जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Ratnagiri

Ratnagiri News

 • अलिबाग - गेली चार-पाच वर्षे शेतकयांच्या आक्रमक धोरणामुळे माघार घेण्यास भाग पडलेल्या रिलायन्स कंपनीच्या महामुंबई सेझ प्रकल्पाला केंद्र सरकारच्या समितीने भूसंपादनासाठी एका वर्षाची मुदतवाढ देऊन प्रकल्प जिवंत ठेवला आहे. जनमत चाचणीद्वारे नागरिकांनी विरोध दर्शवला असतानाही सरकारने नाव बदलून सेझ आणला आहे. सरकारचा हा निर्णय हाणून पाडण्याचा निर्धार रायगड जिल्ह्यातील शेतकयांनी केला आहे. या प्रकल्पाला सलग दोन वेळा भूसंपादनासाठी मुदतवाढ देऊनही मुदतीत भूसंपादन न झाल्यामुळे व शेतकरी आणि...
  July 3, 01:40 AM
 • रत्नागिरी जिल्ह्यात महावितरण बंद मीटर शोध मोहिम राबविणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार्या या मोहिमेमध्ये 1 लाख 20 हजार 467 मीटर तपासण्यात येणार आहेत. ही मोहिम १६ जुलैपर्यंत चालणार आहे. हीमाहिती कोकण परिमंडळाचे मुख्य अभियंता अरुण रणखांबे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.नादुरुस्त मीटर, घराला कुलूप, मीटर न सापडणे, शून्य विजेचा वापर अशा कारणामुळे महावितरणच्या महसूलीवर परिणाम होत असल्यामुळे त्यावर योग्य कारवाई करण्यात येणार आहे. नादुरुस्त किंवा...
  July 2, 06:31 PM
 • रत्नागिरी नगरपालिकेची आगामी निवडणूक स्वबळावरलढविण्याची तयारी कांग्रेस पक्षाकडून सुरु आहे. गुरुवारी शहर काँग्रेसचे अध्यक्ष दीपक राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेने हे स्पष्ट झाले आहे. आगामी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी न करता स्वबळावर लढविण्यात यावी, अशी आग्रही मागणी रत्नागिरी शहरातील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी केली असल्याची माहिती राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. रत्नागिरी पालिकेत आघाडीची सत्ता दिसत असली तरी पालिकेच्या कोणत्याही निर्णयप्रक्रियेत काँग्रेसला...
  July 1, 07:32 PM
 • मालवण - महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात कामांना सुरवात करण्यात आली आहे. तहसील कार्यालयाच्या वतीने तालुक्यात 53 कामे प्रस्तावित होती. यात सामाजिक वनीकरण विभाग व तालुका कृषी विभागाअंतर्गत 32 कामांचा समावेश होता. यातील तालुका कृषी विभागाअंतर्गत साळेल येथे सलग समपातळी चर बांधणे, रामगड येथे घळी नियंत्रक बांध योजनेची दोन कामे अशी एकूण तीन कामे पूर्ण झाली आहेत. यात तालुका कृषी विभागाकडील तीन कामे पूर्ण झाली आहेत. सर्व कामांवर आतापर्यंत 2 लाख 13 हजार रुपये खर्च करण्यात आले...
  June 29, 04:29 PM
 • सावंतवाडी - जिल्हा परिषद सदस्य बाब्या पांढरे यांच्या निधनामुळे रिकाम्या झालेल्या पदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज येथील तहसील कार्यालयात झाली. शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांचा धुव्वा उडवित मळेवाड जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार नारायण ऊर्फ नाना विश्राम सोनुर्लेकर यांनी विजय मिळविला. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार लाडोबा लक्ष्मण केरकर यांचा 466 मतांच्या फरकाने पराभव केला.कॉंग्रेसविरोधात राष्ट्रवादीनेही उमेदवार दिल्याने ही लढत...
  June 29, 04:22 PM
 • रत्नागिरी तालुक्यातील भातपिकाला जोरदार पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सतत पडणारा पाऊस या पिकासाठी घातक आहे. पावसाबरोबर करपा रोगामुळेही शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हळव्या भाताची पिके पसवू लागली असून अनेक ठिकाणी भाताच्या लोंब्या दिसू लागल्या आहेत. सातत्याने आणि जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होत आहे. भातशेतीत साठून राहिलेल्या पाण्यामुळे पिके गारठून त्यांची वाढ खुंटण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
  June 28, 03:36 PM
 • वैभववाडी - जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या 24 तासांत सर्वाधिक पावसाची नोंद वैभववाडी तालुक्यात 145 मिलिमीटर, तर सर्वांत कमी पाऊस मालवणात शून्य मिलिमीटर इतका झाला. विश्रांती घेतलेल्या पावसाने आज दुपारनंतर तालुक्याला अक्षरक्षः झोडपून काढले. करूळ घाटात दरड कोसळली. दगड मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एका कडेच्या दरडीचा भाग हटविण्यास सुरवात केली....
  June 28, 03:25 PM
 • राजापूर - वादळी मुसळधार पावसाने नव्या दमाने सुरुवात केली आणि राजापूर शहराला पुराच्या पाण्याने विळखा घातला. मुसळधार वादळी पावसामुळे राजापूर हायस्कूलनजीक झाड कोसळले. वादळी वार्यांमुळे या हायस्कूलची कौले उडून गेली. त्यामुळे सोमवारी सकाळीच शाळा सोडून देण्यात आली. संपूर्ण हायस्कूलमध्ये पावसाचे पाणी साचले होते.विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी दुपारी पुन्हा जोर पकडला आणि पुराचे पाणी हळूहळू वाढू लागले. हे पाणी राजापूर बाजारपेठेत शिरले. अतिवृष्टीमुळे राजापूरचा मध्यवर्ती जवाहर चौक...
  June 28, 02:00 PM
 • रत्नागिरी - गेल्या काही दिवसात संततधार पावसानंतर तीन दिवस विश्रांती घेतली होती. काल सायंकाळपासून पुन्हा पावसाला सुरवात झाली होती. जूनच्या पहिल्या महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धबधबे कोसळत आहेत. नयनरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी रत्नागिरीतील तरुणाईने तालुक्यातील निवळी, उक्षी, सवतसडा येथील धबधब्यांची वाट धरली होती. रविवार असल्याने सर्वच कार्यालयांना सुटी होती. याचा निर्भेळ आनंद घेण्यासाठी तरुणाईच नव्हे, तर अनेकांनी आपली पावले धबधब्यांकडे वळविली होती....
  June 27, 04:04 PM
 • मालवण - येत्या पालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नियोजन सुरू आहे.राणेसमर्थक श्री. मांजरेकर यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.श्री. वाळके म्हणाले, "सुधीर मांजरेकर यांनी राष्ट्रवादीची पताका खांद्यावर घेतली आहे. संपूर्ण राष्ट्रवादी कॉंग्रेस परिवाराच्या वतीने त्यांचे स्वागत करीत आहोत. त्यांनी यापूर्वी नगरसेवक म्हणून यशस्वीपणे काम केले आहे.येत्या पालिकेच्या निवडणुकीसाठीचे नियोजन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य चार...
  June 27, 03:46 PM
 • सावंतवाडी - डोंगर-उतारावर केल्या जाणाऱ्या नाचणी पिकाचेही या वर्षी पावसामुळे नुकसान झाले आहे. शेत जाळणी केल्यानंतर लगेच पाऊस आल्याने त्यावर पेरलेले नाचणीचे बियाणे डोंगरउतारावरून वाहून गेल्याने ही शेती धोक्यात आल्याचे चित्र आहे.खतटंचाईमुळे शेतकरी हैराण - सिंधुदुर्गात सध्या बऱ्याच ठिकाणी खतांची टंचाई जाणवत आहे. तरवा पेरणी वेळी विशेष करून युरिया खताची शेतकऱ्यांकडून मागणी होते; परंतु जिल्ह्यात ऐन हंगामावेळीच या खताची टंचाई जाणवल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे आता...
  June 27, 03:40 PM
 • कणकवली - गेल्या आठ दिवसांत विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. कणकवली - तालुक्यात शनिवारपासून मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे.पावसामुळे फोंडाघाट येथे घराच्या छपराचे नुकसान झाले. रविवारी सकाळी आठ वाजता घेतलेल्या नोंदीत 92 मिमी (एकूण 1200 मिमी) इतका पाऊस झाला आहे. पावसामुळे फोंडाघाट येथील लक्ष्मी सखाराम म्हसकर यांच्या घराच्या छपरावर झाडाची फांदी पडून सतराशे रुपयांचे नुकसान झाले. आज दिवसभर पावसाची रिपरीप सुरू होती. पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने याचा...
  June 27, 03:37 PM
 • रत्नागिरी - राज्यातील पाच विभागात वीस हजार बायोगॅस संयंत्राचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी तीन कोटी 64 लाखांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. शासनाने पर्यावरण संतुलित समृद्ध गाव अभियान राबविले आहे. यामध्ये पर्यावरणाचे रक्षण करताना प्रदूषण टाळण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी ग्रामीण भागात नित्याच्या सांडपाण्याच्या निचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आणि त्याचा उपयोग मानवी जीवनमान उंचावण्यासाठी करताना जास्तीत जास्त बायोगॅस संयंत्र राबविण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले...
  June 24, 02:03 PM
 • रत्नागिरी - जिल्ह्यातील चार नगरपालिका आणि एका नगर पंचायतीच्या 103 जागांसाठी आज आरक्षण सोडत झाली. या आरक्षणामुळे सर्व पालिकांमध्ये आता महिलाराज अवतरणार असून महिलाच पालिका चालविणार आहेत. महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यात आल्याने 53 महिला तर 50 जागा पुरुषांना मिळणार आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थांवर जिल्ह्यात आजही शिवसेनेचे वर्चस्व आहे; मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसने या वर्चस्वाला अनेक ठिकाणी छेद दिला आहे. त्यामुळेच रत्नागिरीत कॉंग्रेस आघाडी, चिपळूणला राष्ट्रवादी कॉंग्रेस तर दापोली, खेड आणि...
  June 24, 01:51 PM
 • आंबोली - गेल्या आठवडाभरातील दमदार पावसामुळे आंबोली घाटातील धबधबे पूर्ण क्षमतेने कोसळत आहेत. अवघ्या सहा-सात दिवसांत घाटात मोठी दरड पडली होती. आता घाटरस्ताही सुरू झाला आहे. त्यामुळे येथील पर्यटन हंगामाला पुन्हा नव्या दमाने सुरवात झाली आहे.पर्यटन व्यावसायिकांच्यामते, येथे गोवा, मुंबई, पुणे येथील पर्यटकांमुळे चांगला व्यवसाय होतो. पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकातील पर्यटक येथे येत आहेत.वाढत्या पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर आंबोलीत पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.गेला आठवडाभर परिसरात...
  June 24, 01:24 PM
 • रत्नागिरी - अणुऊर्जा प्रकल्पाला राज्य व केंद्र शासनाने पर्यायी वीज निर्मीती प्रस्ताव ठेवावा. अणुऊर्जेला आमचा विरोध आहे. त्यामुळे जैतापूर प्रकल्पाच्या विरोधाला राज्याचा पाठिंबा मिळविण्यासाठी राज्यभर लढा उभारण्याचा इशारा श्रमिक मुक्तीसंघाचे प्रमुख भारत पाटणकर यांनी दिला आहे. येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होतेते म्हणाले, 'जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला आमचा विरोध आहे. या प्रकल्पाबद्दलची खरी माहिती स्थानिकांपासून लपविली जात आहे. त्यामुळे केंद्र व राज्य...
  June 23, 02:46 PM
 • रायगड - रायगडातील रसायनी कोण मार्गे पनवेल या राज्य मार्गावरच्या सावळा गावाच्या हद्दीत भरधाव ट्रकवरील ड्रायवरचा ताबा सुटून सावला गावातील पादचार्यांच्या अंगावर ट्रक गेल्याने ट्रक ड्रायवरसह सावळा गावातील 29 वर्षाचा युवक सुरेश परशुराम गाताडे जागीच ठार झाला, तर इतर ३ जन गंभीर असल्याने त्यांच्यावर अंबानी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.या घटनेनंतर संतप्त गावक-यांनी ट्रक मधील असलेला मालाला आग लाऊन ट्रक पेटून दिला. याच दरम्यान गावक-यांनी २ पोलीस गाड्यांची दगडफेक करून नासधूस केली. तर पोलिसांना...
  June 22, 06:43 PM
 • रायगड - साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या वस्तू नुकत्याच रायगड किल्ल्यावर सापडल्या आहेत. गडावरील प्राचिन वाड्यांच्या पडक्या भिंतींचे नूतनीकरण पुरातत्व विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी खोदकाम करत असताना अनेक दुर्मिळ वस्तू सापडल्या.शिवरायांचा पराक्रम आणि इतिहासाची साक्ष देणाया तसेच सह्याद्रीच्या रांगांमध्ये अजूनही भक्कमपणे उभ्या असलेला रायगड किल्ल्याला पुन्हा एकदा ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी पुरातत्व विभागातर्फे या किल्ल्याच्या संवर्धनाचे काम सुरू करण्यात आले...
  June 22, 06:28 PM
 • रत्नागिरी - रत्नागिरी तालुक्यातील पाली येथे विजेचा धक्का बसल्याने एका कामगाराच्या जागीच मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राजस्थानमधील सुरेंद्र मोहनसिंग (30) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो महावितरणचे विद्युत खांब उभारून मुख्य वीजवाहिनी उभारण्याचा कंत्राटी कामात होता. पाली येथे विद्युत खांब उभारण्याच्या काम सुरू होते. यावेळी मुख्य वीज वाहिनीला अचानक स्पर्श झाल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. यात तो अत्यवस्थ झाला. त्याच्या सहका-यांनी त्याला...
  June 21, 05:17 PM
 • रत्नागिरी - मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात घरे, गोठे कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसाने आज विश्रांती घेतली असून विस्कळित झालेले जनजीवन पूर्वपदावर आले आहे. संगमेश्वर आणि चिपळूणमध्ये दिवसभर हलका पाऊस झाला.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. त्यानंतर आज सकाळपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली. वाशिष्ठी नदीला पूर आल्यामुळे शहरात पाणी घुसले...
  June 20, 03:43 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात