Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Kolhapur

Kolhapur News

 • काेल्हापूर- राज्याची सत्ता एकहाती शिवसेनेकडे द्या, त्यानंतर कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणून दाखवताे की नाही बघा, असे अावाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी येथील जाहीर सभेत केले. असे असले तरी मुख्यमंत्रिपद हे माझे स्वप्न नाही, मात्र शेतकऱ्यांच्या अाक्राेशाकडे लक्ष देण्याची गरज अाहे, असेही ते म्हणाले. कोल्हापूरकर सारखे शिवसेनेकडे मंत्रिपद मागतात. परंतु आधीच या जिल्ह्यात मंत्रिपदाचे एक पार्सल आहे, त्यांनी जिल्ह्याच्या...
  November 25, 07:34 AM
 • काेल्हापूर- मडगाव (गोवा) येथून मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी आराम बसला शुक्रवारी सकाळी लागलेल्या अागीत दाेन जणांचा मृत्यू झाला. काेल्हापूरजवळ ही दुर्घटना घडली. बंटी भट (२२) आणि विकी भट (२४) अशी मृतांची नावे अाहेत, हे दाेघेही पुण्याचे रहिवासी अाहेत. सुदैवाने बसमधील इतर १६ प्रवाशांना वाचवण्यात यश अाले. या दुर्घटनेत बस जळून खाक झाली. गगनबावडा आणि कळे पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी पहाटे ३ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या आत्माराम ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला...
  November 25, 02:32 AM
 • कोल्हापूर- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यानिमित्ताने 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते आत्तापासूनच कामाला लागल्याची चर्चा आहे. आज शुक्रवारी प्रथम कोल्हापूर, उद्या 25 नोव्हेंबर रोजी सांगली आणि 26 रोजी सातारा या जिल्ह्यांचा दौरा ते करणार आहेत. यानिमित्ताने उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा, शेतकरी, व्यापारी तसेच कामगारांशी...
  November 24, 12:04 PM
 • कोल्हापूर- दिल्ली येथील किसान मुक्ती संसदेहून परतलेली स्वाभिमानी एक्स्प्रेस ट्रॅक चुकल्याने नियोजित वेळेपेक्षा पाच तास उशिरा सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी कोल्हापुरात पोहचली. यामुळे रेल्वेत बसून कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. मथुरेत मिळाला चुकीचा सिग्नल मथुरेत स्वाभिमानी एक्स्प्रेसला चुकीचा सिग्नल मिळाला. त्यामुळे तब्बल 160 किलोमीटरपर्यंत गाडी मथुरेहून बानमोरच्या दिशेने धावली. बानमोर येथे शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि रेल्वे प्रशासनाचा निषेधही केला....
  November 23, 09:48 PM
 • मुंबई/कोल्हापूर- अनिकेत कोथळे खून प्रकरणात बडतर्फ पोलिस निरीक्षक युवराज कामटेला पाठीशी घालणाऱ्या सांगलीच्या शहर उपअधीक्षक दीपाली काळे यांची सोलापूरला सहायक उपायुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. सांगलीचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचीही बदली करण्यात आली आहे.नागपूरला राज्य राखीव दलात त्यांची बदली करण्यात आली आहे. कोल्हापूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांची सांगली पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
  November 23, 06:40 PM
 • कोल्हापूर- पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी 24 नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत, अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, सुजित मिणचेकर,जिल्हा प्रमुख संजय पवार,विजय देवणे, आणि मुरलीधर जाधव यांच्या सोबत शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस उपस्थित होते. अरूण दुधवडकर म्हणाले की, 24...
  November 22, 03:35 PM
 • कोल्हापूर- दिल्लीत जंतर-मंतरवरमोर्चा करुन परत येणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची गाडी चुकीच्या दिशेने धावली. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कोल्हापुरातून सुमारे 1500 शेतकरी 4 दिवसांपूर्वी दिल्लीत गेले होते. हे आंदोलन झाल्यानंतर परतीच्या प्रवासाला शेतकरी निघाले. त्यावेळी या विशेष गाडीचा रस्ता चुकला आहे. मथुरेत मिळाला चुकीचा सिग्नल मथुरेत स्वाभिमानी एक्स्प्रेसला चुकीचा सिग्नल मिळाला. त्यामुळे तब्बल 160 किलोमीटरपर्यंत गाडी...
  November 22, 03:15 PM
 • कोल्हापूर-कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयासमोर साक्षीदार म्हणून जबाब देणाऱ्या संजय साडवीलकर याने आपण काही वर्षांपूर्वी अवैध शस्त्रे विकत असल्याचा व दुरुस्त करत असल्याचा जबाब दिला होता. अशी शस्त्रे त्यांनी कुणाकुणाला विकली आणि त्यातून पुढे काय झाले याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आणि सद्या तुरुंगातून जामिनावर सुटलेल्या समीर गायकवाडने कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिस ठाण्यात केली...
  November 21, 05:51 PM
 • सांगली/कोल्हापूर- अनिकेत कोथळे खूनप्रकरणी सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तत्पूर्वी शहर पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज डिलीट केल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली होती. अनिकेत कोथळे याच्या पोलिस ठाण्यातील मृत्यू आणि त्यानंतरची सर्व घटना पोलिस ठाण्यातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. मात्र संशयित कामटे याने सीसीटीव्हीमधील हे सर्व फुटेज डिलीट करुन सीसीटीव्ही बंद पाडला होता. या खून प्रकरणात सगळ्यात महत्त्वाचे हे पुरावे होते....
  November 21, 03:11 PM
 • सातारा/पुणे/कोल्हापूर- छत्रपतीचे शिवाजी महाराजांचे वंशज आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि दमयंतीराजे भोसले यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस आज साजरा केला आहे. सातारकर या ट्विटर हँडलवर उदयनराजे आणि दमयंतीराजे भोसले यांचे दोन फोटो आहेत. यात त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यात दोघे जण एक कापताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये राजे दमयंतीराजेंना केक भरवत आहेत. उदयनराजे यांचे लग्न 20 नोव्हेंबर 2003 रोजी झाले आहे. त्यामुळे...
  November 20, 06:38 PM
 • सांगली/कोल्हापूर- अनिकेत कोथळे खूनप्रकरणी शहर पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी सीआयडीने एकाला ताब्यात घेत त्याची चौकशी केली आहे. अनिकेत कोथळे याच्या पोलिस ठाण्यातील मृत्यू आणि त्यानंतरची सर्व घटना पोलिस ठाण्यातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. मात्र संशयित कामटे याने सीसीटीव्हीमधील हे सर्व फुटेज डिलीट करुन सीसीटीव्ही बंद पाडला होता. या खून प्रकरणात सगळ्यात महत्त्वाचे हे पुरावे होते. मात्र ते डिलीट करण्यात आले. याप्रकरणी ज्या...
  November 20, 02:33 PM
 • पुणे/कोल्हापूर-वीरांगणा झाशीची राणीलक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका तांबे होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता. धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या....
  November 19, 12:01 AM
 • सांगली- शिराळा तालुक्यातील डोंगरावरील मंदिरात एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. मृतदेहाच्या बाजूला लिंबू, काळी बाहुली सापडल्याने नरबळीचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. शिराळा तालुक्यात शिरची शिवरवाडी येथे रस्त्यापासून दोन किलोमीटर अंतरावर एक डोंगर आहे. या डोंगरावर चक्रोबा मंदिर असून या मंदिरात भाविकांची फारशी वर्दळ नसते. सध्या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरु असून शनिवारी सकाळी मजूर कामासाठी मंदिरात गेला....
  November 18, 06:18 PM
 • कोल्हापूर/सांगली-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्यानेच सरसकट शेतकरी कर्जमाफी केली नाही, असा दावा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केला आहे. संपूर्ण कर्जमाफी होण्यास उशीर लागणार आहे, पण त्याचे चांगले परिणाम दिसतील असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांच्या सक्षमीकरण कार्यशाळेच्या निमित्ताने सांगलीत आल्यावर त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी...
  November 18, 04:27 PM
 • मुंबई/कोल्हापूर/सांगली-जनता म्हणजे किडा-मुंगी वाटते काय? आणिआमदारांना पाच पाच कोटी देऊन पक्षात घेण्यासाठी भाजपकडे कुठून पैसे आले? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.मनसेचे राज ठाकरे पाच पाच कोटी देऊन आपले नगरसेवक पळविल्याचे सांगत आहेत, तर खुद्द भाजप प्रदेशाध्यक्षांचे जावई आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भाजपकडून सुरू असलेला घोडेबाजार चव्हाट्यावर आणला आहे, त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी सांगितले. अनिकेत कोथळेच्या कुटुंबीयांची भेट पोलिस मारहाणीत...
  November 18, 03:31 PM
 • कोल्हापूर- मुंबईच्याकळंबोलीमधून सहायक पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत एकमहिला पोलिस अधिकारीगेल्या दीड वर्षापासूनबेपत्ता झाली आहे. अश्विनी राजू गोरेअसे या महिला पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. वारंवार तक्रार करूनही याप्रकरणाचा तपास करण्यास दस्तुरखुद्दपोलिसच टाळाटाळ करतआहेत, असा खळबळजनकआरोपयामहिला पोलिस अधिकाऱ्याच्या पतीनेआणि वडिलांनीकेला आहे. पोलिस ठाण्यात सिनिअर पीआय म्हणून कार्यरत असणाऱ्या अभय कुरुंदरकर या पोलिस अधिकाऱ्यानेच प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा घातपात केल्याचा...
  November 18, 01:10 PM
 • कोल्हापूर- शारीरिक सुखाच्या मागणीसाठी नकार दिल्याने चुलत दीराने डोक्यात दगड घालून भावजयीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे.लक्ष्मी टेकडी परिसरात ही घटना घडली. राजाराम गुंडू कागले (वय- 42) असे आरोपीचे नाव आहे. कागल पोलिसांनी आरोपी राजाराम गुंडू कागले याला गजाआड केले आहे. आरोपीला कोर्टासमोर हजर केले असता त्याला 5 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पी.आय.पाटील,भालके,कागल पोलीस, करवीर पोलीस ठाण्याचे डीबी कर्मचारी,सायबर सेल व कोल्हापूर एलसीबी, हातकणंगले पोलिस ठाण्याचे...
  November 17, 09:12 PM
 • कोल्हापूर- सासरा आणि दिरासह जाऊ आणि तिच्या आई-वडिलांकडून शारीरिक, मानसिक त्रास, मारहाण केला जात असल्याने आणि पोलिसांना वारंवार तक्रार देऊनही कारवाई केली जात नसल्याने कंटाळून अखेर शफीका समीर शिकलगार (रा.इचलकरंजी) या विवाहितेने पती आणि दोन मुलांसह कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. पोलिसांनी हस्तक्षेप करत शफीका हिच्या हातातून रॉकेलचा डबा हिसकावून घेऊन तिला ताब्यात घेतले. या...
  November 17, 04:37 PM
 • कोल्हापूर- वारंवार तक्रार देऊनही पोलिस कारवाई करत नाही, असा आरोप करत कोल्हापूर पोलिस अधिक्षक कार्यालयात एका दाम्पत्याने 3 मुलांसह अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्वरीत हस्तक्षेप करुन दाम्पत्याची समजून काढल्यामुळे पुढील हानी टळली. शिकलगार असे या दाम्पत्याचे आडनाव असल्याची माहिती आहे. ते इचलकरंजी येथील रहिवासी आहे.
  November 17, 03:44 PM
 • मुंबई- सांगलीतील अनिकेत कोथळेच्या कोठडीतील मृत्यूनंतर गृह विभाग खडबडून जागा झाला आहे. पोलिस कोठडीतील आरोपींचे मृत्यू रोखण्यासाठी आणि तुरुंगात आरोपींना चांगली वागणूक देण्यासंदर्भात महत्त्वाची पावले गृह विभागाने उचलली आहेत. यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची समिती नियुक्त करण्याचा निर्णय गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला. केसरकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर आहे, नगर गोळीबाराची स्थानिक दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी...
  November 17, 12:27 AM
 
जाहिरात

RECOMMENDED