जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Ratnagiri

Ratnagiri News

 • यशवंतराव चव्हाणनगरी (चिपळूण)- राजकारणात काम करणार्यांना वाचन करावंच लागतं. कारण वाचनाने कुठे तरी ठिणगी पडते आणि चांगल्यासाठी तिचा वणवाही होऊ शकतो; पण वाचत असताना कोपर्यात बसलेल्या एखाद्या स्त्रीचं दु:ख काय आहे, हेही वाचता आलं पाहिजे, असे प्रतिपादन इंदूरच्या खासदार सुमित्रा महाजन यांनी आम्ही काय वाचतो? का वाचतो? या परिसंवादाचा समारोप करताना केले. मुख्य सभामंडपात झालेल्या या परिसंवादात खासदार अनंत गिते, आमदार प्रमोद जठार, र्शीनिवास पाटील, मंत्री सुनील तटकरे आणि लेखिका उषा...
  January 13, 09:50 AM
 • यशवंतराव चव्हाण नगरी (चिपळूण)- महाराष्ट्र हा मराठय़ांचा नाही तर मराठी माणसांचा म्हणूनच ओळखला जाईल, अशी ग्वाही यशवंतराव चव्हाण यांनी दिली. महाराष्ट्र एकत्र राहिला पाहिजे या भावनेने यशवंतराव चव्हाण यांनी कायम काम केले. भाषा विकासासाठी यशवंतराव चव्हाण यांनी जितके मोलाचे काम केले तितके काम त्यांच्यानंतरच्या एकाही नेत्याने केले नाही. यशवंतरावांचा अपवाद वगळता महाराष्ट्राचे गेल्या 50 वर्षांत इतर नेत्यांनी इतक्या मोठय़ा प्रमाणावर नुकसान केले आहे की त्याचे दुष्परिणाम भावी पिढय़ांना भोगावे...
  January 13, 09:47 AM
 • यशवंतराव चव्हाण नगरी (चिपळूण)- भाष्य किंवा व्यंगात्मक कविता करताना कवीला वैचारिक भूमिका असलीच पाहिजे. अन्यथा ती भाष्य कविता टिंगल टवाळीचे रूप धारण करते, असे मत भाष्यकार कवी रामदास फुटाणे यांनी खुल्या मुलाखतीत व्यक्त केले. त्यांच्यासह कवी अशोक नायगावकर यांच्या मुलाखतीने साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस सुरू झाला. प्रकाश देशपांडे यांनी घेतलेल्या या मुलाखतीला स्त्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आपल्या काही कविता वाचून दाखवत आणि त्या करण्यामागची पार्श्वभूमी विशद करीत दोन्ही कवींनी...
  January 13, 09:43 AM
 • यशवंतराव चव्हाणनगरी (चिपळूण)- जागतिकीकरणामुळे मानवी जगण्याचा वेग प्रचंड वाढला असून तो टिपणे हेच मराठी कादंबरीकारांसमोरचे खरे आव्हान आहे, यावर मराठीतले आघाडीचे कादंबरीकार आणि अभ्यासकांचे आज एकमत झाले. जागतिकीकरण आणि आजची मराठी कादंबरी या विषयावर येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर सभामंडपात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. रवींद्र शोभणे या परिसंवादाचे अध्यक्ष होते. जागतिकीकरणाने माणसाच्या जगण्यावर फार मोठा परिणाम केला आहे. प्रत्येक क्षेत्रात जागतिकीकरणाने प्रवेश केला आहे....
  January 13, 09:09 AM
 • यशवंतराव चव्हाणनगरी (चिपळूण)- चित्रकलेसंदर्भात समाजामध्ये फारशी जागृती आढळत नाही. या क्षेत्राबाबत अंधार जाणवतो. चित्रकला ही नेहमीच उपेक्षित राहिली. अजिंठा लेणी कुणी कोरली याची आपल्याला माहिती नाही. साहित्यिक, लेखकांना जेव्हा काही व्यक्त करावेसे वाटते तेव्हा कित्येकदा शब्दही अपुरे पडतात. प्रत्येकच भावना, कंगोरे शब्दांतून व्यक्त करता येत नाहीत. चित्र हे माध्यम तेथे कामाला येऊ शकते. रेषा व भाषा यांचा नेमका संबंध अशारीतीने प्रस्थापित होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द....
  January 13, 08:59 AM
 • यशवंतराव चव्हाणनगरी (चिपळूण) - साहित्य हीच सर्वश्रेष्ठ कला असल्याचे प्रतिपादन 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी शुक्रवारी केले. कविवर्य बा. सी. मर्ढेकरांनी संगीत ही सर्वश्रेष्ठ कला असल्याचे म्हटले होते. मात्र, मलातरी साहित्य हीच सर्वश्रेष्ठ कला असल्याचे वाटते, असे मत त्यांनी व्यक्त केले. कोत्तापल्ले म्हणाले, संगीत हे साहित्याचे अंग आहे. त्यामुळे साहित्य हीच सर्वश्रेष्ठ कला आहे. साहित्य हे कोणासाठीही घातक नसल्याचे सांगत डॉ. कोत्तापल्ले...
  January 11, 07:23 PM
 • आलोरे - पाटणला पळून जाण्याच्या तयारीत असलेले चोर कुटुंब चिपळूण तालुक्यातील अलोरे येथील नाकाबंदीत पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यांच्याकडून साधारण ९९ हजार रुपये रोख रकमेसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चिपळूण अर्बन बँकेसाठीचे काही लाख रुपये घेऊन नंदकुमार मनोरकर एस.टीने निघाले होते. ते गाडीत बसल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ दोन महिला दोन लहान मुलांसह गाडीत बसल्या. मनोरकर यांच्या शेजारी बसलेली व्यक्ति खाली उतरल्यानंतर संशयित महिलांपैकी एक मनोरकर यांच्या शेजारी येऊन बसली....
  January 10, 03:17 PM
 • चिपळूण - येथील एका कार्यक्रमातून ज्येष्ठ साहित्यिक पुष्पा भावे यांना वगळण्यात आले आहे. चिपळूणयेथील एका पुर्वनियोजित कार्यक्रमासाठी पुष्पा भावे चिपळूणमध्ये येणार होत्या. शिवसैनिकांनी भावे कार्यक्रमास उपस्थित राहिल्या तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे सांगत, पोलिसांमार्फत त्यांना मज्जाव केला. पोलिसांनी भावे यांना कार्यक्रमास उपस्थित राहू नका अशी विनंती केली. त्यानंतर त्यांनीही या कार्यक्रमास गैरहजर राहाण्याचे मान्य केले आहे. चिपळूण मध्ये होऊ घातलेल्या साहित्य...
  January 8, 12:03 PM
 • चिपळूण - येथे होत असलेल्या ८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी रद्द करण्याचा निर्णय संयोजन समितीने घेतला आहे. मुस्लिम साहित्यिक हमिद दलावईंच्या घरातून निघणा-या दिंडीला मुस्लिम समाजाच्या संघटनांनी केलेल्या विरोधापुढे नमते घेत संयोजन समितीने साहित्य संमेलनाच्या उदघाटनाआधी निघणारी ग्रंथदिंडी रद्द केली आहे. मुस्लिम लेखकाच्या सन्मानास मुस्लिम समाजाचाच विरोध होत असल्यामुळे विरोध करणा-यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी साहित्यीक वर्तूळातून केली जात आहे. साहित्य संमेलन...
  January 7, 01:39 PM
 • सिंधुदुर्ग- सिंधुदुर्ग येथील शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार परशुराम उपरकर मनसेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. उपरकरांना विधान परिषदेचे तिकीट न दिल्यामुळे ते नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली असूनसहका-यांसह मनसेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विनायक राऊत, अरूण दुधवडकर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक, यांच्या कार्यपद्धतीवर उपरकर हे नाराज आहेत. त्यामुळे उपरकर मनसेमध्ये प्रवेशाची तारीख...
  January 7, 12:37 PM
 • राजापूर - जैतापूर येथे प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प जोपर्यंत रद्द केला जात नाही तोपर्यंत आंदोलक शांत राहाणार नाहीत, असा इशारा विरोधकांनी दिली आहे. आज (२ जानेवारी) प्रकल्पस्थळाला वेढा घालण्याचे आंदोलन प्रकल्पविरोधकांकडून केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने प्रस्तावित प्रकल्पाच्या एक किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू केली आहे. यापूर्वीची आंदोलने पाहाता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई केली आहे. प्रशासनाने २०० हून अधिक प्रकल्पविरोधकांना नोटीस बजावली आहे....
  January 2, 11:52 AM
 • दापोली - तालुक्यातील करंजणी येथे सिनेस्टाईल थरारनाट्य घडले. एका शाळकरी मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न करणा-या भामट्याच्या तावडीतून मुलीने पळ काढला आणि घर गाठले. त्यानंतर पोलिसांनी त्या संशयिताला ताब्यात घेतले आहे. करंजणी येथील शिवाजी हायस्कुलमध्ये शिकत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला तुझी आई आजारी असल्याचे आदिनाथ माने याने सांगितले आणि सोबत चलण्याचा आग्रह केला. विद्यार्थिनीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्याच्या सोबत जाण्यासही नकार दिला. मात्र, वर्गशिक्षकांनी...
  August 18, 01:52 PM
 • रत्नागिरी- डिझेल आणि ऑईलचे दर वाढल्यामुळे एसटी महामंडळानेही बस भाड्यात 6.35 टक्के वाढ झाली होती. या भाडेवाढीची झळ कोकणालाही बसत आहे. महागाईने हैराण झालेली जनता यामुळे आणखी त्रस्त झाली आहे. ग्रामीण भागामधील प्रवासाच्या तिकीट दरामध्ये एक रुपयापासून तीन रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तर लांबपल्ल्याच्या तिकीट दरामध्ये 10 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे.नवीन भाडेवाढीनुसार रत्नागिरी एसटी स्थानकातून सुटणा-या गाड्यांमध्ये गणपतीपुळ्याला जाण्यासाठी 2 ते 3 रुपये वाढ झाली आहे. जयगडपर्यंत जाण्यासाठी 3...
  August 7, 01:01 PM
 • रत्नागिरी - नारळी पोर्णिमा हा सण मासेमारी करणार्या कोळी लोकांचा महत्त्वाचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असल्याने बोटी, जहाजांची वर्दळ या काळात बंद ठेवण्यात येते. खवळलेल्या समुद्रात कुठली अप्रिय घटना मासेमारी करणार्यांवर येऊ नये म्हणून आणि खवळलेला समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी परंपरेनुसार समुद्राला नारळ अर्पण करून त्याची पूजा करतात. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. या सणाला नारळाचे गोड पदार्थ तयार करण्याची देखील परंपरा आहे. महाराष्ट्राला सुमारे 720...
  August 2, 03:02 PM
 • रत्नागिरी: पिकनिकला गेलेले तिघे जण निवळी येथे धबधब्यात वाहून गेले. रविवारची सुटी एन्जॉय करण्यासाठी रत्नागिरी शहरातील महाजनी असोशिएटचे वकील प्रसाद महाजनी त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर निवळी धबधब्याजवळ गेले होते. त्यावेळी ही दुर्देवी घटना घडली.या अपघातामध्ये एक महिला वकिल देखील वाहून गेली आहे. महिलेला वाचवण्यासाठी महाजनी पाण्यात गेले होते. पण, अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने तिला वाचवण्याच्या प्रयत्नात प्रसाद महाजनी आणि त्यांचे सहकारी हे देखील वाहून गेले. अँड. अपर्णा कुलकर्णी, अनुजा...
  July 30, 11:28 AM
 • रत्नागिरी- सह्याद्रीसह कोकण आणि केरळपर्यंतची संपूर्ण निसर्ग संपदा जपण्यासाठी स्थापन केलेल्या बहुचर्चित माधव गाडगीळ समितीने नुकसाच अहवाल सादर केला आहे. परंतु हा पश्चिम घाट अहवाल स्वीकारू नये, अशी माहिती उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिली. गाडगीळ समितीच्या अहवालाबाबत राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्र्यांसह सर्व सदस्य केंद्रीय पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांची लवकरच भेट घेणार आहेत. असे राणे यांनी सांगितले. गाडगीळ समितीने अभ्यास करून तयार केलेला अहवाल केंद्र शासनाला नुकताच सादर केला...
  July 28, 01:03 PM
 • अलिबाग - २६ जुलै २००५ चा तो दिवस आठवले की, महाड तालुक्यातली दासगाव, जुई, कोडिंवते या गावातील लोकांच्या आंगावर आजही काटा उभा राहातो. आभाळ फाटल्यागत कोसळणा-या पावसाला आज सात वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र, अजूनही पावसामुळे घर उदध्वस्त झालेल्यांचे पुर्णतः पुनर्वसन झालेले नाही. २००५ ला झालेल्या मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला होता. दासगाव, कोंडिवते, जुई या डोंगरपायथ्याशी आणि नदीकिना-यावरील गावांना त्या पावसाची सर्वाधिक झळ बसली. जुई गावात दरड कोसळून त्या...
  July 26, 01:02 PM
 • सिंधुदूर्ग- कणकवली तालुक्यात अज्ञात तापाने गेल्या दोन दिवसात तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा हादरली असून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना अतिदक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कणकवली तालुक्यातील तोंडवली, देवगड आणि कुंभवडे या तीन गावात ही अज्ञात तापाची साथ पसरल्याचे बोलले जात आहे. या तापाची लागण 23 रूग्णांना झाली असून त्यांच्यावर उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या वर्षी पावसाळ्यात जिल्ह्यात लेप्टोची साथ पसरली होती. त्यात 29 जणांचा बळी गेला...
  July 25, 12:16 PM
 • चिपळूण- चिपळूण- कराड मार्गावर पिंपळीजवळ कार आणि मिनी बसच्या झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण किरकोळ जखमी झाले आहे. हा अपघात 22 जुलैला सकाळी 11 वाजेच्या सुमारास झाला. अपघात इतका भीषण होता की, त्यात कारचे प्रचंड नुकसान झाले. या अपघातत कार मालक अपेक्षित शाह (28) आणि उस्मान सय्यद (68) हे जागीच ठार झाले. तर बसमधील आठ प्रवासी जखमी झाले. जखमींवर शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे. स्पार्क शेवरोलेट आणि मिडीबसची समोरासमोर धडक झाली होती. या अपघाताची...
  July 23, 04:47 PM
 • सिंधुदूर्ग - संततधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावर दरडी कोसळ्याचे सत्र सुरुच आहे. दरड कोसळल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वेमार्गावर गेल्या दोन दिवसात आडवली- विलवडे स्थानकादरम्यान आणि राजापूरजवळ दोन ठिकाणी दरड कोसळली. यामुळे दोन वेळा रेल्वे मार्ग ठप्प झाला. संततधार पावसामुळे दरवर्षी कोकणरेल्वेला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. पावसामुळे दरड कोसळतात आणि रेल्वे वाहतूक ठप्प होते. आडवली-विलवडे स्थानकादरम्यान कोसळलेली दरड बाजूला करण्याचे काम सुरु झाले झाले आणि...
  July 21, 03:38 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात