जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Kolhapur

Kolhapur News

 • सातारा- महाबळेश्वर येथील बाजारपेठेत रविवारी रात्री दीडच्या सुमारास भरत साठे या व्यापाऱयाचा अज्ञात व्यक्तीकडून खून करण्यात आला. साठे यांचे व्हिडिओ गेमचे दुकान आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांचा खून केल्याची तक्रार महाबळेश्वर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. दरोड्याच्या उद्देशाने हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला.
  June 21, 01:56 AM
 • कोल्हापूर - शहरातील यादवनगर, शाहु कॉलनी आणि आसपासच्या परिसरात गुंडप्रवृत्तीच्या मुंलाच्या वाढत्या वावराने तेथील नागरिकांना अतिशय त्रास होत होता. महिलांना संध्याकाळच्या वेळेस घराबाहेर पडणे कठिण झाले होते. या गावगुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी पोलिसांकडे केली होती. त्यानूसार आज सकाळी राजारामपूरी पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी साई जाधवसह १० ते १५ गुंडाना बेड्या ठोकल्या. एवढेच नाहीतर हे गावगुंड ज्या रस्त्यांवर उभेराहून मुलींची छेड काढायचे, ज्येष्ठ नागरिकांना त्रास...
  June 20, 03:30 PM
 • महाबळेश्वर - येथील व्हिडिओ पार्लरवर रविवारी रात्री दरोडा टाकून एकाचा खुन करण्यात आला. सोमवारी सकाळी महाबळेश्वर येथील व्हिडिओ पार्लरवर दरोडा टाकल्याचे उघडकीस आले आहे. भरत साठे हे व्हिडिओ पार्लरचे मालक आहेत, दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यात गोळी मारली त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. दरोडेखोरांनी व्हिडिओ पार्लरमधून लाखोंचा माल लंपास केला. तसेच पार्लरमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीची यंत्रणांही नादूरुस्त केली. सीसीटीव्हीचे किट त्यांनी लंपास केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
  June 20, 11:26 AM
 • सांगली: येथील कसबा-वावडा परिसरातून शाळेत जाण्यासाठी निघालेला कौस्तुभ अविनाश कांबळे (वय १५) याला भरधाव जाणा-या कारने जोराची धडक दिल्यामुळे तो जागीच ठार झाला. रविवारी सकाळी सात वाजता हा अपघात घडला. डी. वाय. पाटील विद्यानिकेतनमध्ये आठवीत शिकणारा कौस्तुभ रविवारी सकाळी सायकलवरून शाळेला जाण्यासाठी निघाला होता. रेणुका मंदिराजवळून रस्त्याच्या कडेने जाणाया कौस्तुभला मागून येणाया कारने जोराची धडक दिली.
  June 20, 02:14 AM
 • सांगली- नांद्रे येथील तरुणाच्या हत्येमुळे निर्माण झालेली तणावग्रस्त परिस्थिती नियंत्रणात आली आहे. आता गावात शांतता असून परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. १२जून रोजी मिरज तालुक्यातील नांद्रे येथे सागर प्रकाश राजोबा (२२) या तरुणाचा प्रेमप्रकरणातून खुन झाला होता. दोन दिवसांपूर्वी त्याचा मृतदेह नाल्याच्या पाईपमध्ये सापडला त्यानंतर नांद्रे येथे जाळपोळ, दगडफेकीचे प्रकार सुरु झाले. यामुळे गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. आता परिस्थिती नियंत्रणात...
  June 19, 06:07 PM
 • कोल्हापूर - गेल्या आठ दिवसांपासून मान्सूम पावसाने शहरात जोर धरला होता. पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीतही वाढ होत होती. राजाराम बंधाऱ्यावरून पाणी वाहत होते तर शहरातील विविध सखल भागांत पाणी साचून होते. काल दुपारपर्यंत पावसाच्या सरी सुरू होत्या. हा पाऊस चांगलाच जोर धरल्यास पूर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र पावसाच्या उघडिपीने ही शक्यता फोल ठरविली आहे. राधानगरी व तुळशी धरण क्षेत्रातही गेल्या 24 तासांत अतिवृष्टी झाली. राधानगरी धरण क्षेत्रात सर्वाधिक 93 मिलीमीटर, तुळशीत 84...
  June 19, 05:35 PM
 • कोल्हापूर - कागलमधील हमिदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधरण सभेत खासदार मंडलिकांनी तर कामगार मंत्री मुश्रीफ यांनी समांतर सभा घेऊन कागलमध्ये शनिवारी शक्तिप्रदर्शन केले. कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत खासदार मंडलिकांनी दोन पोटनियमांना मंजुरी देली तर हसन मुश्रीफांनी कारखान्याच्या को-जनरेशन प्रकल्पातील गैरव्यवहार उजेडात आणुन मंडलिकांचा अश्वमेघ रोखण्याची घोषणा केली. यादोन्ही सभा एकाच दिवशी होणार असल्याने पोलिस प्रशासनाला मोठी...
  June 19, 12:29 PM
 • सोलापूर: निर्मलग्राम योजनेला हरताळ फासणा-या बाराशे लोकप्रतिनिधींवर जिल्हाधिका-यांनी कारवाई केली आहे. सोलापूर जिल्ह्यात निर्मलग्राम अभियानाामध्ये स्वच्छतागृह न बांधलेल्या १२२२ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा धाडसी निर्णय जिल्हाधिका-यांनी घेतला आहे.याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकायाकडे पाठविण्यात येणार आहेत. स्वच्छतागृहे न बांधल्यामुळे सदस्यत्व रद्द करावे लागण्याचा राज्यातील हा पहिलाच मोठा निर्णय आहे. जिल्हाधिकारी जगदीश पाटील यांच्या या...
  June 19, 02:16 AM
 • सांगली - मुस्लिमांना व्हिलन ठरविणारा इतिहास बदलला गेला पाहिजे अशी मागणी अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जावेद पाशा कुरेशी यांनी केली आहे. येथील भावे नाट्य मंदिरात (साहित्यीक सय्यद अमीन नगरी) अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन जावेद पाशा कुरेशी बोलत होते. शुक्रवारी साहित्य संमेलनाचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी मंत्री जयंत पाटील, पतंगराव कदम, फैय्याज खान उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात कुरेशी म्हणाले, मुस्लिमांना व्हिलन ठरविणारा...
  June 18, 04:27 PM
 • कोल्हापूर: आजही शहरासह जिल्ह्यात संततधार कायम होती. शिरोळ, कागल, हातकणंगले तालुके वगळता सर्वत्र दिवसभर पाऊस सुरू होता. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 1२५ मि.मी. पावसाची नोंद झाली. पंचगंगा, भोगावती या नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.
  June 18, 02:10 AM
 • सांगली: प्रसिद्ध लेखिका कमल देसाई (वय 83) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. मेंदूज्वरामुळे मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. साहित्य, चित्रकला, सांस्कृतिक क्षेत्रांतील नव्या पिढीशी त्यांचा सतत संपर्क होता. कमल देसाई यांचा जन्म कर्नाटकातील यमकनमर्डी येथे १० नोव्हेंबर १९२८ रोजी झाला. सत्यकथा मासिकातील लेखनासह त्यांच्या काळा सूर्य, हॅट घालणारी बाई, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग या त्यांनी लिहिलेल्या कादबं-या गाजल्या. एक कप च्या या सिनेमात त्यांनी भूमिका केली होती.
  June 18, 01:09 AM
 • कोल्हापूर - शाळेच्या पहिल्या दिवशी दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत आज जंगी स्वरूपात झाले. गेल्या वर्षी केंद्र सरकारने शिक्षणाचा हक्क कायदा अमलात आणला आणि त्यामुळे शाळाबाह्य एकही मूल राहणार नाही याची दक्षता घेण्यास सुरवात झाली.पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वितरण झाले.मुलांना शाळेविषयी आकर्षण वाढावे, शिक्षणाची गोडी वाढावी यासाठी विविध उपक्रम वर्षभर राबवणार आहेत.
  June 16, 04:58 PM
 • कोल्हापूर - डोमेसाईलशिवाय प्रवेश मिळणार असल्याने अनेक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास टाकला आहे.दहावीनंतरच्या प्रवेशासाठी डोमेसाईल म्हणजेच राष्ट्रीयत्वाचा दाखला जोडणे आवश्यक होते. ते मिळवण्यासाठी तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय आणि सुविधा केंद्रात हेलपाटे मारावे लागत.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची तर याहून वेगळी पंचाईत. डोमेसाईल म्हणजे नेमके काय हेच समजत नसे. त्यामुळे त्यांची वेगळीच त्रेधा उडत असे. डोमेसाईल हातात पडले की पालक सुटलो बुवा एकदाचे म्हणत असत. आता या...
  June 16, 04:43 PM
 • कोल्हापूर - जिल्हा परिषद, वन खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला आज लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. उमेश गुलाबसिंग ठाकूर (वय 45, सध्या रा. राजलक्ष्मी अपार्टमेंट, साईक्स एक्स्टेंशन, राजारामपुरी, मूळ बनारस, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध स्वप्नील बाबासाहेब ठोंबरे (रा. जरगनगर) यांनी फिर्याद दिली.पोलिसांनी सांगितले, उमेश मित्रपरिवारातील ओळखीने तो तरुणांना नोकरीचे आमिष दाखवत होता. सात-आठ महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेत नोकरी...
  June 16, 04:36 PM
 • सांगली: मिरज येथील गजबजलेल्या भागातील प्राचीन अंबाबाईच्या मंदिरातून बुधवारी सकाळी १५ लाख रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे उघड झाले. चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व अंबाबाईच्या मूर्तीवरील सर्व दागिने आणि इतर चांदीच्या वस्तू घेऊन पोबारा केला. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्वरित श्वानपथकाचा पाचारण केले. मात्र श्वानाला चोरट्यांचा माग काढता आला नाही. गतवर्षी एका सराफी पेढीवर चोरट्यांनी दरोडा घालून अंदाजे सव्वा कोटी रुपयांचे...
  June 16, 03:29 AM
 • कोल्हापूर - केएमटीमध्ये गेल्या सतरा, आठरा वर्षांपासून रोजंदारीवर काम करणाऱ्या 42 चालक व वाहकांना सेवेत कायम करून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज मुंबईत नगरविकास राज्यमंत्री भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता देत श्री. जाधव यांनी दिले असून, तातडीने ज्येष्ठता यादी करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.
  June 15, 06:15 PM
 • कोल्हापूर - राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचा यंदाचा 26 वा राजर्षी शाहू पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू रा. कृ. कणबरकर आणि माजी आमदार बाबूराव धारवाडे यांना संयुक्तपणे देण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेस ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकर, डॉ. सुनीलकुमार लवटे, माहिती उपसंचालक वसंतराव शिर्के उपस्थित होते.
  June 15, 05:59 PM
 • सातारा - जिल्ह्यातील वनकामगार गेली कित्येक वर्षे रोजंदारीने वन विभागाकडे काम करत आहेत. गेले 4 ते 5 महिने त्यांचा रोजंदारीचा मासिक पगार मिळाला नाही. नुकताच शासनाने वनकामगारांना कायम करण्याचे आदेश दिले असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सर्व वनकामगारांना कायम करावे, अशी मागणी सातारा जिल्हा वनकामगारांनी दिली आहे. वनकामागारांनी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
  June 15, 05:54 PM
 • मिरजेतील प्रसिद्ध अंबामातेच्या मंदिरात चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. देवीच्या अंगावरील सुमारे १५ लाखांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. मंदिरातील पुजारी आज पहाटेच्या सुमारास पूजेसाठी पोहोचले असता कुलूप तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आसपासच्या नागरिकांना आणि पोलिसांना याची कल्पना दिली. पोलिसांनी मंदिरात प्रवेश करताच चोरीचा हा मोठा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने श्वान पथकास प्राचारण केले. मात्र तपासात काही फारशी प्रगती झाली...
  June 15, 01:51 PM
 • सातारा : ज्येष्ठ विचारवंत, ख्यातनाम वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे फलटण येथे 28 ते 30 जूनदरम्यान विभागीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्राचार्यांचे चरित्रकार, प्रसिद्ध लेखक प्रा. मिलिंद जोशी यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी सांगितले की, 28 जून रोजी सायंकाळी चार वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाचा प्रारंभ होणार आहे. तसेच सायंकाळी सहा वाजता श्रीमती रेणू गावसकर...
  June 13, 02:02 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात