जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Ratnagiri

Ratnagiri News

 • अलिबाग - कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी माजी उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूर याचा जामीन विशेष न्यायालयाने रद्द केला आहे. तसेच त्याला अटक करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहेत. रायगड येथे उपजिल्हाधिकारी पदावर असताना ठाकूर याने 118 कोटी 39 लाख 816 रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमवली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली होती. मात्र 90 दिवसांत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करण्यात एसीबीला अपयश आल्याने न्यायालयाने तेव्हा ठाकूरला जामीन मंजूर...
  April 24, 01:59 AM
 • रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात चालू वर्षी 20 लाख 51 हजार झाडे जिल्हा परिषद लावणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासनातर्फे विविध उपक्रम राबवली जाणार आहेत. त्यात पर्यावरण ग्राम समृध्द योजना, शतकोटी वृक्षलागवड, वृक्षलागवड व संवर्धन यांचा समावेश आहे. शासनाने प्रत्येक खात्याला वृक्षलागवडीचे उद्दीष्ट ठरवून दिले आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा परिषद वृक्षलागवडीचे काम करत आहे.
  April 20, 01:00 PM
 • खेड - तालुक्यात सोमवारी (ता.15) सुकिवली सोनारवाडी येथे लागलेल्या आगीत आंबा आणि काजूची बाग जळून खाक झाली. बागयतदार प्रभाकर मोरे यांच्या आंबा आणि काजू बागेस सोमवारी आग लागली. यात मोरे यांची 20 एकरांवरील बाग आगीत पूर्णपणे नष्ट झाली. यात लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे. आग विझवण्याचे प्रयत्न ग्रामस्थांनी केले. मात्र वारा असल्याने आग नियंत्रणात आली नाही. आगीची माहिती नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला दिली. घटनास्थळी पोहोचण्यास अग्निशामक दलाला उशीर झाल्याने सर्व बाग आगीत नष्ट झाली. संध्याकाळी...
  April 18, 12:47 PM
 • गणपतीपुळे - समुद्रात बुडणा-या युवकाला वाचविण्यात यश आले. संजय पाटील हा युवक कुटूंबासह गणपतीपुळेला देवदर्शनासाठी आला होता. समुद्रात आंघोळीसाठी गेलेल्या संजय याला समुद्र लाटा आत ओढत असल्याचा अंदाज आला नाही. तो बुडत असल्याचा बाबा मयेकर, दिनेश सुर्वे, दिनेश ठावरे, जीवन पाटील, सूरज पवार या समुद्रकिना-यावर असलेल्यांनी लाईफ रिंगच्या सहाय्याने संजयचे प्राण वाचवण्यात यश मिळवले.
  April 17, 02:30 PM
 • रत्नागिरी - अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये आता केंद्रीय भरती प्रक्रियेतून शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार आहेत. तसेच शिक्षकांची नवी पदे निर्माण करण्यात येणार असल्याचा उल्लेख शासकीय मसुद्यात आहे.2009 च्या शिक्षण हक्क कायद्यानुसार शासनावर मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण पुरवण्याची जबाबदारी आहे. त्यानुसार सरकार आता स्थानिका स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या जागा केंद्रीय प्रवेश परीक्षेद्वारे ( सीईटी) भरणार आहे. या निर्णयाचा जास्त फटका...
  April 15, 01:07 PM
 • राजापूर - जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प शिवसेना पूर्ण होऊ देणार नाही. प्रकल्पाची भिंती बांधणी पूर्ण झाली असली, तरी त्यासाठी येणारी साधनसामग्री शिवसेना आंदोलनाच्या माध्यमातून पोहोचू देणार नाही, असे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी सांगितले. माडबन जनहित सेवा समितीतर्फे अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आले होते. त्या प्रसंगी आंदोलनकर्त्यांशी साळवी बोलत होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, सेवा समितीचे तालुकाध्यक्ष प्रकाश कुवळेकर, जि.प. सदस्य अजित नारकर व...
  April 11, 01:20 PM
 • सिंधुदुर्ग - उद्योगमंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या कणकवली नगर पंचायत निवडणुकीत राणेंच्या नेतृत्वाखालील कॉँग्रेस पक्षाने 13 जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळविले, तर त्यांच्याविरोधात एकत्र आलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपला मात्र अपयश आले आहे. 1७ जागांच्या पालिकेत काँग्रेसला 13, तर शिवसेनेला तीन, तर भाजपला एक जागा मिळाली. या निवडणुकीत मनसेनेही आपले तीन उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यांच्यासह राष्ट्रवादीला खातेही उघडता आले नाही. पुढील स्लाइडमध्ये वाचा, गुहागरमध्ये...
  April 2, 08:36 AM
 • रत्नागिरी- कणकवली नगरपरिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस 13 जागांवर आघाडी घेऊन स्पष्ट बहुमत सिद्ध केले आहे. नारायण राणे यांनी शिवसेनासह भाजप, मनसे आणि राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला आहे. 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने 13 जागांवर बाजी मारली तर शिवसेनेला तीन आणि भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले. कणकवलीमध्ये नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राणेंना शह देण्यासाठी शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी महाआघाडी झाली. तर मनसेनेही स्वतंत्रपणे निवडणूक लढवली....
  April 1, 02:21 PM
 • चिपळूण - तरूणीची छेडछाड केल्या प्रकरणी एका प्राध्यापकाला नुकतेच पोलिसांनी ताब्यात घेतले. प्राध्यापक मदनलाल निपाणे हे शहरातील एका महाविद्यालयात कार्यरत आहेत.गेल्या काही दिवसांपासून निपाणे हे बहादूरशेख नाक्यावर जाऊन त्या तरूणीला तू मला आवडते असे म्हणत होता. तरूणीने या दररोजच्या घटनेला कंटाळूण पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवले असता निपाणे यांना ताब्यात घेण्यात आले.
  March 23, 04:08 PM
 • रत्नागिरी - नवविवाहितेने गळफास लावून मंगळवारी ( ता.19) कारवांचीवाडी पोलिस वसाहतीत आत्महत्या केली.या आत्महत्या प्रकरणी नवविवाहितेच्या पतीला न्यायालयाने सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मेघा पावसकर यांचे काही दिवसांपूर्वीच दापोली येथील मंगेश पावसकर यांच्याशी विवाह झाला होता. हे दोघे ही पोलिस वसाहतीत राहत होते. मंगळवारी मेघा यांनी घरात गळफास लावून आत्महत्या केली.नवविवाह तेच्या वडीलांनी मेघाच्या पतीची चौकशी करावी व त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी पोलिस अधीक्षक दीपक...
  March 22, 01:00 PM
 • रत्नागिरी - भाजपाची रत्नागिरी तालुक्याची 61 जणांची कार्यकारिणी नुकतेच भाजपाचे तालुकाध्यक्ष बाबा भाईंग व सरचिटणीस उमेश कुलकर्णी यांनी जाहीर केली महेश खानविलकर ,संयोग दळी यांची सरचिटणीस, रामचंद्र लोखंडे,परवीन मुकादम,सूर्यकांत सावंत यांची उपाध्यक्ष व नरेश मयेकर,सुरेश प्रसादे,मलिंद राजवाडकर,मनोहर मोरे यांच्या 61 जणांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
  March 21, 01:51 PM
 • गुहागर - तालुक्यातील तवसाळ व काताळे या गावातील गावठी कट्टयाच्या बंदुकी विक्री प्रकरणी पाच आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या आरोपींना 22 नोव्हेंबर 2009 पासून पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. दिलीप काताळकर, रमेश काताळकर, विठ्ठल पाष्टे, शशिकांत बामणे, शंकर बामणे या आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले.या पाच आरोपींनी तवसाळ व काताळे यागावात गावठी कट्टयाच्या बंदुकीची विक्री करत होते.त्यांना नोव्हेंबर 2009 साली पोलिसांनी अटक केली होती. सरकारी पक्षाला या आरोपींविरूध्द कोणतेही पुरावे...
  March 20, 02:10 PM
 • खेडजवळ जगबुडी नदीत खासगी बस कोसळून झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या 37 वर पोहचली आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. आतापर्यंत 26 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतकांची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघातग्रस्त बस महाकाली ट्रॅव्हल्सची होती. आजच्या अपघाताचे मुख्यकारण म्हणजे चालकाची चूक आहे. मुंबई-गोवा मार्गाच्या चौपदीकरणास उशीर झाल्याचे भास्कर जाधव यांनी मान्य केले आहे. महाकाली ट्रॅव्हल्सकडे प्रवाशांची यादीच नसल्याचा धक्कादायक...
  March 19, 12:43 PM
 • रत्नागिरी - एसटीचा कामगार हा संघटित आहे.त्याने तुरूंगवास भोगल्यानेच न्याय मिळाला आहे, असे एस.टी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी सांगितले. चव्हाण हे 49 व्या एस टी कामगार अधिवेशनाच्या समारोपाप्रसंगी बोलत होते.संघटना उभारणीत मुख्य आधार कर्मचारी आहे,असे चव्हाण यांनी सांगितले.यावेळी संघटनेचे सचिव हनुमंत ताटे यांनी मार्गदर्शन केले व पुढील 50 वे अधिवेशन पुणे येथे होणार असल्याचे जाहीर केले.
  March 18, 01:11 PM
 • कणकवली - बेकायदेशी गर्भपात केंद्र चालवल्याबद्दल फोंडाघाट येथील डॉ राजेश्वरी गुरव आणि डॉ सुजाता नारकर या दोन महिला डॉक्टरांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले. डॉ गुरव यांचे अनुराधा क्लिनिक व डॉ नारकर यांचे नारकर हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात केंद्र चालवत असल्याचे जिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ कुमार ननावरे यांना तपासात आढळून आल्याने त्यांच्याविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले.
  March 17, 12:56 PM
 • दापोली - तालुक्यात आज कासव, डॉल्फीन महोत्सवाचे मुरूड व वेळास समुद्रकिना-यावर संध्याकाळी 5.30 वाजता उद्घाटन होणार आहे.महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री भास्कर जाधव यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी आमदार सूर्यकांत दळवी,भाई जगताप,महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचे संचालक डॉ जगदीश पाटील,जिल्हाधिकारी राजीव जाधव यांच्या महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.आज सकाळी सात वाजता मुरूड समुद्रकिना-यावर डॉल्फिन सफारी व वॉटर स्पोर्टस् होतील.
  March 15, 01:13 PM
 • रत्नागिरी - माजगाव येथील महिलेची तिघांनी 55 हजार रूपयांची फसवणूक केली.श्ाबीना पोमेटकर यांनी आरोपींकडे आपले मंगळसूत्र गहाण ठेवले होते. तुळसणी-संगमेश्वर येथील दोघे व रत्नागिरीतील श्रीराम फायनान्स कंपनीच्या कर्मचा-यावर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोमेटकर यांच्याकडून त्यांची पुतणी गुलनार बोट व तिचा पती परवेज बोट यांनी लग्नात जाण्यासाठी मंगळसूत्र नेले.चुलतीला न सांगता पुतणीने मंगळसूत्र गहाण ठेवले होते व त्याची 55 हजार रूपयांची फसणूक केली.तसेच...
  March 14, 01:10 PM
 • अलिबाग - ज्येष्ठ निरूपणकार व महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मारकावरून उद्भवलेल्या वादामुळे व्यथित झालेल्या त्यांच्या कुटुंबीयांनी आता हे स्मारकच रद्द करण्याची मागणी केली आहे. या स्मारकासाठीचा निधी दुसर्या चांगल्या कामासाठी वापरावा, अशी विनंती करणारे पत्र नानासाहेबांचे पुत्र अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लिहिले आहे. रायगड जिल्हय़ात 30 एकर विस्तीर्ण जागेवर नानासाहेबांचे स्मारक उभारण्याचा निर्णय तत्कालीन राज्य सरकारने घेतला...
  March 14, 04:59 AM
 • रत्नागिरी - केसरी टुर्स कंपनीची प्रतिनिधी असलेल्या महिलेला अफरातफरा केल्या प्रकरणी पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.ही महिला केसरीमधील पर्यटन विभागात सेल्समन म्हणून कार्यरत होती. यशोधन राणे यांच्या तक्रारीनुसार आरोपी अश्विता खानविलकर (रा.कोकणनगर,रत्नागिरी)यांनी ऑक्टोबर 2012 ते फेब्रूवारी 2013 या कालावधी दरम्यान राणे यांच्या मालकीच्या केसरीतील 20 ते 25 पर्यटकांची आरक्षणे काढली व चेक व बनावट पावत्या बनवून 18 लाख अफरातफर केले.याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केले.न्यायालयाने खानविलकरांना...
  March 13, 03:42 PM
 • राजापूर - राजापूर पंचायत समितीत धनादेश अपहरण प्रकरणातील आरोपी माजी शिक्षणाधिकारी तानाजी नाईक यांना अद्याप ही अटक करण्यात आली नाही.न्यायालयाने नाईक यांना 72 तासांची नोटीस दिली आहे. अटकेत असलेल्या शिक्षण विभागाच्या शिपायांने दिलेल्या माहितीनुसार धनादेशाची रक्कम ही शिक्षणाधिकारी तानाजी नाईक यांच्या आदेशानुसार काढल्याचे पोलिसांना सांगितले.या माहितीनुसार नाईक यांना अटक करण्यासाठी पोलिस गेले असता नाईक यांनी न्यायालयातून 72 तासांची नोटीस त्यांना दाखवली. नाईक यांची अटक टाळण्यासाठी...
  March 12, 01:08 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात