Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Kolhapur

Kolhapur News

 • कोल्हापूर: आजही शहरासह जिल्ह्यात संततधार कायम होती. शिरोळ, कागल, हातकणंगले तालुके वगळता सर्वत्र दिवसभर पाऊस सुरू होता. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 1२५ मि.मी. पावसाची नोंद झाली. पंचगंगा, भोगावती या नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.
  June 18, 02:10 AM
 • सांगली: प्रसिद्ध लेखिका कमल देसाई (वय 83) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. मेंदूज्वरामुळे मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. साहित्य, चित्रकला, सांस्कृतिक क्षेत्रांतील नव्या पिढीशी त्यांचा सतत संपर्क होता. कमल देसाई यांचा जन्म कर्नाटकातील यमकनमर्डी येथे १० नोव्हेंबर १९२८ रोजी झाला. सत्यकथा मासिकातील लेखनासह त्यांच्या काळा सूर्य, हॅट घालणारी बाई, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग या त्यांनी लिहिलेल्या कादबं-या गाजल्या. एक कप च्या या सिनेमात त्यांनी भूमिका केली होती.
  June 18, 01:09 AM
 • कोल्हापूर - शाळेच्या पहिल्या दिवशी दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत आज जंगी स्वरूपात झाले. गेल्या वर्षी केंद्र सरकारने शिक्षणाचा हक्क कायदा अमलात आणला आणि त्यामुळे शाळाबाह्य एकही मूल राहणार नाही याची दक्षता घेण्यास सुरवात झाली.पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वितरण झाले.मुलांना शाळेविषयी आकर्षण वाढावे, शिक्षणाची गोडी वाढावी यासाठी विविध उपक्रम वर्षभर राबवणार आहेत.
  June 16, 04:58 PM
 • कोल्हापूर - डोमेसाईलशिवाय प्रवेश मिळणार असल्याने अनेक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास टाकला आहे.दहावीनंतरच्या प्रवेशासाठी डोमेसाईल म्हणजेच राष्ट्रीयत्वाचा दाखला जोडणे आवश्यक होते. ते मिळवण्यासाठी तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय आणि सुविधा केंद्रात हेलपाटे मारावे लागत.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची तर याहून वेगळी पंचाईत. डोमेसाईल म्हणजे नेमके काय हेच समजत नसे. त्यामुळे त्यांची वेगळीच त्रेधा उडत असे. डोमेसाईल हातात पडले की पालक सुटलो बुवा एकदाचे म्हणत असत. आता या...
  June 16, 04:43 PM
 • कोल्हापूर - जिल्हा परिषद, वन खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला आज लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. उमेश गुलाबसिंग ठाकूर (वय 45, सध्या रा. राजलक्ष्मी अपार्टमेंट, साईक्स एक्स्टेंशन, राजारामपुरी, मूळ बनारस, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध स्वप्नील बाबासाहेब ठोंबरे (रा. जरगनगर) यांनी फिर्याद दिली.पोलिसांनी सांगितले, उमेश मित्रपरिवारातील ओळखीने तो तरुणांना नोकरीचे आमिष दाखवत होता. सात-आठ महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेत नोकरी...
  June 16, 04:36 PM
 • सांगली: मिरज येथील गजबजलेल्या भागातील प्राचीन अंबाबाईच्या मंदिरातून बुधवारी सकाळी १५ लाख रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे उघड झाले. चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व अंबाबाईच्या मूर्तीवरील सर्व दागिने आणि इतर चांदीच्या वस्तू घेऊन पोबारा केला. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्वरित श्वानपथकाचा पाचारण केले. मात्र श्वानाला चोरट्यांचा माग काढता आला नाही. गतवर्षी एका सराफी पेढीवर चोरट्यांनी दरोडा घालून अंदाजे सव्वा कोटी रुपयांचे...
  June 16, 03:29 AM
 • कोल्हापूर - केएमटीमध्ये गेल्या सतरा, आठरा वर्षांपासून रोजंदारीवर काम करणाऱ्या 42 चालक व वाहकांना सेवेत कायम करून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज मुंबईत नगरविकास राज्यमंत्री भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता देत श्री. जाधव यांनी दिले असून, तातडीने ज्येष्ठता यादी करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.
  June 15, 06:15 PM
 • कोल्हापूर - राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचा यंदाचा 26 वा राजर्षी शाहू पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू रा. कृ. कणबरकर आणि माजी आमदार बाबूराव धारवाडे यांना संयुक्तपणे देण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेस ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकर, डॉ. सुनीलकुमार लवटे, माहिती उपसंचालक वसंतराव शिर्के उपस्थित होते.
  June 15, 05:59 PM
 • सातारा - जिल्ह्यातील वनकामगार गेली कित्येक वर्षे रोजंदारीने वन विभागाकडे काम करत आहेत. गेले 4 ते 5 महिने त्यांचा रोजंदारीचा मासिक पगार मिळाला नाही. नुकताच शासनाने वनकामगारांना कायम करण्याचे आदेश दिले असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सर्व वनकामगारांना कायम करावे, अशी मागणी सातारा जिल्हा वनकामगारांनी दिली आहे. वनकामागारांनी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
  June 15, 05:54 PM
 • मिरजेतील प्रसिद्ध अंबामातेच्या मंदिरात चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. देवीच्या अंगावरील सुमारे १५ लाखांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. मंदिरातील पुजारी आज पहाटेच्या सुमारास पूजेसाठी पोहोचले असता कुलूप तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आसपासच्या नागरिकांना आणि पोलिसांना याची कल्पना दिली. पोलिसांनी मंदिरात प्रवेश करताच चोरीचा हा मोठा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने श्वान पथकास प्राचारण केले. मात्र तपासात काही फारशी प्रगती झाली...
  June 15, 01:51 PM
 • सातारा : ज्येष्ठ विचारवंत, ख्यातनाम वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे फलटण येथे 28 ते 30 जूनदरम्यान विभागीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्राचार्यांचे चरित्रकार, प्रसिद्ध लेखक प्रा. मिलिंद जोशी यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी सांगितले की, 28 जून रोजी सायंकाळी चार वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाचा प्रारंभ होणार आहे. तसेच सायंकाळी सहा वाजता श्रीमती रेणू गावसकर...
  June 13, 02:02 AM
 • कोल्हापूर - कोल्हापूर-सावंतवाडी दरम्यानच्या आंबोली घाटात दरड कोसळल्याने वाहतूकीस मार्ग बंद झाला आहे. या घाटातील मार्ग खुला होण्यासाठी अजून पाच दिवस लागतील असे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सांगितले आहे. आंबोली घाटात मु्ख्य धबधब्याजवळ रविवारी दुपारी दरड कोसळली होती. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. दरड पडल्याने कोल्हापूर-सावंतवाडी आणि आजरा-सावंतवाडी मार्ग बंद झाला आहे. दरड उचलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असून घाट पूर्णत: वाहतूकीस मोकळा होण्यासाठी अजून पाच...
  June 12, 05:42 PM
 • कोल्हापूर - जिल्ह्यात मागील चार महिन्यांपासून तीव्र खत टंचाई असतांना जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद प्रशासन केवळ उपाययोजनेचा फार्स करीत आहे. कोल्हापूरात 40 टक्के खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. पावसानेही चांगली सुरवात केली असून शेतकरी मात्र खतटंचाईने हैराण झाले आहेत. मागणीच्या तुलनेत खतांचा अपुरा परवठा, वाहतूकदार आणि कंपन्यामधील रखडलेला वाहतूक करार आणि प्रशासनाचे दुर्लक्ष या कारणांमुळे तीव्र खतटंचाई जाणवत आहे. जिल्हाला 29 हजार टन खताची गरज असतांना जून महिन्याच्या पहिल्या...
  June 12, 01:52 PM
 • पंढरपूर- जागतिक कीर्तीचे चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या निधनाचे वृत्त समजताच तीर्थक्षेत्र पंढरीत हळहळ व्यक्त करण्यात आली. संपूर्ण जगात नाव कमावलेला हा कलंदर मूळचा पंढरपूरचा. बालपणीच पोरका झालेल्या हुसेन यांनी चित्रकलेलाच आपले आयुष्य वाहून घेतले होते. त्यांच्या मनात कायम भूवैकुंठ पंढरी दडली होती. पंढरपूरकरांकडून त्यांना जसे विलक्षण प्रेम मिळाले तसे त्यांच्या रोषालाही हुसेन यांना तोंड द्यावे लागले होते.हुसेन हे मूळचे पंढरपूरचे (जिल्हा सोलापूर). 17 सप्टेंबर 1915 रोजी त्यांचा जन्म...
  June 10, 01:55 AM
 • इचलकरंजी: अवैध बांधकामप्रकरणी नगराध्यक्षा मेघा चाळके व त्यांचे पती नगरसेवक सागर चाळके यांचे पद रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी मंगळवारी घेतला. राज्यातील व नगरपालिकेच्या इतिहासात असा निकाल देण्याची हि पहिलीच वेळ आहे. मेघा चाळके आणि सागर चाळके यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी नगराध्यक्ष पदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला आहे. नगराध्यक्षा मेघा चाळके या येथील राजमाता जिजाऊ यंत्रमाग...
  June 8, 02:09 PM
 • कोल्हापूर: करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथे हणमंतवाडीच्या तरुणाचा अनैतिक संबंधातून खून झाला होता. रणजीत संभाजी नणुंद्रे (28) असे या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी करवीर पोलिसांनी धनाजी हरी पाटील (35, रा. शिंगणापूर) याला किणी वाठार येथून ताब्यात घेतले आहे. या खूनाचा हा मुख्य सूत्रधार असल्याचे बोलले जात आहे. या आरोपीला न्यायालयाने 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी रणजीतचा पाठलाग करून तीक्ष्ण हत्याराने निर्घृण खून करण्यात आला होता. रणजीतच्या शरीरावर वीस वार करण्यात...
  June 8, 12:58 PM
 • कोल्हापूर: करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली येथे गोबरगॅसच्या खड्ड्यात पडल्याने दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. आदर्श बंडू जाधव असे त्याचे नाव असून त्याच्या दुदैवी मृत्यु झाल्याने दिंडनेर्लीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. यासंदर्भात करवीर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
  June 8, 12:40 PM
 • कोल्हापूर: करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथे अनैतिक संबंधातून हणमंतवाडीच्या तरुणाचा निर्घृन खून झाला. रणजीत संभाजी नणुंदे (28) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली. रणजीतचा पाठलाग करुन त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वीस वार करण्यात आले होते. त्याचा गळा कापूण त्याचा उजवा हात तोडण्यात आला होता, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी संपत हरी पाटील या तरुणाला गगनबावडा येथून ताब्यात घेतले आहे.
  June 7, 11:49 PM
 • कोल्हापूर (आंबा) - पहिल्याच पावसात कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेंगाळलेले रुंदीकरण आणि रोलिंगअभावी धोकादायक बनलेल्या बाजूपट्ट्यांमुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. रस्ता सोडून बाजू पट्ट्यावर वाहन उतरताच मातीमुळे वाहने फसत आहेत. या महामार्गावर पुलाच्या बांधकामासाठी वाळू, खडी,मशिनरी उतरविल्यामुळे वाहतूकीला अडचणीचे ठरत आहे. पावसाची रिपरिप, घसरगुंडी बनलेल्या बाजूपट्ट्या आणि महामार्गावरील बांधकामाचे साहित्य यामुळे वाहनधारक त्रस्त आहेत....
  June 6, 05:26 PM
 • कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये कॉंग्रेसचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार महोदेवराव महाडिक व धनंजय महाडिक यांच्यातील मदभेद मिटविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी म्हटले आहे. खासदार मंडलिक यांनी कॉंग्रेस प्रवेशाचा निर्णय घेतला असून धर्मनिरपेक्ष आणि विकासाभिमूख राजकारण करण्यासाठी कॉंग्रेस प्रवेश करीत असल्याचे सांगत, कोणत्याही अटीवर प्रवेश केला नसून यापूढे पक्ष जो निर्णय घेईल त्याप्रमाणे पुढील वाटचाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.कोल्हापूरातील...
  June 6, 04:11 PM
 
जाहिरात

RECOMMENDED