध्वस्त केला. सागराच्या अजस्त्र लाटांचे तांडव सुरूच...
  September 1, 07:20 PM
 • सिंधुदुर्ग- विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन अवघ्या एका दिवसावर आले आहे. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी कोकणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे. सिंधुदुर्गात गणेश चित्रशाळेमध्ये गणेश मुर्त्यांवर अखरेचा हात फिरविण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे. भाविकांची गणेशमुर्ती खरेदी करण्यासाठीही आता गर्दी केली आहे. कोकणात विशेषतः सिंधुदुर्गात शाडूच्या मातीच्या मुर्ती बनविल्या जातात....
  August 31, 11:30 AM
 • रत्नागिरी: रत्नागिरीजवळील पोमेंडे येथे रेल्वे रुळांवर संरक्षक भिंत कोसळल्याने मंगळवारी कोकण रेल्वेसेवा ठप्प झाली. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान, युद्धपातळीवर प्रयत्न केल्याने सायंकाळनंतर रेल्वेसेवा सुरळीत झाली.मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास संरक्षक भिंत कोसळून माती आणि दगड मोठ्या प्रमाणावर रेल्वे रुळांवर जमा झाल्याने येथील ट्रॅकवर दोन फूट पाणी साचले. पोमेंडीजवळ संरक्षक भिंत कोसळण्याची या पावसाळ्यातील ही तिसरी वेळ आहे. रेल्वे प्रशासनाच्या...
  August 31, 02:01 AM
 • मुंबई: गेल्या तीन-चार दिवसांपासून कोकणामध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम पुन्हा एकदा कोकण रेल्वेवर झाला आहे. रत्नागीरीजवळ पोमेंडी घाटात संरक्षक भिंत पुन्हा एकदा कोसळली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतुक ठप्प झाली आहे. अनेक रेल्वेगाड्या वेगवेगळ्या स्थानकावर थांबविण्यात आल्या आहेत. ढिगारा काढण्यासाठी 5-6 तास लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सव सुरु होण्याच्या आधी नागरिकांचे हाल होत आहेत. हजारो प्रवासी अडकून बसले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईकडे येणारी...
  August 30, 05:00 AM
 • रत्नागिरी: जिल्ह्यात दापोली तालुक्यात मुरूड -कर्देबीच येथे खचलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने एस. टी. बस रस्त्याच्या १० फूट खाली कोसळून चालकासह १४ प्रवासी जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. कर्देहून दापोलीकडे परतत असताना हा अपघात घडला. सुदैवाने गाडी कोसळली तेथे समुद्राची वाळू असल्याने प्रवासी बचावले. दापोली बसस्थानकातून सकाळी ७ वा. एमएच-२०-डी-८९०९ ही दापोली-कर्दे गाडी घेवून दापोली आगारातून कर्दे येथे निघाली असता हा अपघात घडला. या अपघातात लक्ष्मी सुरेश माने (६०), मनाली...
  August 29, 05:57 AM
 • सिंधुदुर्ग- जिल्ह्यात 'लेप्टो'ची साथ पसरली असताना नव्याने डेंग्यूची साथही डोके वर काढू लागली आहे. कुडाळ तालुक्यातील आम्ब्रड येथील सुरेश विष्णू कदम या ५५ वर्षीय इसमाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. कदम यांना चार-पाच दिवस ताप येत होता. त्यामुळे त्यांना कुडाळ येथील उप रुग्णालयात हलविण्यात आले होते कुडाळमध्ये डेंग्यूची पसरली आहे. याशिवाय मालवणातही डेंग्यू तापाचे रुग्ण आढळत आहेत. मालवण नगरपालिकेने डास प्रतिबंधक मोहीम हाती घेतली आहे. मालवणात गेल्या दोन दिवसात बाजारपेठील २५ जणाचे रक्त...
  August 28, 05:11 PM
 • रायगड: जिल्ह्यातील मुरुड येथील नवाब राजवाड्यात एका माथेफिरू डॉक्टरने हवेत गोळीबार केल्याची घटना शनिवारी घडली. मुरुड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटना स्थळी पोहचून या माथेफिरूला ताब्यात घेतले आहे. मोहन तुकाराम रोटकर असे या डॉक्टरचे नाव आहे. मोहन रोटकर हे शनिवारी नवाब राजवाडा पाहण्यासाठी मुरूड येथे आले होते. राजवाड्यात शिरून मुख्य दरवाज्यासमोर स्वत:कडे असलेल्या भारतीय बनावटीच्या पिस्तुलमधून त्यांनी हवेत गोळीबार केल्याने राजवाड्यात खळबळ उडाली. राजवाड्यातील सुरक्षारक्षक...
  August 27, 10:05 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात