जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Ratnagiri

Ratnagiri News

 • रत्नागिरी- कुडाळ ते सिंधुदुर्ग स्थानकांदरम्यान तळगाव राणेवाडी येथे शनिवारी मध्यरात्री दरड कोसळल्याने कोकण रेल्वेला ब्रेक लागला होता. परंतु, मुसळधार पावसामुळे आज पोमेंडी येथे संरक्षक भिंत रेल्वे रुळांवर कोसळल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतुक 21 जुलैपर्यंत बंद करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात ही भिंत खचली होती. त्यावेळीही 3 दिवस कोकण रेल्वे ठप्प झाली होती. काही भागात रेल्वे मार्गावर पाणी आले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. रुळांवर आलेली माती आणि भिंतीचा भाग...
  July 18, 01:57 PM
 • कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला रविवार मुसळधार पावसाने झोडपले. दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण जिल्ह्यात जनजीवन विस्कळित झाले आहे.संततधार पावसामुळे चिपळूण तालुक्यात वशिष्ठी आणि शिवनदीला पूर आला. पुराचे पाणी शहरातील बाजारपुलावरून वाहू लागले. पुराच्या पाण्याने मच्छीमार्केट, बाजारपेठ, चिंचनाका, अनंत आइसफॅक्टरी परिसर, खाटिक गल्ली, वडनाका परिसरालाही वेढले.जिल्ह्यांतील अनेक नद्या दुथडी भरून वाहात असून, अनेक नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे....
  July 18, 01:54 PM
 • रत्नागिरी: मुंबईसह कोकणात शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच सिंधुदुर्ग आणि ओरोस स्थानकदरम्यान रेल्वेमार्गावर दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची दोन्ही बाजंूची वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, आठ ते दहा तास युद्धपातळीवर प्रयत्न केल्यानंतर ही सेवा सुरळीत झाली.सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक छोट्या- मोठ्या शहरांतील प्रमुख रस्त्यांवर...
  July 18, 01:22 AM
 • सिंधूदुर्ग - जिल्ह्यातील तळगावजवळ दरड कोसळून कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. मागील ४८ तासांपासून कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधूदुर्ग या जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. रविवारी सकाळी सिंधूदुर्गातील तळगावजवळ रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यानंतर तातडीने रेल्वे कर्मचारी ट्रॅकवरील माती दूरकरण्याच्या कामाला लागले आहेत. मात्र जोरदार पावसामुळे कामात अडथळ येत असल्याचे रल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. दादर - सावंतवाडी रेल्वे ही थांबवण्यात आली...
  July 17, 10:08 AM
 • रत्नागिरी: विजेचा धक्का बसल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोटा गावातील तरुण शेतकरी पती- पत्नीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. शेतात काम करत असताना विजेच्या खांबासाठी असलेल्या सपोर्ट तारेत विद्युत प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का लागून शेतकरी दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. शेतातून जाणा-या ११ के. व्ही विजेच्या तारेचे खांब मागील ४० वर्षांपासून खराब झालेले आहेत. महावितरणच्या दुर्लक्षामुळे हे खांब अजूनही धोकादायक स्थितीत आहेत. महावितरणने या घटनेची पूर्ण चौकशी...
  July 17, 05:29 AM
 • रायगड - निसर्ग सुंदर कोकणाचा विकास व्हावा यासाठी कोकणात सिनेनिर्मीतीसाठी स्टुडिओ उभारण्याबाबत शासन निश्चित प्रयत्न करेल. असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. रोहे येथे नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या डॉ.चिंतामणराव देशमुख शहर सभागृहाच्या नुतनीकरणाचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या सभागृहाचे उदघाटन करण्यात आले. उदघाटन समारंभाला सिनेअभिनेता नाना पाटेकर, सुबोध भावे, कलादिग्धर्शक आणि निर्माते चंद्रकांत देसाई रायगड जिल्हयाचे...
  July 16, 11:25 AM
 • अलिबाग: मुंबईतील जव्हेरी बाजार भागात बुधवारी झालेल्या बॉम्बस्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला. त्यात रायगड जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. मृतांमध्ये राजेश रामजी खेडेकर (वय 28, ता. तळा), तुषार गंगाराम कोळंबे (वय 24, ता. म्हसळा) अशी त्यांची नावे आहेत. रमेश भागोजी खेडकर, नामदेव नारायण धुलूप, शशिकांत महोदव वाघे, सोनू रामचंद्र भुवड व दिनेश ढवळे हे म्हसळे तालुक्यातील सहा जण जखमी झाले आहेत. मृतांच्या नातेवाइकांना पाच लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी एच. के. जावळे यांनी...
  July 16, 02:29 AM
 • सावंतवाडी - विवाहितेला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अति प्रसंगाचा प्रयत्न करणार्या सचिन शर्मा व शिरीन शहा यांना मंगळवारी न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी रद्द करून 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपींच्या वतीने उद्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात येणार आहे. त्या महिलेने बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा पुरवणी जबाब दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
  July 13, 05:31 PM
 • वेंगुर्ले - येथील साई मंगल कार्यालयात वेंगुर्ले पंचायत समितीची आमसभा आ. दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आमसभेची सुरुवातच वादळी झाली. जि. प. सदस्यांची नवाबाग याठिकाणी होत असलेल्या फिशिंग व्हिलेजबाबत चर्चा चालू असतानाच काँग्रेसच्याच कार्यकर्त्याने विरोध केला. तेव्हा दोन्ही कार्यकत्र्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी आ. केसरकर यांनी हे भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला; परंतु कॉंग्रेसचे कार्यकर्ते यांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद न देता अधिकच गोंधळ घालण्यास...
  July 13, 05:26 PM
 • रत्नागिरी - जैतापूर प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणाऱयांना पाठिंबा देण्यासाठी रत्नागिरी दौऱयावर आलेले कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश कारत यांच्या कार्यकर्त्यांवर मंगळवारी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. कारत यांनी मंगळवारी जैतापूर प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दगडफेक करणाऱयांना ताब्यात घेतले. कामत यांनी आधीपासूनच जैतापूर प्रकल्पाला विरोध केला आहे....
  July 12, 07:36 PM
 • रायगड - जिल्ह्यातील विविध तालुक्यांत भातलावणीची सुमारे ६५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने धुवॉंधार बरसून हजेरी लावली होती. त्यामुळे शेतीच्या कामांना जोमाने सुरुवात केली आहे. परंतु अचानक खंड पडल्याने भाताची रोपे करपण्याच्या भीतीने बळिराजा हवालदिल झाला होता. जुलै महिन्यात पाऊस अधूनमधून बरसत असल्याने रोपे तग धरून राहिली. जिल्ह्यातील काही तालुक्यांतील ग्रामीण भागांमध्ये खतांचा काही प्रमाणात तुटवडा आजही जाणवत आहे. पावसाची कृपादृष्टी अशीच राहिल्यास लवकरच...
  July 12, 12:45 PM
 • राजापूर - रेशनिंगधारकांना वितरण करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या रॉकेलच्या टाकीचे कुलूप तो़डून 3 हजार लिटर रॉकेल काल (ता. 10) रात्री अज्ञातांनी चोरले.त्यामुळे राजापूर बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. दिनेशकुमार जैन शहरातील अर्जुना-कोदवली नद्यांच्या संगमानजीक बंदरधक्क्याजवळ पेडणेकर बिल्डिंगमध्ये एका टाकीत रॉकेलचा साठा करतात. ते हेरून रात्री उशिरा बाजारपेठेत असलेली शांतता आणि काळोखाचा फायदा घेत अज्ञातांनी टाकीला लावलेले कुलूप तो़डून चोरी केली. चोरट्यांनी सुमारे 3 हजार लिटर रॉकेल लांबविल्याचे...
  July 12, 12:25 PM
 • आकेरी - आराम बसने ट्रकला दिलेल्या धडकेत चालकांसह सहा प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघात झाराप-खानमोहल्ला येथे घडला. ट्रॅव्हल्स मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होती. अचानक मोटारसायकलस्वार समोर आल्याने ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रॅव्हल्सची समोरूण येणा-या ट्रकला धडक बसली. रस्त्यावर काचांचा खच पटला होता. महामार्गावरील वाहतूक अर्धा तास बंद होती.जखमी प्रवाशांना सावंतवाडी कुटिर रुग्णालयात दाखल केले. अधिक तपास कुडाळचे हवालदार एल. एस. जाधव करीत आहेत. घटनास्थळी पोलिस निरीक्षक जे....
  July 12, 12:04 PM
 • पनवेल: ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम...विठू माऊली तू माऊली जगाची....विठूचा गजर हरिनामाचा... या ओव्यांच्या जयघोषाने पनवेलसह पेण दुमदुमुन गेले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पनवेल व पणमधील शालेय विद्यार्थ्यांनी वारकरी दिंडी काढून तुळशी लावा दारी, आरोग्य सुधारेल घरोघरी, इंधन वाचवा, झाडे लावा यांसारखे संदेश देण्यात आले. संतश्रेष्ठ ज्ञानोबा, संत तुकाराम, संत रामदास, मुक्ताई व विठ्ठल रखुमाईच्या वेषभूषेतील छोट्या वारकयांनी नागरिकांचे लक्ष वेधले होते. पनवेल येथील कोकण एज्युकेशन...
  July 10, 11:50 AM
 • महाड: नऊ वर्षीय विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणार्या कोळोसे येथील प्राथमिक शाळेतील रावसाहेब खरे (४५) या शिक्षकाला शहर पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेला शिक्षक दारूच्या नशेत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.कोळोसे येथील जि. प. च्या शाळेतील इयत्ता तिसरीत शिकत असलेली ही विद्यार्थिनी बुधवारी शाळेत गैरहजर असल्याने आदल्या दिवशीच्या अभ्यासाची माहिती सांगण्याच्या बहाण्याने सदर शिक्षकाने मुलीला थांबवले. वर्गाचा दरवाजा बंद करून विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केले. घाबरलेल्या मुलीने आईला...
  July 8, 07:47 PM
 • कणकवली: मुंबईतील नरीमन पॉइंट येथील राष्ट्रवादी भवनात गुरुवारी प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे युवा नेते संदेश पारकर यांची प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. या निवडीचे वृत्त जिल्ह्यात धडकताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून आनंद साजरा केला. पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष पिचड यांनी दिलेल्या संधीचे सोने करून कोकणात पक्षाचा विस्तार करण्यासाठी...
  July 8, 11:48 AM
 • अलिबाग - राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करा; अन्यथा वेगळे परिणाम होतील, अशी धमकी खासदार पद्मसिंह पाटील यांचे आमदार पुत्र राणा जगजितसिंह यांनी पवनराजे निंबाळकर यांना दिली होती, अशी साक्ष पवनराजे यांचे मेहुणे डॉ. आबासाहेब चव्हाण यांनी बुधवारी अलिबाग कोर्टात दिली.पवनराजे हत्याकांडात साक्षी नोंदविण्याचे काम तीन दिवसांपासून सुरू आहे. पवनराजे यांच्या पत्नीचे भाऊ डॉ. चव्हाण यांची साक्ष बुधवारी नोंदविण्यात आली. यावेळी त्यांनी पवनराजेंना धमकी देण्यात आल्याचे न्यायालयास सांगितले....
  July 7, 03:15 AM
 • रत्नागिरी: राज्यात सर्व जिल्ह्यांत ई-चावडी ही संकल्पना कार्यान्वीत केली जात असताना ही संकल्पना आपल्या जिल्ह्यातही सुरू व्हावी, या साठी जिल्ह्यातील चारशे पैकी 350 तलाठी स्वखर्चाने लॅपटॉप खरेदी करणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आता त्यांच्या दारात सात-बाराचे उतारे व इतर दाखले एका क्लिकवर दिले जाणार आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातही हा प्रयोग येत्या महिनाभरात केला जाणार आहे. त्यानुसार शासनदारातच सात-बारा, रहिवासी, उत्पन्न आदी दाखल गावातील नागरिकांना दारात जाऊन त्यांच्या मागणीनुसार...
  July 5, 03:09 PM
 • अलिबाग - गणेश उत्सवाला दोन महिने राहिले असताना छोट्या आणि आकर्षक मूर्तींसाठी प्रसिद्ध असणा-या पेणमध्ये श्रींच्या मूर्ती बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वाढत्या महागाईचा गणेशभक्तांनाही फटका बसणार असून यंदा मूर्तीच्या किमतीत सुमारे 20 टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे. तसेच पेणमधून यंदा सुमारे दहा हजार मूर्तींची निर्यातही होणार आहे. रायगड जिल्ह्यातील पेण हे गाव गणेशमूर्ती बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील सुमारे ५०० कारखान्यांमधून दरवर्षी १२ लाख गणेशमूर्ती तयार केल्या जातात....
  July 4, 12:52 AM
 • गुहागर तालुक्यातील अडुरमधून खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना आपल्या प्राणास मुकावे लागले. गेल्याच महिन्यात याच गावातील दोन शालेय विद्यार्थ्यांचा चिरेखाणीत पडून मृत्यू झाला होता. एकाच कुटुंबातील निकेतन घाणेकर आणि स्वप्नील घाणेकर हे दोघेजण त्यांच्याच गावातील गणपत आरेकर (वय 55) यांना घेऊन गुरुवारी खेकडे पकडण्यासाठी दुर्गेच्या डोंगराखालील भागात गेले होते. खेकडे पकडता पकडता स्वप्नील आणि निकेतन यांना भान राहिले नाही. बेसावध असलेले तिघेही एका मोठ्या लाटेमुळे समुद्रात ओढले...
  July 3, 05:36 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात