जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Ratnagiri

Ratnagiri News

 • कणकवली: कोकण रेल्वे मार्गावरील बहुतेक गाड्यांच्या वेळापत्रकात शुक्रवारपासून (ता. 10) बदल करण्यात आला असून 31 आॅक्टोबरपर्यंत कार्यान्वित राहणार आहे. पावसाळ्यात गाडयांचा वेग कमी होत असल्याने 10 जून ते 31 आॅक्टोबर या काळात कोकण रेल्वे नव्या वेळापत्रकानुसार धावते. सावंतसाडी ते दिवा ही पॅसेंजर गाडीची वेळे गेल्या काही दिवसांपूर्वीच बदलण्यात आली होती. कोकणकन्या, मांडवी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, पुणे एर्नाकुलम, पटना- वास्को एक्सप्र्रेस, गांधीधाम एक्सप्रेस, मत्स्यगंगा एक्सप्रेस, बिकानेर...
  June 10, 02:01 PM
 • रत्नागिरी: सिंधुदर्ग जिल्ह्यात आधार कार्ड नोंदणीत नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 45 हजार आधार कार्ड नोंदणी झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी विक्रमकुमार अरोरा यांनी दिली. 31 मार्च 2012 पर्यंत शंभर टक्के लोकांना आधार कार्ड दिले जाणार आहे, असेही अरोरा म्हणाले.
  June 9, 07:34 PM
 • रत्नागिरी: कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आघाडी सरकारच्या राजवटीत महागाईने जनता त्रस्त झाली असताना रत्नागिरीत रस्त्यांच्या दूरावस्थेमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरच आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. दाभीळ आंबेरे ते डोर्ले या रस्त्याची दूर्दशा झाल्याने डोर्ले येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या आवारात आमरण उपोषण सुरू केले आहे. डोर्ले येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता मरण यातना सहन करतोय. या रस्त्याची दुरुस्ती केली जात नसल्याने परिसरातील राष्ट्रवादीचे...
  June 9, 11:54 AM
 • मालवण -जिल्हा पुरवठा विभागाकडून मालवणसाठी 60 टक्के केरोसीनचा पुरवठा केला जात आहे. अन्य तालुक्यांपेक्षा मालवणसाठी कमी प्रमाणात पुरवठा होत असल्याने किमान 80 टक्के केरोसीनचा पुरवठा व्हावा, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पालकमंत्री नारायण राणे यांच्याकडे करण्यात आली आहे.पालकमंत्री राणे नुकतेच येथे आले असतांना, नगरसेवक जावकर यांनी त्यांची भेट घेतली. मालवणला कमी प्रमाणात केरोसीनचा पुरवठा होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे हा कोटा वाढवून मिळावा, यासाठी त्यांनी राणे यांचे...
  June 8, 05:13 PM
 • अलिबाग - किल्ले रायगडावर उद्या सोमवारी दि. 6 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित केला असून संभाजी ब्रिगेड आणि अन्य काही संघटनांनी शिवसमाधीसमोरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीस आक्षेप घेतल्यामुळे किल्ल्यात प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा मोठय़ा उत्साहात दरवर्षी सहा जून रोजी साजरा केला जातो. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचा या कार्यक्रमात पुढाकार असतो. शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे वाघ्या कुत्र्यांची समाधी ही अप्रस्तुत वाटते असे मत...
  June 6, 03:19 AM
 • रत्नागिरी: कोकणसह राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. पहिल्या पावसामुळे सर्वदूर गारवा जाणवत असला तरी कोकण रेल्वेला या पावसाचा जबर फटका बसला आहे. कोकण रेल्वे मार्गावरचं निवसर स्टेशनचा भराव पुन्हा एकदा खचला आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षीच कोट्यवधी रुपये खर्च करून या मार्गाची दुरुस्ती करण्यात आली होती. निवसर स्टेशनचा भराव खचल्याने प्लाटफार्मला भेगा पडल्या आहेत. भेगा बुजण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
  June 5, 11:15 PM
 • रत्नागिरी - "पावसाळ्यामुळे आरोग्याच्या मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवतात त्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क रहायला हवी.तसेच वैद्यकीय अधिका-यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी रहाणे बंधनकारक आहे," असे निर्देश नवनियुक्त जिल्हा परिषद अध्यक्ष रोहिणी दळवी यांनी दिले आहेत.अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर दळवी यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची पहिलीच सभा झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, शिक्षण आणि अर्थ सभापती शरद लिंगायत, आरोग्य आणि बांधकाम सभापती सुरेश लाड, समाजकल्याण...
  June 5, 11:04 PM
 • रत्नागिरी - जिल्ह्यात सलग तिस-या दिवशी वादळी वा-यासाह पावसाची रिपरिप सुरु आहे. पावसामुळे तीन दिवसात घरे व दुकानांचे दोन लाखांचे नकसान झाले आहे. तर किनारपट्टीवर ताशी 45 ते 50 कि.मी. वेगाने वादळी वारे सक्रीय झाल्यामुळे किनारपट्टीवर तीन नंबरचा धोक्याचा बावटा लावण्यात आला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. गेल्या चार ते पाच वर्षातील हवामानाच्या अंदाजापेक्षा कोकणात यावर्षी मान्सुनपुर्व पावसाला लवकर सुरवात झाली आहे. या पावसाचा सर्वाधिक तडाखा हा दक्षिण रत्नागिरीतील...
  June 5, 05:55 PM
 • रत्नागिरी जिल्ह्यात सलग दुस-या दिवशी पावसाने हजेरी लावली. काल दिवसभर विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने चिपळूण, संगमेश्वर, आणि लांजा येथे तीन घरांचे मिळून 37 हजारांचे नुकसान झाले आहे. कोकणात मान्सून सक्रीय होण्यासाठी अजून तीन -चार दिवस वाट पाहावी लागणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात पुढील 48 तासांत 7 ते 12 इंच पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सलग दुस-या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. काल सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत...
  June 4, 10:51 PM
 • रत्नागिरी: उकाड्याने हैराण झालेल्या आणि पावसाची चातकासारखी वाट पाहणा-या कोकणात काही भागात पावसाने आज(शुक्रवारी) दुपारी हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला. दक्षिण कोकणात यंदा पाच दिवस अगोदरच पावसाने हजेरी लावली असल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे. रत्नागिरीसह परिसरात दुपारपासूनच ढग गर्दी करु लागले होते. पाऊस येण्याचे चिन्हे जाणवत होती. दरम्यान, मुंबई, पुणे, औरंगाबादसह राज्यातील काही भागात दोन दिवसांपूर्वीच पाऊस हजेरी लावली आहे.
  June 3, 06:55 PM
 • रत्नागिरी: उकाड्याने हैराण झालेल्या आणि पावसाची चातकासारखी वाट पाहणा-या कोकणात काही भागात पावसाने आज(शुक्रवारी) दुपारी हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला. दक्षिण कोकणात यंदा पाच दिवस अगोदरच पावसाने हजेरी लावली असल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे. रत्नागिरीसह परिसरात दुपारपासूनच ढग गर्दी करु लागले होते. पाऊस येण्याचे चिन्हे जाणवत होती. दरम्यान, मुंबई, पुणे, औरंगाबादसह राज्यातील काही भागात दोन दिवसांपूर्वीच पाऊस हजेरी लावली आहे.
  June 3, 06:48 PM
 • मुंबई - कोकणासारख्या निसर्गरम्य ठिकाणी सागरी जलचरांचे काचेच्या बोगद्यातून निरीक्षण करता यावे आणि डॉल्फिनच्या कसरती पाहता याव्यात म्हणून 'सागरी विश्व प्रकल्पा'बाबतच्या तांत्रिक-व्यापारिक शक्याशक्यतेचा अहवाल बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांना आज सादर करण्यात आला. या प्रकल्पाची जागा मुंबई आणि गोवा या दोन्ही ठिकाणी येणा:या पर्यटकांना आकृष्ट करेल अशी हवी. संपूर्ण देशात अशाप्रकारचा हा एकमेव प्रकल्प असल्याने पर्यटकांची खर्च करण्याची क्षमताही लक्षात घ्यायला हवी. तसेच...
  June 2, 03:28 AM
 • सिंधुदुर्ग - जिल्ह्यात ठिकठिकाणी रविवारी सकाळी मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसाचा जोर सह्याद्रीच्या रांगांमध्ये जास्त होता. दरम्यान, उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. गेल्या तीन- चार दिवसांपासून कमालीचा उकाडा वाढला होता. काल रात्री उशिरापर्यंत गडगडाटासह विजा चमकत होत्या. आज पहाटे चारच्या सुमारास जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस झाला. सह्यादीच्या रांगांमध्ये पावसाचा जोर जास्त होता. किनारपट्टीकडे मात्र पाऊस झाला नाही. पावसामुळे वातावरणात...
  May 30, 05:14 AM
 • महाड - शहरापासून एक किलो मीटर अंतरावर असलेल्या शिरगाव गावाच्या हद्दीतील शेतामध्ये अनोळखी महिलेची हत्या करण्यात आली असल्याची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. महिलेची निर्घृण हत्या केल्यानंतर आरोपी कोणताही पुरावा न ठेवता फरार झाले असून पोलीस तपास करीत आहेत. शिरगावच्या हद्दींत असलेल्या एका शिवारामध्ये महिलेला दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. महिलेच्या डोक्यांत दगड मारून तिला ठार मारण्यात आले.
  May 28, 06:59 PM
 • सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पर्यटन पायाभूत सुविधा प्राधान्याने निर्माण केल्या जातील, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. येत्या दीड वर्षांत मुंबई-गोवा महामार्गावर रस्ते चौपदरीकरणासाठी टप्प्याटप्प्याने नियोजन केले जाईल, असे ते म्हणाले. सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आरोंदा येथे हाऊसबोटमधून सफर केली. त्यानंतर शिरोडा-वेळागर येथील वादग्रस्त सव्र्हे नं. ३९, मोचेमाड, नवाबाग वेंगुर्ले या ठिकाणी भेटी...
  May 28, 05:37 PM
 • सावंतवाडी - मायनिंग वाहतूक कळणे-बांदा रेडी अशी होत असताना १५ जानेवारीपासून १७ मेपर्यंत ३५ डंपर्समधून मायनिंग परस्पर लंपास केले. त्याची ४ कोटी इतकी किंमत होईल, अशी तक्रार ठेकेदार दत्ताराम कवठणकर यांनी पोलिसांत केली. गेल्या काही दिवसांत चर्चेचा विषय ठरलेल्या मायनिंग हेराफेरीची पोलिसांत तक्रार दाखल झाल्याने मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.कळणे येथील मिनरल्स अॅण्ड मेटल या धुळे येथील विनय पाटील यांच्या मायनिंग कंपनीचा वाहतूक ठेकेदार दत्ताराम गजानन कवठणकर यांनी दोघांविरोधात...
  May 28, 05:05 PM
 • रत्नागिरी - वास्तव्याचा दाखल किंवा अन्य कागदपत्रांची अद्यापही पूर्तता न केलेल्या किंवा अजूनही ज्यांनी शिधापत्रिका जमा केलेल्या नाहीत, अशा बोगस शिधापत्रिकाधारकांची शोधमोहीम पुन्हा एकदा शासनाने हाती घेतली आहे. 1 जूनपासून नागरिकांना अर्जाचे वाटप होणार असून 15 जुलैपर्यंत अंतिम अहवाल शासनाकडे पाठवायचा आहे.
  May 28, 04:57 PM
 • राजापूर - घातक मनोरुग्णाला रत्नागिरीतील मनोरुग्णालयात घेऊन येत असताना ओणी येथे गाडीतून पळून जाऊन त्याने पन्नास फुट विहिरीत बेधडक उडी मारली. यामध्ये मनोरुग्ण गंभीर जखमी झाला. राजेंद्र वसंत माळवदे (वय 42, रा. तळेबाजार, देवगड, जि. सिंधुदुर्ग) असे मनोरुग्णाचे नाव आहे. त्याला देवगड न्यायालयाने घातक मनोरुग्ण जाहीर करून त्याला तत्काळ रत्नागिरी मनोरुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. महामार्गावर वाहनांसह प्रवाशांचीही वर्दळ होती. त्यामुळे देवगड पोलिसांनी...
  May 28, 04:49 PM
 • शिरोडा - तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांचा प्रारंभापासून शिरोडा वेळागरवाडी ग्रामस्थांना वेळोवेळी पाठिंबा आणि सहकार्य आहेच. त्यांनी परिसरातील युवकांना पर्यटनविषयक शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, जेणेकरून या भागाचा विकास होईल आणि सुशिक्षित युवक स्वतःच्या पायावर उभे राहतील, अशी मागणी वेळागर सर्व्हे नंबर 39 मधील सामाजिक कार्यकर्ते व तंबू प्रकल्प निर्माते अजय मरे यांनी केली.
  May 28, 04:41 PM
 • सावंतवाडी - महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्ना संदर्भात महाराष्ट एकीकरण समितीच्या वतीने 1 जूनला येथे होणाऱ्या जेलभरो आंदोलनात सर्वपक्षीय दोन हजार कार्यकर्ते सहभागी होतील. असा दावा महाराष्ट्र एकीकरण समितीचे जिल्हाध्यक्ष वसंत ऊर्फ अण्णा केसरकर यांनी केला. सीमा प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दावा सुरू आहे. त्याचा निकाल लागेपर्यंत सीमा भाग केंद्र शासित करावा, अशी एकीकरण समितीची मागणी आहे. यासंदर्भात एकीकरण समितीचा निकराचा संघर्ष सुरू आहे. 1 जूनचे जेलभरो आंदोलन याच संघर्षाचा भाग असल्याचे...
  May 28, 04:20 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात