जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Ratnagiri

Ratnagiri News

 • रत्नागिरी - गोळप येथील व्यापारी वैभव कोरगावकर यांचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे पाच लाखाचा ऐवज लंपास केला. त्यामध्ये 70 हजार रोकड व 20 तोळे सोन्याच्या दागिन्यांचा समावेश असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घर फोडून 5 लाखाची झालेली चोरी बनावट असल्याचा ग्रामीण पोलिसांना संशय आहे.चोरीला गेलेल्या दागिन्याचे वर्णन सांगण्यात तक्रारदार अपयशी ठरले आहेत. घरात सापडलेले दागिने एकदा सासूचे तर एकदा सुनेचे असल्याचे सांगितले जाते. जबाबात तफावत आहे, अशा अनेक गोष्टींनी चोरीबद्धल ग्रामीण पोलिसांच्या...
  June 20, 03:34 PM
 • रत्नागिरी: दरड कोसळल्यामुळे ठप्प झालेली कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली. मुंबईहून शनिवारी रात्री सुटलेली कोकणकन्या एक्स्प्रेस रविवारी गोव्याच्या दिशेने रवाना करण्यात आली. मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर मातीचा ढिगारा जमा झाल्यामुळे मागील दोन दिवसांपासून या मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प होती. मात्र, कमी वेळेत कोकण रेल्वच्या व्यवस्थापनाला ही माती हटविण्यात यश आले. कोकण रेल्वेची वाहतूक बंद झाल्यानंतर कोकणातील तसेच गोव्यातील वाहतुकीवर फार मोठा परिणाम झाला होता.
  June 20, 02:12 AM
 • रत्नागिरी - संरक्षक भिंत रुळावर कोसळ्याने गेल्या दोन दिवसांपासून बंद असलेली कोकण रेल्वे आज सकाळी पुर्ववत सुरु झाली आहे. रविवारी मुंबईहून निघालेली कोकणकन्या एक्सप्रेस सकाळी १० वाजता रत्नागिरी स्थानकातून गोव्याच्या दिशेने रवाना झाली. त्यामुळे कोकणात जाणा-या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. सध्या धीम्यागतीने येथून रेल्वे जात आहेत. रत्नागिरीजवळील पोमेंडी येथे मुसळधार पावसासमुळे संरक्षक भिंत कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक बंद झाली होती. मात्र कोकण रेल्वेच्या कर्मचा-यांनी...
  June 19, 11:29 AM
 • कोकण रेल्वेची ठप्प पडलेली सेवा रविवारी दुपारनंतर सुरु होण्याची शक्यता आहे. परंतु, पाऊस पडल्यास रेल्वे सुरू होण्यास आणखी एक दिवस लागू शकतो. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत होता. परंतु, शनिवारी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दुरुस्ती कार्याला वेग आला. पोमेंडीजवळ रेल्वेट्रॅकवर पडलेली माती उचलण्यात पथकाला यश आले आहे. वाकलेले, नादुरुस्त रूळ काढून नवीन ट्रॅक टाकण्यात आला. शनिवारी हे काम पूर्ण झाल्यामुळे रविवारी मालगाडीची चाचणी घेण्यात येणार आहे. ती यशस्वी झाल्यास...
  June 19, 08:23 AM
 • रत्नागिरी: पावसामुळे निवसर-पोमंडी स्थानकांदरम्यान शुक्रवारी सकाळी दरड कोसळली. त्यामुळे सकाळी सहा वाजल्यापासून कोकण रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. रत्नागिरी आणि परिसरात गुरुवारपासून मुसळधार पाऊस सुरू असून नव्यानेच बांधण्यात आलेली संरक्षक भिंत ट्रॅकवरच कोसळली. रेल्वेमार्गात अडथळे निर्माण झाल्याने मंगला एक्स्प्रेस अडवली रेल्वेस्थानकावर थांबवण्यात आली आहे, तर इतर गाड्या गोव्यामध्ये थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी मोठ्या संख्येने प्रवासी
  June 18, 02:05 AM
 • बांदा: इन्सुली- क्षेत्रफळवाडी परिसरात सुरु झालेल्या पावसामुळे तिलारी कालव्याचा भराव शुक्रवारी खचल्याने सुमारे 10 एकर क्षेत्रातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. इन्सुली-क्षेत्रफळवाळीतून जाणारा हा कालवा आधीच वादाच्या भोव-यात सापडला होता. कालव्याला संरक्षक भिंत अथवा पिचिंग करण्यात यावी, अशी परिसरातील शेतक-यांनी मागणी केली होती. विशेष म्हणजे या मागणीसाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण केले होते. यावेळी संबंधित अधिका-यांनी भेट देऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले...
  June 18, 12:24 AM
 • पावसाळा सुरु होताच कोकण रेल्वेच्या मागे ग्रहण लागले आहे. दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. निवसर-पोमेंडी स्थानकादरम्यान आज पहाटेच दरड कोसळली. रत्नागिरी आणि जवळच्या परिसरात कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नव्यानेच बांधण्यात आलेली संरक्षक भिंत ट्रॅकवरच कोसळली. त्यामुळे आज सकाळी 6 वाजतापासून रेल्वेवाहतूक बंद करण्यात आली आहे.रेल्वे मार्गावरून माती काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले आहे. रेल्वेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या मंगला...
  June 17, 09:02 AM
 • चिपळूण - एक्स्प्रेस गाड्यांना चिपळुणात थांबा मिळावा यासाठी 22 जूनला रेल रोको करण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला.रेल रोको आंदोलनाला सर्वस्तरातून पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाच्या जय्यत तयारीसाठी भाजपसह सर्वपक्षीय कार्यकर्ते व व्यापारांनी चांगला प्रतिसाद दिला.
  June 16, 03:53 PM
 • रत्नागिरी - दोन जूनपासून आगमन झालेल्या मुसळधार पावसाचा उत्तर रत्नागिरीतील चिपळूण, गुहागर, दापोली, खेड तालुक्यांना फटका बसला आहे. कालपर्यंत जिल्ह्य़ात एकूण ५७५.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.काही ठिकाणी घराची कौले, पत्रे उडाले आहेत. चिपळुणात घर व गोठा कोसळून २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. एक गाय मृत्युमुखी पडल्याची घटना मुंठेतर्फे सावर्डे येथे घडली आहे. दापोलीत आवाशी धरणाचा कालवा फुटल्याने हातिप गावातील भातशेतीच्या रोपांचे व शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. तालुक्यात हातिप, दगडवणे...
  June 16, 03:44 PM
 • दोडामार्ग - विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तीनपैकी दोन शिक्षकांची बदली झाल्याने जवळपास 48 मुलांचा भार आता एकमेव शिक्षिकेवर येणार आहे. 48 विद्यार्थ्यांमध्ये सध्याच्या घडीला 28 विद्यार्थिनी आहेत. सात वर्ग आहेत. एवढा सगळा डोलारा सांभाळताना एका शिक्षिकेची पुरेवाट होणार आहे. जिल्हा किंवा तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा बदली करताना विचार केला नसल्याने पालकांत संताप व्यक्त होत आहे.
  June 16, 03:38 PM
 • सावंतवाडी: सिंधुदुर्गात बुधवारी दुपारनंतर पुन्हा पावसाने जोर धरल्याने शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यासह पालकांची तारांबळ उडाली. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 35. 22 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. सायंकाळीही हा पाऊस सुरूच होता. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. शेतकरीही या पावसाने सुखावला आहे.
  June 16, 01:25 AM
 • कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षपदी नमिता कीर यांची निवड झाली आहे .परिषदेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ही घोषणा झाली . कोमसापच्या स्थापनेस २० वर्षे पूर्ण होत असून यंदा प्रथमच एका महिलेला कार्याध्यक्षपदाचा मान मिळाला आहे .
  June 14, 04:30 PM
 • चिपळूण - तालुक्यातील मालघर येथे दोन दिवस गॅस्ट्रोचा फैलाव झाला असून, येथील 55 ग्रामस्थांना त्याची लागण झाल्याने सहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तालुका आरोग्य यंत्रणा या साथीच्या फैलावामुळे खडबडून जागी झाली असून मालघरमध्ये तीन वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. साथ नियंत्रणात असून नवीन रुग्ण नसल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गाढवे यांनी सांगितले.गावात अनेक जण या आजाराने बेजार असल्याचे लक्षात आल्यानंतर खरवते प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. ए....
  June 14, 04:27 PM
 • सावंतवाडी - उन्हाळी हंगामात एसटीला वाढती मागणी असते, मात्र याच हंगामात सावंतवाडी एसटी डेपोचा कारभार पार रसातळाला गेल्याचे चित्र आहे. बसेस बंद पडण्याचे प्रमाण सर्व जिल्ह्यात सावंतवाडीतच जास्त असल्याने प्रवाशांबरोबरच एसटीचे चालक आणि वाहक कंटाळले आहेत.जवळपास 40 हून अधिक चालकांची कमतरता या डेपोला भासत आहे. परिणामी सावंतवाडी डेपोतून वेळेत बस सोडल्याचे दाखवा आणि हजार रुपये कमवा, अशी अवस्था या डेपोची झाली आहे. स्पेअरपार्टची कमतरताही आहे. वरिष्ठ पातळीवरून स्पेअरपार्टचा पुरवठा वेळेत होत...
  June 14, 04:20 PM
 • रायगड- अशुद्ध पाणीपुरवठा करण्यात रायगड जिल्हा संपूर्ण राज्यात अव्वल आहे, अशी धक्कादायक माहिती रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी यांनी दिली.रायगड जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पाणी गुणवत्ता जिल्हास्तरीय कार्यशाळेत गणेश चौधरी बोलत होते. रायगड जिल्ह्य़ातून घेण्यात आलेल्या पाण्यांच्या नमुन्यांपैकी १८ टक्के पाणी दूषित आढळले, जे पिण्याच्या लायक नव्हते. त्यामुळे दूषित...
  June 14, 03:54 PM
 • रत्नागिरी - चिपळूण तालुक्यात पडणा-या पावसाने चौथ्या दिवशीही आपला जोर कायम ठेवला. त्यामुळे आतापर्यंत 360 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे 7 लाखांचे नुकसान झाले आहे तर एक जण वाहून गेला आहे. या सततच्या पावसाने सखल भागात पाणी साचले असून पेरणीच्या कामातही अडथळा येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा प्रारंभीच जोरदार पाऊस सुर झाला आहे. सततच्या पावसामुळे दोन दिवसांमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. संगमेश्वर - पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील तळेकोट येथे दरड...
  June 13, 02:57 PM
 • सिंधुदुर्ग - सावंतवाडी तालुक्यातील राधानगरी अभयारण्यात एका वाघाचा 'कॅमेरा ट्रॅप' मध्ये फोटो मिळाला आहे. हा वाघ साधारण दीड वर्षाचा असल्याचे वन खात्याचे म्हणणे आहे. या बछड्याच्या छायाचित्राचा अंदाज घेता असाच आणखी एक बछडा तसेच किमान एक वाघ आणि तीन माद्या असण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात असणा-या राधानगरी अभयारण्यात किमान पाच वाघांचा वावर असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. गव्यासाठी प्रसिध्द असलेल्या या अभयारण्यात बिबटे, अस्वले, काळवीट,...
  June 13, 11:48 AM
 • सिंधुदुर्ग - जिल्हा परिषदेमार्फत विविध योजनांतर्गत स्वयंरोजगाराच्या दृष्टीने दर्जेदार शिवणयंत्रे वाटप करण्यात आली मात्र ते चालविण्याचे प्रशिक्षण नसल्यामुळे लाभार्थींकडे ही यंत्रे पडून असल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास आणि समाज कल्याण विभागातर्फे महिलांना स्वयंराजगाराच्या दृष्टीने शिवणयंत्र पुरविली गेली आहेत. त्यासाठी 10 लाखांहून अधिकच्या निधीची तरतूद करण्यात आली. सध्या प्रत्येक तालुक्यात शिवणयंत्राचे वाटप सुरु असून जिल्ह्यातील 300 लाभार्थींचा यात...
  June 12, 04:06 PM
 • सिंधुदुर्ग - 15 जून ते 15 ऑगस्ट असे दोन महिन्यांसाठी मासेमारीस बंदी घालण्यात आली आहे. समुद्रातील माशांचे जतन व्हावे या उद्देशाने बंदी घालण्यात आल्याचे जिल्हाधिकारी विक्रमकुमार अरोरा यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम अंतर्गत ही बंदी घालण्यात आली आहे. जून ते ऑगस्ट हा मासळीचा प्रजनन काळ असतो. या काळात समुद्रात नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणात येते. त्यामुळे क्षारतेचे प्रमाण कमी होते. समुद्रातील मूलद्रव्ये वरच्या थरात येतात. त्यामुळे तवंग निर्मिती होते हे तवंग माशांसाठी...
  June 11, 07:02 PM
 • सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फलटणवाडीमध्ये शनिवारी सकाळी घरावरुन दरड कोसळून एका 14 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेत मुलीची आई गंभीर जखमी आहे. सकाळी सहाच्या दरम्यान घरातील लोक साखर झोपेत असतांना घरावर दरड कोसळली. यामुळे मयुरी परब हिचा मृत्यू झाला असून तिची आई देवकी परब (40) गंभीर जखमी झाली आहे. या घराला संरक्षक भिंत बांधण्यात आली होती मात्र दरड मोठी असल्यामुळे संरक्षक भिंतही कोसळली आहे. या घटनेवेळी मयुरीचे वडिल वासुदेव परब हे शेतावर गेले असल्यामुळे बचावले आहेत.
  June 11, 04:08 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात