जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Ratnagiri

Ratnagiri News

 • डोंबिवली:अलिबागला जाण्यासाठी सध्या एसटी व जलवाहतूक हेच दोन पर्याय उपलब्ध आहेत.पनवेल-अलिबाग या मार्गावर लोहमार्गची उभारणी लवकरच केली जाणार आहे अशी घोषणा मुंबई रेल्वे विकास महामंडळांचे(एमआरव्हीसी) संचालक राकेश सक्सेना यांनी केली. डोबिवली प्रवाशी संघटनेने आयोजित केलेल्या रामभाऊ म्हाळगी स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष भालचंद्र लोहोकरे,सुधाकर महाजन यांची उपस्थिती होती याबरोबरच तिस-या टप्प्या अंतर्गत विरार-वसई-दिवा-पनवेल नवीन...
  March 11, 01:11 PM
 • लांजा - लांजा तालुक्यात एकात्मिक बालविकास प्रकल्पा अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात 80 बालके कुपोषित आढळली आहे.यात 46 बालिकांचा समावेश आहे. हे सर्वेक्षण एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाने अंगणवाडी सेविकांच्या साहाय्याने केले.तालुक्यातील 200 अंगणवाड्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले होते.त्यात 52 लहान अंगणवाड्यांचा समावेश्ा होता.लांजा पंचायत समितीचे त्यावेळचे गटविकास अधिका-याने 2003 मध्ये केलेल्या कुपोषित बालके दत्तक घेण्याच्या योजनेत फक्त 5 ते 7 बालके कुपोषित आढळली होती. आता समोर...
  March 10, 01:31 PM
 • देवरूख - गडगडी धरणाजवळ (ता.संगमेश्वर ) अवैध वाळू उपसा केला जात आहे.तो बंद करावा यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली होती.त्याबाबत काइवाई करून वाळू उपसा बंद करण्यात आले होते.ते पुन्हा कसे सुरू झाले हा प्रश्न उपस्थित झाला आहे. धरणातील पाणी कमी झाल्याने वाळू उपसा वाढला आहे का याबाबत चर्चा सुरू आहे.वाळूचा डंपर उलटल्याने हा प्रकार प्रकाशझोतात आला आहे.महसूल व पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देऊन अवैध वाळू उपसा बंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
  March 9, 01:29 PM
 • मोरवंडे : आंबवलीतील (ता.खेड) रस्त्यांची दुरूस्ती करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने गुरूवारीपासून (ता.सात) आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी एका आंदोलकाची तब्येत खालवल्याने त्याला कळबंणी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आंबवलीतील उखडलेल्या रस्यावरून नियमित वाहतूक करण्ो तसेच रूग्ण किंवा गरोदर महिलांना दवाखान्यात नेणे म्हणजे तारेवरची कसरत ठरत आहे.रस्त्यांच्या दुरूस्तीविषयक वेळोवेळी निवेदन जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला...
  March 8, 12:08 PM
 • खेड- सातबारा उतार्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहाथ पकडण्यात आलेले दापोली महसूल विभागातील मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना खेड न्यायालयाने बुधवारी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दापोली तालुक्यातील सोंडेघर येथील सहनमियॉं नांदगावकर यांच्या पत्नी सबीरा नांदगावकर यांनी दापोली शहरातील कोंड परिसरात चार गुंठे जमीन घेतली. या जमिनीचे फेरफार करून सातबाराचे उतारे मिळावे, अशी मागणी त्यांनी तलाठी जाधव यांच्याकडे केली होती. तराठी जाधव व मंडळ अधिकारी पांडूरंग शिंदे यांनी या...
  March 7, 12:53 PM
 • कराड/चिपळूण- मुला-मुलीचा थाटामाटात शाही विवाह सोहळा पार पाडलेले राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते व मंत्री भास्कर जाधव यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शाही सोहळ्याचा खर्च करणा-या कराडमधील शहा कंस्ट्रक्शन या कंत्राटदाराच्या वेगवेगळ्या कार्यालयावर प्राप्तीकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. याचबरोबर लॉन मालकाची चौकशी, मंडप, डेकोरेटर्स यांचीही चौकशी करण्यात येत आहे. शहा यांच्या कराडमधील पंकज हॉटेलवर धाडी टाकल्या आहेत. शहा कंत्राटदार कराडमधील मोठे प्रस्थ आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री...
  February 19, 09:42 AM
 • रत्नागिरी - मनाला भुरळ घालणार्या निसर्गसंपन्न कोकणाला रविवारी देश-विदेशातील ललनांच्या सौंदर्याने भुरळ पाडली होती. रत्नागिरी जिल्हय़ातील गणपती पुळे येथे आयोजित इंडियन प्रिन्सेस अँड इंटरनॅशनल प्रिन्सेस 2013 कार्यक्रमात अनेक मॉडेल्सनी कॅटवॉक केले.
  February 18, 02:28 PM
 • खेड - अजित पवारांना नक्कल करायला कधीच जमणार नाही. नक्कल करायलादेखील अक्कल लागते. ते नेहमी गंभीर असतात कारण त्यांना सतत मोजत बसायचे असते, असा सणसणीत टोला राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्र्यांना लगावला. राज नकलाकार असल्याची टीका पवार यांनी केली होती. शुक्रवारी खेडमधील सभेत राज यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. अजित पवार पैशात, तर राणे जमिनीत मग्न आहेत, असा आरोप त्यांनी केला. कोल्हापूरच्या प्रचंड सभेनंतर कोकणातील खेडमधील सभेलाही नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. खेडमधील सभेत राज यांनी...
  February 16, 12:50 PM
 • खेड- कोकणातील जमिनी परप्रांतीयांना विकू नका व जे परप्रांतीय आहेत त्यांना हाकलून काढा, असे आवाहन राज ठाकरे यांनी कोकणवासियांना केले. तसेच रत्नागिरीतील प्रस्तावित जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प उपयोगाचा असेल तर त्याला खुशाल पाठिंबा द्या, चांगल्या कामात अडथळे आणू नका असेही राज यांनी स्पष्ट केले. राज म्हणाले, कोकणातील भूमिपूत्रांवर अन्याय होत असून आहे. तुमच्या जमिनी बाहेरचे लोक खरेदी करीत असून, तुम्हाला येथून विस्थापित करण्याचे ष़डयंत्र आहे. त्याला बळी पडू नका. आपल्या जमिनी विकून स्वत:चे...
  February 15, 08:32 PM
 • कणकवली- शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. विनायक राऊत तसेच स्थानिक पदाधिकार्यांच्या राजकारणाला कंटाळून उपरकरांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. शिवसेनेला जय महाराष्ट्र करून खेडमध्ये राज ठाकरे यांच्या होणार्या जाहीर सभेत ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार असल्याचे कळते. उपरकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याचेही वृत्त आहे. खेडमध्ये राज ठाकरेंची शु्क्रवारी सभा आहे. या सभेत उपरकारांसह शिवसेनेचे काही प्रमुख कार्यकर्तेही...
  February 15, 07:47 PM
 • चिपळूण- पक्षांर्तगत होणार्या अन्यायामुळेच आपल्याला शिवसेनेतून बाहेर पडावे लागले, असा आरोप कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रामदास राणे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. मी 27 वर्षे शिवसेनेत होतो. परंतु कधी प्रसिद्धीसाठी काम केले नाही. असे असतानाही सभापती, तालुकापप्रमुख पदांवरून करून शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी आपल्यावर नेहमी अन्याय केला. अनेक वर्षे सेनेचे काम केले मात्र संघरटनेने मला दिलेली पदे पूर्वसूचना न देता काढून घेतली. पदे काढून घेतल्याचे दु:ख नाही, परंतु याची कारणे तरी समजायला...
  February 11, 12:56 PM
 • रत्नागिरी - डिझेल दरवाढी विरोधातील आंदोलनामुळे गेल्या दहा दिवसांपासून ठप्प असेलली मच्छिमारी मंगळवारी सुरु झाली. मच्छिमारांनी त्यांच्या बोटी समुद्रात उतरवल्या आणि ताजी-ताजी मासळी बाजारात दिसायला लागली. त्यावर ग्राहकांच्या उड्या पडल्या होत्या. मच्छिमारांना दिल्या जाणा-या डिझेलच्या किंमतीत ११ रुपयांनी वाढ करण्यात आल्यामुळे मच्छिमारांनी मच्छिमारी बंद केली होती. यामुळे जवळपास ३० कोटींची उलाढाल ठप्प पडली होती. मंगळवारी मच्छिमारांनी त्यांच्या बोटी समुद्रात उतरविल्या त्यामुळे...
  February 6, 12:00 PM
 • रत्नागिरी- रत्नागिरी तालुक्यातील दोघांनी विषारी औषध प्राशन केल्याच्या घटना घडल्या आहेत. दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चिपळूण तालुक्यातील आंबडस येथील दादा दिंगबर चव्हाण वय 65 यानी डांबर गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तर दुसर्या घटनेत जयगड येथील चाफेरी- पाटीलवाडी येथील सचिन प्रभाकर पाटील वय 32 यांनी उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. दोघांनी विषारी औषध का प्राशन केले याचे कारण समजू शकले नाही.
  February 2, 01:08 PM
 • चिपळूण- तालुक्यातील तोंडली कांबळेवाडी येथील अल्पवयीन मुलीवर 2009 मध्ये झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी दोन नराधमांना 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा खेड सत्र न्यायालयाने सुनावली आहे. दरम्यान, तोंडली कांबडेवाडी येथे सन 2009 मध्ये एका पंधरा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. याबाबत 16 जून 2009 रोजी पीडित मुलीच्या आई-वडिलांनी सावर्डे पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सत्यजीत आमले यांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती. त्यांच्या विरुद्ध खेड ये्थील...
  January 30, 11:54 AM
 • रत्नागिरी- तालुक्यातील ओरी येथे मोटारसायकल घसरुन झालेल्या अपघातात कोल्हापुरातील नवविवाहितेचा मृत्यू झाला. गौतमी पृथ्वीराज मेहत्रे (वय-22, संभाजीनगर, कोल्हापूर) असे नवविवाहितेचे नाव आहे. कोल्हापूर महापालिकेतील कर्मचारी पृथ्वीराज मेहत्रे हे आपली पत्नी गौतमी हिच्यासोबत गणपतीपुळेकडे देवदर्शनासाठी निघाले होते. ओरीजवळ पृथ्वीराज यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला. त्यात गौतमी आणि पृथ्वीराज गंभीर जखमी झाले. जाकादेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून...
  January 28, 11:51 AM
 • रत्नागिरी- भाटीमिर्या येथील दोन कुटुंबांनी परस्परविरोधी तक्रार केली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारी झाले. यात दोन गटांतील लोकांनी एकमेकांवर बेदम मारहाण केली. या प्रकरणी दोन्ही गटांतील सात संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे तर आठ जण अद्याप फरार आहेत. सात आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. ही घटना शनिवारी रात्री घडली. नंदकुमार कुशा वांदरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार यांचे अंकिता वांदरकर यांच्या कुटुंबाशी अनेक...
  January 21, 12:50 PM
 • रत्नागिरी- अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या होणार्या निवडणुकीसाठी कोकणातून आठ उमेदवार उभे आहेत. नटराज पॅनलचे 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे नाट्य कलाकार विनय आपटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोकणात 900 मतदार आहेत. निवडणुकीचा 20 जानेवारी रोजी मुंबई येथे संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मुंबईत या निवडणुकीसाठी 38 जागांसाठी 58 उमेदवार उभे आहेत. त्यापैकी 16 उमेदवार हे नटराज पॅनलचे आहेत. प्रकाश कुशे, अँड. सुधाकर भावे, नाट्यलेखक प्र.लं. मयेकर व सुनील जोशी या...
  January 16, 02:34 PM
 • यशवंतराव चव्हाण नगरी (चिपळूण) - साहित्य व सिनेमा यांचं नातं तोडता येण्यासारखं नाहीच, हे मान्य करूनही चित्रपटांसाठी कालानुरूप व तांत्रिकदृष्ट्या सकस लेखन साहित्यिकांकडून येत नाही. त्यामुळे लेखकांनी स्वत:ला योग्य साच्यात बसवलं पाहिजे, असा सूर रविवारी मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टी या परिसंवादात चित्रपट निर्मात्यांनी काढला. अर्थात, निर्मात्यांत सकस साहित्याच्या आकलनाच्या मर्यादा आहेत, असे परखड मत लेखक अभिराम भडकमकर यांनी मांडले. साहित्य संमेलनाच्या मुख्य सभामंडपात तिसया दिवशी हा...
  January 14, 12:24 PM
 • यशवंतराव चव्हाणनगरी (चिपळूण) - आमची पिढी रोजगाराच्या निमित्ताने जरी विदेशात स्थायिक झाली असली तरी त्यांच्या मनात आजही भारताविषयी पूर्वीइतकीच आत्मीयता टिकून आहे. विदेशात जी मराठी माणसे स्थायिक झाली त्यांनी आपली संस्कृती टिकवण्यासाठी आजही अनेक प्रयत्न सुरू ठेवले आहेत. महाराष्ट्र मंडळांची वाढती संख्या व मराठी शिकवण्यासाठी चालवलेले जाणारे वर्ग, विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम यातून आपल्याला हे प्रयत्न दृश्यरूपात दिसू शकेल, असे प्रतिपादन इंग्लंडमध्ये गेल्या 40 वर्षांपासून वास्तव्याला...
  January 14, 12:24 PM
 • यशवंतराव चव्हाण नगरी- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ताकद त्यांच्या कुंचल्यामध्ये होती. याच कुंचल्याच्या फटकार्यांनी त्यांनी मराठी माणसांमध्ये वाघाची ताकद निर्माण केली. केवळ कुंचल्याच्या साहाय्याने एवढे मोठे कर्तृत्व अन्य कोणी गाजवले असेल याचे अन्य उदाहरण माझ्या तरी बघण्यात नाही. शिवसेनाप्रमुखांचे नाव चिपळूणमधील साहित्य संमेलनाच्या मुख्य व्यासपीठाला दिल्यानंतर त्यावरून वाद निर्माण होतील, असे कधीही वाटले नव्हते, असे प्रतिपादन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज...
  January 13, 12:39 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात