जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Kolhapur

Kolhapur News

 • सांगली -अभिनेत्री दिपाली सय्यदने शनिवारी सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. सांगलीकरांना अनेकांनी मदत केली आहे पण सांगलीपर्यंत ती पोहोचली नाही. तसेच पुराचे राजकारण करू नये असे त्या यावेळी म्हणाल्या. सांगलीतील 1 हजार मुलींच्या लग्नाची जबाबदारी घेणार असून सय्यद फाऊंडेशनच्या माध्यमातून सांगली पूरग्रस्तांना 5 कोटींची मदत करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. सांगली, कोल्हापूर, सातारा आणि कोकणात यावेळेस भीषण पूरस्थिती निर्माण झाली. यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अशात...
  August 17, 07:33 PM
 • सांगली - महापुराने नुकसान झालेल्या सांगली व काेल्हापूर जिल्ह्यातील घरांचे पंचनामे सुरू झाले असून शनिवारपर्यंत याद्या निश्चित होतील. पूरग्रस्तांना शहरी भागात १५ हजार, तर ग्रामीण भागात १० हजार सानुग्रह अनुदान वितरित करण्यात येत असून त्यामधील ५ हजार रुपये रोखीने वाटप सुरू आहे. सांगलीत आतापर्यंत १४ हजार ४२५ पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार रुपये याप्रमाणे ७ कोटी २१ लाख २५ हजार रुपयांच्या निधीचे वाटप झाले आहे. यंत्रणांनी अनावश्यक कागदपत्रे न मागता पूरबाधितांना मदत पोहोचवावी, असे...
  August 17, 09:18 AM
 • कोल्हापूर - राजर्षी शाहूंनी देशाला एकसंध राहण्याचा संदेश दिला आहे. आज संकट मोठं आहे आपण एकत्र या संकटाला तोंड देऊ असा दिलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुरग्रस्तांना दिला. देशाचा 73 वा स्वातंत्र्य दिन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसोबत साजरा केला. तसेच पीडितांची विचारपूस केली. यावेळी स्थानिक महिलांनी शरद पवारांना राखी देखील बांधली. महापुराचा मोठा फटका कोल्हापूर शहराला आणि आजूबाजूच्या अनेक गावांना...
  August 15, 12:35 PM
 • सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील काही पूरग्रस्त भागांना बुधवारी भेटी दिल्या. २००५ मध्ये पूर आल्यानंतर पाण्याची पातळी ग्राह्य धरली ती चुकल्याने यंदाची परिस्थिती उद्भवली आहे. कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी यंदाच्या पाण्याची पातळी त्याहून अधिक नोंद करून त्याप्रकारे उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले. शरद पवार म्हणाले, अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग कर्नाटक सरकारने...
  August 15, 09:03 AM
 • सातारा - महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गाव आहे - मिलिट्री आपशिंगे. नावातच देशसेवेचे व्रत आहे. प्रत्येक घरातील एक जण सैन्यात किंवा सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू झालेली ही परंपरा आजही कायम आहे. या गावात १६५० पेक्षा अधिक जवानांनी सैन्यात आणि इतर सुरक्षा दलात सेवा बजावली आहे. इंग्रजांच्या काळात पहिल्या महायुद्धात या गावातील ४६ जवान शहीद झाले होते. यामुळे इंग्रजांनी या गावाचे नाव मिलिट्री आपशिंगे असे ठेवले. दुसऱ्या महायुद्धातही गावातील...
  August 15, 07:46 AM
 • सांगली - सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील ब्रम्हऩाळ गावात पुराचे पाणी घुसले असतांना स्थानिक गावकऱ्यांकडून बचावकार्य सुरु होते. यात बोट पाण्यात उलटुन 14 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या गावावर शोककळा पसरलेली आहे. याच पुरग्रस्त गावाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हे गाव दत्तक घेतले आहे. ग्रामपंचायतीने पत्र देऊन केले जाहीर पुरग्रस्त ब्रम्हनाळ गावातील 700 कुंटुंब, 3500 लोकसंख्या असलेल्या गावाचे पुनर्वसन करण्यासाठीची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे....
  August 14, 01:25 PM
 • सांगली -महापुरात उद्ध्वस्त सांगलीच्या पलूस तालुक्यापासून अवघ्या ६० किमीवरील बाळेवाडी चारा छावणीतल्या ६० गुरांच्या तोंडाला कोरड पडली होती. टँकरने आलेल्या पाण्याचे टिपडे बैलापुढे सरकवत दत्ता हाके पुराच्या बातम्या वाचत बसले होते. सालाबादप्रमाणे यंदाही त्यांच्या शेतात पावसाचा थेंब पडला नाही. कायमस्वरूपी दुष्काळी म्हणून गणल्या गेलेल्या त्यांच्या खानापूर तालुक्यासाठी वर्षातून ४ आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला होता. प्रत्यक्षात फक्त एकच आवर्तन सरकारनं सोडलं. आता बघा कसं सगळं पाणीच...
  August 14, 11:56 AM
 • औरंगाबाद -अत्यंत कष्टाने उभारलेले क्लिनिक आणि त्यातील कोट्यवधींचे महागडे उपकरण डोळ्यादेखत पुरात पाण्यात गेले असतानाही एका डॉक्टर दांपत्याने हजारो पूरग्रस्तांना वैद्यकीय मदत देत अनोखा आदर्श निर्माण केला आहे. डॉ. जयश्री आणि श्रेणिक पाटील असे या दांपत्याचे नाव असून मागील १२ दिवसांपासून ते सातत्याने पूरग्रस्तांवर उपचार करत आहेत. उपचारासोबतच तातडीने लागणारी औषधे, सॅनिटरी नॅपकिन्स तसेच खाद्यपदार्थही पूरग्रस्तांना अगदी नि:शुल्क पुरवत आहेत. सांगतील प्रख्यात रेडिअाेलॉजिस्ट डॉ....
  August 14, 09:17 AM
 • मुंबई - राज्यातील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील 5 लाख 60 हजार 953 पुरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला यश आले आहे. शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, नौदल, वायूदल, तटरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत, अशी माहिती मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली. स्थानिक प्रशासनाबरोबरच सांगली, कोल्हापूर...
  August 13, 02:26 PM
 • सांगली -पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी सरकार स्वतःची जाहिरात करण्यात व्यग्र आहे. अलमट्टी धरणाची उंची आणि त्यामुळे निर्माण झालेली पूरपरिस्थितीकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. शिरोळ तालुक्यात विविध ठिकाणी स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांंची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. पूरग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असा दिलासाही त्यांनी दिला. आंबेडकर म्हणाले, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील पाणी...
  August 13, 08:47 AM
 • सांगली - महापूर ओसरल्यानंतरही सांगलीकरांच्या मागील दुर्दैवाचा फेरा सुटण्याची चिन्हे नाहीत. पुराचे पाणी ओसरल्यानंतर पूरग्रस्त गावभागातील चार घरे कोसळली. त्यामुळे पुरात आठ दिवसांपासून असलेल्या घरांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय कोणीही आपल्या घरी परतू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, कृष्णा नदीचे पाणी ५० फुटांवर असून ते अद्याप पूररेषेहून ५ फूट अधिक आहे. पूर ओसरलेल्या भागात साफसफाई करण्याच्या कामाला महापालिकेने प्राधान्य दिले आहे. या पुरामुळे नदीकाठच्या...
  August 13, 08:39 AM
 • सांगली -सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुराने थैमान घातल्याने लाखो संसार उद्ध्वस्त झाले. महापूर ओसरत असताना यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज येत आहे. अशा वेळी प्रत्येकाने जमेल तसे पुढे येऊन एकजुटीने या संकटास सामाेरे जाणे आवश्यक आहे. काही सामाजिक संस्थांच्या मदतीने दिव्य मराठीने एक गाव दत्तक घेऊन तेथील लोकांचे पुनर्वसन करण्याचा निर्धार केला आहे. दोन हजार लोकवस्तीचे गाव ज्या ब्रह्मनाळमध्ये बोट बुडाली, त्याच पलूस तालुक्यातील सुखवाडी हे दोन हजार लोकवस्तीचे गाव. मोडून पडलेले संसार...
  August 13, 07:49 AM
 • मुंबई - कोल्हापूरात महापूराने हाहाकार माजवला आहे. यामध्ये हजारो नागरिकांचे संसार उद्धवस्त झाले. यानंतर पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्यभरातून मदतीचे हात पुढे सरसावत आहेत. यांसोबत आता छत्रपती संभाजीराजे सुद्धा पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. कोल्हापूरातील लोकांची मदत करण्यासाठी ते पाण्यात उतरले होते. आता ते पुरग्रस्तांसाठी पाच कोटी रुपयांची मदत करणार असल्याची माहिती स्वतः संभाजीराजेंनी ट्विट करुन दिली आहे. संभाजीराजे यांनी माझ्या निधीतून 5 कोटी रुपये महापुराने...
  August 12, 01:52 PM
 • ब्रह्मनाळ- कृष्णेला महापूर आला आणि ब्रह्मनाळ गाव पाण्याने वेढले. पाणीपातळीही वाढू लागली. घरे,दुकाने, रस्ते, मंदिरे पाण्यात बुडू लागल्याने प्रत्येक जण जिवाच्या आकांताने गावाबाहेर काढणाऱ्या एकमेव बाेटीत बसण्याकरिता धडपड करू लागला. क्षमतेपेक्षा अधिक लाेक बाेटीतून प्रवास करू लागले असतानाच 8 आॅगस्टला एक माेठी लाट बाेटीत शिरली. बाेटीचा पंखा काटेरी झुडपात अडकल्याने बाेट कलंडली. बाेटीतील 30 ते 35 लोक पाण्यात गटंगळ्या खाऊ लागले. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
  August 12, 12:32 PM
 • औरंगाबाद -काेल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वच पातळीवरून मदतीचा अाेघ सुरू झाला अाहे. शहरातील मुस्लिम समाजातील कार्यकर्तेही यात अग्रेसर अाहेत. शहरातील ३५० मशिदींमध्ये व्हेज पुलाव आणि डाळ-भात बनवण्याचे काम सुरू असून जवळपास ५००० मुस्लिम कार्यकर्ते जेवणाची पाकिटे पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवत आहेत. सुमारे ७ हजार पूरग्रस्तांच्या भाेजनाची साेय येथून केली जात अाहे. साेमवारची ईद साधेपणाने साजरी करतानाच बकऱ्याची कुर्बानी न देता त्याचे पैसे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खर्च...
  August 12, 07:44 AM
 • कोल्हापूर - अलमट्टी धरणातून 5 लाख 30 हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित 2 दरवाजे खुले असून त्यामधून 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणामधून 53,882 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी आज सकाळी दिली. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी 7 वाजता 50 फूट 11 इंच असून, एकूण 104 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर 8.26 टीएमसी पाणीसाठा आहे....
  August 11, 01:26 PM
 • कोल्हापूर -अलमट्टी धरणातून ५ लाख क्युसेकने विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित ४ दरवाजे उघडण्यात आले असून त्यामधून ७,११२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस. एम. शिंदे यांनी दिली. शनिवारी सकाळी सात वाजता कोयना धरणामधून ७७,९८७ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी सांगितले. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणीपातळी सकाळी ५२ फूट २ इंच असून एकूण १०७ बंधारे...
  August 11, 08:29 AM
 • मिनाज लाटकर कोल्हापूर - जिवावर बेतलेल्या पूरस्थितीत बचावलेल्या कोल्हापूरमधील महिलांनी विस्थापितांसाठी अत्यावश्यक साहित्याची जमवाजमव सुरू केली. स्वत:चे घर सोडून मुला-बाळांसह शाळा, समाज मंदिरांमध्ये आसरा घेतलेल्या, घरांतील दुसऱ्या-तिसऱ्या मजल्यावर जीव मुठीत घेऊन बसलेल्या नागरिकांसाठी या समयसूचकता दाखवत या महिलांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या कामात प्रिया देसाई, शुभलक्ष्मी देसाई आणि वनिता ढवळे यांनी पुढाकार घेतला आहे. तर काही महिला वैयक्तिकरित्या गरजूंच्या मदतीसाठी पुढे येत आहेत....
  August 10, 11:59 AM
 • कोल्हापूर, सांगलीतील पुराच्या वेढ्यातून बचावलेल्या तसेच ही स्थिती प्रत्यक्ष अनुभवणाऱ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आम्ही मिळवल्या आहेत. पहिल्या दिवशी महत्त्वाची कागदपत्रे, पैसे, दागदागिने घेऊन बाहेर पडलेले नागरिक तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी तर फक्त आपली माणसं आणि स्वत:चा जीव मुठीत घेऊन बचाव पथकाच्या हवाली होत आहेत. पुराने वेढलेल्या सांगली व कोल्हापूरवासीयांना कपडे, अन्न, पिण्याचे पाणी, महत्त्वाची औषध या सर्वांची नितांत गरज आहे. चार दिवसांपासून भिजलेल्या कपड्यांवरच, औषधेही नाहीत...
  August 10, 11:40 AM
 • एकनाथ पाठक/औरंगाबाद : संततधार पाऊस अाणि पुराच्या पाण्यामुळे सांगलीसह काेल्हापूर शहर अाणि जिल्ह्यातील गावेच्या गावे पाण्याखाली अाली अाहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. याचा माेठा फटका सर्वसामान्यांपेक्षा प्रतिभावंत मल्लांनाही बसला अाहे. सांगली अाणि काेल्हापुरामधील एेतिहासिक वारसा लाभलेल्या मानाच्या कुस्ती तालमींचे नुकसान झाले. सर्वच तालीम संघांमध्ये प्रचंड पाणी जमा झाले अाहे. अागामी सहा महिन्यांमध्ये हाेणाऱ्या विविध स्पर्धांसाठी तयारी करणाऱ्यांना याचा मोठा फटका बसला अाहे....
  August 10, 10:14 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात