जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Ratnagiri

Ratnagiri News

 • सिंधुदुर्ग: गोव्याच्या धर्तीवर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनाढ्य मच्छीमारांनी यांत्रिक मासेमारी सुरु केल्याने पारंपारिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यांत्रिक मासेमारीमुळे आपले जीवन उद्धवस्त होणार अशी भावना त्यांच्या निर्माण झाली आहे. सध्या सिंधुदुर्गची किनारपट्टीवर पारंपारिक आणि यांत्रिक मच्छीमारी (ट्रॉलर) असा संघर्ष पेटला आहे. गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरील समुद्रात पर्ससीन बोटी मासेमारी करताना आढळून होत्या. त्यामुळे पारंपारिक...
  August 27, 07:02 PM
 • सिंधुदुर्ग: सक्षम जनलोकपाल विधेयक सरकारने मंजूर करावे, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. मालवणकरांनीही अण्णांना पाठिंबा दर्शविला असून धरने आंदोलन सुरु केले आहे. गुरुवारी तिसर्या दिवशी महाविद्यालयातील युवक-युवतींना सायकल रॅली काढून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मसुरे, चिन्दर या गावातही अण्णांच्या समर्थनार्थ प्रभात फेरी काढण्यात आली. मालवणमध्ये सुरू असलेल्या धरणे आंदोलनात हजारो नागरीकांनी सहभाग घेतला आहे. सावंतवाडी...
  August 26, 03:34 PM
 • सिंधुदुर्ग - मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटण येतील हॉटेल मधुबनच्या आवारातील एस टी डी बूथ वर नोकरीस असलेल्या मीनल मनोहर गुरव ( १९) या युवतीचा एअरगनची गोळी लागून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. एअरगन एकमेकाकडे खेचताना एअरगन मधून सुटलेली गोळी मीनल हिच्या नाकात घुसून आरपार गेल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली असून पोलिसांनी या प्रकरणी संशयित म्हणून प्रवीण वामन पवार (१९) याला ताब्यात घेतले आहे. ही एअरगन कुणाची याबाबत पोलीस तपास करीत असूनपोलीस उपविभागीय...
  August 26, 09:42 AM
 • संगमेश्वर - मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे लवकरात लवकर बूजविण्यात यावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले. २५ ऑगस्ट पासून या रस्त्याच्या कामाला सुरवात केली जाईल असे आश्वासन अभियंता महाले यांनी दिले आहे. संगमेश्वर ते कोळंबे या मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक अत्यंत धोकादायक झाली आहे. छोटे मोठे अपघात ही नित्याची बाब झाली आहे. प्रशासन एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पहात आहे का, असा सवाल मनसे तर्फे...
  August 24, 02:31 PM
 • रत्नागिरी : अण्णा हजारे कृती समितीच्या मशाल फेरीला दोन दिवसांपूर्वी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर आता बुधवारपासून (ता. 24) साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सक्षम जन लोकपाल विधेयक जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण केले जाणार असल्याची माहिती कृती समितीचे अभिजित हेगशेट्ये यांनी पत्रकारांना दिली. अण्णा हजारे कृती समितीला जिल्ह्यातून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे जिल्हा कृती समिती तयार करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मशाल...
  August 23, 12:17 PM
 • मुंबई-गोवा महामार्गावरवरील वालोपेजवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. एसटी बस आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली यात पेठमाप येथील फजल मुजावर जागेवरच ठार झाले आहे. चिपळूणहून गणपतीपुळे-मुंबई जाणारी बस भरधाव वेगात येत असतांना या बसची मुजावर यांच्या दुचाकीला जोरदार ठोस दिली. यात मुजावर जागेवरच ठारे झाले तर त्यांची दुचाकी पुर्ण चुरा झाली आहे. बसचालक अमर शेख याने अपघाताची माहिती चिपळून पोलिसांना कळविली. पेठमाप येथे अपघाताची माहिती कळताच गावावर शोककळा पसरली. मुजावर...
  August 22, 02:07 PM
 • सिंधुदुर्ग - वैभववाडी तालुक्यातील येडगाव गावात बिबट्या ने धुमाकूळ घातला असून येड्गावातील जयवंत धोंडू रावराणे यांच्या मालकीच्या बैलावर हल्ला करून बैल मारून टाकल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात श्री रावराणे यांचे सात हजाराचे नुकसान झाले असून वन विभागाने तातडीने एड गावात भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला बिबट्या मानवी वस्तीत घुसू लागल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे
  August 21, 01:23 PM
 • सिंधुदुर्ग - लोकपाल विधयाकावरून केंद्र सरकार हादरवून सोड्नाय्रा जेष्ठ समाजसेवक अन्ना हजारे यांच्या समर्थनार्थ आज मालवणात भव्य मोर्चा काढण्यात आला जो करेगा भ्रष्ट्राचार उसको मारो जुते चार , अन्ना हजारे अंगार है बाकी सब भंगार है लोकपाल बिल लाना है भारत भ्रष्ट्राचार मुक्त करणा है अश्या घोषणा देत मोर्चेकरी मंडळीनी आसमंत दुमदुमून टाकला या मोर्च्यात जेष्ठ नागरिकांबरोबरच युवा वर्ग सहभागी झाला होता भर पावसात हा मोर्चा काढण्यात आला तरी गर्दी मोठी होती; मोर्चेकरी मंडळीनी तहसीलदारांना...
  August 19, 01:53 PM
 • नांदगाव-मधलीवाडी शाळेची बक्षीसपत्र केलेल्या जागेची मोजणी न करता वर्गखोल्या मंजूर करण्यात आल्या. त्यानुसार वर्गखोल्यांचे बांधकाम परस्पर चालू केले आहे. यासंदर्भात वर्गखोल्यांचे बांधकाम करताना बक्षीसपत्राने जिल्हा परिषदेच्या नावाने कोणती जमीन प्रत्यक्षात दिलेली आहे, त्याची भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून घेऊन त्यानंतर जागा निश्चित झाल्यावरच प्रत्यक्षात बांधकाम करणे आवश्यक असते. कणकवली गटशिक्षणाधिकारी यांनी तसे न करता परस्पर वर्गखोल्या बांधकामास मान्यता देऊन बांधकाम सुरू...
  August 19, 01:48 PM
 • सिंधुदुर्ग - शासनाने वर्ग तीन व चारच्या जिल्हा परिषदेतील कर्मचारी भरतीला एक वर्षासाठी स्थगिती दिली होती. जूनमध्ये ही स्थगिती उठवून पुन्हा जुलैमध्ये पुन्हा एक वर्षासाठी स्थगिती दिली आहे. आता शासनाने यापैकी अनुशेषाच्या जागा भरण्याचे आदेश काढले आहेत.जिल्हा परिषदेतील वर्ग तीन व चारच्या रिकामी पदे भरतीला शासनाने एक वर्षासाठी दिलेली स्थगिती उठविल्यास 100 हून जादा पदे भरली जाणार आहेत.
  August 19, 01:45 PM
 • सिंधुदुर्ग - अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचारविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. लोकशाही अधिक बळकट करणाऱ्या आणि भ्रष्टाचाराला विरोध दर्शविणाऱ्या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सर्व स्तरांवरून जोरदार पाठिंबा मिळू लागला आहे. जिल्ह्यातील डॉक्टर, विद्यार्थी, शिक्षक, कलाकार, व्यावसायिक, लोकप्रतिनिधी आदी विविध क्षेत्रांतील महिला-पुरुषांनी आज जिल्हाधिकारी सिंह यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या वेळी वंदना करंबेळकर, परशुराम गंगावणे, सचिन देसाई, मीनल देसाई, मृणाल देसाई, प्रशांत भाट, शंकर प्रभू...
  August 18, 04:14 PM
 • दापोली - तालुक्यातील विसापूर येथे पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकून जुगाराच्या साहित्यासह चार संशयितांना अटक केली.खेड विभागाचे पोलिस उपअधीक्षक पाटील हे मंडणगड ते खेड येथे गस्त घालत असताना त्यांना विसापूर येथे काही जण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी या ठिकाणी धाड टाकून जुगाराचे साहित्य, दोन हजार 320 जप्त केली असून या प्रकरणी नरेंद्र वालेकर (करंजाणी), नियाज पेवेकर (सातेरे), संजय जांभळे (हातीप) व संजय पाटील (खोंडा, दापोली) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  August 18, 04:11 PM
 • सिंधुदुर्ग - जिल्ह्यात लेप्टो स्पायरोसीसच्या आजाराचे रुग्ण सापडण्याचे प्रकार अजूनही सुरूच असून जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील राऊतवाडी येथील सुरेश नारायण मिराशी (40) या व्यक्तीला लेप्टोची लागण झाली आहे. आता जिल्ह्यात एकूण 13 लेप्टो पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली आहे. गतवर्षी ऐन भात कापणीच्या वेळी जिल्ह्यात थैमान घालत 27 जणांचे बळी घेतलेल्या लेप्टोने जिल्ह्यात यावर्षी लावणीच्या कालावधीत आपले आगमन केले आहे. आतापर्यंत या आजाराचे 12 रुग्ण कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण आणि वैभववाडी या...
  August 18, 04:10 PM
 • अलिबाग - रायगड जिल्ह्यातील परंपरागत बैलगाडीच्या शर्यती बंद होणार आहेत. पर्यावरण मंत्रालयातर्फे कायद्यातील तरतुदीप्रमाणे बैलांच्या शर्यतींवर बंदी घालण्यात आली आहे.सणासुदीला आयोजित केल्या जाणा-या रायगड जिल्ह्यातील परंपरागत बैलगाडीच्या शर्यती बंद होणार आहेत. शर्यतीबाबत आखून दिलेल्या नियमांनंतरही बैलांचा छळ केला जात असल्याचे एका प्राणिमित्र संस्थेने मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.प्रतिबंधक कायद्याची अमलबजावणी यापूर्वीही होत होती...
  August 17, 03:15 PM
 • सावंतवाडी - "इन्कलाब जिंदाबाद', "अण्णा हजारे आगे बढो, हम तुम्हारे साथ है', "वंदे मातरम्' अशा घोषणा देत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी जनलोकपाल विधेयकाच्या समर्थनार्थ उर्त्स्फूतपणे रस्त्यावर येत जनजागृती केली. बापूसाहेब महाराज पुतळ्यासमोरून प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. या वेळी पोलिस बंदोबस्त होता. मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर येताच त्याचे रूपांतर छोटेखानी सभेत झाले. प्रा. दुखंडे यांनी या...
  August 17, 03:12 PM
 • सिंधुदुर्ग - जिल्हा दूरसंचार प्रबंधक प्रभाकर पाटील यांना कणकवली येथील कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गोटय़ा सावंत यांनी सावंतवाडी येथील त्यांच्या कार्यालयात येऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिल्याची तक्रार प्रभाकर पाटील यांनी सावंतवाडी पोलिसांत दिली आहे. पोलीस निरीक्षक शिंदे यांनी त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या निवासस्थानी दोन पोलीस तैनात केले आहेत. मंगळवारी दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान गोटय़ा सावंत आपल्या सहकार्यांसह सावंतवाडी येथील दूरसंचार कार्यालयात गेले....
  August 17, 03:11 PM
 • कुडाळ - तालुक्यातील निकृष्ट रस्त्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सिंह यांचे निवेदन देऊन लक्ष वेधले. तालुक्यातील खराब व निकृष्ट रस्त्यांच्या कामाबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष राजेश पडते यांनी जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.त्रस्त जनता संबंधित खात्याकडे वारंवार तक्रार करूनही अधिकारी जाणूनबुजून कानाडोळा करतात.या...
  August 17, 03:09 PM
 • रायगड: जिल्ह्यातील पेण येथील दीनदयाळ पतसंस्थेत कर्ज वाटपात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. पतसंस्थेत कर्ज वाटपात गैरव्यवहार झाल्याचे विशेष लेखी परीक्षकांच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. सन 2002 ते 2007 या कालावधीत कर्ज व्यवहारात अनेक त्रुटी व नियमबाह्य गोष्टी लेखा परीक्षकांच्या लक्षात आल्या. चौकशी अहवाल पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा निबंधकांकडे पाठविण्यात आला आहे. या अवहालानुसार दीनदयाळ पतसंस्थेच्या संचालक मंडळावर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पेण अर्बन...
  August 15, 11:58 AM
 • नेरुळ: पैशासाठी नव-याकडून वारंवार होणा-या छळाला कंटाळून नेरुळ येथून जवळच असलेल्या अवसरे गावातील एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नीता खाडे असे मृत महिलेचे नाव आहे. नवयाकडून वारंवार होणारी पैशांची मागणी आणि त्याच्याकडून होणार शाररिक व मानसिक छळाला कंटाळून या महिलेने स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर गायकरला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा होमगार्ड असल्याचे समजते.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2008 मध्ये ज्ञानेश्वरने पत्नी...
  August 12, 11:36 AM
 • रायगड: श्रावण महिना हा व्रतवैकल्पांचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात सणांची बरसात होत असते. श्रावणात सर्वत्र हिरवा निसर्ग पाहायला मिळत असतो. श्रावणातील सणांना केळीच्या पानांना मोठी मागणी असते. पर्यायाने परिसरातील आदिवासींना रोजगाराच संधी उपलब्ध होत असते. परिसरातील डोंगराळ भागात केळीची झाडे उगवतात, निसर्गाची देगणी असलेली ही पाने आदिवासींसाठी वरदान ठरली आहेत. जिल्ह्यातील पनवेल, पेण, अलिबाग, महाड, माणगांव, रोहा अशा ठिकाणच्या भाजी व फुलांनाही मोठ्या प्रमाणात मागणी असते.आदिवासी...
  August 12, 11:16 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात