जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Kolhapur

Kolhapur News

 • कोल्हापूर- कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी येत्या फेब्रुवारीमध्ये तीन दिवसांचा कला महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. तर एप्रिल-मे या दोन महिन्यात 2-2 दिवसाच्या 40 ते 50 विनाशुल्क पर्यटन सहली आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केली. पोलिस मुख्यालयासमोरील पोलिस उद्यानातील 6 एकर जागेमध्ये आयोजित केलेल्या महाराष्ट्रात प्रथमच होत असलेल्या कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिव्हलचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते...
  December 24, 09:02 PM
 • कोल्हापूर- पुणे-बंगळुरू महामार्गावरील कोगनोळी टोल नाक्यावर शनिवारी संध्याकाळी एका भरधाव ट्रकचा विचित्र अपघात झाला. ट्रक बेळगावहून कोल्हापूरच्या दिशेने जात होता. कोगनोळी टोलनाक्यावर ट्रक आल्यानंतर चालकाचा त्यावरील ताबा सुटला आणि ट्रक प्रचंड वेगाने टोलनाक्यावरील दुभाजकाला धडकला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. अपघातानंतर ट्रकच्या मालकाने धुम ठोकली. ही संपूर्ण घटना टोल नाक्यावरील सीसीटव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेची नोंद कोनगोळी पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे....
  December 24, 12:26 PM
 • कोल्हापूर- सलमान खानचा टायगर जिंदा है हा चित्रपट यशाचे नवे मापदंड प्रस्थापित करत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे कलेक्शन 35 ते 40 कोटी रुपये असु शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.सलमानचे चाहते याचे सेलिब्रेशन करतानाही जागोजागी दिसत आहेत. कोल्हापुरातील पद्मा चित्रपटगृहात तर त्याच्या चाहत्यांनी पडद्यासमोरच डान्स केला. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आला नाही - नाइट शो संपण्यापूर्वी फॅन्स थिएटरच्या स्क्रीनसमोर असणाऱ्या प्लॅटफॉर्मवर चझले आणि नाचु...
  December 23, 06:40 PM
 • कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेच्या 45 व्या महापौर पदावर काँग्रेसच्या स्वाती यवलूजे यांची तर उपमहापौर पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील पाटील यांची निवड करण्यात आली आहे. आजच्या विशेष सभेत नगरसेवकांनी हात उंचावून यासाठी मतदान केले. आज बोलावण्यात आलेल्या मनपाच्या विशेष सभेचे अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीईओ कुणाल खेमणार होते. महापौर पदाच्या निवडणुकीत स्वाती यवलूजे यांनी भाजप ताराराणी आघाडीच्या मनीषा कुंभार यांचा 15 मतांनी पराभव केला. यवलूजे यांना 48 तर कुंभार यांना 33 मते...
  December 22, 03:49 PM
 • कोल्हापूर- राज्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिका ही सर्वात लहान क्षेत्रफळ असलेली एकमेव महानगरपालिका आहे. मागील 44 वर्षे मागणी करूनही कोल्हापूर शहराची हद्दवाढ न झाल्याने आजतागायत कोल्हापूर शहराचा विकास खुंटला आहे. याबाबत वेळोवेळी आंदोलने, निदर्शने, तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना यासह विविध आयुधान्द्वारे शासनाचे लक्ष वेधले. शासन हद्दवाढ करण्याचा निर्णय होत नसल्याने आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेच्या पायऱ्यावर बेमुदत उपोषण सुरु केले. राज्यशासनाकडून हद्दवाढीऐवजी...
  December 19, 04:21 PM
 • कोल्हापूर- कोल्हापूरच्या रिक्त झालेल्या महापौर पदासाठी कॉंग्रेस पक्षाकडून नगरसेविका स्वाती यवलुजे निवडणूक लढवणार आहे तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी पक्षाने सुनील पाटील यांच्या नावाला पसंती दिली आहे. या पूर्वी महापौरपद हे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडे होते. आघाडीच्या नियमानुसार आता हे पद कॉग्रेस पक्षाकडे जाणार असल्याने विद्यमान महापौर हसीना फरास आणि उपमहापौर अर्जुन माने यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहे. कॉग्रेस पक्षाचे नेते सतेज पाटील यांनी स्वाती यवलुजे यांच्या तर...
  December 19, 11:17 AM
 • कोल्हापूर- शहरातील पोलीस उद्यानमध्ये तब्बल 6 एकराच्या प्रशस्त जागेवर फ्लॉवर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर स्ट्रीट ब्युटीफिकेशन प्रोजेक्ट (केएसबीपी) या एनजीओच्या वतीने या फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती एनजीओचे अध्यक्ष सुजय पित्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कसबा बावडा रोडवर 24 ते 28 डिसेंबर दरम्यान कोल्हापूर पोलीस उद्यानमध्ये सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे फ्लॉवर फेस्टिव्हल सर्वांसाठी खुले राहणार आहे. 24 तारखेला सकाळी 9 वाजता कावळा नाका येथून...
  December 16, 04:11 PM
 • कोल्हापूर- क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या वडिलांच्या भरधाव कारने शुक्रवारी पहाटे एका वृद्ध महिलेला जोरदार धडक दिली. उपचारादरम्यान वृद्धेचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी अजिंक्यचे वडील मधुकर रहाणे (५४) यांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आशाताई कांबळे (६७, रा. इचलकरंजी) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी पहाटे मधुकर रहाणे हे सहकुटुंब मुंबईहून कोल्हापूरमार्ग मालवण येथे जात होते. या वेळी स्वत: तेच कार चालवत होते. कागल येथे आल्यानंतर त्याचे कारवरील नियंत्रण...
  December 16, 01:39 AM
 • कोल्हापूर- सोवळं न नेसल्याने श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांना आज (शुक्रवार) करवीर निवासीनी श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारण्यात आला. मंदिराच्या गाभाऱ्यात जाताना सोवळं नेसणे अनिवार्य आहे, मात्र पाटणकर यांनी सोवळं न नेसल्याने पुरोहीतांनी त्यांना प्रवेशद्वारावरच रोखले. ही माहिती खुद्द पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. अंबाबाईच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखल्याने संतप्त झालेले पाटणकर म्हणाले की, राज्य सरकारने या हिवाळी अधिवेशनातच पुरोहितांना...
  December 15, 06:01 PM
 • कोल्हापूर-नव्याने स्थापन झालेल्या हुपरी नगरपरिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपच्या जयश्री गाठ या तब्बल 2000 मतांच्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिवसेनेच्या विमल जाधव या उमेदवाराचा पराभव केला. हुपरी नगरपरिषदेच्या 7 जागांवर भाजपचे तर ताराराणी विकास आघाडीला 5 आणि अंबाबाई विकास आघाडीला 2 , शिवसेनला दोन आणि 2 जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.बुधवारी या निवडणुकीसाठी 85.18 टक्के मतदान झाले होते.
  December 14, 03:40 PM
 • कोल्हापूर -पुस्तक न आणल्याने 500 उठाबशांची शिक्षा केल्याने एका विद्यार्थिनीच्या पायाला सूज आल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थिनीवर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी देवणे यांच्यावर गुन्हा दाखल करूनत्यांना अटक करण्यात आली आहे. तर चंदगडचे जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ यांनी तर या मुख्याध्यापिकेचे निलंबन झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असे ठणकावले आहे.जि. प. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी या मुख्याध्यापिकेचे वेतन...
  December 14, 03:25 PM
 • कोल्हापूर- गेल्या सहा वर्षांपूर्वी बंद पडलेली कोल्हापूर-मुंबई विमान सेवा आता 24 डिसेंबरपासून टेकऑफ करणार आहे. अशी माहिती कोल्हापूरचे युवराज आणि राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे. खा.संभाजीराजे यांनी केंद्रीयमंत्री अशोक गजपती राजू व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानसेवा सुरु होण्याबद्दल संपूर्ण कोल्हापूर वासियांतर्फे आभार मानले. एयर डेक्कनची ही विमानसेवा दर मंगळवार, बुधवार व रविवारी असून मुंबईवरून दुपारी १:१५ वाजता...
  December 13, 05:07 PM
 • कोल्हापूर- छातीवर चाकूने सपासप वार करून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. काल (बुधवार) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गांधी मैदानामध्ये ही घटना घडली. प्रणव उर्फ गणेश सुभाष बिंद (वय- 17, रा.खंडोबा तालिमीजवळ शिवाजीपेठ) असे या मृत तरुणाचे नाव आहे. दोन तरुण मंडळाच्या वादातून हा खून झाल्याची चर्चा असून संपूर्ण शिवाजीपेठ परिसरात वातावरण तणावपूर्ण आहे. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिस निरीक्षक अनिल गुजर अधिक तपास करत आहेत. बिंद कुटुंबीय मूळ गुजरातचे... गणेश बिंद...
  December 13, 03:23 PM
 • कोल्हापूर- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील कर्जमाफी अंतर्गत कोल्हापूर जिल्हयात जिल्हा मध्यवर्ती बँक व राष्ट्रीकृत बँकांच्या माध्यमातून आतापर्यंत 48 हजार 407 शेतकऱ्यांना 115 कोटी 61 लाख 87 हजार 282 रुपयांचा कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. यात 15 हजार 905 शेतकरी कर्जमाफी अंतर्गत तर 32 हजार 502 शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान योजनेचे आहेत. राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेच्या निकषांना पात्र असणारा एकही शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे...
  December 12, 07:28 PM
 • सांगली- पोलिस दलाची खाकी मलिन करणार्या बहुचर्चित अनिकेत कोथळे हत्येप्रकरणी मुख्य आरोपी आणि निलंबित पोलिस अधिकारी युवराच कामटे याच्या मामेसासर्याला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकार्यांनी (सीआयडी) अटक केली आहे. बाळासाहेब कांबळे असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला सीआयडीने कोर्टात हजर केले. कोर्टाने त्याला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अनिकेतच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी युवराज कामटे याला मदत केल्याचा दावा सीआयडीने केला आहे. सांगली पोलिसांनी दिलेल्या...
  December 12, 06:13 PM
 • कोल्हापूर- कोल्हापूरमहानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाअंतर्गत ( केएमटी ) उद्या मंगळवारी 12 डिसेंबर पासून पर्यटकांसाठी कोल्हापूर शहरात करवीर दर्शन बससेवा सुरू करण्यात येणार आहे. या बससेवेचा शुभारंभ कोल्हापूरच्या महापौर हसीना फरास यांच्या हस्ते करण्यात होणार आहे, अशी माहिती मनपा परिवहन सभापती नियाज खान यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूरची ओळख दक्षिण काशी म्हणून आहे.या शहरात साडेतीन शक्तीपीठापैकी एक संपुर्ण शक्तीपीठ असलेले अंबाबाई मंदिर आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरातून...
  December 11, 06:09 PM
 • मोहोळ- सख्ख्या मावस बहिणीशी प्रेमविवाह केल्यानंतर लष्करी जवानाच्या कुटुंबीयांनी तिची हत्या केल्याची घटना सोलापूर जिल्ह्याच्या येवतीमध्ये घडली आहे. जवानाची आई, वडील आणि भावाला अटक करण्यात आली आहे. येळवीचे रघुनाथ जमदाडे व येवतीचे सुभाष लेंडवे साडू आहेत. लेंडवेंंचा मुलगा श्रीकृष्ण पंजाबच्या पठाणकोटमध्ये सैन्यदलात आहे. श्रीकृष्ण व जमदाडे यांची मुलगी रेखा यांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघांनी गुपचूप लग्न केलेे. श्रीकृष्णच्या कुटुंबीयांना हे लग्न मान्य नव्हते. रेखाला घरी ठेवून...
  December 10, 02:34 AM
 • सांगली- पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्यावर असलेले महाराष्ट्र स्वाभिमानी संघटनेचे नेते नारायण राणे यांनी पु्न्हा एकदा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या बांधणीसाठी सांगलीत दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांनी बाळासाहेबांना त्रास दिल्याचा आरोप राणेंनी केला आहे. उद्धव यांनी आता त्यांनी तोंड बंद ठेवले नाही तर, त्यांनी काय त्रास दिला हे उडघडकीस आणेल, अशा शब्दांत राणेंनी इशारा दिला आहे. उद्धव यांनी माझ्यावर टीका...
  December 9, 06:20 PM
 • काेल्हापूर- माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची पहिली सभा शुक्रवारी काेल्हापुरात झाली. श्री महालक्ष्मी देवीचे अाशीर्वाद घेऊन राणेंनी अापल्या नव्या पक्षाच्या झेंड्याचेही या सभेत अनावरण केले. मनसेच्या झेंड्याप्रमाणेच स्वाभिमान पक्षाच्या झेंड्यावरही भगवा, निळा व हिरव्या रंगाचा समावेश अाहे. तसेच झेंड्याच्या मध्यभागी वज्रमूठचे चिन्ह लावण्यात अाले अाहे. मुंबईतील परप्रांतीय फेरीवाल्यांविराेधातील अांदाेलनात मनसेच्या भूमिकेचे समर्थन करणाऱ्या...
  December 9, 04:08 AM
 • कोल्हापूर- गोकुळ दुध संघावर टीका करून गोकुळची बदनामी केल्याप्रकरणी जिल्ह्यातील लाखो दुध उत्पादकांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. मोर्चात महादेवराव महाडिक, माजी आमदार पी.एन.पाटील, खासदार धनंजय महाडिक, गोकूळचे अध्यक्ष विश्वास पाटील, गोकुळचे सर्व संचालक, दुध संस्था व दुध उत्पादक सहभागी झाले आहेत. सतेच पाटील- धनंजय महाडिक यांच्यात संघर्ष गोकुळ दुध संघावरील वर्चस्वावरुन कोल्हापूरमधील राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक आणि...
  December 7, 03:18 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात