जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Ratnagiri

Ratnagiri News

 • जिल्हा परिषदेमधील मागासर्गीयांचा अनुशेष भरण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार गट-क, ड वर्गातील पदांची भरती करण्याचे आदेश शासनाने जिल्हा परिषदेला दिले आहेत. तसेच या भरती प्रक्रियेचे वेळापत्रकही ठरवून देण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने जिल्हा परिषदेतील मागासवर्गींच्या अनुशेषाच्या सर्व पदांच्या भरतीवर स्थगिती दिली होती. त्यामुळे जि.प.तील अनेक कामे खोळंबली आहेत. आता या भरती प्रक्रियेमुळे कनिष्ठ अभियंता, कृषि अधिकारी, कृषि विस्तार अधिकारी, कनिष्ठ यांत्रिकी, आरोग्य...
  August 10, 06:06 PM
 • रत्नागिरी - मुंबई समुद्रात जलसमाधी मिळालेल्या रॅक जहाजातून होणा-या तेलगळतीमुळे रत्नागिरीच्या किना-यांना धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.पनामाचे एम.व्ही.रॅक जहाज मुंबईत ४ ऑगस्ट रोजी बुडाले. या जहाजातून मोठ्या प्रमाणात तेलगळती होत आहे. या तेलगळतीचा धोका रत्नागिरी किनारपट्टीलाही निर्माण होण्याची शक्यता असून जिल्हाधिका-यांनी सर्वच विभागांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. इंडोनेशियाहून गुजरातकडे जाणारे रॅक हे जहाज अरबी समुद्रात बुडाले आहे....
  August 9, 01:12 PM
 • रत्नागिरी - रत्नागिरीतील लांजा या गावी एका शेतक-याच्या झोपडीत बिबट्याच्या मादीने तीन पिलांना जन्म दिला आहे. बिबट्याच्या पिलांना पाहण्यासाठी गावक-यांनी मोठी गर्दी केली असून या पिलांची आई मात्र त्यांच्या रक्षणासाठी तिथेच ठाण मांडून बसली आहे. यामुळे गावक-यांच्या जमावावर बिबट्या केव्हाही हल्ला करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान गावक-यांनी वनविभागाला या घटनेची माहिती दिल्यानंतरही, कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. वनविभागाकडून झोपडीतून बिबट्याला बाहेर काढण्याची...
  August 7, 07:23 PM
 • मुंबई - २६ जूनला खालापूर येथील माऊंट व्ह्यू हॉटेलमधील रेव्ह पार्टीत सहभागी झालेल्या ७० जणांनी ड्रगसेवन केले असल्याचे वैद्यकीय अहवालातून निष्पन्न झाले आहे. त्यात अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाचा पोलिस निरीक्षक अनिल जाधव याचाही समावेश आहे. जाधवसह ड्रग पुरवठादार सुनील घुले, हॉटेलचा व्यवस्थापक राहुल खन्ना, पार्टीचे आयोजक स्नेहजित कार आणि कुशांत सुभाष कुमार हेदेखील दोषी आढळले आहेत, अशी माहिती रायगडचे पोलिस अधीक्षक एस. पी. शिंदे यांनी ही माहिती दिली. आता या सर्वांविरोधात अमली पदार्थांचे सेवन...
  August 6, 01:43 AM
 • रत्नागिरी: आकेरी येथील मतिमंद मुलांच्या निर्मलगिरी आश्रम परिसरात अचानक रानटी हत्तीने प्प्रवेश करून धुमाकूळ घातला. त्यामुळे मुलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आश्रमातील बागायतींचे ही मोठे नुकसान झाले आहे. मिळलेली माहिती अशी की, माणगाव खोयातील रानटी हत्ती अचनाक निर्मलगिरी आश्रम परिसरात घुसले. मुलांनी मोठ्या कष्टाने उभारलेल्या बागा हत्तीने तुडविल्या. तर नारळाच्या झाडांच्या कोवळ्या पाती व नव्याने बाहेर येणारे कोंब त्यांनी फस्त केले. तसेच भात शेतीचे मोठ्या प्रमाणात...
  August 5, 05:02 PM
 • राजापूर: दोन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शहरातून वाहणाया अर्जुना आणि कोदवली नदीला पूर आल्याने पुराचे पाणी थेट बाजारपेठमध्ये शिरले होते. त्यामुळे बाजारपेठेतील व्यापा-यांची तारांबळ उडाली होती. दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापा-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तब्बल 12 तासांनंतर पुराचे पाणी कमी झाल्यानंतर बाजारपेठेतील पाणी ओसरले. गेल्या चोवीस तासात तालुक्यात 148 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
  August 4, 03:01 PM
 • रत्नागिरी - सलग पाचव्या दिवशी कोकणात सुरु असलेल्या पावसामुळे रत्नागिरीतील काही भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे रत्नागिरीकरांना सुर्य दर्शनही झालेले नाही. त्यामुळे तापमानात घट होऊन रत्नागिरी गारठले आहे.रत्नागिरीसह कोकणात पावसाची संततधार पुढील २४ तास कायम राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.सिंधुदूर्ग जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. गेल्या 24 तासामध्ये जिल्ह्यात सरासरी पाच इंच पाऊस पडल्याची...
  August 1, 04:36 PM
 • रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. शुक्रवार - शनिवारी २४ तासात १२ से.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. किनार्यावर ९ फुट उंचीच्या लाटा उसळत आहेत. बुधवारपासून जिल्ह्यात पावसाने थैमान मांडले आहे. अशातच शनिवारी अमावास्येलाही पावसाचा जोर कायम राहिला. यामुळे आठवडाभर पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. पावसाने बंधारा वाहून गेल्याने लाटांमुळे किना-यावरील वाळू आता समुद्रात जात आहे. अशातच बंधाऱ्याच्या मजबुतीसाठी घातलेले सुमारे सहा टन...
  July 31, 03:10 PM
 • रत्नागिरी: रत्नागिरीसह रायगड, सिंधुदुर्ग परिसरात शनिवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून बळीराजाही सुखावला आहे.रत्नागिरीत 201 मिलीमीटर, दापोलीमध्ये 219 मिली मीटर, संगमेश्वर 136 मिली मीटर, राजापूर 132 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. वैभववाडीत 124 मिलीमीटर, कणकवली 180 मिलीमीटर, वेंगुर्ल्यात 114 मिलीमीटर, सावंतवाडी 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
  July 30, 05:17 PM
 • सिंधुदुर्ग- आज शनि अमावस्या आहे. त्यामुळे राज्यातील तसेच देशभरातील शनि मंदिरात शनिभक्तांची गर्दी होत आहे. मालवण तालुक्यातही प्रसिद्ध शनि मंदिर आहे. काळसे हुबलीचा माळ येथील जागृत देवस्तान म्हणून गणल्या गेलेल्या शनि मंदिरात शनि अमावस्येनिमित्त भक्तांनी गर्दी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याशिवाय रत्नागिरी, कोल्हापूर, बेळगाव तसेच गोवा भाविक दर्शनासाठी येतात. हुबलीचा माळ येथे १९३० साली राघो परब घराण्यातील विश्राम रघुनाथ प्रभू यांनी सर्वप्रथम मारुतीचे छोटे मंदिर बांधले. नंतर १९३७...
  July 30, 12:57 PM
 • सिंधुदुर्ग - शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक कर्ज उपलब्ध व्हावे, म्हणून बॅंकांच्या समन्वय समितीने 120 कोटींचे पीक कर्ज वाटप उद्दिष्ट मंजूर केले आहे. पालकमंत्री तथा उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली दोन वेळा जिल्ह्यातील बॅंकांच्या समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकांमध्ये सर्व पात्र शेतकरी सभासदांना जास्तीत जास्त पीक कर्ज वाटप करण्याचे आदेश पालकमंत्री राणे यांनी दिले होते. त्याप्रमाणे बॅंकांच्या समन्वय समितीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक कर्ज वाटप...
  July 28, 03:23 PM
 • रायगड: जिल्ह्यातील खालापूर येथे झालेल्या रेव्हपार्टीतील 10 जणापैकी सात जणांची वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे रेव्ह पार्टीतील सहभागी तरुणांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. अहवालानुसार या सात तरुणांनी ड्रग्ज घेतल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेची शक्यता आहे. तसेच काही जणांचे अहवाल अजून यायचे आहे. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. खालापूर येथील माऊंट व्ह्यू रिसॉर्टमध्ये गेल्या महिन्याच्या 26 ला सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर...
  July 27, 01:33 PM
 • सिंधुदुर्ग: कोकणात गणेशोत्सवाला आगळे-वेगळे महत्त्व आहे. मालवणी मुलखात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असली तरी घरगुती गणपती मोठ्या प्रमाणात पूजले जातात. त्यामुळे गणेशोत्सवाला मालवणी मुलखात फार मोठे महत्त्व आहे. सध्या मालवणी मुलखात गणेशोत्सवाचे वेध लागले आहे. गणेश चतुर्थी एक महिन्यावर आली असताना गणेश मूर्ती बनविण्याच्या कामाला वेग आला आहे. गणेश शालामध्ये मूर्तीची माती मळण्यापासून मूर्ती बनविण्यापर्यंत मूर्तीकार व्यस्त आहे. याशिवाय गणेशोत्सवात...
  July 27, 10:18 AM
 • आंबोली घाटात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळत आहेत. त्यामुळे पर्यटक, घाटातून जाणारी वाहने यांना धोका निर्माण झाला आहे. दरडींबाबत ठोस उपाययोजना करण्यासाठी भूवैज्ञानिक पथकाला पाचारण करण्याचा ठराव जिल्हा नियोजनच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी विरेंद्रसिंह यांनी दोन दिवसांपूर्वी घाटाची पाहणी केली होती. त्यानुसार वन विभागाने तयार केलेल्या प्रस्तावाला उद्योगमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नारायण राणे यांनी मंजुरी देत कोसळणा-या दरडींबाबत ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
  July 26, 05:53 PM
 • सिंधुदूर्ग जिल्हा सौंदर्याने नटलेलाच. जिल्ह्यातील मालवण तालुक्यात बिलवस येथे श्री सातेरी जल मंदिरात दरवर्षी जत्रा भरते. पाण्याने वेढलेल्या या मंदिराचा परिसर निसर्गसौंदर्याने भरलेला आहे. पावसाळ्यात तर या ठिकाणचे सौंदर्य अधिकच खुलुन जाते. पावसाळा सुरु झाल्यानंतर या ठिकाणी जत्रा भरते. या जत्रेला मुंबई, पुणे तसेच महाराष्ट्रातील इतर भागातूनही भाविक येतात.
  July 24, 08:39 PM
 • रेवदंडा: येथून जवळच असलेल्या सुडकोली गावात पोलिसांनी केलेल्या छापेमारीत हातभट्टी दारुचा अड्डा उद्ध्वस्त केला असून एका बंद घरातून काळ्या गुळाच्या 30 ढेपांसह हातभट्टीची दारुही जप्त करण्यात आली आहे. आरोपी नथूराम तांबडकर हा फरार आहे. या व्यतिरिक्त सुडकोली गावातील ओहोळा ठिकाणी 63 हजार रूपये किंमतीचे गुळ नवसागर मिश्रीत रसावनाच्या 15 टाक्या आढळून आल्या. पोलिसांनी त्या त्याच ठिकाणी नष्ट करण्यात आल्या. हे छापे उपविभागीय पोलिस अधिकारी अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली टाकण्यात आले. पुढील तपास...
  July 24, 01:28 PM
 • सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील तळगाव येथे दरड कोसळल्याने या मार्गावरील ठप्प झालेली कोकण रेल्वेची वाहतूक त्यानंतर तब्बल 30 तासांनतर सुरु झाली. शनिवारी सकाळी या मार्गावरील वाहतूक सुरू झाल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.दरम्यान, शुक्रवारी पहाटे तळगावजवळ दरड कोसळून माती आणि दगड रेल्वे मार्गावर आल्याने दोन्ही बाजुंची वाहतून पूर्णपणे ठप्प झाली होती. अनेक गाड्या विविध रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचा प्रचंड खोळंबा झाला होता. दरवर्षी पावसाळ्यात कोकण रेल्वे...
  July 22, 02:38 PM
 • मुंबई. गौरीगणपतीसाठी कोकणात जाणा-या गणेशभक्तासांठी एसटीने २७ जुलैपासून आरक्षणाची सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी एसटीचे मुंबई विभागातील सर्व संगणक आरक्षण केंद्र २४ तास खुले राहणार आहेत. मुंबई, सेंट्रल, परळ दादर, कुर्ला नेहरु नगर बोरवली, सायन, मैत्रीपार्क, वाशी, ठाणे, पनवेल या एसटीच्या केंद्राव्यक्तीरिक्त ८० खाजगी आरक्षण केंद्रावरही कोकणात जाणा-या एसटीचे आरक्षण उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. गौरी गणपतीला जाण्यासाठी एसटीचे हे आरक्षण २७...
  July 22, 03:31 AM
 • सिंधुदूर्ग - गेल्या ३-४ दिवसांपासून तळ कोकणात तळ ठोकून असलेल्या पावसाने हाहाकार उडाला आहे. गेल्या २४ तासात वैभववाडीत १८२ मिलीमीटर, तर कणकवलीत ११९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे मालवण तालुक्यात आलेल्या पुराची काही छायाचित्रे खास तुमच्यासाठी.
  July 19, 06:39 PM
 • रत्नागिरी. सलग तिस-या दिवशी सोमवारी कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम होता. दरड कोसळल्यामुळे ठप्प झालेली कोकण रेल्वे रविवारी सायंकाळी रुळावर येत नाही तोच सोमवारी पोमेंडी येथील संरक्षक भिंत रुळावर कोसळल्याने पुन्हा ही रेल्वेसेवा ठप्प झाली. रत्नागिरी, रायगडवर वरुणराजा कोपला असून, या दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे ७० गावांचा तर पश्चिम महाराष्ट्रातील ३० गावांचा पुरामुळे संपर्क तुटला आहे. तसेच श्रीवर्धन येथील सायगाव धरणात दोन जण वाहून गेले. कोकणातील मुसळधार पावसामुळे...
  July 19, 04:30 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात