जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Kokan >> Ratnagiri

Ratnagiri News

 • नाणिज - श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे नुकत्याच झालेल्या वारी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानिमित्त महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या मोफत सेवेसाठी 14 रुग्णवाहिका दानशूरांनी स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते संस्थानकडे सुपूर्द केल्या.वारी उत्सवानिमित्त सुंदरगड भाविकांनी फुलून गेला होता. गडावर दोन दिवस काकडआरती, अभिषेक, धुपारती, रुद्र स्वाहाकार याग यासारखे धार्मिक कार्यक्रम झाले. सांगत सोहळ्यास देशभरातील भाविक व अनेक...
  May 14, 05:22 AM
 • श्रीवर्धन: दिवेआगर येथील ग्रामस्थ आणि विश्वस्त मंडळाने लोकवगर्णीतून सोन्याची गणेशमूर्ती बसवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सध्याचे विश्वस्त मंडळही बरखास्त करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मार्च महिन्यात या मंदिरातील सोन्याची गणेश मूर्ती आणि दागिने चोरीला गेले होते. पोलिसांनी या दरोडाप्रकरणी वेगवेगळ्या भागांतून काही आरोपींना अटक केली आहे, मात्र अद्याप मूर्ती मिळालेली नाही. त्यामुळे लोकवगर्णीतून नव्या सुवर्णमुर्तीची प्रतिष्ठापणा व जीर्णोद्धार करण्याचा निर्णय...
  May 6, 11:46 PM
 • रायगड - जिल्हयातील रोहा तालुक्यातील वरुड पाले गावात राष्ट्रवादी आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी झाली. यात एकाचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत. नथुराम खांडेकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता होता.सावंतवाडीच्या वरवडे गावात राणे समर्थकांचा राडा? कॉंग्रेस उमेदवाराच्या घरावर हल्लारायगड नगरपालिका निवडणूक प्रचारात कॉंग्रेस-शेकापचा राडा
  April 7, 06:57 PM
 • रायगड - दिवेआगार येथील मंदिर दरोड्याच्या निषेधार्थ आज रायगड बंद पाळण्यात येत आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी रायगड बंदची हाक दिली होती. त्याला रायगडकरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सोमवारी उद्धव ठाकरे यांनी या दरो़डा प्रकरणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान या मंदिर दरोड्या प्रकरणी चर्चा करण्यात आली. त्यानंतर ठाकरे यांनी दादरच्या सिद्धीविनायक मंदिरात घंटानाद आणि रायगड बंदची हाक दिली होती. आज सहा दिवस झाले तरी या दरोड्यातील आरोपी...
  March 29, 02:35 PM
 • सिंधुदुर्ग- बदलत्या हवामानानुसार आंबा फळांवर उपाययोजना होत नसल्यामुळे जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकरी संकटात सापडला आहे. कीटक आणि कीडरोगांमुळे उत्पादनात मोठी घट येत आहे. हेक्टरी 50 हजार एवढी नुकसान भरपाई मिळावी तसेच 100 टक्के कर्जमाफी व्हावी, अशी मागणी देवगड तालुका आंबा बागायतदार शेतकर्यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास रास्ता रोकोचाही इशारा शेतकर्यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी विरेंद्र सिंह यांना देण्यात आले आहे. कीटक व कीडरोगांमुळे आंबा फळाचे नुकसान मोठ्या...
  March 27, 04:24 PM
 • राजापूर - राजापूर तालुक्यातील ओणी-अणुस्कुरा मार्गावर ट्रक आणि इंडिगोच्या झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. मृत व्यक्ति ही डॉक्टर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. राजापूर तालुक्यातील सौंदळ पाटीलवाडी ते ओणी दैतवाडी दरम्यान राजापूरहून पाचलकडे जाणा-या इंडिगो कारची पाचलहून राजापूरकडे जाणा-या ट्रकला समोरासमोर ठोस बसून झालेल्या अपघातात कारचालक डॉक्टर जागीच ठार झाले आहेत. रविवारी सकाळी १०.३० वाजता हा अपघात घडला. खारेपाटण येथील अशोक दत्ताराम गुरव हा रविवारी सकाळी आपल्या ताब्यातील...
  February 20, 02:04 PM
 • सिंधुदुर्ग - कोकणात दादागिरी असल्याचा आरोप करणा-यांनी पुण्यात कोणाची दादागिरी आहे हे आधी पाहावे. अजित पवार हा खराब झालेला टेपरेकॉर्डर असून त्यांच्या धमक्यांना आपण घाबरत नाही, अशा शब्दांत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी जाहीर सभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले. कुडाळ येथे आयोजित जाहीर सभेत राष्ट्रवादीचे वस्त्रहरण करण्याची घोषणा नारायण राणेंनी केली होती. त्यामुळे आजच्या सभेकडे राज्याचे लक्ष लागले होते. मात्र प्रत्यक्षात 8 फेब्रुवारीला पुण्यात जाऊन आपण...
  February 1, 03:42 AM
 • सिंधुदुर्ग - नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोकणात येऊन उद्योगमंत्री नारायण राणेंना आव्हान दिले होते. त्याचे पडसाद आता जिल्हा परिषद निवडणुकीत उमटणार असल्याची चिन्हे आहेत. कोणी मुंबईतून येतो अन् कोकणात दादागिरी करतो. हे आता सहन केले जाणार नाही, असा खणखणीत इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच कुडाळ येथील जाहीर सभेत दिला होता. त्याला प्रत्त्युत्तर म्हणून राष्ट्रवादींच्या नेत्यांचे वस्त्रहरण करणार अशी जाहिरातबाजी करत राणेंनी प्रत्त्युत्तर...
  January 31, 06:46 AM
 • रत्नागिरी: बहुचर्चीत जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेकडून होणार विरोध हा केवळ देखावा आहे, असा आरोप ज्येष्ठ समाजवादी चळवळीचे कार्यकर्ते आणि माजी गृहराज्य मंत्री भाई वैद्य यांनी केला आहे. सत्ताधारी कॉंग्रेसप्रमाणेच विरोधकांना जैतापूर प्रकल्पाच्या माध्यमातून आपली फायद्याची पोळी भाजून घ्यायची आहे. असेही भाई वैद्य यांनी सांगितले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त सर्वोदय चळवळीच्या कार्यकर्त्यांनी रत्नागिरीतल्या साखरीनाटे येथे आयोजित जनहक्क परीषदेत ते बोलत होते. या परिषदेत उत्तराखंडात...
  January 27, 05:01 PM
 • सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गुजरातकडे अवैध खनिज वाहतूक करणारे 16 ट्रक रेडी या गावात महसूल विभागाच्या अधिकायांनी शुक्रवारी जप्त केले. सुमारे 71 टन असलेल्या या खनिजाची किंमत जवळपास 25 कोटी रुपये असल्याचे सूत्रांनी सांगितले. रेडी या गावातून गुजरातकडे हे ट्रक जात असताना ही कारवाई करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी गोवा येथील शुभंकर मिनरल रिसोर्सेस या खाण कंपनीने हा साठा करून ठेवला होता. विनापरवानगी ही वाहतूक करण्यात येत होती.
  January 14, 01:59 AM
 • रत्नागिरी - दोन दुचाकींची समोरा समोर टक्कर झाल्यानंतर एक दुचाकी समोरुन येणा-या डंपरवर आदळल्याने झालेल्या अपघातात दोनजण जागेवरच ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. खेड-मंडणगड मार्गावरील चिंचघर गावाजवळ मंगळवारी हा अपघात झाला. खेड येथील कामे उरकून मंडणगड कडे निघालेले प्रदीप रक्ते आणि संतोष चव्हाण हे दोघे या अपघातात ठार झाले. हे दोघे दुचाकीने खेडला आले होते. भरधाव वेगातील त्यांची दुचाकी खेड मंडणगड मार्गावरील चिंचघर गावाजवळ आली असता त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि समोरुन येणा-या दुचाकीवर...
  January 11, 02:03 PM
 • रत्नागिरी: गोवा- मुंबई हायवेवर भरधाव वेगाने जाणारा कंटेनर झाडावर आदळून नंतर चार गाड्यांना चिरडत झालेल्या विचित्र अपघातात पाच जण ठार झाल्याची घटना रविवारी घडली. हा अपघात हातखंबा- निवळी रस्त्यावर घडला. ठार झालेल्या पाचपैकी दोघांची ओळख पटली आहे.कृष्णा अनंत केदारे (60) आणि संतोष गोपाळ शिंदे (44) अशी दोन मृतांची नावे आहेत. तर अन्य तिघांची नावे कळू शकले नाहीत.याशिवाय पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यातील चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते. जखमी झालेले हे सुझलॉन कंपनीचे कर्मचारी असून ते...
  January 2, 03:53 AM
 • सिंधुदुर्ग- मालवण नगराध्यक्षाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी- शिवसेनेने युती करून उभ्या केलेल्या अपक्ष उमेदवारांचा अर्ज बाद ठरल्याने अल्पमतात असूनही येथील पालिका उद्योगमंत्री नारायण राणेंच्याच ताब्यात राहण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मालवण पालिकेत कॉँग्रेसला 8, राष्ट्रवादीला 6, शिवसेनेला 2 तर 1 जागा अपक्षाला मिळून त्रिशंकू परिस्थिती होती. राणेंना शह देण्यासाठी राष्ट्रवादीने शिवसेनेशी युती करत अपक्ष महेश जावकर यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली. मात्र, अर्ज भरण्यासाठी स्वत: न आल्याने...
  December 24, 03:20 AM
 • रायगड - पेण अर्बन बँक बंद पडून दीड वर्ष पूर्ण होत असताना रिझर्व्ह बँके कडून बँक दिवाळखोरीत का काढण्यात येऊ नये ? अशी विचारणा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. पेण अर्बन बँक लिक्विडेशनमध्ये जाण्याची शक्यता असल्याचे पत्र भारतीय रिझर्व्ह बँकेने पेण अर्बनच्या प्रशासनाला पाठविले आहे. अशी माहिती ठेवीदारांना कळताच त्यांनी बँकेसमोर जमायला प्रारंभ केला. बँकेसमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ठेवीदार जमा झाले. या संतप्त ठेवीदारांनी बँके विरोधात नारेबाजी करत रास्ता-रोको आंदोलन केले. नगरपालिका...
  December 21, 05:53 PM
 • रत्नागिरी - कोकणात राष्ट्रवादीची ताकत वाढत आहे. शिवसेना - भाजप युती कोकणातून नामशेष होत आहे. इथल्या संस्कृतीला दहशतवाद मान्य नसल्याचे लोकांनी या निकालाने दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया नगरविकास राज्य मंत्री भास्कर जाधव यांनी निकालानंतर दिली. तळकोकण म्हणून ओळखल्या जाणा-या सिंधुदूर्गमधील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवणमध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसचे मातब्बर नेते नारायण राणे यांना चितपट करीत विजय संपादन केला आहे. रत्नागिरीमध्ये मात्र राष्ट्रवादी आपले वर्चस्व राखू न शकल्याची कबुली...
  December 12, 07:48 PM
 • रायगड - तळकोकणात नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या पुढाकाराने सत्तेत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची आगेकूच रायगडमध्येही कायम राहिली आहे. जिल्ह्यातील १० नगरपालिकांपैकी ५ नगरपालिकांवर राष्ट्रवादीची सत्ता आल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. जिल्ह्यातील महाड, पेन, पनवेल या नगरपालिकांमध्ये काँग्रेसची सत्तेवर आली आहे. अलिबाग नगरपालिकेवर शेतकरी कामागार पक्षाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. उरण नगर पालिकेवर सेना-भाजप-शेकाप अशी महाघाडीची सत्ता...
  December 12, 05:57 PM
 • सिंधुदूर्ग - सावंतवाडी नगरपालिकेच्या १७ पैकी १७ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व मिळविले आहे. त्यामुळे उद्योगमंत्री नारायण राणे यांना जबर धक्का बसला आहे. मागील काही दिवसांपासून नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. त्यामुळे सिंधुदूर्गनगरीतील निवडणूकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. सिंधूदूर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व मिळवत १७ पैकी १७ जागांवर यश संपादन केले आहे....
  December 12, 01:18 PM
 • वेंगुर्ले: नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वेंगुर्ले शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. प्रचारादरम्यान राजकीय राडा झाला होता. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. त्याची पुर्नरावृत्ती होऊ नये याठिकाणी जिल्ह्याबरोबरच रत्नागिरी, पुणे, नवी मुंबई येथील सुमारे 12 पोलिस अधिकारी, 117 पोलिस कर्मचारी, 62 होमगार्ड असे एकूण 191 पोलिस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड शहरात आले आहेत. शहराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.मतदारांनी निर्भीडपणे...
  December 11, 12:25 PM
 • रत्नागिरी: महाराष्ट्रविरूद्ध हिमाचल प्रदेश सामना रत्नागिरीत 21 ते 24 डिसेंबर या कालावधीत शिवाजी स्टेडियमवर रंगणार आहे. महाराष्ट्र संघाने रणजी ट्रॉफी एलीट 'ब' ग्रुपच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविल्यामुळे महाराष्ट्राला स्वतःच्या राज्यात खेळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या शिस्तबद्ध आयोजनामुळे हा सामना रत्नागिरी खेळविण्याचा निर्णय महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने घेतला आहे. मुंबईचा धडाकेबाज फलंदाज रोहीत मोटवाणीसह महाराष्ट्र संघातील पूर्ण भरात...
  December 11, 12:11 PM
 • वेंगुर्ले - शहरात सोमवारी (ता. 5) रात्री शहरात झालेल्या राजकीय राड्याचे पडसाद आज दिल्लीत १० जनपथवर दिसले. कॉंग्रेसच्या २० जणांच्या शिष्टमंडळाने राहुल गांधी यांची भेट घेऊन नारायण राणे यांची तक्रार केली आहे.नारायण राणेंमुळे नगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. नारायण राणेंमुळे जुने सहकारी नाराज होत आहेत, नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग परिसरात दहशत पसरवली आहे असा आरोप पुष्पसेन सावंत यांनी केला आहे.
  December 8, 11:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात