जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Kolhapur

Kolhapur News

 • कोल्हापूर- पुण्याहून गणपतीपूळ्याला देवदर्शनाला जाताना कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावरील आंबा घाटाजवळील तळवडे येथे एका अपघाती वळणावर वेगाने जाणारी कार रस्त्याकडेला असणाऱ्या झाडावर आदळून सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर तिघेजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन मुले, दोन पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. अपघातात मृत झालेल्यांमध्ये संतोष राऊत, अपर्णा संतोष राऊत, दीपक शेळकंदे, वरूणा शेळकंदे, प्रज्ञा ( 5 वर्ष) या पाच जणांचा समावेश आहे. कारचा...
  January 26, 07:50 PM
 • कोल्हापूर- 6 जून 1674 रोजी किल्ले रायगडावर शिवछत्रपती महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र व सार्वभौम राज्याची स्थापना झाली. ही गोष्ट असामान्य अशीच आहे. मुघल सत्तेला मूळातून हादरा देणारी ही घटना अखंड भारतवर्षाचा भाग्योदय करणारी आहे. त्यामुळे या शिवराज्याभिषेकाचे महत्त्व संपूर्ण देशाला समजावे, यासाठी यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी राजपथावर छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सोहळा अवतरणार आहे. तरुण पिढीला स्फूर्ती मिळावी, राष्ट्रप्रेमाची भावना...
  January 24, 07:29 PM
 • कोल्हापूर- चंद्रकांत पाटील यांच्या कर्नाटकातील वक्तव्याचा सीमाभागातील कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. सीमा बांधव आणि बेळगावमधील मराठी युवा मंचचे संतप्त कार्यकर्त्ये आज (मंगळवार) संभाजीनगर परिसरात असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करणार आहे. परंतु, कार्यकर्त्यांना पोलिसांकडून निवासस्थानापासून 100 फुटावरच अडवण्यात आले आहे. बेळगाव,निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा देऊन सीमा भागातून आलेल्या संतप्त...
  January 23, 09:01 PM
 • कोल्हापूर/सातारा/पुणे- खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक पंकज चव्हाण, रुपेश सपकाळ, विकी यादव, दीपक धडवई, युवराज शिंदे, सनी भोसले, विवेक जाधव, अमोल हदगे, अमर आवळे, सुजित आवळे, सनराज साबळे यांना सुरुची धुमश्चक्रीप्रकरणी हायकोर्टानेतात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मुंबई हायकोर्टात सोमवारी (दि. 22) खासदार समर्थकांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्याची आज न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले समर्थकांना सात फेब्रुवारीपर्यंत...
  January 23, 08:27 PM
 • सातारा- तीन महिन्यांपूर्वी साताऱ्यात खासदार उदयनराजे भाेसले व अामदार शिवेंद्रराजे भाेसले यांच्या समर्थकांत तुंबळ हाणामारी झाली हाेती, गाेळीबारही झाला हाेता. या प्रकरणी दाेन्ही गटांतील काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात अाली हाेती. मात्र, छातीत दुखत असल्याचे कारण सांगितल्यामुळे यापैकी काही अाराेपींना जिल्हा रुग्णालयात कैद्यांसाठी राखीव असलेल्या वाॅर्डात दाखल करण्यात अाले हाेते. दरम्यान, शनिवारी या प्रकरणात अामदार समर्थक कार्यकर्त्यांना शनिवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. ही...
  January 22, 11:23 PM
 • पुणे/कोल्हापूर- सातारा जिल्ह्यात कोयना, पाटण परिसरात 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसल्याचे हवामान शास्त्र विभागाने म्हटले आहे. तर सिंचन विभागाच्याकार्यकारी अभियंत्यांकडून याची तीव्रता 3.2 असल्याचे सांगण्यात आले.सकाळी 11 वाजून 36 मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का बसला आहे.भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनेपासून 29.6 किमी अंतरावरील वारणा खोऱ्यात जावळे गावापासून दक्षिणेला 10 किमी अंतरावर असल्याचे सांगण्यात आले. केंद्र बिंदूची खोली हवामान विभागाने 10 किलोमीटर तरसिंचन विभागाच्या कार्यकारी...
  January 21, 05:28 PM
 • कोल्हापूर-कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज रेल्वे टर्मिनसरेल्वे स्थानकामध्ये मोफत वायफाय सुविधा सुरू करण्यात आली. केंद्र सरकारच्या वतीने देशातील अनेक रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात कोल्हापूर रेल्वेस्थानकात वायफाय सेवेचा शुभारंभ झाला. दुसर्या टप्प्यात मध्यवर्ती बस स्थानक आणि श्री अंबाबाई मंदिर परिसर तसेच काही महाविद्यालयात वायफाय सेवा सुरू केली जाईल, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. कोल्हापूर शहरात किमान पाच...
  January 21, 01:10 PM
 • कोल्हापूर- सांगलीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर रंगलेल्याऐतिहासिक कुस्तीमध्येउपमहाराष्ट्र केसरी किरण भगतने डब्ल्यूडब्ल्यूई पैलवान मनजीतसिंगला आस्मान दाखवलं आहे. लोखंडी पिंजऱ्यातील या पोलादी कुस्तीमध्ये किरणने अवघ्या काही मिनिटात मनजितसिंगवर मात केली. स्वातंत्र्यानंतर तब्बल 70 वर्षांनी महाराष्ट्रातील नागरिकांना पहिल्यांदाच लोखंडी पिंजऱ्यातल्या कुस्तीचा थरार अनुभवता आला.या कुस्तीला पाहुणे म्हणून भिडे गुरुजी उपस्थित होते. त्याच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार...
  January 18, 09:26 PM
 • मुंबई/कोल्हापूर-कोल्हापूरच्या विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. अनाथ मुलांच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी 1 टक्के समांतर आरक्षण ठेवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. कोल्हापुरातया निर्णयांचे स्वागत कोल्हापूर येथील व्हीनस कॉर्नर चौकातील छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुतळ्यासमोर साखर पेढे वाटून भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले. कोल्हापूरकरांच्या वतीने गेल्या अनेक...
  January 17, 05:24 PM
 • पुणे- कृष्णाकाठचा ढाण्या वाघ म्हणून कधीकाळी जरब निर्माण केलेले व नंतर प्रवचनकार बनलेले बापू बिरू वाटेगावकरांचे मंगळवारी निधन झाले. त्यांचे वय १०३ वर्षे असल्याचा दावा आहे. मात्र, ते नव्वदीच्या पुढेच असावेत, असा अंदाज आहे. त्यांच्यावर इस्लामपूर (जि. सांगली) येथील रुग्णालयात उपचार चालू होते. बापूंचा उल्लेख कथा, पोवाडे, कीर्तनातून झाला. त्यांच्यावर चित्रपटही निघाला. सांगली, सातारा, कोल्हापूर या पट्ट्यात चार दशके बापूंनी स्वतःची सरकार समांतर यंत्रणा उभारली होती. अडल्या-नडल्यांना मदत,...
  January 17, 03:11 AM
 • सातारा-सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रात रॉबिनहूडप्रमाणे आयुष्य जगलेले बापू बिरु वाटेगावकर यांचे आज निधन झाले. गावोगावी त्यांना जीव लावणाऱ्या असंख्य बहिणींनी आपला भाऊ गमावला. जुलै 2017 मध्ये त्यांच्यावर पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमधे सांधे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. असे झाले पश्चिम महाराष्ट्राचे रॉबिनहूड कृष्णा नदीच्या काठावरील काही गावांमध्ये गावातील गावगुंड गोर-गरीब जनतेवर अन्याय-अत्याचार करत त्यांना गुलामाची वागणूक देत...
  January 16, 04:30 PM
 • बापू बिरू वाटेगावकर ऊर्फ आप्पा. पश्चिम महाराष्ट्रातील घराघरात माहिती असलेले नाव. ठणठणीत तब्येत. तल्लख बुद्धी. वागण्या-बोलण्यात तडफ, हा त्यांचा आब. काही दिवसांपूर्वी त्यांच्या गुडघ्यांवर शस्त्रक्रिया झाली होती. आधी डॉक्टर म्हणाले, वयोमानपरत्वे शक्य होणार नाही. आप्पा म्हणाले, काही घाबरू नका. काही होणार नाही, ...आप्पाचं सगळंच कसं अद्भुत नि अलौकिक... रंग्या शिंदेंची बोरगावात गँग हुती. त्या गँगच्या जिवावर रंग्या लय मातलं वतं. कोंबडं घावदे न्हायतर बोकड, बिन पैसे देता घेऊन जायचं. पैसे मागितलं...
  January 16, 03:33 PM
 • कोल्हापूर- अंबाबाई मंदिरात पुजारी हटाव लढा, आता अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र दिसत आहे. राज्य सरकारने त्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवालही सरकार कडे सादर करण्यात आला आहे. त्या आह्वालात नेमके काय म्हणण्यात आले आहे. त्याबाबत उद्या (मंगळवार) विधी व न्याय विभागाचे सचिव आणि आपण स्वतः बैठक घेणार आहोत, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, संपूर्ण व्यवस्थापन, 47 हजार एकर जमिनी आणि पुजारी असा कायदा करत असताना वेळ लागत आहे. त्यामुळे...
  January 16, 10:19 AM
 • सांगली- नुसती साहित्य संमेलन भरवू काय फायदा, मराठी माणूस टिकला तर मराठी भाषा टिकेल, मराठी भाषेसाठी साहित्यिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी केले. औदुंबर साहित्य संमेलनाच्या समारोपात राज ठाकरे बोलत होते. केवळ एक दिवस साहित्यिकांचा सन्मान करायचा, परंतु थोर साहित्यिकांचे साहित्य वाचणार नाही तर केवळ साहित्य संमेलन भरवून काय फायदा, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. नरेंद्र मोदींवर साधला निशाणा.. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा...
  January 14, 06:23 PM
 • कोल्हापूर- हा संघर्ष गेल्या कित्येक महिन्यापासून आम्हाला दिसत होता. सरकार, पोलिस,आणि राजकीय नेत्यांना आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न केला. हाफिज सईद पाकिस्तान सरकारला वेठीस धरतो आहे, त्याचप्रकारे भारतातही हाफिज सईद निर्माण होवू लागले आहेत. त्यांचा बंदोबस्त आता शासनाने करावा. शासनाकडून हे काम होत नसेल तर झाले नाही तर आम्ही जनतेला आवाहन करू. जनतेच या हाफिज सईदचा बंदोबस्त करेल, असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात दिला. भारताचा पाकिस्तान होवू...
  January 13, 05:47 PM
 • कोल्हापूर- शाहुवाडी तालुक्यातील शिवारे येथील मंदिरावर दोन चोरट्यांनी अर्ध्यारात्री डल्ला मारला. मूर्तिच्या गळ्यातील सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि दानपेटी घेऊन चोरटे पसार झाले. ही घटना मंदिराच्या गाभार्यात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस फुटेजची मदत घेत आहेत. काय आहे हे प्रकरण...? - शिवारे येथे प्रसिद्ध बाळुमामा मंदिर आहे. येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. -7 जानेवारीला रात्री पुरोहीत मंदिर बंद करून घरी गेला. नंतर मध्य रात्री दोन...
  January 13, 05:25 PM
 • सांगली- सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगी येथे ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि क्रूझरच्या धडकेत सहा पैलवानांचा मुत्यू झाला आहे, तर सहा पैलवानांची प्रकृती गंभीर आहे. साताऱ्यातून कुस्ती खेळून परतत असताना शुक्रवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. सांगलीतील कुंडल गावातल्या क्रांती कुस्ती संकुलाचे10 ते 12 पैलवानसाताऱ्याहून कुस्ती खेळून क्रूझरने परतत होते. त्यावेळी ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि क्रूझर यांची धडक होऊन हा भीषण अपघात झाला. जखमींना सांगलीतील...
  January 13, 09:24 AM
 • कोल्हापूर-राजपुतवाडी (ता.करवीर) येथील निवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांमध्ये रात्री झोपेच्या जागेवरुन हाणामारी झाली. एका विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या छातीत ठोसे मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे. मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव शंकर सावळाराम मोरे (वय 16 वर्षे, रा.अंबाई वाडा, ता.शाहूवाडी ) असे आहे. याबाबत करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, राजपुतवाडी या गावात भटका व विमुक्त समाज विकास मंडळ संचलित...
  January 11, 07:38 PM
 • कोल्हापूर/सांगली-राज्यातील 288 आमदार हे बिनकामाचे आहेत. शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर राज्यकर्त्यांनी आपल्या सोयीस्कर राजकारणानुसार केला, असा आरोपशिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केला आहे. सांगलीतल्या तासगावात झालेल्या धारकऱ्यांच्या गडकोट मोहिमेच्या बैठकीत ते बोलत होते.तासगावमध्ये शिवप्रतिष्ठानच्यावतीने गडकोट मोहिम आणि 32 मन सुवर्ण सिंहासन पुर्नस्थापना या विषयावर ही बैठक आयोजित केली होती.राज्यकर्त्यांपैकी एकालाही प्रतापगडाच्या कुशीत महाराजांचे स्मारक व्हावे,...
  January 11, 01:36 PM
 • कोल्हापूर-करवीरनिवासींनी अंबाबाईच्या मंदिरात आगामी 15 दिवसात पगारी पुजारी नेमा अन्यथा मंत्रालयाच्या दारात अंबाबाईचा गोंधळ घालू असा सज्जड इशारा आज अंबाबाई मंदिर पुजारी हटाव कृती समितीने दिला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना याबाबत कृती समितीने निवेदनही दिले आहे. साडेतीन शक्तीपीठा पैकी एक संपूर्ण शक्तीपीठ असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांची मनमानी झाल्याचा आरोप करत गेल्या काही महिन्यांपासून मंदिरात पगारी पुजारी नेमण्यात यावेत या मागणीसाठी...
  January 10, 06:00 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात