Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Kolhapur

Kolhapur News

 • सांगली - स्वत:च्या शेतातील कणसे चोरणा:यांना विरोध केल्यामुळे चिडलेल्या दरोडेखोरांनी त्या शेताचे मालक लक्ष्मण जानू निकम व त्यांची पत्नी मंगल लक्ष्मण निकम यांना धारदार शस्त्राने वार करून काल हत्या करण्यात आली. खानापूर तालुक्यातील खानापूर तालुक्यातील देवीखिंडी येथे ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याबाबत परशुराम रामचंद्र निकम यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. मयत निकम पती- पत्नीची देवीखिंडी गावापासून दीड कि. मी. अंतरावर शेती आहे. त्यांना...
  May 21, 03:10 PM
 • कोल्हापूर - शहराच्या स्वच्छतेसाठी कंत्राट देण्यात आलेल्या रॅमकी या कंपनीकडून कंत्राट महापालिकेकडून काढून घेण्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनेक सदस्यांनी कचरा उठावात होत असलेल्या हलगर्जीपणाचा मुद्दा उचलून धरत रॅमकी गो-बॅकची मागणी केली. एक महिन्यात करारातील तरतुदीप्रमाणे कारवाई करून ठेका रद्द करण्याची ग्वाही प्रशासनाने दिली. सभेच्या सुरुवातीलाच सचिन चव्हाण यांनी रॅमकीकडून कचरा उठावाचे काम व्यवस्थित होत नसताना प्रशासनाला त्यांचा पुळका का...
  May 20, 04:44 PM
 • कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेतील नगरसेवकांनी महापालिकेकडे शहरातील विकासकामांसाठी निधी देण्याची मागणी केली आहे. तसेच या नगरसेवकांनी महापालिका निधी देत नसेल तर महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांना कुलूप लावावे, असा संतप्त सवाल पालिकेकडे केला आहे.महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी निधी देण्याची मागणी केल्यानंतर प्रशासनाने असमर्थता दर्शविल्यामुळे सभेत गोंधळ झाला. गोंधळामुळे सभा तहकूब करण्यात आली. दरम्यान, शासनाकडून महापालिकेला दहा कोटी रुपयांचे अनुदान मिळावे,...
  May 20, 04:41 PM
 • सांगली - खून प्रकरणी कारागृहात असलेल्या महिलेने जिल्हा कारागृहात स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता संतोष चौगुले (वय 30, रा. बनेवाडी, ता. वाळवा) असे या महिलेचे नाव असून, सावत्र मुलीच्या खून प्रकरणी ती कारागृहात होती. सहा महिन्यांपूर्वी सावत्र मुलीचा दोरीने गळा आवळून खून केल्याच्या आरोपाखाली तिच्यावर खटला सुरू आहे. कारागृहात जेवण झाल्यानंतर दुपारी तीन तास विश्रांती दिली जाते. दोनच्या सुमारास कारागृहातील महिला पोलिस कर्मचारी जेवणासाठी गेल्या...
  May 20, 04:38 PM
 • मिरज - मिरजमध्ये सप्टेंबर २००९ मध्ये झालेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी विनायक सूर्यवंशी आणि हिंदू एकता आंदोलनाचे नेते अशोक खटावकर यांना अटक करण्यात आली आहे. विनायक हे मिरजेचे शिवसेना शहराध्यक्ष विकास सूर्यवंशी यांचे भाऊ आहेत. विकास यांना यापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे. शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफलखानाचा कोथळा बाहेर काढल्याचे मोठे पोस्टर गणपती महोत्सवात लावण्यात आल्याने याठिकाणी दंगल उसळली...
  May 20, 04:07 PM
 • विटा - देवीखिंडी (ता खानापूर) परिसरात शेतात कामासाठी गेलेल्या पती-पत्नीचा अज्ञात व्यक्तीने कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव लक्ष्मण ज्ञानू निकम (वय 60) असे असून, त्यांची दुसरी पत्नी असलेल्या मंगल निकम (वय 35) यांची हत्या करण्यात आली आहे. लक्ष्मण व मंगल यांच्या मानेवर व डोक्यावर वार केल्याच्या खूणा असून, अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  May 20, 04:04 PM
 
जाहिरात

RECOMMENDED