जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Kolhapur

Kolhapur News

 • कोल्हापूर- शहरातील स्पेशालिटी हॉस्पिटल चालवणाऱ्या पाच नामवंत डॉक्टरांच्या हॉस्पिटल व निवासस्थानांवर आज आयकर विभागाने धाडी टाकल्या. या धाडीमध्ये कोट्यावधीची बेहिशोबी मालमत्ता आढळून आल्याची चर्चा आहे. या धाडसत्रामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. आज पहाटे चार वाजता पुणे-औरंगाबाद आयकर विभागाचे शंभरहून जास्त अधिकारी कोल्हापुरात पोहोचले. कोल्हापूर येथील मध्यवर्ती बसस्थानकाजवळील हॉटेल इंटरनॅशनल जवळ स्थानिक शंभरहून अधिक पोलिसांना बंदोबस्तासाठी सोबत घेऊन 25 वाहने शहरातील...
  December 6, 08:47 PM
 • सांगली/कोल्हापूर- आंबोली येथे सापडलेला मृतदेह हा अनिकेतचाच असल्याचे डीएनए चाचणीच्या अहवालात स्पष्ट झाले आहेत. सीआयडीचे संजय कुमार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सांगलीच्या पोलिस कोठडीत पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे अनिकेत कोथळे या तरुणाचा मृत्यू झाला होता. यानंतर तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्यांच्या साथीदारांनी अनिकेत याचा मृतदेह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे नेऊन जाळला होता. हा खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सीआयडीने आंबोली येथून अर्धवट जळलेल्या...
  December 5, 04:45 PM
 • कोल्हापूर- कॉंग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यानंतर आपल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करणारे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच पश्चिम महाराष्ट्राच्या दौरावर येत आहेत.त्यांची पक्ष स्थापनेनंतर पहिलीच जाहीर सभा कोल्हापूरमध्ये होणार आहे, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. नारायण राणे हे 8 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी खासगी हेलिकॉप्टरने कोल्हापूर विमानातळावर आगमन...
  December 5, 04:19 PM
 • कोल्हापूर- काँग्रेसचे सरकार नको म्हणून भाजप सरकार सत्तेवर आणले. मात्र, हे सरकार तर शेतक-यांच्या जीवावरच उठले आहे,अशा शब्दात राज्य आणि केंद्रीय सरकारबद्दल तीव्र संताप व्यक्त करुन भाजप सरकार मुजोर असल्याची जोरदार टीका आज खासदार राजू शेट्टी यांनी केली.ते सतेज कृषी प्रदर्शनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले ज्यांनी सत्तेवर आणले त्याच शेतकऱ्यांच्या जीवावर उठत,त्यांच्याशीच मुजोरी करण्याचा डाव या सरकारने केला आहे.शेतीसाठी लागणाऱ्या शेती अवजारांवर आणि ट्रॅक्टर...
  December 5, 01:08 PM
 • कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात बीएसएनएलचे नवीन 123 टॉवर उभारणीला मंजुरी देण्यात आली आहे . त्यामुळे आता जिल्ह्यातील ग्रामीण नागरिकही रिचेबल होणार आहेत. यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. ग्रामीण भागाला बीएसएनएलच्या दूरध्वनी आणि मोबाईल सेवेवर अवलंबून रहावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. पण टॉवरची संख्या कमी असल्याने, रेंजच नसल्याचा अऩुभव आहे. परिणामी ग्रामीण भागात अनेक ठिकाणांची संपर्कच होत नाही. दुर्गम वाड्या-वस्त्यांची तर आणखीनच बिकट...
  December 3, 11:18 PM
 • कोल्हापूर- आंबोली येथील हिरण्यकेशी फाट्या जवळ दारुच्या नशेत सुसाट वेगाने जाणाऱ्या स्वीफ्ट कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट पुलाचा कठडा तोडून सुमारे 50 फुट खाली नदीत कोसळली घटना घडली. या अपघातात कारमधील चौघेजण ४ जण आश्चर्यकारकरित्या बचावले. एमपी ०९ सी ए ७६१० ही स्विफ्ट कार गोव्याहून कोल्हापुरच्या दिशेने जात होती. यात चालकासह अन्य तीघे दारूच्या नशेत होते. कार चालक सचिन नाना निंबारे (36),मनीष राधाकीसन मरमठ (42),निरज देवेंद्रकुमार सूरी (36),जितेंद्र लक्ष्मणसिंग पिसोदीया (45) सर्वजण जखमी झाले...
  December 3, 10:44 PM
 • कोल्हापूर- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी आज (शनिवार) सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उभय नेत्यांमध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याच्या तसेच विविध प्रश्नांवर लोकसभेत एकत्र आवाज उठवण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. याभेटीदरम्यान राजू शेट्टी आणि अशोकराव चव्हाण यांनी गळाभेट घेतल्याने तर्कवितर्क लढवले जात आहे. अशोक...
  December 3, 03:51 AM
 • कोल्हापूर- अभिनेत्री सागरिका घाटगे आणि टीम इंडियाचा माजी गोलंदाज झहीर खान या नवदाम्पत्याने कागलमधील गैबी दर्ग्यावर अर्पण चादर केली. तसेच प्रभु रामचंद्राचेही घेतले दर्शन घेतले कोल्हापूरचा जावई महालक्ष्मीच्या चरणी.. झहीर खान आणि सागरिकाने काल (शुक्रवार) रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी करवीर निवासिनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. देवस्थान समितीने अंबाबाईची मूर्ती देवून त्यांचा सन्मान केला. कोल्हापूरच्या जावायाला पाहाण्यासाठी मंदिरात चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. झहीर आणि चक दे...
  December 2, 05:16 PM
 • कोल्हापूर- पत्नीची वारंवार छेड काढणाऱ्या समीर बाबासो मुजावर ( वय-28, रा. सुभाष नगर) या तरुणाचा आज (शनिवार) सकाळी 8 वाजता चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडली. आरोपी अनिल रघुनाथ धावडे (वय-38) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर बाबासो मुजावर हा अनिल धावडे यांच्या पत्नीला त्रास देत होता. तिची भर रस्त्यावर छेड काढत होता. त्यामुळे अनिल याने त्याला वेळोवेळी ताकीत दिली होती. तरीही समीरच्या वागण्यात सुधारणा होत नसल्याने अनिल याने आपल्या बागलचौक येथील...
  December 2, 02:06 PM
 • कोल्हापूर- खासदार धनंजय महाडिक म्हणजे जत्रेतला किल्लीवर धावणारे ट्रॅक्टर आहे, अशा बोचरी टीका माजी गृह राज्यमंत्री आणि विधानपरिषदेचे विद्यमान आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. आमदार पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. जत्रेतल्या ट्रॅक्टरला किल्ली दिली तेवढाच तो ट्रॅक्टर चालतो. यापेक्षा वेगळी स्थिती खासदार महाडिक यांची नसल्याचे ते म्हणाले. खासदार धनंजय महाडिक यांनी काल दूध उत्पादकांच्या चुलीत सतेज पाटील यांनी पाणी ओतण्याचे काम करू नये, आमच्याशी वैर असेल तर राजकीय मैदानात उतरून दोन...
  December 1, 02:24 PM
 • कोल्हापूर/सातारा- राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंनी आज एक वक्तव्य केले. त्याद्वारे त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. उदयनराजे नेहमी राजकारणावर बोलतात. आज मात्र, त्यांनी अनाथ मुलांबद्दल आपले मत मांडले. अनाथ आश्रमातली सारी मुलं उद्या माझ्या गँगमध्ये असतील, असे विधानही उदयनराजेंनी यावेळी केले. या आश्रमशाळेमध्ये उदयराजेंनी ब्लँकेटचे वाटप केले. त्यावेळी ते बोलत होते. एक सांगतो, त्याचबरोबर एक खंतही सांगतो. आम्हाला आई-बाबा मिळाले, तुम्हाला मिळाले नाही. पण एकच...
  November 30, 07:17 PM
 • सांगली/कोल्हापूर- अनिकेत कोथळेचा खून हा पोलिस खात्याला लागलेला कलंक असून दोषींना फाशी द्यावी अशी मागणीकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीरामदास आठवले यांनी केली आहे. पोलिस कोठडीत थर्ड डिग्री वापरणे कायदेशीररित्या योग्य नाही. जे पोलिस थर्ड डिग्रीचा वापर करत असतील त्यांना पोलिस खात्यात ठेऊच नये असे मतही आठवले यांनी व्यक्त केले. पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
  November 30, 01:57 PM
 • सातारा- पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर खांबाटकी बोगद्याजवळ नागपूरहून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात झाला आहे. यामध्ये 12 विद्यार्थी जखमी झाले असून 1 विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. उपचारासाठी त्याला पुण्यात हलवण्यात आले आहे. बुधवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. खांबाटकी बोगदा पार करुन पुढे जाणा-या विद्यार्थ्यांच्या बसला मागून येणा-या दुधाच्या टँकरने धडक दिली. त्यामुळे बसची धडक पुढे असलेल्या ट्रकला बसली. नंतर तो ट्रक पुढे...
  November 30, 09:48 AM
 • कोल्हापूर- गेल्या तीन वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजप-शिवसेना सरकार सर्वच पातळीवर सपशेल अपयशी ठरले आहे.पोकळ आश्वासन देऊन जनतेची फसवणूक करणाऱ्या या सरकारबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.राज्य सरकारच्या या अनागोंदी आणि जनविरोधी कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल आंदोलन केले.या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री आणि विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जबाजारी राज्य,विजेच्या...
  November 29, 02:50 PM
 • सांगली- कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या अनिकेत कोथळेच्या दोन भावांनी मंगळवारी स्वत: वर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, अनिकेतच्या मृत्यूची सीआयडी चौकशी न करता सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिस निरीक्षकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून अनिकेतचा मृतदेह जाळून टाकून, दोन...
  November 29, 01:20 AM
 • कोल्हापूर-चार चाकी गाडीच स्वप्नं आयुष्यभर पाहिलं..अखेर एका वस्त्रांच्या दुकानाने दिवाळीच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या लकी ड्रॉ द्वारे नशिब फळफळले आणि चार चाकीचे स्वप्न पूर्ण ही झालं ... चार चाकी गाडी ताब्यात घेतली आणि हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने याच कार विजेत्या दिलीप कांबळे यांचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबातील सदस्यांचा आनंद दुःखाच्या सागरात मावळून गेला. याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातल्या वडणगे गावातील सर्वसामान्य कुटुंबातील चंद्रकांत...
  November 28, 10:37 PM
 • मुंबई/कोल्हापूर- गडहिंग्लजमधील शिक्षक विजयकुमार गुरव यांच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. विजयकुमार यांच्या पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने त्यांचा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. खूनप्रकरणी विजयकुमार यांची पत्नी जयलक्ष्मी गुरव आणि तिचा प्रियकर सुरेश चोथे या दोघांना मुंबईतील लोअर परळमधून अटक करण्यात आली आहे. 11 नोव्हेंबरला सिंधुदुर्गच्या आंबोली कावळेसाद येथे छिन्नविछीन्न अवस्थेत एक मृतदेह आढळून आला होता. त्याचवेळी गडहिंग्लज येथून आपले शिक्षक पती बेपत्ता झाल्याची...
  November 28, 08:16 PM
 • कोल्हापूर-शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन तंत्रज्ञान आणि माहिती मिळावी या उद्देशाने सतेज कृषी आणि पशु प्रदर्शन येत्या 1 ते 4 डिसेंबर दरम्यान कळंबा येथील तपोवन मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून देशविदेशातील नामवंत कंपन्यांचा सहभाग या प्रदर्शनात असणार आहे, अशी माहिती आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. प्रदर्शनाचे उद्घाटनास1 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री पतंगराव कदम, आमदार हसन...
  November 28, 06:50 PM
 • कोल्हापूर- चोरीच्या उद्देशाने बंगल्यात आलेल्या चोरट्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे चोरट्याचे इतर साथीदार त्याचा मृतदेह सोडून पसार झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील कराडमधील चौंडेश्वरीनगरातील गजानन हौसिंग सोसायटीजवळील पायस एंटरप्रायझेस बंगल्यात ही घटना आज (मंगळवार) उघडकीस आली. सूत्रांनुसार, तत्पूर्वी चोरट्यांनी कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. मृत चोरट्याची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र, त्याच्यासोबत आणखी...
  November 28, 03:20 PM
 • मुंबई/कोल्हापूर- अवघ्या आपल्या लेखनामुळे परिचित असलेले नाव म्हणजे विश्वास पाटील हे होय. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी म्हणून वावरणाऱ्या विश्वास पाटील यांची प्रशासकीय निवृत्ती मात्र अतिशय वादग्रस्त ठरली. निवृत्तीआधी 5 दिवसांत त्यांनी झोपुच्या 450 फायली निकालात काढल्या. 28 नोव्हेंबर 1959 रोजी त्यांचा कोल्हापूर जिल्ह्यात जन्म झाला. चंद्रमुखी, पांगिरा, पानिपत, महानायक, लस्ट फॉर लालबाग, संभाजी या त्याच्या कादंबऱ्या गाजल्या. तर रणांगण हे नाटक व नॉट गॉन विथ द विंड हा त्यांचा लेख संग्रह गाजला....
  November 28, 03:04 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात