Home >> Maharashtra >> Kokan >> Ratnagiri

Ratnagiri News

 • सिंधुदुर्ग - कॉग्रेसचे उमेदवार निलेश राणेंचा कोणत्याही परिस्थितीत प्रचार करणार नाही, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसकर यांनी घेतली आहे. दीपक केसकर यांच्या भूमिकेमुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये दुही माजली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिंधुदुर्गमध्ये सभा घेऊन कोकणात आघाडीत निर्माण झालेले बिघाडीचे वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. आता राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता निलेश राणेंचा प्रचार करणार असल्याचेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले....
  April 13, 03:49 PM
 • नाणीज (जि. रत्नागिरी) येथील सुंदरगडावर शुक्रवारपासून संतशिरोमणी गजानन महाराज प्रगट दिन व रामानंदाचार्य जयंती उत्सवाला प्रारंभ झाला. नवग्रह याग, शोभायात्रा यासह दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. शनिवारी प्रगट दिनाचा मुख्य सोहळा होत आहे. यानिमित्ताने देशभरातील असंख्य भाविक सुंदरगडावर जमा झाले असून परिसर गजबजून गेला आहे. भव्य शोभायात्रा व नरेंद्र महाराजांचे प्रवचन यासह विविध कार्यक्रम शनिवारी साजरे होणार आहेत.
  February 22, 12:40 AM
 • अलिबाग - राज्यातील व केंद्रातील कॉँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर खाली खेचण्याचा निर्धार तमाम शिवसैनिकांनी केला आहे. देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान, तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, अशा शब्दांत युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी अलिबागच्या मेळाव्यात शिवसेनेचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून उद्धव ठाकरेंची उमेदवारी जाहीर करून टाकली. युवा सेना पदाधिकार्यांच्या पहिल्या राज्यस्तरीय मेळाव्यात आदित्य म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 80...
  January 17, 04:57 AM
 • अलिबाग - एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजप नेत्यांबरोबर जागा वाटपाची चर्चा करत असताना सामान्य शिवसैनिकांच्या मनात मात्र भाजप व मोदींविरोधात असलेली खदखद गुरुवारी समोर आली. भाजपच्या मिशन 272चे सर्वेसर्वा अरविंद गुप्ता यांना युवा शिवसैनिकांनी मोदींबाबत प्रश्न विचारून भंडावून सोडले. अखेर शिवसेना नेते राहुल नार्वेकर यांना माइक हाती घेऊन प्रश्नोत्तरे संपवावी लागली. अलिबाग येथे युवा सेनेच्या पदाधिका-यांचा पहिला राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या...
  January 17, 03:21 AM
 • कणकवली- आमच्यावर उगारलेला हात खांद्यापासून वेगळा केल्याशिवाय राहणार नाही. यापुढे पोलिस आणि सत्ताधार्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. आम्ही सत्तेवर आल्यावर या सर्वांचे हिशेब चुकते करू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख मंगळवारी नारायण राणे यांचे नाव न घेता दिला. कणकवली येथे रविवारी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत उपजिल्हाप्रमुख राजू शेट्टय़े व अनेक शिवसैनिक जखमी झाले होते. तसेच जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनाही अटक झाली होती. या सर्वांची भेट घेण्यासाठी उद्धव...
  November 27, 05:50 AM
 • सिंधुदुर्ग / कणकवली - आमच्यावर उगारलेला हात खांद्यापासून वेगळा केल्या शिवाय राहाणार नाही. यापुढे पोलिस आणि सत्ताधा-यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. कणकवलीत रविवारी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत उप जिल्हाप्रमुख राजू शेट्ये आणि अनेक शिवसैनिक जखमी झाले होते. त्यांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे आज (मंगळवार) कणकवलीत आले आहेत. त्यांनी जिल्हा प्रमुख वैभव नाईक व शेट्ये यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी...
  November 26, 08:42 PM
 • सिंधुदुर्ग - कणकवली येथे काँग्रेस आणि शिवसेनच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. दुस-या दिवशीही येथे तणावाची परिस्थीती असून नारायण राणे आणि शिवसेना नेत्यांमधील शाब्दीक चकमक संपायचे नाव घेत नाही आहे. रविवारी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाइल झाली. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्यावर केलेल्या आरोपांवरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. नेत्यांनी एकमेकांना...
  November 25, 02:06 PM
 • चिपळूण - चिपळूण-कराड मार्गावर पेडांबे गावाजवळ चालत्या बसने पेट घेतल्यामुळे कित्येक तास दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबली होती. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही, मात्र बसचे मोठे नुकसान झाले आहे. पेडांबे गावाजवळ चालत्या मिनीबसने पेट घेतल्याचे मागून येणा-या वाहनातील लोकांनी बसचालकाला सांगितले. तोपर्यंत बसमधील प्रवाशांनाही या आगीची कल्पना नव्हती. त्यानंतर तत्काळ बस रिकामी करण्यात आली. पुढच्या काही क्षणांतच बसने आणखी पेट घेतला. जवळपास तीन तास आग विझवण्याचे काम सुरू होते. या...
  October 17, 05:03 PM
 • रत्नागिरी - पेट्रोल टाकून जाळण्यात आलेले रत्नागिरीतील सहायक पोलिस उपनिरिक्षक हरिश्चंद्र पेवेकर (56) यांचा अखेर मृत्यू झाला. अज्ञात चार ते पाच जणांनी त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास शहरात घडली होती. पेवेकर यांनी नावे सांगितलेल्या दोन संशयित हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. पेवेकर 80 टक्के भाजल्या गेले होते. गंभीर अवस्थेत त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यांनी काल रात्री उशीरा प्राण सोडले. कुवारबाव येथील...
  October 7, 09:26 AM
 • रत्नागिरी - सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पेवेकर (56) यांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाला असून ते 90 टक्के भाजले आहेत. रत्नागिरी पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पेवेकर यांच्यावर कुवारबाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडरकर सामाजिक न्याय भवन येथे एका टोळक्याने हल्ला केला आणि नंतर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज (रविवार) सकाळी 6.30 च्या दरम्यान ही घटना घडली आहे. एवढ्या सकाळी पेवेकर येथे कसे आले याचा तपास पोलिस करत आहेत. काही प्रत्यक्षदर्शींनी...
  October 6, 01:38 PM
 • मुंबई- ऐन पावसाळ्यात मुंबईतील समुद्रात आज (मंगळवार) भरती आली आहे. 4.88 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या असून समुद्राचे पाणी शहरात शिरले आहे. तसेच दुपारपासून पावसाचा जोर वाढल्याने हार्बर लाईनवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. चुनाभट्टी- कुर्ल्यादरम्यान पाणी साचल्याने पनवेल ते छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुसरीकडे मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे, वाहतुकीच्या कोंडीमुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. मुंबईत दुपारी बारानंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. मुसळधार...
  July 23, 03:21 PM
 • रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांसह तीन समितींच्या सभापतींनी राजीनामे दिले असून अद्यापही त्यांच्या जागेवर नवीन पदाधिका-याची निवड करण्यात आलेली नाही. या घटनेस 15 दिवस उलटून गेले आहेत. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विश्वास सुर्वे, बांधकाम व आरोग्य सभापती दत्ता कदम, महिला व बालकल्याण सभापती अरूणा आंब्रे, शिक्षण व अर्थ सभापती विजय सालीम यांनी 5 जून रोजी आपापल्या पक्षाचे आदेश मानून जिल्हा प्रशासनाकडे आपला राजीनामा सुपुर्द केला. निवडणूक कार्यालयाकडून जोपर्यंत निवडणूक...
  July 17, 11:43 AM
 • रत्नागिरी - आरोग्य विभागाच्या गट-अ आणि ब श्रेणीतील जिल्ह्यात एकूण 27 जागा कमी झाल्या आहेत. शासनाने दिलेल्या मुदतीमध्ये नियुक्त झालेले वैद्यकीय अधिकारी कामावर रूजू न झाल्याने आरोग्य विभागाने त्यांच्या नेमणूका रद्द केल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने महाराष्ट्र ज्ञान महामंडळामार्फत आरक्षिणनिहाय 22 एप्रिल 2013 ला 108 पात्र उमेदवारांना वैद्यकीय अधिकारी या पदाचे नियुक्ती पत्र दिले होते. आरोग्य विभागाने नियुक्त उमेदवारांना एक महिन्याच्या आत आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी रूजू व्हावेत असे...
  July 16, 01:36 PM
 • रत्नागिरी - रत्नागिरी आणि चिपळूण परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर आसुर्डेजवळ रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे वाहनांना पुढे जाण्यात मोठा अडथळा येत आहे. कोकण रेल्वेची वाहतूकही ठप्प झाली आहे. मुसळधार पावसामुळे चिपळूण, संगमेश्वर येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पावसामुळे हजारो प्रवाशी अडकून पडले आहेत. या पावसामुळे संगमेश्वरमधील माखजन गावाचा संपर्क तुटला आहे. संगमेश्वर...
  July 2, 09:03 PM
 • मालवण- आज आहे डॉक्टर्स डे. रुग्णांसाठी डॉक्टर हा देवदूतच असतो. डॉक्टरांच्या तत्परतेने शेकडो रुग्णांचे प्राण वाचले आहेत. वेळेची तमा न बाळगता रुग्णाला वाचविण्यासाठी डॉक्टर धावून जातात. याची प्रचिती देणारी एक घटना मालवणजवळ एका छोट्याशा गावात घडली. मध्यरात्रीच्या सुमारास एका गर्भवतीला अचानक प्रसव वेदना सुरु झाल्या. वैद्यकीय सुविधा त्या गावापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या मालवणमध्येच उपलब्घ आहे. तिच्या पतीने तिला रिक्षातून मालवणकडे नेतो. परंतु, रस्तेतच तिची अवस्था अतिशय गंभीर होते....
  July 1, 05:55 PM
 • रत्नागिरी- कणकवलीहून मालवणच्या दिशेने येणारी एसटी बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. आज शनिवारी संध्याकाळी वातवड-खैदा गावाजवळ हा अपघात झाला. यात वैभव सदानंद कदम (22) याचा जागीच मृत्यू झाला. रिक्षाचालक अक्षय अजय तावडे हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर गोवा बांबूळी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
  June 29, 09:14 PM
 • रत्नागिरी- मालवणच्या समुद्रकिनार्यावर विष्णूरुपी तिरुपती बालाजीची पूरातन मूर्ती आढळून आली आहे. सकाळी फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या दोन चिमुरड्यांना ही सहा इंच लांबीची बालाजीची मूर्ती दिसली. मूर्ती वाळूत रुतलेली होती. चिमुरड्यांनी ती अलगद बाहेर काढली. मूर्ती काळ्या पाषाणाची असून रेखीव आहे. गेल्या महिन्यात याच किनार्यावर ब्रह्मदेवाची तर मेढा राजकोय भागात शिवकालीन तोफ आढळून आली होती. मालवण शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्यामुळे समुद्र किनार्यावर अशा प्रकारच्या प्राचिन मूर्ती...
  June 29, 05:36 PM
 • अलिबाग - कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी आरोपी असणारा निलंबित उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूर याचा भाऊ नीलेश यालाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. नितीशची कोट्यवधीची मालमत्ता नीलेशच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. न्यायालयाने मंगळवारी त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. नितीश ठाकूर याने सुमारे 221 कोटी 79 लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आपला भाऊ नीलेश व आईच्या नावे केली असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत समोर आले आहे. त्यानुसार नीलेशला अटक...
  June 26, 01:41 AM
 • रत्नागिरी- कोकण रेल्वेला यंदाच्या पावसाळ्यातील पहिला फटका बसला. रत्नागिरीजवळ विलवडेजवळ रुळांवर माती आल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक काही तासांसाठी बंद पडली होती. माती हटविल्यानंतर वाहतूक सुरु करण्यता आली असून जनशताब्दी एक्स्प्रेस आणि नेत्रवती एक्स्प्रेस रवाना करण्यात आल्या आहेत. सुमारे 3 तास वाहतूक ठप्प होती. काही दिवसांपासून कोकणात संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे रुळांवर माती आली. माती काढण्याचे काम सुरु करण्यात आले होते.
  June 25, 07:05 PM
 • रत्नागिरी- मुलगी पाहण्यासाठी तुरळ (ता. संगमेश्वर) येथे मालाड (मुंबई) येथून आलेल्या चव्हाण कुटूंबियांवर रविवारी मध्यरात्री काळाने घाला घातला. मुंबई- गोवा महामार्गावर लवेल-दाभीळजवळ त्यांच्या क्वॉलिस गाडीला समोरून येणार्या डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात 11 ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये तीन चिमुरड्यांचा समावेश आहे. चव्हाण कुटूंबिय मूळचे दापोली तालुक्यातील रहिवाशी आहेत. मात्र, ते मालाड येथे सध्या वास्तव्यास होते. मुलगी पाहण्याच्या निमित्ताने ते तुरळ (ता. संगमेश्वर) येथे...
  June 24, 03:31 PM
 
जाहिरात

RECOMMENDED