जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Ratnagiri

Ratnagiri News

 • मुंबई- पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली असतानाच कोकण रेल्वेलाही पावसाने दणका दिला आहे. कोकणात मुसळधार पावसामुळे विलवडे ते वैभववाडी स्थानकांदरम्यान दुपारी रेल्वे रूळावर दरड कोसळ्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. वैभवाडीत जनशताब्दी एक्स्प्रेस थांबवून ठेवण्यात आली आहे. रूळावरील माती हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.आठवडाभरापासून कोकणात संततधार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा कहर झाला आहे. या पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. तर अनेक...
  July 20, 07:30 PM
 • चिपळूण- चिपळून तालुक्यातील कळवंडे धरणला गळती लागली आहे. गळती लागल्याने धरणातील पाणीसाठा वाहून जात असून धरणाच्या करण्यात आलेल्या दुरूस्तीची चौकशी करण्याची मागणी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्याकडे माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप माटे करणार आहेत. कळवंडे धरण 1980 साली बांधण्यात आले होते. अडीच कोटी रुपये खर्च करून धरणाचे दुरुस्तीचे काम नोव्हेंबर 2000 मध्ये सुरू करण्यात आले होते. हे दुरूस्तीचे काम 2012 नोव्हेंबपर्यंत पूर्ण करण्याची मुदत आहे. सध्याची कामाची स्थिती पाहता हे काम वेळेत पुर्ण होईल...
  July 20, 12:30 PM
 • कणकवली - कणकवली येथील रहिवासी प्रितम भाउसाहेब महाडदेव (वय 32) यांचे स्वाइन फ्लूने निधन झाले. स्वाइन फ्लूचा सिधुदुर्गातील हा पहिलाच बळी आहे. स्वाइन फ्लूमुळॆ मृत्यू झाल्याने जिल्ह्यात घबराहटीचे वतावरण पसरले आहे. स्वाइन फ्लूला वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रार्थमिक आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महडदेव या देवगड तालुक्यतील जामसंडे येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.
  July 16, 01:30 PM
 • रत्नागिरी - रत्नागिरीत मागील दोन वर्षापूर्वी उसळलेली लेप्टोची साथ यंदाच्या पावसाळ्यातही डोकवर काढतांना दिसून येत आहे. जिल्ह्याच्या विविध रुग्णालयांमध्ये रुग्ण लेप्टोच्या उपचारासाठी दाखल झाले आहेत. लेप्टोच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील असून, जिल्हापरिषदेचे अधिकारी मात्र बेफिकीर असल्याचं दिसून येत आहे.रूग्णालयात उपचार घेणार्या पाच रूग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. आरोग्याविभागातर्फे गावागावात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. तसेच, वैद्यकीय पथकही...
  July 12, 02:15 PM
 • महाड- महाड औद्योगिक वसातीमधील सॅन्डोझ या कंपनीत रिएक्टरमध्ये पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सचिन हरपळकर असे या कामगाराचे नाव आहे. सचिन हा सॅन्डोझ कंपनीत मागील दोन वर्षापासून प्लॅन्ट ऑपरेटर म्हणून नोकरी करत होता. तो सातारा जिल्ह्यातील धामणी गावातील रहिवासी होता. शनिवारी रात्रीच्या आठच्या सुमारास कंपनीतील एका रिअँक्टरमध्ये रासायनिक पावडर टाकत असतांना त्याच्या हातात असलेली बॅग खाली पडल्याने ती काढण्यासाठी तो वाकला असता त्याचा तोल जाऊन तो रिअँक्टरमध्ये पडला....
  July 10, 01:28 PM
 • रत्नागिरी- दापोली तालुक्यातील दाभोळजवळील गुडघे या गावात एका वृद्धाचा वीजेच्या खांबावरून तुटून तारांना चिटकून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जयवंत दांडेकर (वय-95) या व्यक्तीचे नाव आहे. बुधवारी संध्याकाळी घटना घडली. दापोली तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरु आहे. जोरदार वार्यासह विजेचे खांब अनेक ठिकाणी कोलमडले आहेत. विद्युत प्रवाह सुरु असताना तार खाली कोसळले. या तारांना चिटकून दांडेकरांचा मृत्यू झाला. वीज कंपनीचा बेपर्वाईपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे.
  July 6, 03:47 PM
 • रत्नागिरी: संपूर्ण कोकणात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर आजही कायम आहे. रत्नागिरीसह संगमेश्वर, मंडणगड, कणकवली आणि वैभववाडी परिसराला पावसाने चांगले झोडपले आहे. संततधार पावसामुळे भुईबावडा रस्ता खचल्याने कोल्हापूर- राजापूर हा राज्यमार्ग बंद झाला आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी तब्बल 10 दिवस लागतील अशी माहिती सूत्रांनी दिली. कुडाळ, मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडीतही पाऊस पडत आहे.शिर्डीत दोन इंच पाऊस; नगर शहरात जोरदार सरीअखेर पाऊस बरसला; रेल्वे कोलमडलीपूर्वोत्तरात धो-धो...
  July 4, 01:07 PM
 • रत्नागिरी: करूळ घाटात दरड कोसळल्याने कणकवली- कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक फोंडामार्गे वळविण्यात आली आहे. कोकणात पाऊस सक्रीय झाला आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे करुळ घाटात दरळ कोसळली. मार्ग मोकळा करण्याचे काम सुरु आहे. संध्याकाळपर्यंत मार्ग मोकळा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गणपतीपुळे परिसरात मुसळधार पाऊसगणपतीपुळे रत्नागिरीतही पावसाचा जोर वाढला आहे. दोन दिवसांपासून दमदार पाऊस होत असल्याचे परिसरातील नद्या, नाले वाहू लागले...
  July 2, 04:22 PM
 • रत्नागिरी - कोकण पदवीधर मतदारसंघातून माझी दावेदारी सरुवातीपासून आहे. त्यासाठी पक्षातील ज्येष्ठांकडे संपर्कदेखील साधला होता, मात्र पक्षाने कुणालाही विचारात न घेता निरंजन डावखरे यांना उमेदावारी दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार निलेश चव्हाण यांनी केला. तसेच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार असल्याचा खुलासा चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, पदविधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने मी २००३ पासून काम करत आहे. १४ हजार मतदारांची...
  June 30, 03:04 PM
 • खेड - कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक दोन तासासाठी ठप्प झाली होती. बुधवारी दुपारी ही दरड कोसळली. गेल्या वर्षीदेखील महामार्गावर याच ठिकाणी दरड कोसळली होती. दरड आणि माती जेसीबीच्या सहाय्याने काही वेळातच साफ करण्यात आली. त्यानंतर वाहतुक सुरु झाली मात्र, वाहनचालक जीव मुठीत घेऊन वाहने चालवित होती. मागील वर्षी ज्या तीन ठिकाणी दरड कोसळली होती यंदाही तिथेच दरड कोसळली आहे. यावेळी कोणतेही वाहन रस्त्यावर नसल्याने मोठी हानी टळली. फार जोराचा पाऊस नसतांना दरड कोसळत आहे....
  June 28, 02:41 PM
 • रत्नागिरी - जिल्ह्यामधील संगमेश्वर तालुक्यातील पांगरी गावाला राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियानाचा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला आहे. राज्यात कुपोषित बालकांची संख्या गेल्या काही वर्षात वाढत आहे. त्यामुळे शासनाने राज्य कुपोषण मुक्त करावे या उद्देषाने मागील वर्षापासून कुपोषणमुक्त ग्राम अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. गाव कुपोषणमुक्त करण्यासाठी गावाला पुरस्कार आणि सर्व संबंधीत अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, मदतनीस, महिला बचतगट प्रतिनिधी, ग्रामसेवक, सरपंच, प्रशिक्षित...
  June 27, 01:35 PM
 • संगमेश्वर - जमिनीच्या भांडणावरुन उपळे-वरचीवाडी येथील निशाणमोड येथे एका वृद्धाच्या डोक्यात कोयत्याने वार करण्यात आले तर, भांडण सोडवण्यास गेलेल्या वृद्धाच्या मुलीच्या डोक्यात दगड फेकून मारण्यात आला. या दोघांवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपळे-वरचीवाडी येथील पांडुरंग सोनू घडशी (६३) हे शनिवारी गुरे चरवून निशाणमोडी येथे लावलेल्या काजू कलमांची पाहाणी करत होते. त्यांना काही कलमा उपटून टाकल्याचे लक्षात आले. याबद्दलची विचारणा केली असता त्या ठिकाणी लपून बसलेले शांताराम...
  June 25, 03:17 PM
 • रत्नागिरी- शनिवारपासून प्रसन्न झालेल्या वरुणराजाने सलग तीन दिवस कोकण परिसरावर आभाळमाया कायम ठेवली आहे. मुसळधार पावसामुळे या भागातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर अनेक ठिकाणी पूर आल्याने काही गावांचा संपर्कही तुटला आहे. दरम्यान, पहिल्याच पावसात कोकण रेल्वे सोमवारी सकाळी काही वेळासाठी विस्कळीत झाली होती.दापोली तालुक्यातील दापोली-हर्णे रस्ता पाण्याखाली गेला आहे. तर देवगड येथे 10 वर्षाचा मुलगा ओढ्यात वाहून गेल्याचे वृत्त आहे. मालवणमध्ये माडाचे झाड घरावर पडल्याने एकजण जखमी झाला....
  June 19, 04:24 AM
 • रत्नागिरीः राज्यात मोसमी पावसाचे आगमन होताच कोकण रेल्वेला फटका बसला आहे. कोकणात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेला ब्रेक लागला असून अतिशय संथ गतीने वाहतूक सुरु आहे. लांजा आणि आडवली रेल्वे स्थानकादरम्यान रुळांवर मातीचे ढिगारे वाहून आले होते. त्यामुळे अनेक गाड्या थांबविण्यात आल्या होत्या. माती हटविण्यात आल्यानंतर संथ गतीने वाहतूक सुरु झाली आहे. दोन्ही दिशेने धावणा-या गाड्या सुमारे 4 तास उशीराने धावत आहेत. रेल्वे मार्गावर आलेली माती सातवाजेपर्यंत दूर करण्यात प्रशासनाला यश...
  June 18, 09:14 AM
 • रत्नागिरी: प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 1 जुलैपासून राज्यातील सर्व प्राथमिक शाळा बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा राज्यातील शिक्षण संस्थांनी दिला आहे. अलिबाग येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्थाचालक महासंघाच्या प्रांतिक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार राम मोझे अध्यक्षस्थानी होते. येत्या आठ दिवसांत सरकारला याबाबतची नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती महासंघाचे कार्याध्यक्ष वि. ल. पाटील यांनी दिली.अलिबाग येथे...
  June 16, 11:34 AM
 • रत्नागिरी - अॅपे टेम्पोने ठोकरल्याने विरुद्ध दिशेने येणा-या स्कोडा गाडीला धडकून एक पादचारी व्यक्ती ठार झाली. रत्नागिरी शहरातील साळवीस्टॉप येथे बुधवारी सकाळी ११.३० च्या सुमारास हा विचित्र अपघात घडला. अरुण धोंडिराम मिरजोळकर (५५) हे त्यांची बाईक रस्त्याच्या कडेला लावून पायी त्यांच्या मित्राकडे जात असतांना समोरुन आलेल्या अॅपे टेम्पोने त्यांना पहिल्यांदा धडक दिली. यामुळे मिरजोळकर कुवारबाच्या दिशेने जाणा-या स्कोडा गाडीली धडकले. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि ते रस्तावर...
  June 14, 12:49 PM
 • रत्नागिरी: प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आखण्यात आलेल्या पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी येत्या 10 जूनपासून करण्यात येणार आहे. यामुळे 10 जूनपासून 31 ऑक्टोबपर्यंत या मार्गावरून धावणार्या काही गाड्यांची वेळ काहीशी बदलणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीने दरडी कोसळण्याची भीती असलेल्या भागातून रेल्वे गाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेऊन कोकण रेल्वेकडून पावसाळ्यासाठी स्वतंत्र वेळापत्रक आखण्यात येते.दरम्यान, रत्नागिरीसह कोकणात पावसाला प्रारंभ झाला असून गेल्या दोन दिवसात 30 मिमी...
  June 7, 04:46 PM
 • रत्नागिरी: दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या भोवर्यात सापडलेल्या महाराष्ट्रावर एक दिवस आधीच वरुण राजाची कृपा झाली. कोकण किनारपट्टीवर मान्सून धडकला आहे. रत्नागिरीसह परिसरात मंगळवारीच पावसाने हजेरी लावली होती. आजही काही भागात दमदार पाऊस झाला. वातावरणात गारवा निर्माण झाला असल्याने उष्म्याने हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळाला आहे.गणपतीपुळेच्या समुद्र किनार्यावर उंच लाटा उसळल्या आहे. या लाटांमुळे किनारपट्टीवरील दुकानांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे समुद्र किनारपट्टी लगतच्या नागरिकांना...
  June 6, 05:05 PM
 • महाड - पुरातत्त्व खात्याची बंदी झुगारून किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या होळीच्या माळावरील पूर्णाकृती पुतळ्यावर शिवप्रेमींनी 132 किलो वजनाचे पंचधातूचे छत्र बसवले. छत्र बसवण्यास केंद्राच्या पुरातत्त्व खात्याने परवानगी नाकारली होती. तसेच त्या ठिकाणी जमावबंदीचे कलम 144 लावण्यात आले होते. मात्र शनिवारी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 338 वा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार उत्साहात साजरा करण्यात आला. याच वेळी शिवाजी महाराजांचे वंशज, खासदार उदयनराजे भोसले यांच्या...
  June 3, 02:52 AM
 • रत्नागिरी। 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमानपदाचा मान चिपळूणला मिळाल्यानंतर तेथील संमेलननगरीला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्याची घोषणा यजमान लोकमान्य टिळक स्मारक ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आली.यशवंतराव चव्हाण यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांना मानवंदना करण्यासाठी हा निर्णय घेण्याचे आल्याचे ग्रंथालयाचे कार्यवाह प्रकाश देशपांडे यांनी सांगितले. यशवंतरावांच्या जन्मशताब्दीनिमित्त संमेलन कराडला व्हावे, अशी...
  May 22, 04:14 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात